Back
भंडारा: माटोरा मार्गाची दुरावस्था, स्थानिकांचा संताप उफाळला!
Bhandara, Maharashtra
Pravin Tandekar Bhandara
Slug - 0207_BHA_ROAD_DAMAGE
FILE - 7 VIDEO
भंडाराच्या माटोरा येथील मुख्यमार्गाची दुरावस्था...... स्थानिकांमधून व्यक्त होत आहे संताप...... मार्ग दुरुस्त करण्याची मागणी
ANCHOR :- भंडाराच्या माटोरा येथील मुख्य मार्गाची मागील अनेक दिवसांपासून दुरावस्था झाली असून मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. या परिसरातील अनेक गावाला जाण्याकरिता हा मुख्य रस्ता असून नागरिकांना प्रवासादरम्यान विविध अडचणीचा सामना करावा लागतो आहे. यासंबंधी प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला निवेदन देण्यात आली मात्र तरीसुद्धा प्रशासनाच्या वतीने याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थ आता संतापले असून मार्गाची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अन्यथा आंदोलन करू इशारा येथील ग्रामस्थांनी दिलाय.
BYTE :- सचिन निंबार्ते, स्थानिक नागरिक माटोरा
BYTE :- विकेश मेश्राम, नागरिक
.....
.....
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Shirdi, Maharashtra:
Anc - राहुरी येथील डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत घवघवीत यश संपादन केल्यानंतर कर्जाच्या बोजाखाली असलेला कारखाना सुरू करण्यासाठी सत्तेसोबत जाण्याशिवाय पर्याय नसल्याने माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे काका आणि माजी खासदार प्रसाद तनपुरे यांचे सख्खे बंधू अरुण तनपुरे यांनी अजीत पवार गटात प्रवेश केलाय...प्राजक्त तनपुरे हे जयंत पाटील यांचे भाचे आहेत.त्यामुळे प्राजक्त तनपूरे हे देखील अजित पवार गटात प्रवेश करणार का..? अशा अनेक चर्चांना उधान आले होते...तनपुरे यांनी मात्र मी शरद पवार यांचेसोबतच राहणार असल्याच स्पष्ट केलय...
V/O - आमदार शिवाजी कर्डीले आणि भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी तनपुरे कारखान्यातून माघार घेत निवडणुक न लढवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखालील डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत 21 च्या 21 जागा जिंकत सत्ता काबीज केली...कारखान्यावर 140 कोटींचे कर्ज असल्याने कर्जाचे पुनर्गठन आणि नव्याने कर्ज घेण्यासाठी सत्तेशिवाय पर्याय नसल्याने अरुण तनपुरे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाला रामराम करत अजीत पवार गटात प्रवेश केलाय त्यानंतर प्राजक्त तनपुरे यांनी आपली याबाबतची भुमिका स्पष्ट केली...कारखाना सुरू करण्यासाठी अरुण तनपुरे हे अजीत पवारांसोबत गेले मात्र मी शरद पवारांची साथ सोडणार नसल्याचे प्राजक्त तनपुरे यांनी स्पष्ट केलय...
बाईट - प्राजक्त तनपुरे , माजी मंत्री
0
Share
Report
Raigad, Maharashtra:
स्लग - रायगडात पावसाचा जोर वाढला ....... अधून मधून पावसाच्या जोरदार सरी ....... हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट .......
अँकर - रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलाय. जिल्ह्याच्या सर्वच भागात अधून मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. काही काळ उसंत घेत ढग दाटून येत जोरदार वाऱ्यासह पाऊस बरसतो आहे. हवामान विभागाने जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला असला तरी कुठंही धोकादायक स्थिती नाही.
0
Share
Report
Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0207ZT_WSM_RAIN_CROP_DAMAGE
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर : वाशिम जिल्ह्यात २५ व २६ जून रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील रिसोड, मालेगाव व वाशिम तालुक्यांतील अनेक महसुली मंडळांमध्ये ६५ मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. त्यामुळे सोयाबीन,तूर, उडीद,मूग यांसारख्या खरीप पिकांसह फलबागा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही भागांत पेरलेली बियाणं कुजली असून, काही ठिकाणी रोप उगवण्याआधीच मर झाली आहे. शेतकरी संकटात सापडले असून,नुकसानग्रस्त भागांत तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी केली जात आहे.
0
Share
Report
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव: ब्रेकिंग
DHARA_FIR
धाराशिवमध्ये शक्तिपीठ महामार्गा विरोधात रस्ता रोको आंदोलन करणाऱ्या चाळीस शेतकऱ्यावर गुन्हे दाखल
महामार्ग अडवला आणि जमावबंदीचे उल्लंघन केले म्हणून शेतकऱ्यावर गुन्हे दाखल
शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी धुळे सोलापूर महामार्गावर शेतकऱ्यांनी केला होता रास्ता रोको
एक तासापेक्षा जास्त काळ रस्ता अडवल्यामुळे धाराशिव मधील शेतकऱ्यावर धाराशिव पोलिसांकडून गुन्हे दाखल.
येत्या दहा तारखेपर्यंत धाराशिव जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू आहेत
0
Share
Report
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव
DHARA_UPOSHAN
पवनचक्की विरोधात आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी उपचार नाकारले
धाराशिव च्या वाशी येथे गेली सात दिवसापासून सुरू आहे पवनचक्कीच्या विरोधात शेतकऱ्याचे आमरण उपोषण आंदोलन
आज उपोषणाचा आठवा दिवस, उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास शेतकऱ्यांचा नकार
पवनचक्की कंपनीकडून संपादित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळण्यासाठी सुरू आहे आमरण उपोषण
0
Share
Report
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
2 FILES
SLUG NAME - SAT_AGITATION
कराड - पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता असतानाच केंद्रीय जल आयोगाचे कंत्राटी कर्मचारी किमान वेतन आणि विमा सुरक्षेच्या मागणीसाठी संपावर गेले आहेत. त्यामुळे पुणे विभागातील कृष्णा, कोयना यांसारख्या महत्त्वाच्या नद्यांवरील पूर नियंत्रण यंत्रणा ठप्प झाली आहे.या संपामुळे नागरिकांना पूरस्थितीची योग्य माहिती मिळणार नाही.त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून त्वरीत तोडगा काढण्याची मागणी होते आहे.
बाईट – सुहास चव्हाण, केंद्रीय जल आयोग कंत्राटी कर्मचारी
0
Share
Report
Oros, Maharashtra:
अँकर --- सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलाय मागील काही दिवस लपंडाव करणाऱ्या पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावलीय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुपार पासून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर उद्या देखील जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. पुढील दोन दिवसात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केलंय.
0
Share
Report
Ambernath, Maharashtra:
बदलापुरात महावितरण आणि मजीप्राविरोधात शिवसेनेचा आक्रोश मोर्चा
मडकं फोडून प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा निषेध
Bdl sena morcha
Anchor - बदलापूर शहरात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि पाणीपुरवठ्याच्या समस्येविरोधात आज शिवसेनेच्या वतीने महावितरण आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी मडकं फोडून प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा निषेध केला. या मोर्चात मोठ्या संख्येनं महिला सहभागी झाल्या होत्या. मोर्चेकरांनी प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत बदलापुरातील वीज आणि पाणीपुरवठ्याच्या समस्यांचा पाढा वाचला.
चंद्रशेखर भुयार , बदलापूर
0
Share
Report
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
5 FILES
SLUG NAME -SAT_HINDU_MORCHA
सातारा -सकल हिंदू समाजाचा वतीने साताऱ्यात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.धर्मांतराला विरोध आणि धर्मांतर कायदा करावा या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.साताऱ्यातील शिवतीर्थ पोवई नाका येथून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली.जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा गेल्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
byte
0
Share
Report
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0207ZT_CHP_WALL_ISSUE_1_2
( 2 file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर शहरातील वादग्रस्त भिंतीचा मुद्दा विधिमंडळात गाजला, आपले व्यावसायिक भागीदार पवन सराफ यांच्या आलिशान घराच्या सुरक्षेसाठी स्थानिक भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी आकाशवाणी वॉर्डात प्रस्तावित केली पुरसंरक्षक भिंत, आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला 1 कोटींचा निधी
अँकर:-- चंद्रपूर शहरातील वादग्रस्त पुरसंरक्षण भिंतीचा मुद्दा आज विधिमंडळात गाजला. आपले व्यावसायिक भागीदार पवन सराफ यांच्या आलिशान घराच्या सुरक्षेसाठी स्थानिक भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी आकाशवाणी वॉर्डात एका नैसर्गिक नाल्यावर पुरसंरक्षक भिंत प्रस्तावित।केली. आपत्ती व्यवस्थापन विभागाने यासाठी सुमारे 1 कोटींचा निधी दिला. आणि जलसंधारण विभागाने तातडीने ही भिंत बांधून काढली. भिंत पुरासाठी नव्हे तर आलिशान घर वाचविण्यासाठी बांधली गेली. आमदारकीचा वापर खाजगी फायदा पोचविण्यासाठी करण्याचे हे प्रकरण विधिमंडळात गाजले. माजी मंत्री भाजपचे आ. सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेस विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला यावरून चांगलेच कोंडीत पकडले. यावर आ. जोरगेवार यांना खुलासा करताना नाकी नऊ आले. तर जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी प्रश्नाला उत्तर देताना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आवश्यक कारवाई करण्याचे आश्वासन दिले. चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात सुधीर मुनगंटीवार यांना भाजपमधील विरोधी गटाकडून लक्ष्य केले जात असताना आता मुनगंटीवार यांनी थेट हे प्रकरण विधिमंडळात उपस्थित करून खळबळ उडवून दिली आहे. भाजपच्या अंतर्गत राजकारणाचा स्फोट मात्र यानिमित्ताने झालाय.
---अधिवेशनातील भिंतीच्या मुद्यावरील वादावादी---
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report