Back
साक्री नगरपंचायतीत अविश्वास ठरावावर गोंधळ: नगरसेवकांचा संताप!
Dhule, Maharashtra
anchor - साक्री नगरपंचायतीच्या नगर अध्यक्षांवर दाखल अविश्वास ठरवायच्या मतदान प्रक्रियेवरून गोंधळ झाला. साक्री नगरपालिकेत भाजपची सत्ता आहे, नगराध्यक्षांच्या कामकाजा विरोधात नाराजी व्यक्त करत भाजपच्या 11 पैकी सहा नगरसेवकांनी अविश्वास दाखल करण्याची मागणी केली होती. भाजपच्या सहा नगरसेवकांना विरोधकांनी पाठबळ देत जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केला होता अविश्वास ठराव. विद्यमान नगराध्यक्ष जयश्री पवार यांच्या विरोधात
अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी आज विशेष बैठकीच आयोजन करण्यात आले होते. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी बैठकीला उपस्थित न झाल्याने नगरसेवक संतप्त झाले. बराच वेळ प्रतीक्षा करूनही पिठासीन अधिकारी न आल्यामुळे नगरसेवकांनी आक्रमक होत नाराजी व्यक्त केली. अविश्वास ठरावाच्या प्रस्तावावर निर्णय न झाल्याने सत्ताधारी नगरसेवकांसह विरोधक आक्रमक झाले. प्रशासनाच्या विरोधात नगरसेवकांची घोषणाबाजी करत ही लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप केला.
प्रशांत परदेशी, धुळे.
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Navi Mumbai, Maharashtra:
story slug - सप्टेंबर अखेर पर्यंत नवी मुंबई विमानतळाच काम पूर्ण होईल - राहुल कुल यांची माहीती
FTP slug -navi mumbai airport september
byet- rahul kul
shots-
reporter- swati naik
navi mumbai
anchor - विधिमंडळ सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष राहुल कुल , मिलिंद नार्वेकर यांच्यासह काही आमदार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी केली.. काही महिन्यातच नवी मुंबई विमानतळ सुरू होणार असल्याने हालचाली वाढल्या आहेत.. सध्या विमानतळाचं काम सुरू आहे.. त्यामुळे विधिमंडळ सार्वजनिक उपक्रम समितीने पाहणी केली.. यावेळी बोलताना विधिमंडळ सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष राहुल कुल यांनी माहिती देताना म्हटल की सप्टेंबरमध्ये विमानतळाचं काम पूर्ण होईल. नवी मुंबई विमानतळाच्या नावा संदर्भातील अंतिम निर्णय हा शासन स्थरावर होईल.. तर सप्टेंबर अखेर पर्यंत विमानतळाच काम पूर्ण होईल..
बाईट- राहुल कुल , विधिमंडळ सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष
0
Share
Report
Washim, Maharashtra:
वाशिम:
File:2506ZT_WSM_RAIN_25JUN
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर: वाशिम जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये आज सायंकाळ दरम्यान जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.दीर्घ प्रतिक्षेनंतर आलेल्या या पावसामुळे वाशिम,मालेगाव व रिसोड तालुक्यातील शेतकरी सुखावले आहेत.जोरदार पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला असून,अंकुरलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळणार आहे.परिणामी,खरीप हंगामातील पेरणीस वेग येण्याची शक्यता आहे.पावसाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून,त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले आहे.मात्र जल स्त्रोत्राची पातळी वाढीसाठी मुसळधार पावसाची जिल्ह्यातील नागरिकांना प्रतीक्षा आहे.
0
Share
Report
Ambernath, Maharashtra:
बदलापुरातील भाजप पदाधिकाऱ्यांकडून महावितरणच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी
अधिकाऱ्यांचा उपहासात्मक केला शाल घालून सत्कार
वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबद्दल विचारला जाब
लोकांना टीओडी मीटरची सक्ती केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
Bdl mseb bjp
Anchor - गेल्या काही दिवसांपासून बदलापुरात विजेचा खेळखंडोबा सुरू असून त्या विरोधात भाजपने आक्रमक पवित्रा घेतलाय. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढत अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. इतकच नाही तर निष्क्रिय अधिकाऱ्यांना शाल घालून गांधीगिरीच्या मार्गाने त्यांचा सत्कारही केला.
बदलापुरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वीज पुरवठा खंडित होत आहे. तसंच वीज ग्राहकांना महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून टीओडी मीटरची सक्तीही करण्यात येतीय. याबाबत वारंवार नागरिकांच्या तक्रारी येत असल्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी खरवई येथील महावितरण कार्यालय गाठलं आणि अधिकाऱ्यांना कडक शब्दात जाब विचारला. एवढ्यावरच न थांबता अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेबद्दल शाल देऊन गांधीगिरी पद्धतीने त्यांचा सत्कारही करण्यात. येत्या आठ दिवसात महावितरणच्या अधिकाऱ्यांनी योग्य तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय.
चंद्रशेखर भुयार , बदलापूर
0
Share
Report
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग : भाजपच्या नेत्या आणि माजी महापौर शोभा बनशेट्टी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
- *सोलापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटांमध्ये आणखी एक मोठ्या नेत्याचा पक्षप्रवेश*
- *भाजपच्या नेत्या आणि माजी महापौर शोभा बनशेट्टी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश*
- *उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी महापौर शोभा बनशेट्टी यांचा पक्षप्रवेश संपन्न*
- शोभा बनशेट्टी या सोलापूर महापालिकेच्या माजी महापौर राहिलेल्या आहेत
- त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीत पक्षाने डावलल्यानंतर सोलापूर शहर उत्तरमधून विधानसभा निवडणूक लढवली होती
- सोलापूर शहरात मागील अनेक वर्षांपासून बनशेट्टी कुटुंबाचे राजकीय वर्चस्व राहिले आहे
- शोभा बनशेट्टी या अक्कलकोटचे भाजपचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांची ती कन्या आहेत
- माझी महापौर शोभा बनशेट्टी यांच्या पक्षप्रवेशामुळे सोलापूर शहरात शिवसेना शिंदे गटाची ताकद आणखी वाढली
- काही दिवसांपूर्वी अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता.
0
Share
Report
Raigad, Maharashtra:
स्लग - आणीबाणी लादणाऱ्यांचे वंशज देशात अराजकता पसरवताहेत ...... भाजपच्या चित्रा वाघ यांची टीका ...... आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्यांचा अलिबाग इथं सत्कार ......
अँकर - ज्यांनी आणीबाणी लादली त्या इंदिरा गांधींचे वंशज आज देशात आणीबाणी सारखीच अराजकता या देशात पसरवू पाहताहेत. राहुल गांधी देशाच्या विरोधात बोलताहेत , सैनिकांच्या विरोधात बोलताहेत. देशात अस्वस्थता निर्माण करण्यासाठी राहुल गांधी आज कार्यरत आहेत अशी टीका भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली. आणीबाणीला 50 वर्षे झाल्याबद्दल आणीबाणी काळात तुरुंगवास भोगलेल्यांचा आज दक्षिण रायगड भाजपच्या वतीने सन्मान करण्यात आला. अलिबाग इथं झालेल्या कार्यक्रमात चित्रा वाघ बोलत होत्या.
साउंड बाईट - चित्रा वाघ
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
डोंबिवलीत न्यायालयीन प्रक्रियेमुळे वर्षभर बंद असलेली टोईंग सेवा पुन्हा सुरू
चुकीच्या ठिकाणी वाहणे पार्किंग करून वाहतूक कोंडी करणारी वाहन आता टोईंग व्हॅनने थेट उचलून टोईंग सेंटरला नेण्यात येणार असून दंड भरल्यावरच वाहन मिळणार
Anc..डोंबिवलीकर वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी! मागील वर्षभर शहरातील वाहतूक अडथळे आणि चुकीच्या पार्किंगवर नियंत्रण ठेवण्यासाठी बंद असलेली टोईंग व्हॅन सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. न्यायालयीन प्रक्रिया आणि काही तक्रारींमुळे स्थगित झालेली ही सेवा आता डोंबिवली पूर्व आणि पश्चिम भागात राबवण्यात येणार आहे. त्यामुळे आता चुकीच्या ठिकाणी उभ्या केलेल्या वाहनांवर थेट कारवाई करत वाहन टोईंग सेंटरला नेण्यात येणार आहे . या आधी रस्त्यावरती बेजबाबदारपणे वाहने उभी असली तर वाहतूक पोलिसा कडून त्या वाहनाचा ई चलान पध्दतीने मोबाईल मध्ये फोटो काढून त्याला दंडात्मक पावती ऑनलाईन पाठवत होते. दंडाची कारवाई झाली तरी वाहन रस्त्यावरच उभे राहत असल्याने दिसून येत होते. मात्र आता या टोईंग व्हॅन मुळे अवैधरित्या पार्किंग करण्यात आलेल्या वाहन उचलून थेट टोईंग सेंटरला नेण्यात येणार असुन वाहनधारकाला वाहतूक कार्यालयात जाऊन दंड भरल्यानंतरच त्याची वाहने परत मिळणार आहे .ही कारवाई डोंबिवलीतील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार असून वाहनधारकांनी अनधिकृत पार्किंग टाळून सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत आहे.
Byte:- श्रीराम पाटील ( वरिष्ठ पोलीस निरीक्षक डोंबिवली वाहतूक विभाग)
0
Share
Report
Pandharpur, Maharashtra:
25062025
Slug - PPR_SHIVSENA_MEETING
feed on 2c
file 01
------------
Anchor - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका साठी शिवसेनेने सोलापूर जिल्ह्यात तयारी सुरू केली आहे. शिवसेना संपर्क प्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत यांच्या उपस्थितीत पंढरपूर मध्ये शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला. आगामी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीसाठी शिवसेना ताकतीने उतरणार असून महायुतीच्या घटक पक्षांसोबत निवडणुका लढून महायुतीचा झेंडा स्थानिक स्वराज्य संस्था फडकवणार असल्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला आहे
0
Share
Report
Mumbai, Maharashtra:
अँकर -- मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ठाकरेंच्या शिवसेनेच्या भारतीय कामगार सेना आणि मनसेच्या हवाई कर्मचारी सेनेने एकत्रित आंदोलन केलं. इंडिगो एअरलाइन्सच्या कामगारांच्या प्रश्नसंदर्भात हे आंदोलन करण्यात आलं आहे. शिवसेना ठाकरे यांची युनियन आणि मनसे युनियनशी संबंधित कामगारांचे मॅनेजमेंट विरोधात काम बंद आंदोलन केलं.
भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस संजय कदम आणि मनसे कामगार सेनेचे कार्याध्यक्ष संतोष धुरी यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले आहे.
मनोज कुळकर्णी
Vdo २C
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
केडीएमटीच्या परिवहन बसमधून पडून विद्यार्थाचा अपघात..
विद्यार्थी गंभीर जखमी..
Anchor: – कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन (KDMT) सेवेच्या धावत्या बसमधून पडून तुषार देशमाने या आयटीआयमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा अपघात गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात तुषारचा डावा हात पॅक्चर असून त्याच्यावर कल्याणच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
vo.. कल्याण स्थानकातून रोनक सिटीच्या दिशेने तुषार देशमाने आपल्या घरी जात असंताना बसमध्ये चढताना बसचे हँडल अचानक तुटल्यामुळे तो चालत्या बसमधून खाली पडला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला असून त्याच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे.
अपघात घडल्यानंतरही बस चालक व वाहकाने बस थांबवली नाही, तर बस थेट रोनक सिटीपर्यंत पोहोचली. नातेवाईकांनी चालक व वाहकावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.
या घटनेमुळे विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांमध्ये संतापाची लाट असून, त्यांनी KDMT प्रशासनाकडून तत्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे..कल्याण महात्मा फुले पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे
बाईट:- राहुल आघाम नातेवाईक
बाईट:- तुषार देशमाने जखमी विद्यार्थी
0
Share
Report
Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Rain
Feed on - 2C
---------------------------
Anchor - मोठ्या खंडानंतर आज नांदेड शहरासह परिसरात पावसाचे आगमन झाले. गेल्यात तेरा चौदा दिवसापासून नांदेड मधे पाऊस बरसला नव्हता. आज सायंकाळी 5 वाजेच्या सुमरास रिमझीम पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास पावसाची रिमझिम सुरु होती. पाऊस गायब झाल्याने उकाडा वाढला होता. शिवाय ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आली होती. या पावसामुळे नांदेड तालुक्यातील पिकांना थोडे जीवदानी मिळणार आहे. शिवाय या रिमीझिम पावसामुळे उकाडा कमी झाला. अजूनही मोठ्या पवसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांसह सर्वांनाच आहे.
----------------
0
Share
Report