Back
भंडाऱ्यात संततधार पावसाने वाहतूक ठप्प, प्रशासनाची दक्षता वाढली!
Bhandara, Maharashtra
Pravin Tandekar Bhandara
Slug - 0707_BHA_RAINFALL
FILE - 1 VIDEO
भंडाऱ्यात पहाटेपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद........जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने दक्षता घेण्याचे आवाहन.....
ANCHOR :- भंडारा जिल्ह्यात कालपासून पावसाची रिपरिप सुरू होती. आज सकाळपासून मात्र संततधार पाऊस पडतोय यामुळे सर्वत्र पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन भंडाराच्यावतीने अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. तशा सूचनाही देण्यात आल्या असून त्यामध्ये भंडाऱ्याच्या वैनगंगा नदीवरील भंडारा ते कारधा लहान पुल, तुमसर तालुक्यातील गोंदेखारी ते टेमनी, चुल्हाड ते सुकळी नकुल अशा मार्गांचा समावेश आहे.
.....
.....
.....
4
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0707ZT_CHP_17_PICKUP_SEIZ
( single file sent on 2C)
टायटल:--चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी, महाराष्ट्र-तेलंगणा राज्य सिमेवर नाकाबंदी करुन गौवंशीय जनावरांची अवैध वाहतुक करणारी १७ पिकअप वाहने पकडली, ५३ गौवंशीय जनावरांची सुटका, तब्बल २४ आरोपी अटकेत
अँकर:-- चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची पथके चंद्रपूर जिल्हयात पेट्रोलिंग करत असताना मध्यरात्री अतिदुर्गम पोलीस स्टेशन टेकामांडवा हद्दीत मोठ्या गो-तस्करीची गुप्त माहिती मिळाली. चिखली खुर्द वन तपासणी नाका येथे सापळा रचुन एकुण १७ पिकअप वाहने थांबवून त्यातील एकुण ५३ गौवंशीय जनावरांची सुटका केली. ५३ गौवंशीय जनावरे कत्तलीकरीता वाहतुक करणा-या एकुण २४ आरोपीना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत वाहने व गौवंशीय जनावरे असा एकुण दीड कोटीहुन अधिक रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी जात असलेल्या या तस्कर साखळीतील सर्व 24 आरोपी जीवती तालुक्यातील रहिवासी असून सीमावर्ती भागाचा फायदा घेत हा धंदा चालविला जात होता.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
ठाणे ते कल्याण 20 किलोमीटरसाठी हेलिकॉप्टर कशाला ?
जमिनीवर या ...रस्त्याने आले असतील तर पलावाची फुलाचे परिस्थिती बघता आली असती ..
मनसे नेते राजू पाटील यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना टोला
Anchor :- आषाढी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याण मध्ये आले होते यावेळी ठाण्याहून ते हेलिकॉप्टरने कल्याण मध्ये दाखल झाले व तिकडून ते गाडीने बिर्ला कॉलेज व त्यानंतर बिर्ला मंदिरात गेले उपमुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावरून मनसेचे नेते राजू पाटील यांनी टोला लगावला.राजू पाटील म्हणाले की ,"आषाढी एकादशीनिमित्त पालकमंत्री कल्याण मध्ये विठ्ठल मंदिरात जाणार होते.. ते ठाण्यावरून हेलिकॉप्टरने पलावाला येणार होते व तिकडून ते शहाडला विठ्ठल मंदिरात जाणार होते मात्र वीस किलोमीटर साठी हेलिकॉप्टर कशाला पाहिजे अशी टीका केल्यानंतर ते हेलिकॉप्टरने भिवंडीला गेले तेथून कल्याणला आले.पालकमंत्री या पुलावरून आले असते त्यांना परिस्थिती कळाली असती.. कधीतरी जमिनीवर या फक्त आपल्या लाडक्या बबड्याचे काम बघायला येऊ नका लोकांच्या देखील समस्या बघा .. असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला ..
Byte :- राजू पाटील मनसे नेते
0
Share
Report
Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 0707_BHA_HOSPITAL
FILE - 2 VIDEO
भंडारा जिल्ह्याच्या तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाणी गळती.....
ANCHOR :- भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे असलेल्या सुभाष चंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात ठिकठिकाणी गळती लागली असल्याने महिलांच्या डिलिव्हरी वार्डमध्ये ठीक ठिकाणी पाणी साचलेले दिसून येत आहे. बाळंत महिलांचा हा वार्ड असल्याने अशा या पाण्याच्या गळतीमुळे त्यांच्या तब्येतीवर परिणाम होण्याची किंवा घसरून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांनी याची दक्षता घेऊन उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यानंतर मनसे नेते राजू पाटील यांचे सडकून टीका
काहीजण भुंकत असतात आम्ही त्याकडे लक्ष देत नाही
ते राज्याचे प्रतिनिधित्व करतात त्यापेक्षा जास्त दहा पट जीएसटी आपला एकटा महाराष्ट्र राज्य जमा करतो ते आम्हाला शिकवणार ?
तुमच्याकडे गुन्हेगारी होते ,ज्या खंडण्या व्यापाऱ्यांना अपहरण करून वसूल केल्या जातात त्यासाठी तुमच्या जातीचे व्यापारी तिथे राहत नाहीत याचा कुठेतरी त्यांनी आता परीक्षण करा
आता कुठे उत्तर प्रदेशची परिस्थिती सुधारते आहे
तिथे पोषक भूमी नाही म्हणून ते महाराष्ट्रात आलेत
स्वतःचे आत्मपरीक्षण आत्मचिंतन करून चिंतन करा
Byte :- राजू पाटील (मनसे नेते)
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
अँटिकरप्शन विभागाने ठेकेदार ची आणि सेल कंपनीची चौकशी करावी... राजू पाटील
पलावा ब्रिज वरुण कल्याण डोंबिवलीत राजकारण तापले..
अनेक वर्षांपासून पलावा ब्रिज चर्चे नंतर ही राजकारण सुरु..
मनसे ठाकरे गटाने केले होते आंदोलन..
ठाकरे गट मनसे आणि शिवसेना शिंदे गटात जुंपली..
अर्धवट पुलाचे उदघाटन करणाऱ्या आणि पुलाचे नित्कृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल करा ..ठाकरे गटाची मागणी..
"पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे..भीतीपोटी पुलाचे घाईत लोकार्पण केलं ..सत्ताधारी ठेकेदाराला काही बोलत नाहीत ते खाल्ल्या मिठाला जागतायत ..मनसे नेते राजू पाटील यांची टीका.
पलावा पुलावर चार तारखेला एकही अपघात नाही ,विरोधकांना काय टीका करायचे ते करून देत आम्ही विकासाच्या माध्यमातून उत्तर देणार - शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांचे विरोधकांना प्रत्युत्तर
Anchor :- चार तारखेला उद्घाटन करण्यात आलेल्या पलावा पुलावरून कल्याण डोंबिवलीत पुन्हा एकदा शिवसेना आणि मनसे ठाकरे गट आमने-सामने उभे ठाकलेत.ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपक म्हात्रे यांनी डीसीपी अतुल झेंडे यांची भेट घेत या अर्धवट पुलाचे उद्घाटन करणाऱ्यांसह पुलाचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर संतोष मनुष्य व त्याचा गुन्हा दाखल करा अशी मागणी केलीये .तर मनसे नेते माजी आमदार राजू पाटील यांनी सत्ताधाऱ्यावर सडकून टीका करताना ,"पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे..भीतीपोटी पुलाचे घाईत लोकार्पण केलं ..सत्ताधारी ठेकेदाराला काही बोलत नाहीत ते खाल्ल्या मिठाला जागतायत..या पुलावर लोकांचे बळी जातील त्यामुळे पुलाच्या रस्त्याची दुरुस्ती करून मगच पूल सूरु करावा अशी मागणी केली .
तर याबाबत शिवसेना शिंदे गटाचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी पुलावर डांबर आणि ऑइल असल्याने बाईक स्लिप होत होत्या त्यामुळे स्टोन क्रेशर टाकला. या स्टोन क्रेशरचे फोटो टाकून विरोधक टीका करतात चार तारखेपासून आपण सुरू झालं पाच तारखेपासून आत्तापर्यंत एकही अपघात झालेला नाही . विरोधकांना काय टीका करायचे ते करून देत आम्ही विकासाच्या माध्यमातून उत्तर देणार असा टोला विरोधकांना लगावलाय .
Vo.. अनेक महिन्यांपासून उदघाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या पलावा पुलाच्या एका मार्गिकेचे लोकार्पण करत हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला .मात्र पुलावरील रस्त्याच्या काही भाग गुळगुळीत असल्याने दोन दुचाकीस्वार पडून अपघात झाला त्यानंतर काही क्षणात पुन्हा पूल बंद करत युद्धपातळीवर या पुलावरील रस्त्याचे काम हाती घेण्यात आले .तासाभराने पुन्हा पूल सूरु करण्यात आला .मात्र त्यानंतर पुलावरील रस्त्याची केलेली तात्पुरती डागडुजी टीकेचा विषय ठरली आहे .या पुलावर दुचाकीस्वाराना गाडी चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे .याबाबत ठाकरे गटासह आक्रमक मनसेने आक्रमक पवित्रा घेतलाय .
या पुलावरील रस्त्याची दुरावस्था झाली त्यामुळे अनेक अपघात होत आहेत या पुलाचे काम अर्धवट होते ..लवकरात लवकर पुलाचे काम पूर्ण करून उदघाटन करा अशी मागणी केली होती ..मात्र आम्ही उदघाटन करू या भीतीने त्यांनी अर्धवट पुलाचे उदघाटन केलं असा टोला नाव न घेता शिवसेना संजय गटाचे आमदार राजेश मोरे यांना टोला लगावला..पोलीस उपयुक्त यांना निवेदन दिले ज्यांनी या अर्धवट पुलाचे उद्घाटन केलं ज्या ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केलं त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी डीसीपी अतुल झेंडे यांच्याकडे केली आहे तर डीसीपी झेंडे यांनी याप्रकरणी सकल चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिल्याचे देखील म्हात्रे यांनी सांगितले
Byte :- दिपेश म्हात्रे ( जिल्हा प्रमुख ठाकरे गट )
wkt... आतिश भोईर
डोंबिवली
पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे.. सत्ताधारी ठेकेदाराला काही बोलत नाहीत ते खाल्ल्या मिठाला जागतायत-मनसे नेते राजू पाटील यांची सत्ताधार्यांवर टीका
घाई घाईत या फुलाचा लोकार्पण केलं त्यानंतर बाईच्या अपघात झाले फुल पुन्हा बंद केला.ग्रीट पावडर टाकून पूल पुन्हा सुरू केलाय .मात्र फुलाचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे . सत्ताधारी ठेकेदाराला काही बोलत नाही कारण ते खाल्ल्या मिठाला जागतायत . दीडशे कोटींचा फुल सात आठशे कोटी पर्यंत पैसे खाण्यासाठी नेलाय . ऊन चालू करताना आमच्यावर टीका केली त्याप्रमाणे फुल तरी करायचा ना त्यांनी काहीही करायचं ते सहन करण्यात आला मी नाही त्यांचे मित्र पक्ष सहन करत असतील मनसे सहन करणार नाही . या पुलाचे साधे गार्डन लॉन्च केले तेव्हा फटाके वाजवले मात्र या पुलाचं लोकर पण करताना त्यांना भीती होती.. या पुलावर लोकांचे बळी जाऊ शकतात त्यामुळे लवकरात लवकर पुलाचे देखभाल दुरुस्ती करावी अशी मागणी आम्ही करत आहोत या पुलाबाबत पोलिसांकडे तक्रार करण्यापेक्षा लाच लुचपत विभागाकडे तक्रार करा ,पोलीस फार फार तर ठेकेदाराला नोटीस देतील मात्र त्याला काही अर्थ नाही ..अत्यंत मोठ्या प्रमाणात एकंदरीतच खूप भ्रष्टाचार झालेला आहे ,ठेकेदाराचे आणि त्याच्या इतर सेल कंपन्या त्यांची चौकशी करण्यात यावी तेव्हा इथलं काळं लबोर बाहेर येईल
Byte :-राजू पाटील( मनसे नेते माजी आमदार )
तर याबाबत शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांनी चार तारखेला पूल लोकांसाठी खुला करण्यात आला होता . त्यानंतर काही अवधीत काही दुचाकी स्लिप झाल्या त्यानंतर हा रस्ता पुन्हा तासाभराकरता बंद करण्यात आला .डांबर आणि ऑइल असल्याने दुचाकी स्लिप झाल्या होत्या त्यामुळे पुन्हा दुरुस्ती करून स्टोन केशर वापरत तासाभराने हा रस्ता खुला करण्यात आला .मात्र काही विरोधकांनी टाकण्यात आलेल्या स्टोन केशरचे फोटो टाकून टीका करण्यात आली मात्र पुलावर कोणताही खड्डा नाही ,चांगला पूल झालाय ..चार तारखेपासून त्या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली नाही
चांगलं काम देणारं महायुतिचे सरकार आहे ,विरोधकांनी काय बोलायचं हे त्यांनी ठरवावं आम्ही विकासाच्या माध्यमातून टिकेला उत्तर देणार ,पत्रिपुल ,मानकोली पुलाच्या नावाने देखील आमच्यावर खापर फोडले मात्र विकासाच्या मुद्द्यावर आम्ही पुढे जाणार ,लोकांना आमही काय देऊ शकतो याकडे आमचं लक्ष आहे असा टोला विरोधकांना लगावला.
Byte :- राजेश मोरे ( आमदार कल्याण ग्रामीन )
byte.. राजू पाटील
मनसे नेते.
byte.. दीपेश म्हात्रे
जिल्हा प्रमुख ठाकरे गट
0
Share
Report
Ambernath, Maharashtra:
अंबरनाथमध्ये स्कुल व्हॅनमधून मुलं पडल्याचं प्रकरण
स्कुल व्हॅन चालकासह तिघांवर गुन्हा दाखल
चूक आढळल्यास शाळेविरोधातही गुन्हा दाखल करणार
डीसीपी सचिन गोरे यांची माहिती
Amb school van update
Anchor : अंबरनाथमध्ये स्कुल व्हॅन मधून मुलं पडल्याप्रकरणी स्कुल व्हॅन चालक आणि दोन केअरटेकर महिला अशा तिघांविरोधात अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. तसंच तपासात शाळेची चूक आढळल्यास फातिमा शाळा प्रशासनाविरोधातही गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती डीसीपी सचिन गोरे यांनी दिली आहे.
Vo : अंबरनाथच्या फातिमा शाळेतून नर्सरीच्या मुलांना घेऊन जाणाऱ्या भरधाव स्कुल व्हॅन मधून २ चिमुकले विद्यार्थी पडल्याची घटना आज सकाळी कल्याण बदलापूर राज्य महामार्गावर घडली होती. यात एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून दुसरा किरकोळ जखमी झालाय. या विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून दुसरीकडे अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी या अवैध स्कुल व्हॅन चालकासह दोन केअरटेकर महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असून त्यात शाळेची चूक आढळली, तर शाळा प्रशासनाविरोधातही गुन्हा दाखल केला जाईल, तसंच या अवैध आणि धोकादायक प्रवासी वाहतुकीबाबत आरटीओ प्रशासनाला कळवलं जाईल, अशी माहिती डीसीपी सचिन।गोरे यांनी दिली आहे.
Byte : सचिन गोरे, डीसीपी
चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
0
Share
Report
Ratnagiri, Maharashtra:
ऐतिहासिक गोवा किल्ल्याची पडझड
डागडुजीच्या नावाखाली गाफीलपणा
शिवप्रेमी संतप्त, चौकशीची जोरदार मागणी
लोकेशन-हर्णे, दापोली
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा हर्णे येथील ऐतिहासिक गोवा किल्ला सध्या दुरवस्थेकडे झुकत आहे. शासनाकडून कोट्यावधी रुपये खर्चाच्या डागडुजीच्या कामास सुरुवात झाली असली तरी या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे पुरावे समोर आले आहेत.
तटबंदी मे महिन्यात करण्यात आलेल्या तटबंदीचे बांधकाम अवघ्या पहिल्याच पावसात कोसळल्याने किल्ल्याच्या डागडुजीवरील विश्वासच कोसळला आहे. हजारो वर्षे तग धरलेली मूळ तटबंदी आजही मजबूत उभी आहे, पण काहीच महिन्यांत नवी तटबंदी ढासळल्याने कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
डागडुजीसाठी कोट्यावधी रुपये मंजूर झाले आहेत.काम सुरू झाले ,परंतु सहा महिन्यांत तटबंदी कोसळली
पुरातत्व विभागाच्या कार्यक्षमतेवर शंका निर्माण झाली आहे.
शिवप्रेमी व इतिहासप्रेमींत तीव्र संताप,स्थानिक नागरिक, शिवप्रेमी आणि इतिहाससंवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्थांकडून कामाच्या दर्जावरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काम पूर्ण होण्याआधीच कोसळू लागले, तर गोवा किल्ल्याचे भवितव्य काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
0
Share
Report
Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज...
स्किप्ट ::- वलांडी गावातील महिलांनी अवैध दारू विक्रीच्या विरोधात एल्गार.... लातूरच्या राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात महिलांचा ठिय्या...
AC ::- लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील वलांडी गावातील महिलांनी अवैध दारू विक्रीच्या विरोधात मोठा आवाज उठवला आहे. गल्लोगल्ली सुरू असलेल्या देशी दारूच्या विक्रीला कंटाळून या महिलांनी थेट लातूरच्या राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात धडक दिली आणि दिवसभर ठिय्या आंदोलन केलं.वलांडी गावात देशी दारूची खुलेआम विक्री सुरू आहे... मात्र संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप महिलांनी केला. गावातील अनेक कुटुंबांचं आयुष्य या दारूमुळे उद्ध्वस्त होत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करा आणि गावातली दारू विक्री थांबवा, ही या महिलांची ठाम मागणी होती. अखेर प्रशासनाने कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर या महिलांनी तात्पुरते आंदोलन मागे घेतले.
0
Share
Report
Ratnagiri, Maharashtra:
चिपळूणमध्ये मराठी माध्यमाच्या शाळांची दुरवस्था – अर्धे छत जमीनदोस्त, प्रशासनाची डोळेझा,,,,?
ही परिस्थिती आहे चिपळूण मधील गुढे डुगवे प्राथमिक शाळेची,,,,,
एका बाजूला संपूर्ण महाराष्ट्रात मराठी भाषेच्या अस्मितेचा जागर सुरू असताना, चिपळूण तालुक्यातील ग्रामीण भागातील मराठी माध्यमाच्या शाळा मात्र उपेक्षेच्या गर्तेत सापडलेल्या दिसून येतात.
काही शाळांच्या इमारतींचे अर्धे छत कोसळूनही प्रशासन आणि शिक्षण खात्याचे पूर्ण दुर्लक्ष सुरु आहे.
"मराठी भाषेचा अभिमान बोलायचा तरी मराठी शाळांचे काय?" असा संतप्त सवाल आता गावकऱ्यांकडून विचारला जात आहे.
ग्रामस्थांनी वारंवार शासनाकडे शाळांच्या दुरुस्ती आणि नव्या इमारतीसाठी प्रस्ताव पाठवले, विनंत्या केल्या, मात्र कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. काही ठिकाणी तर ग्रामस्थांनीच स्वखर्चाने नवीन इमारती उभारल्या, मात्र त्या इमारतींचीही अवस्था इतकी वाईट झाली आहे की गळतीमुळे एका खोलीत चार वर्गांचा घोळ भरवण्याची वेळ आली आहे.
छतावरून पाणी टपकत असतानाच, मुलं खाली बसून शिक्षण घेत आहेत. पालक आणि शिक्षक यांच्यात भीतीचं वातावरण आहे – कधी काय कोसळेल सांगता येत नाही!" छतारूपी मरण सतत डोक्यावर, आणि शाळेचा उज्वल नव्हे तर अंधकारमय भविष्यकाळ समोर उभा आहे.
इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे टोलेजंग, एसी युक्त कॅम्पस जेथे बहरात आहेत, तिथे मराठी शाळा उदासवाण्या अवस्थेत धूसर होताना दिसतात. शिक्षणाचा दर्जा केवळ अभ्यासक्रमाने नव्हे तर शाळेच्या भौतिक सुविधांनीही ठरतो हे सरकार विसरतंय का, असा सवाल आता शिक्षणप्रेमींमधून होतो आहे.
0
Share
Report
Sinnar, Maharashtra:
अँकर
नाशिकच्या निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणातून 43 हजार 882 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नांदूर मधमेश्वर गावाजवळ असलेल्या निफाड व सिन्नर सह तालुक्यातील गावांना जोडणारा गोदावरी नदी वरील पुलाला पाणी टच झाले आहे नांदूर मधमेश्वर धरणातून 50 ते 55 हजार क्युसेक परंतु पूर पाण्याच्या विसर्गात वाढ झाल्यास पुलावरून पाणी जाईल आणि निफाड-सिन्नर सह तालुक्यातील गावांचा संपर्क तुटेल यामुळे पुलावरून पाणी राहिल्यास वाहनधारकांनी आपली वाणी न येण्याचा प्रशासनाच्या वतीने इशारा देण्यात आला आहे
7
Share
Report