Back
लातूरमध्ये काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा, तणाव वाढला!
VBVAIBHAV BALKUNDE
FollowJul 13, 2025 16:00:09
Latur, Maharashtra
लातूर ब्रेकिंग न्यूज
AC ::- लातूर शहरातील मजगे नगर येथे रस्त्याच्या कामाच्या उद्घाटनावरून काँग्रेसचे आणि भाजपाचे कार्यकर्ते मध्ये राडा झाला आहे. काँग्रेसचे आमदार अमित देशमुख उद्घाटनासाठी पोहोचले आणि त्यांनी त्या रस्त्याचे उद्घाटन केलं त्यावेळी भाजपाचे कार्यकर्ते उद्घाटन स्थळी घुसले आणि कार्यक्रमात घोषणाबाजी केली. यावेळी काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आम्ही सामने आले. आणि दोघांमध्ये राडा झाला. भाजप कार्यकर्ते निषेधाचे फलक घेऊन उद्घाटनस्थळी दाखल झाले होते. हे काम भाजप सरकारच्या निधीतून मंजूर झालं आहे आणि काँग्रेस फक्त श्रेय घेते असा आरोप भाजपकडून करण्यात आला. या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनीही घोषणाबाजी करत प्रत्युत्तर दिलं. काही काळ दोन्ही गट आमने-सामने आले होते. परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप केला. दोन्ही गट वेगळे करून परिस्थिती आटोक्यात आणण्यात आली. याप्रकरणी पोलिसांकडून अद्याप कोणताही गुन्हा अद्याप नोंदवण्यात आलेला नाही.
बाईट ::- आमदार अमित देशमुख
बाईट ::- अजित पाटील कव्हेकर भाजपा शहर जिल्हाध्यक्ष
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VKVISHAL KAROLE
FollowJul 14, 2025 02:33:27Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn encroachment av
Feed attached
जालना रोडनंतर आता मनपाने सातारा देवळाईकडे मोर्चा वळवला आहे. रस्ता रुंदीकरण मोहिमेत मनपा सोमवारी बीड बायपासवरील देवळाई चौक ते झाल्टा फाटा या दरम्यान मार्किंग करणार आहे. ६० मीटर रस्त्याच्या आत असलेल्या मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्यात येणार आहे. मार्किंगनंतर खांब उभे करणार आहे. N डीपी रस्त्यांच्या लगत सामासिक अंतरामध्ये ज्या मालमत्ता आहेत त्यांची कागदपत्रे मनपाचे पथक तपासणार आहे. या कागदपत्रांमध्ये बांधकाम परवानगी, गुंठेवारी नियमितीकरण दाखला आणि मालमत्ता करभरणा या बाबींचा प्रामुख्याने समावेश असणार आहे. यापूर्वी केलेल्या कारवाईत देवळाई चौक ते पैठण रोड यादरम्यान असलेली अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे महापालिकेने हटविली आहेत.
8
Share
Report
VKVISHAL KAROLE
FollowJul 14, 2025 02:33:17Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn midc issue av
Feed attached
शेंद्रा एमआयडीसी च्या ऑरिकसिटी मध्ये जागेसाठी उद्योगांकडून मागणी असल्याने १० हजार एकर भूसंपादनासाठी, तसेच पायाभूत सुविधांसाठी १० हजार कोटी रुपयांची आवश्यकता असेल. यासंदर्भातील प्रस्ताव 'महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेड'च्या महिनाभरातील बैठकीत सादर केला जाईल. त्यानंतर २ महिन्यांत भूसंपादन सुरू होण्याची अपेक्षा आहे, असे सूत्रांनी सांगितले.
'दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर' (डीएमआयसी) प्रकल्पांतर्गत शेंद्रा बिडकीन गुंतवणूक क्षेत्रासाठी १३ वर्षांपूर्वी भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली होती. त्या वेळी बिडकीन परिसरातील ७,९०० एकर व शेंद्रा परिसरातील २,१०० एकर शेतजमिनीचे संपादन झाले
भूसंपादन आणि पायाभूत सुविधांसाठी ६ हजार कोटी रुपये खर्च झाला. तेव्हा शेतकऱ्यांना एकरी २३ लाख रुपये मिळाले होते त्यामुळं यावेळी पैसे अधिक वाढवुन मिळतील अशी ही चर्चा आहे...
0
Share
Report
VKVISHAL KAROLE
FollowJul 14, 2025 02:33:09Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn jayakwadi av
Feed attached
गेल्या २५ वर्षांत पहिल्यांदाच जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात जायकवाडीत ७५.६६ टक्के साठा झाला आहे. सध्या धरणात ९,४८२ क्युसेकने आवक होत आहे. त्यामुळे मराठवाड्यातील ५ जिल्ह्यांतील पावणेदोन लाख हेक्टर सिंचनाचा प्रश्न मिटला आहे. सोबतच छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्यातील शहरांची दोन वर्षे पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली आहे, जायकवाडीच्या वरील भागात झालेल्या जोरदार पावसामुळे मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात, गेल्या १५ दिवसांपासून पाण्याची आवक वाढली आहे. १८ दिवसांतच धरणाचा साठा २९ वरून ७५ टक्क्यांवर गेला. म्हणजे साठा १८ दिवसांतच ४६ टक्क्यांनी वाढला. मागील वर्षी याच दिवशी धरणात केवळ ४ टक्के पाणीसाठा होता.
मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने मराठवाड्यात पाण्याची परिस्थिती गंभीर बनली होती. मात्र, नाशिक, नगर जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडीचा साठा झपाट्याने वाढला. ८ दिवस धरणात आवक सुरू राहिली तर जुलैमध्ये पाणी सोडावे लागेल...
0
Share
Report
VKVISHAL KAROLE
FollowJul 14, 2025 02:30:48Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
csn crime update av
feed attached
ANCHOR : छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील शिरसगाव येथे ४७ वर्षीय शेतकऱ्याचा घरासमोरच धारदार शस्त्राने खून करण्यात आल्याची घटना काल उघडकीस झाली होती. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी तपासाचे चक्रे फिरवत अवघ्या 24 तासात आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. राजाराम ऊर्फ राजू भाउसिंग चुंगडे मयताचे नाव असून, आनंद राजपूत, इरफान शहा, समीर कुरेशी असे आरोपींचे नावं आहेत. यातील आरोपी आनंद राजपुत यास मयत राजाराम यांनी एक ते दिड वर्षापुर्वी मारहान केली होती त्याचा राग मनात होता, तर दुसरा आरोपी समीर कुरेशी, याचेवर दाखल अॅट्रॉसीटीच्या गुन्हात मदत न केल्याने, व आरोपी ईरफान शहा याने मयत हे नेहमी कब्रस्तानच्या जागेच्या वादावरुन आमच्या समाजाला मदत करत नाहीत. यापुर्व वैमन्यष्यातून खून केला असल्याचे कबूल केले आहे.
Byte : विनयकुमार राठोड, पोलीस अधीक्षक
0
Share
Report
VKVISHAL KAROLE
FollowJul 14, 2025 02:30:30Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn maha palika av
Feed attached
छत्रपती संभाजीनगर मध्ये रस्ता रुंदीकरण
मोहिमेमुळे शहरात महापालिकेची दहशत वाढली आहे. याची प्रचीती प्रशासनालाही येत असून, या संधीचा फायदा शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठीही घेण्यात येणार आहे. मनपाचा घनकचरा विभाग व्यापाऱ्यांच्या दुकानांसमोर डस्टबिन नसेल तर ५ हजार रुपये दंड ठोठावणार आहे. दुभाजक, चौक, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला तरी जबर दंड आकारणी केली जाणार आहे. सर्व १० झोनमध्ये मनपा स्वच्छतेसाठी विशेष मोहीम राबविणार आहे. या मोहिमेअंतर्गत, अनधिकृत होर्डिंग्ज, रस्त्यांवरील कचरा, सिंगल युज प्लास्टिकवर लक्ष केंद्रित करण्यात येईल. शहर विद्रूप करणारे अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्सवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिले आहेत.
0
Share
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowJul 14, 2025 02:02:52Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 1407_BHA_SCHOOL
FILE - 5 VIDEO
साकोली येथील जिल्हा परिषदेची शाळा जीर्ण अवस्थेत... जीर्ण इमारतीत विद्यार्थी करतात ज्ञानर्जन... विद्यार्थीचे जीव धोक्यात...
Anchor : - भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथील विद्यार्थी शाळेतील जीर्ण इमारतीखालीच ज्ञानार्जन करत असल्याचे वास्तव्य समोर आले आहे यामुळे जीर्ण इमारतीखाली विद्यार्थी अध्ययन करीत असल्याने विद्यार्थ्यांच्या जीव धोक्यात आले आहे.....
Vo : भंडारा जिल्ह्याच्या साकोली येथील जिल्हा परिषद शाळेची स्थापना 1 जुलै 1957 रोजी झाली असून सध्या इमारतीचे वय 79 वर्षापर्यंत पोहोचले आहे. दरम्यान शाळेतील दुसऱ्या मजल्यावरील छप्पर सध्या वाकलेले असून ते मोठ्या बासाच्या टोकावर अवलंबून आहे. कवेली फुटलेल्या अवस्थेत असून त्यातून पावसाचे पाणी गळत आहे. हेच वर्ग विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे केंद्र आहे. पावसाळ्यात पावसाच्या वेळी छत कोसळण्याचा मोठा धोका निर्माण झालं आहे. सद्या पावसाळा सुरू असताना परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर दुर्घटना घडू शकते सध्याची धोकादायक स्थितीची जाणीव असूनही शाळा प्रशासन अत्यंत मर्यादित संसाधनामध्ये विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू ठेवण्याच्या प्रयत्न करत आहे. मुख्याध्यापकांनी पंचायत समितीकडून सकाळी , दुपारी असा दोन पाळीत शाळा भरवण्याची तात्पुरती परवानगी घेतली आहे. मात्र विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे.
Vo : साकोली विधानसभेतील तीन पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या लाखनी,साकोली आणि लाखांदूर येथील अश्या 134 वर्ग खोल्यांना 17 कोटी 52 लक्ष रुपये मजूर झाला असला तरी शासन कधी नवीन वर्ग खोल्या बांधणार असा प्रश्न उपस्थित होत असून शासन एखादि मोठी दुर्घटना घडण्याची वाट बघते काय असा सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहे.
BYTE - बादल विश्वनाथ हेमने , विद्यार्थी
BYTE - जिज्ञाशा कापगते , विद्यार्थ्यांनी
BYTE - कोचे,मुख्याध्यापक
BYTE - रवींद्र सोनटक्के , शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद भंडारा
0
Share
Report
SNSWATI NAIK
FollowJul 14, 2025 02:02:25Navi Mumbai, Maharashtra:
story slug- खासदार नरेश म्हस्के ऑन संजय राऊत
mp naresh mhaske on sanjay raut
FTP slug - nm mp naresh mhaske
shots-
byet- naresh mhaske
reporter - swati naik
navi mumbai
anchor -*संजय राऊत ऑन शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांची एसआयटी चौकशी*
संजय राऊत रोज सकाळी भुंकण्याचा काम करतात.
मुळात संजय राऊत हेच आरोपी आहेत ते जामिनावर बाहेर पडले आहेत ते निर्दोष नाहीये.
लोकांस सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण अशी पद्धती संजय राऊत यांची आहे त्यांना बोलण्याचा काय अधिकार आहे की जे स्वतः आरोपी आहे.
हे भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आत गेलेले आहेत जामिनार बाहेर आलेले आहेत त्यामुळे त्यांना तो अधिकार नाहीये बोलण्याचा.
*शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीचा परिणाम होईल का*
कोणाशी युती झाली कोणाशी आघाडी झाली म्हणून कुठले पक्ष बंद नाही पडत. या हिंदुस्थानामध्ये 1947 पासून वेगवेगळ्या आघाड्या झाल्या वेगवेगळ्या युती झाल्यात.
हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे हे म्हणाले होते काँग्रेसला बाजूला ठेवल पाहिजे यांच्या जवळ कधी जायला नाही पाहिजे त्यांच्याशी सत्तेसाठी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस बरोबर आघाडी केली तर अशा किती युती आणि आघाड्या या भारताला या महाराष्ट्राला नवीन नाहीये त्याच्यावरती मत व्यक्त करणे मला काही उचित वाटत नाही.
*सामना - शिवसेना मनसे युती झाली तर महाराष्ट्राला दिशा मिळेल.*
आम्ही अडवले कुठे करावी युती परंतु कालपर्यंत काँग्रेस बरोबर युती केलेली सोनिया गांधींचे तळवे चाटत होता त्याच काय करणार पाय पुसणे म्हणून त्याचा वापर करणार का याचं उत्तर पहिला संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी द्यायला पाहिजे.
आता राजसाहेब ठाकरे जर त्यांना आठवत असतील तर राजसाहेब ठाकरे यांनी शिवसेना वाढवली ग्रामीण भागामध्ये त्यांना यांनी बाजूला काढलं त्यावेळी राज साहेबांची किंमत नव्हती का? यांना राज साहेबांची व्हॅल्यू त्यावेळी नव्हती का?
राज साहेबां बरोबर जे जे लोक होती त्यांना कायमचा आयुष्यात उठवण्याचे काम यांनी केलं तेव्हा राज साहेबांची व्हॅल्यू त्यांना नव्हती का? राज साहेबांना वेगळे का जावं लागलं मनाच्या विरुद्ध निर्णय का घ्यावा लागला याचे सुद्धा उत्तर उद्धव ठाकरे यांच्याकडून येणे अपेक्षित आहे. त्यावेळी राज साहेबांना बाळासाहेबांचं नाव लावायचं नाही बाळासाहेबांचं नाव घ्यायचं नाही अशा पद्धतीचे निर्देश दिले त्यावेळी राज साहेब यांची किंमत यांना नव्हती का याचे उत्तर पहिलं संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी देण अपेक्षित आहे आणि राज साहेबांनी सुद्धा याचे उत्तर त्यांच्याकडेमागणे अपेक्षित आहे.
बाईट - नरेश म्हस्के - खासदार
0
Share
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 14, 2025 02:02:02Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळे फासणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
- संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळे फासणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
- इंदापुरातील दीपक काटे, भवानेश्वर शिरगिरे यांच्यासह एकूण 7 जणांवर गुन्हा दाखल
- अक्कलकोट शहर उत्तर पोलीस ठाण्यात दीपक काटे आणि त्याच्या 7 सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल
- बी एन एस. कलम 115(2), 189(2),191(2),190, 324(4) या कलमांन्वये गुन्हा दाखल
- या मध्ये प्रामुख्याने जमाव जमवून मारहाण करणे, दंगल करणे आदी गुन्ह्याप्रकरणी गुन्हा दाखल
- यात एकूण 2 आरोपी अटकेत असून उर्वरित 5 आरोपिंचा शोध सुरू
0
Share
Report
SNSWATI NAIK
FollowJul 14, 2025 02:01:54Navi Mumbai, Maharashtra:
story slug - स्मशानभूमी ला पत्रे नसल्याने पावसात करावा लागतो अंत्यसंस्कार
स्मशानभूमी पर शेड न होने के कारण कर बारीश मे हो रहे अंत्यसंस्कार
FTP slug - panvel aaptaa villege
shots-
reporter - swati naik
navi mumbai
anchor- पनवेल तालुक्यातील आपटा येथील दाभोळवाडी आदिवासी वाडीतील ग्रामस्थांना मरणानंतरही मरणयातना सोसाव्या लागत आहेत,
येथील स्मशानभूमीला पत्रेच नसल्याने भर पावसात अंत्यसंस्कार करावे लागत आहेत,यामुळे
आपटा ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे ।
gf
0
Share
Report
SNSWATI NAIK
FollowJul 14, 2025 02:01:46Navi Mumbai, Maharashtra:
story Slug -: मोबाईल टॉवरचे 5g युनिट चोरणाऱ्या टोळीला अटक, 56 लाखांचा मुद्देमाल जप्त.
5g unit chori
FTP slug - nm crime pc
shots-
byet- amit kale
reporter - swati naik
navi mumbai
Anchor -: जिओ कंपनीच्या मोबाईल टॉवरवरील 5G unit चोरणाऱ्या टोळीला नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केलेय. मागील महिनाभरात पनवेल, खान्देश्वर आणि तळोजा भागात लावण्यात आलेल्या जिओ कंपनीच्या मोबाईल टॉवरवरील 5G युनिट चोरी झाले होते. याचा एकत्रित तपास करत असताना पोलिसांना हे सर्व गुन्हे एका टोळीमार्फत करण्यात येत असल्याचे समोर आले. त्यानुसार तांत्रिक तपास करत मुख्य आरोपी मधुकर गायकवाड याच्यासह सौरभ मंजुळे, अभिषेक काकडे आणि दानिश मलिक या आरोपींना परभणी, मालेगाव, पडघा, सटाणा येथून अटक केली असून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेय. पोलिसांच्या चौकशीत नवी मुंबईसह मीरारोड आणि मुंबईतील एकूण 13 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून आरोपीकडून 56 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.
बाईट - अमित काळे
उपायुक्त,गुन्हे
0
Share
Report
MAMILIND ANDE
FollowJul 14, 2025 02:01:37Wardha, Maharashtra:
वर्धा स्टोरी
SLUG- 1407_WARDHA_MP_KALE
- राज्यातील आरोग्य व्यवस्थाच व्हेंटिलेटरवर आहे
- खासदार अमर काळे यांची आरोग्य व्यवस्थेवर टीका
- वर्धा जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले
- तळेगाव श्यामजी पंत येथे रुग्णालय उभारण्याची निवडणुकी पूर्वी घोषणा पण त्याचे पुढे काय झाले
अँकर - राज्यात आरोग्य व्यवस्था व्हेन्टीलेटर वर असल्याची टीका खासदार अमर काळे यांनी केली आहे. अनेक उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नाहीए, गायनोकोलॉजिस्ट नाही आहे. आर्वी सारख्या ठिकाणावरून रुग्ण वर्ध्याला पाठवावे लागतात, आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन झालेले नाही अशी बिकट अवस्था असताना शासन सतत दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप खासदार अमर काळे यांनी केला आहे. सहा सहा महिन्यापासून डॉक्टरांचे पगार झाले नाहीत, ही अवस्था येथेच नाही तर संपूर्ण राज्यात असल्याचे खासदार अमर काळे यांनी म्हटले आहे. तर तळेगाव श्यामजी पंत येथे तीनशे बेडचे रुग्णालय उभारण्याची घोषणा निवडणुकीपूर्वी करण्यात आली. निवडणूक आटोपली त्याचे पुढे काय झाले कळलेच नाही. असेही ते म्हणाले.
बाईट - अमर काळे, खासदार वर्धा
4
Share
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowJul 14, 2025 02:01:31Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 1407_BHA_ANDOLAN
FILE - 2 VIDEO
भंडाऱ्याच्या भिलेवाडा ते करडी महामार्गावर रस्ता दुरुस्तीच्या मागणी करिता करण्यात आले आंदोलन.....
ANCHOR :- भंडाऱ्याच्या भिलेवाडा - करडी ते तिरोडा या महामार्गाची दुरुस्ती करण्याकरिता करडी - भिलेवाडा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. स्थानिक नागरिकांनी वारंवार मागणी करून सुद्धा बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने अखेर नागरिकांनी रास्ता रोको आंदोलनाची भूमिका घेतली. अखेर संबंधित अधिकाऱ्यांनी आंदोलन स्थळी भेट देत पाच दिवसात दुरुस्तीचे काम करण्याची आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
....
0
Share
Report
MAMILIND ANDE
FollowJul 14, 2025 02:01:12Wardha, Maharashtra:
वर्धा ब्रेकिंग
SLUG- 1407_WARDHA_TRAIN_MARHAN
अहमदाबाद-हावडा एस्प्रेसमध्ये आसनासाठी ब्लेड हल्ला; दोन जखमी
ॲंकर - अहमदाबाद-हावडा या धावत्या रेल्वे गाडीत आसनासाठी दोघांमध्ये फ्रि-स्टाईल झाली. ही घटना एस-1 या कोचमध्ये घडली. या प्रकरणातील दोन्ही जखमींना वैद्यकीय तपासणीनंतर पुढील कारवाईसाठी वर्धा लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले...
व्हिओ - छत्तीसगढ येथील नरेशकुमार वर्मा हे अहमदाबाद-हावडा एस्प्रेसच्या एस-1 कोच मधून नियोजित ठिकाणी जात होते. ते आपल्या आरक्षीत आसनावर बसून असताना धामनगाव रेल्वे स्टेशननंतर धामनगाव येथील आशिष मिसाळ हा रेल्वेत चढला. तो नरेशकुमार यांच्या आसनावर बसला असता त्यास येथे बसू नका हे माझे आसन आहे असे सांगण्यात आले. नंतर आसनाच्या कारणावरूनच आशिष व नरेश यांच्याच चांगलीच शाब्दिक खडाजंगी झाली. सुरुवातीला शाब्दिक वाद सुरू असतानाच थेट ब्लेडने मारहाण करण्यात आली. या मारहाणीत नरेशकुमार व आशिष हे दोघे जखमी झाले. धावत्या रेल्वेत ब्लेड हल्ला झाल्याची माहिती मिळताच वर्धा येथील रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी व कर्मचारी अॅशन मोडवर आले. पुलगाव रेल्वे स्थानक येथून एएसआय गजभीये यांनी रेल्वे चढून आशिषला ताब्यात घेतले. त्यानंतर आशिष व नरेशकुमार यांना वर्धा रेल्वे स्थानकावर उतरविण्यात आले. जखमी आशिष व नरेशकुमार यांना रेल्वे सुरक्षा बलाचे पोलिस निरीक्षक छेदीलाल कनोजिया यांच्या मार्गदर्शनात प्रिती सहारे व इतर जवानांनी रुग्णालयाकडे रवाना केले.
0
Share
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 14, 2025 01:02:27Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - चीन मधून अवैधरित्या उत्तर भारतात विक्री होणारया बेदाणामुळे महाराष्ट्रातील बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आरोप..
अँकर - चीनच्या बेदाण्याची तस्करी करून उत्तर भारतात विक्री सुरू असल्याने महाराष्ट्रातल्या बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत, असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आला आहे.महाराष्ट्रात विशेषता देशात यंदा बेदाण्याचे उत्पादन घटल्याने बेदाण्याला 400 ते 500 रुपये प्रति किलो इतका दर मिळालेला आहे मात्र सध्या चीन मधून नेपाळ मार्गे तस्करी करत आयात शुल्क चुकवत तू उत्तर प्रदेश,बिहार सह उत्तर भारतात 250 ते 300 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे.यामुळे महाराष्ट्रा आणि विशेषतः सांगली जिल्ह्यातील बेदाण्याचा दरात 50 ते 60 रुपयांची घसरण झाल्याच आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी केला आहे. धडक घसरण झाल्याने बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होत असून केंद्र सरकारने तातडीने चीन मधून भारतात अवैध मार्गे येणाऱ्या बेदाण्याची वाहतूक व विक्रीवर बंदी आणावी,अशी मागणी करत प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे.
बाईट - महेश खराडे - जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना- सांगली.
0
Share
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 14, 2025 01:02:17Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - भारतीय सैन्यासाठी शिवसेना शिंदे गटाकडुन जम्मू-कश्मीर मध्ये 9 ऑगस्ट रोजी सिंदूर महारक्तदान शिबिर - डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील.
अँकर - जम्मू-कश्मीर मध्ये भारतीय सैन्यासाठी येत्या 9 ऑगस्ट रोजी सिंदूर
महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या माध्यमातून शिवसेना शिंदे गटाच्यावतीने हा महारक्तदान पार पडणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सिंदूर महारक्तदान उपक्रमाचे उदघाटन होणार असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे नेते डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी दिली आहे.
जम्मू-काश्मीरच्या उधमपूर आणि आर्मी कमांड हॉस्पिटल येथे हा उपक्रम संपन्न होणार आहे.यासाठी येत्या पाच ऑगस्ट रोजी सांगलीतून धर्मवीर एक्सप्रेस या विशेष रेल्वेने जिल्ह्यातील एक हजार युवक जाणार आहेत.
9 ऑगस्ट पासून पुढील वर्षभर देशातल्या विविध ठिकाणी असणाऱ्या आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्सच्या कॅम्प मध्ये जाऊन सांगली जिल्ह्यातील युवक हे रक्तदान करणार आहेत.देशाच्या स्वातंत्र्यानंतर देशाच्या कर्तव्यासाठी प्राण देणाऱ्या सैनिकांच्या प्रति राबवण्यात येणारे पहिल्याच अभियान असल्याचं दावा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी केला आहे.क्रांती दिन आणि रक्षाबंधनचे औचित्य साधून हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे चंद्रहार पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
बाईट - चंद्रहार पाटील - डबल महाराष्ट्र केसरी.
0
Share
Report