Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
RaigadRaigad

चार वर्षांनंतरही तळीयेतील दरडग्रस्‍तांची परवड, सरकार कुणाची वाट पाहतंय?

PRAFULLA PAWAR
Jul 02, 2025 01:30:11
Raigad, Maharashtra
स्‍लग – भय इथले संपत नाही ....... तळीये दरडग्रस्‍तांची आजही परवड सुरूच ........ चार वर्षानंतरही पुनर्वसन अर्ध्‍यावरच .......... दरडग्रस्‍त गावाला पुनर्वसनाची प्रतिक्षा ....... घरे उभारण्‍याचे काम संथ गतीने सुरू ........... सरकार आमच्‍या मरणाची वाट पाहतंय का ......... तळीयेतील दरडग्रस्‍त कुटुंबांचा आर्त सवाल .......... अँकर – महाड तालुक्‍यातील तळीये गावावर दरड कोसळून झालेल्‍या दुर्घटनेला चार वर्षे होत आली. दुर्घटनेनंतर गावाच्‍या पुनर्वसनाचा निर्णय सरकारने घेतला. परंतु आजही इथल्‍या ग्रामस्‍थांची परवड सुरूच आहे. दरडींची टांगती तलवार डोक्‍यावर घेवून इथले ग्रामस्‍थ जगताहेत. अद्याप पुनर्वसनाचे काम पूर्ण झालेले नाही. 271 पैकी आतापर्यंत केवळ 66 कुटुंबांचेच पुनर्वसन झालंय. परंतु तिथंही नागरी सुविधांचा अभाव आहे. पुनर्वसनाच्‍या प्रतिक्षेत असलेले ग्रामस्‍थ पावसाळ्यात सुरक्षित आसरा शोधतात. अतिवृष्‍टी सुरू झाली की इथल्‍या ग्रामस्‍थांच्‍या मनात भीतीचा थरकाप उडतो. वर्षानुवर्षे डोंगरदरयांमध्‍ये खेळणारया या ग्रामस्‍थांमध्‍ये दरडीची भीती कायम घर करून राहिली आहे. पावसाळ्यात सरकारी यंत्रणा स्‍थलांतर करायला सांगते पण जायचं कुठं असा प्रश्‍न या ग्रामस्‍थांसमोर आहे. बाईट – बाजीराव शिंदे बाईट – संजय शिंदे वॉक थ्रू – पुनर्वसनाच्‍या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्‍ल पवार यांनी
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement