Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421501

महावितरणच्या 9 कर्मचाऱ्यांवर लाखभर लोकसंख्येचा भार!

CHANDRASHEKHAR BHUYAR
Jul 02, 2025 01:01:24
Ambernath, Maharashtra
अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर महावितरणचा भार लाखभर नागरिकांसाठी अवघे 9 कर्मचारी नफेखोर महावितरणचं बदलापूर ग्रामीणकडे दुर्लक्ष  Bdl mseb Anchor - अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे महावितरणच्या बदलापूर ग्रामीण विभागावर प्रचंड ताण येतोय. लाखभर लोकसंख्येसाठी अवघे 9 कर्मचारी अशी स्थिती आहे. त्यामुळे वीज वितरणाचा गाडा कसा हाकायचा हाच प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर पडलाय.त्यामुळे ग्रामीण विभागावरचा वाढता भार लक्षात घेता नफेखोर महावितरणने कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याची मागणी ग्राहकांमधून होतीय.          महावितरणच्या बदलापूर ग्रामीण विभागाअंतर्गत वांगणी सारखं 40 हजार लोकसंख्या असलेले मोठं शहर तसंच आसपासची 15 ते 20 गावं येतात. अखंडित वीजपुरवठा ठेवण्यासाठी या विभागात किमान 16 कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. मात्र सध्या केवळ 9 कर्मचारी असल्यामुळे त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण येतोय. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे अनेक ठिकाणी शॉर्ट सर्किट, लाईन कट होण्याचे प्रकार वारंवार होतात. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ उडते. अनेकदा संतप्त लोकांच्या रोषालाही त्यांना सामोरं जावं लागतं. फिल्डवरच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळही सहन करावी लागते. महत्त्वाचं म्हणजे वांगणी सारखं शहर वेगाने वाढत असताना देखील या शहराला ग्रामीण विभागात टाकण्यात आल्याने अनेक अडचणी येत आहेत. त्याबाबतही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकारात्मक विचार करून शहरी विभागाप्रमाणे सेवा पुरवणं आवश्यक आहे अशी मागणीही नागरिकांमधून होतीय. चंद्रशेखर भुयार , बदलापूर
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement