Back
नालासोपार्यात बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या; पोलिसांची नावे सुसाईड नोटमध्ये!
Nala Sopara, Maharashtra
Date-1july2025
Rep-prathamesh tawade
Loc-nalasopara
Alug-Nalasopara suicide
Feed send by 2c
Type-AV
Slug- नालासोपार्यात बांधकाम व्यासायिकाची आत्महत्या;
सुसाईड नोट मध्ये पोलिसाचे नाव आढळल्याने खळबळ
नालासोपार्यात बांधकाम व्यासायिकाची आत्महत्या
चिठ्ठीत पोलिसांची नावे
अँकर-- नालासोपारा येथील बांधकाम व्यावसायिकाने पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे ... जयप्रकाश चौहान (६४) असं या व्यावसायिकाचे नाव आहे .. नालासोपारा गाला नगर परिसरात ते आपल्या कुटुंबासोबत राहत होते. . त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये दोन पोलिसांची नावे लिहिली आहेत....
३२ लाखांच्या कर्जाच्या वसुलीसाठी पोलीस आणि दलाल मानसिक छळ करत असल्याने आत्महत्या करत असल्याचे सुसाईड नोटमध्ये लिहिलेले आहे ...
पोलिस हवालदार श्याम शिंदे आणि महाजन आणि लाला लाजपत नावाचा एजंट कर्जाच्या वसुलीसाठी चौहानवर सतत मानसिक दबाव आणत होते, असा आरोप कुटुंबाने केला आहेआहे... आचोळे पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत..
बाईट- गौरी चौहान(मयताची मुलगी)
बाईट- सुजित कुमार पवार. (वरिष्ठ पोलीस निरीक्षक आचोळे पोलीस ठाणे)
l
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 0207_BHA_ROAD_DAMAGE
FILE - 7 VIDEO
भंडाराच्या माटोरा येथील मुख्यमार्गाची दुरावस्था...... स्थानिकांमधून व्यक्त होत आहे संताप...... मार्ग दुरुस्त करण्याची मागणी
ANCHOR :- भंडाराच्या माटोरा येथील मुख्य मार्गाची मागील अनेक दिवसांपासून दुरावस्था झाली असून मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. या परिसरातील अनेक गावाला जाण्याकरिता हा मुख्य रस्ता असून नागरिकांना प्रवासादरम्यान विविध अडचणीचा सामना करावा लागतो आहे. यासंबंधी प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला निवेदन देण्यात आली मात्र तरीसुद्धा प्रशासनाच्या वतीने याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थ आता संतापले असून मार्गाची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अन्यथा आंदोलन करू इशारा येथील ग्रामस्थांनी दिलाय.
BYTE :- सचिन निंबार्ते, स्थानिक नागरिक माटोरा
BYTE :- विकेश मेश्राम, नागरिक
.....
.....
0
Share
Report
Akola, Maharashtra:
Anchor : अकोला जिल्हयामध्ये अवैध धंदे संपूर्ण नष्ट करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबविण्यात येत आहेय.. या मोहिमेअंतर्गत अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त बातमी नुसार मुर्तीजापुरात नाकाबंदी करण्यात आली.. नाकाबंदी दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका चारचाकी गाडीतून देशी तथा विदेशी दारूचा मोठा साठा जप्त केला...अवैधरिते वाहतूक करणाऱ्या या गाडीतून पोलिसांनी देशी दारू तथा विदेशी दारू आणि चारचाकी गाडी असे एकूण 5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेय...
0
Share
Report
Akola, Maharashtra:
Anchor : राज्यातील अनेक भागांत पेरणीला सुरुवात झालेली आहे, आणि काही ठिकाणी शंभर टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत..मात्र अकोला जिल्ह्यातील मुंडगाव परिसरातील शेतकऱ्यांवर एक मोठा संकट उद्भवला आहे.. या परिसरात पेरलेले पीक हरणांच्या कळपांनी उधळले आहेय..यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे, कारण हरणांच्या हुलकावणीमुळे त्यांच्या मेहनतीला पाणी फेरले जात आहेय..तर या समस्येवर उपाय शोधण्यासाठी वनविभाग आणि स्थानिक प्रशासनाने देखील लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
0
Share
Report
Raigad, Maharashtra:
स्लग - रायगडात पावसाळी पर्यटनाचा बळी ..... माणगावच्या चन्नाट धबधब्यात बुडून मुंबईच्या तरुणाचा मृत्यू .......
अँकर - रायगडच्या माणगाव तालुक्यातील चन्नाट येथील धबधब्यात बुडून मुंबईतील पर्यटक तरुणाचा मृत्यू झाला. ऋषी पथीपका असे 22 वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे. तो आपल्या मित्रांसह या धबधब्यावर पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आला होता. धबधब्याखाली पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. माणगाव आणि कोलाड येथील बचाव पथकांनी शोध घेऊन त्याचा मृतदेह बाहेर काढला असून शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
0
Share
Report
Ambernath, Maharashtra:
उल्हासनगर डीसीपी कार्यलयावर ख्रिस्ती समाजाचा मोर्चा
आमदार गोपीचंद पडळकर विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी
पोलीस उपायुक्तांना दिलं निवेदन
Ulh agitations
Anchor ख्रिश्चन समाजाच्या धर्मगुरूंविरोधात चिथावणीखोर वक्तव्य
करणारे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी उल्हासनगर शहरात ख्रिश्चन समाजाने मोर्चा काढून पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांना निवेदन दिले आहे,यावेळी पोलीस उपायुक्त कार्यलया बाहेर मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधवांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केलीय,
चंद्रशेखर भुयार ,उल्हासनगर
0
Share
Report
Raigad, Maharashtra:
स्लग – भय इथले संपत नाही ....... तळीये दरडग्रस्तांची आजही परवड सुरूच ........ चार वर्षानंतरही पुनर्वसन अर्ध्यावरच .......... दरडग्रस्त गावाला पुनर्वसनाची प्रतिक्षा ....... घरे उभारण्याचे काम संथ गतीने सुरू ........... सरकार आमच्या मरणाची वाट पाहतंय का ......... तळीयेतील दरडग्रस्त कुटुंबांचा आर्त सवाल ..........
अँकर – महाड तालुक्यातील तळीये गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेला चार वर्षे होत आली. दुर्घटनेनंतर गावाच्या पुनर्वसनाचा निर्णय सरकारने घेतला. परंतु आजही इथल्या ग्रामस्थांची परवड सुरूच आहे. दरडींची टांगती तलवार डोक्यावर घेवून इथले ग्रामस्थ जगताहेत.
अद्याप पुनर्वसनाचे काम पूर्ण झालेले नाही. 271 पैकी आतापर्यंत केवळ 66 कुटुंबांचेच पुनर्वसन झालंय. परंतु तिथंही नागरी सुविधांचा अभाव आहे. पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत असलेले ग्रामस्थ पावसाळ्यात सुरक्षित आसरा शोधतात. अतिवृष्टी सुरू झाली की इथल्या ग्रामस्थांच्या मनात भीतीचा थरकाप उडतो. वर्षानुवर्षे डोंगरदरयांमध्ये खेळणारया या ग्रामस्थांमध्ये दरडीची भीती कायम घर करून राहिली आहे. पावसाळ्यात सरकारी यंत्रणा स्थलांतर करायला सांगते पण जायचं कुठं असा प्रश्न या ग्रामस्थांसमोर आहे.
बाईट – बाजीराव शिंदे
बाईट – संजय शिंदे
वॉक थ्रू – पुनर्वसनाच्या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी
0
Share
Report
Ambernath, Maharashtra:
अंबरनाथच्या जलाल शेखला गोमांसाची वाहतूक करताना पकडलं!
गोरक्षकांनी चोप देत दिलं पोलिसांच्या ताब्यात , पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Amb beef seized
Anchor : अंबरनाथमध्ये गोमांसाची विक्री करणाऱ्या जलालुद्दीन उर्फ जलाल शेख याला गोमांसाची वाहतूक करताना गोरक्षकांनी रंगेहाथ पकडलं. यानंतर त्याला चोप देत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करत बेड्या ठोकल्या आहेत. जलाल याचा मोबाईल तपासला असता, त्यात गोवंशाचे फोटो आढळल्याचा दावा गोरक्षकांनी केला आहे.
चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
0
Share
Report
Ambernath, Maharashtra:
अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर महावितरणचा भार
लाखभर नागरिकांसाठी अवघे 9 कर्मचारी
नफेखोर महावितरणचं बदलापूर ग्रामीणकडे दुर्लक्ष
Bdl mseb
Anchor - अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे महावितरणच्या बदलापूर ग्रामीण विभागावर प्रचंड ताण येतोय. लाखभर लोकसंख्येसाठी अवघे 9 कर्मचारी अशी स्थिती आहे. त्यामुळे वीज वितरणाचा गाडा कसा हाकायचा हाच प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर पडलाय.त्यामुळे ग्रामीण विभागावरचा वाढता भार लक्षात घेता नफेखोर महावितरणने कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याची मागणी ग्राहकांमधून होतीय.
महावितरणच्या बदलापूर ग्रामीण विभागाअंतर्गत वांगणी सारखं 40 हजार लोकसंख्या असलेले मोठं शहर तसंच आसपासची 15 ते 20 गावं येतात. अखंडित वीजपुरवठा ठेवण्यासाठी या विभागात किमान 16 कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. मात्र सध्या केवळ 9 कर्मचारी असल्यामुळे त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण येतोय. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे अनेक ठिकाणी शॉर्ट सर्किट, लाईन कट होण्याचे प्रकार वारंवार होतात. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ उडते. अनेकदा संतप्त लोकांच्या रोषालाही त्यांना सामोरं जावं लागतं. फिल्डवरच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळही सहन करावी लागते. महत्त्वाचं म्हणजे वांगणी सारखं शहर वेगाने वाढत असताना देखील या शहराला ग्रामीण विभागात टाकण्यात आल्याने अनेक अडचणी येत आहेत. त्याबाबतही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकारात्मक विचार करून शहरी विभागाप्रमाणे सेवा पुरवणं आवश्यक आहे अशी मागणीही नागरिकांमधून होतीय.
चंद्रशेखर भुयार , बदलापूर
0
Share
Report
Yeola, Maharashtra:
अँकर:-एक जुलै कृषी दिन निमित्त बाबुराव कृषी महाविद्यालय यांच्या अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना दिनाच्या निमित्ताने पन्हाळ साठे या ठिकाणी आंबा, चिंच, सिताफळ ,या उपयुक्त व हवामानाला अनुरूप अशा दोनशे झाडांची लागवड करण्यात आली
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा शिक्षक वृंद विद्यार्थी स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते
0
Share
Report
Yeola, Maharashtra:
अँकर:-
येवला मर्चंट बँकेत क्यूआर आर कोडचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते पार पडला. यावेळी डिजिटल क्षेत्रात मर्चंट बँक एक पाऊल पुढे जात ग्राहकांना क्यूआर कोडची वाटप करण्यात आले. यावेळी बाजार समितीच्या सभापती सविता पवार, डॉक्टर चंद्रशेखर क्षत्रिय , सी ए सोमाणी, सी ए किरण बनकर यांच्या हस्ते उपस्थित व्यापाऱ्यांना QR कोड देऊन शुभारंभ करण्यात आला. सदर कार्यक्रमाप्रसंगी प्रसंगी चेअरमन पूजा काबरा, व्हाइस चेअरमन सारिका दिवटे तथा पॅनलचे प्रमुख मनीष काबरा,सुरज पटणी व राजेश भांडगे यांच्यासह बँकेचे संचालक मंडळ, बँकेचे अधिकारी कर्मचारी, व ठेवीदार उपस्थित होते..
0
Share
Report