Back
5G युनिट चोरी करणाऱ्या टोळीला नवी मुंबई पोलिसांनी अटक!
SNSWATI NAIK
FollowJul 14, 2025 02:01:46
Navi Mumbai, Maharashtra
story Slug -: मोबाईल टॉवरचे 5g युनिट चोरणाऱ्या टोळीला अटक, 56 लाखांचा मुद्देमाल जप्त.
5g unit chori
FTP slug - nm crime pc
shots-
byet- amit kale
reporter - swati naik
navi mumbai
Anchor -: जिओ कंपनीच्या मोबाईल टॉवरवरील 5G unit चोरणाऱ्या टोळीला नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केलेय. मागील महिनाभरात पनवेल, खान्देश्वर आणि तळोजा भागात लावण्यात आलेल्या जिओ कंपनीच्या मोबाईल टॉवरवरील 5G युनिट चोरी झाले होते. याचा एकत्रित तपास करत असताना पोलिसांना हे सर्व गुन्हे एका टोळीमार्फत करण्यात येत असल्याचे समोर आले. त्यानुसार तांत्रिक तपास करत मुख्य आरोपी मधुकर गायकवाड याच्यासह सौरभ मंजुळे, अभिषेक काकडे आणि दानिश मलिक या आरोपींना परभणी, मालेगाव, पडघा, सटाणा येथून अटक केली असून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेय. पोलिसांच्या चौकशीत नवी मुंबईसह मीरारोड आणि मुंबईतील एकूण 13 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून आरोपीकडून 56 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.
बाईट - अमित काळे
उपायुक्त,गुन्हे
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
FollowJul 14, 2025 11:12:13Bhandara, Maharashtra:
Anchor :- सरकार मधलेच दोन लोक एक केंद्रीय मंत्री आणि एक राज्यातील एक सुपर मुख्यमंत्री आपल्या भंडाऱ्यात आहेत ते ((नाव न घेता आमदार परिणय फुके यांच्यावर टीका)) या दोघांच्या वक्तव्यातील हा फरक आपल्याला जाणवला. त्यामुळे ही जी परिस्थिती आज आहे.....
अधिकाऱ्यांवर सरकारचा कंट्रोल असल्या पाहिजे तो राहिलेला नाही..... मनमानी चाललेली आहे....
भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्स विकले जात आहेत हे पण सत्य आहे....
गडकरींनी एसपीची का तारीफ केली तो एक प्रश्न आहे.....
त्यामुळे आता सत्ता पक्षाच्या लोकांमधले कुठली चढावूत चालली आहे हे कळायला कारण नाही....
आमच्या जिल्ह्यात प्रशासनाची जे काही प्रमुख पद आहेत. यांच्यावर पकड असली पाहिजे.... प्रशासकीय व्यवस्थेतुन सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे...
((नितीन गडकरी यांनी भंडारा जिल्हा दौऱ्या दरम्यान भंडाराचे पोलीस अधीक्षक नुरून हसन यांची कामगिरीबद्दल तारीफ केली.... तर दुसरीकडे भाजपच्याच आमदार परिणय फुके यांनी भंडारा जिल्ह्यात एमडी सारखा ट्रक्स विकत असल्याची खंत व्यक्त केली या दुमतावर नाना पटोले बोलत होते)))
......
......
BYTE : - नाना पटोले (१:२६)
ANCHOR :- जो खताचा कोटा आहे.... ते खट मोठ्या प्रमाणात ब्लॅक मार्केटिंग मध्ये विकले जात आहेत..... हे आता जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर कृषी अधिकाऱ्यांनी मान्य केला आहे.....
शेतकऱ्यांना कोणत्या पद्धतीने लुटलं जातं कोणत्या पद्धतीने लिंकिंग दिली जाते.... शेतकऱ्यांना पाहिजे नाहीत अशा गोष्टीही त्यांना खरेदी करावा लागतात. एका युरियाच्या पोत्यावर दोनशे रुपयाची लुट होत आहे.
हे सर्व प्रश्न खासदार शेतकरी व सामान्य नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांक पुढे मांडले आहेत...
((शेतकऱ्यांच्या मुद्द्याला घेऊन नाना पटोले यांनी भंडाऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत संबंधित अधिकाऱ्यांची परेड घेतली त्यावर नाना पाटोळे बोलत होते))
...
BYTE : - नाना पटोले ( १:११)
Anchor :- राज्यात ज्या पद्धतीने लुट मोहीम सुरू आहे ती प्रत्येक स्तरावर सुरू आहे. शिकलेल्या मुला मुलींची, सामान्य नागरिकांची, शेतकऱ्यांची.... विद्यार्थ्यांची गरीब माणसाची अशी प्रत्येकाची लुट चाललेली आहे....
त्याचप्रमाणे दारूचे दुकाना चालवतात त्या लोकांकडून नाही आता लूट सुरू केली आहे. एक्साईज दीडशे पट वाढवला , वैट वाढवला. हा पैसा गोळा केला जात आहे.... हा पैसा चालला कुठे हा प्रश्न निर्माण होत आहे. राज्य सरकार वर 10 लाख कोटी वर कर्ज आहे.....
जीएसटी आला तेव्हापासून प्रत्येक माणसाला टॅक्स भरावा लागतो..... एवढा मोठा पैसा केंद्र आणि राज्य सरकारच्या तिजोरीत जात आहे....
तरीही कर्ज का वाढत आहे....
सर्वसामान्यांना लुटायचं आणि मूठभरांना या देशात जगण्याची संधी आहे हे काही समीकरण राज्य सरकारने सुरू केले असेल तर कदापि मान्य होणार नाही.....
बुधवारी विधानसभेमध्ये मी हा प्रश्न मांडणार.....
सरकार चार ते पाच हजार नवीन दारूचे लायसन्स देणार आहे अशी पेपरला बातमी पाहिली..... याचा अर्थ एकेकडे शाळा बंद करायचे आणि दारूचे दुकान वाढवायची महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे.....
या पद्धतीने महाराष्ट्र निर्माण करायचा अधिकार या बहिणीने निवडून आलेल्या लोकांना नाही.....
BYTE :- नाना पटोले बाईट ( ३:३०)
0
Share
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowJul 14, 2025 11:09:45Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Rajapurkar
Location : Maval
File.name : 1407ZT_MAVAL_ACCIDENT_CCTV
Total files : 02
Headline : तळेगांव चाकण मार्गावर खालुब्रे चौकात मोटरसायकल स्वारांचा भीषण अपघात
अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
Anchor:
तळेगांव चाकण मार्गावर खालुब्रे चौकात मोटरसायकल स्वारांचा भीषण अपघात झाला, यात मोटरसायकल च्या मागे बसलेला कामगार कंटेनर च्या चाकाखाली आल्याने जागीच ठार झाला, या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय..सध्या पावसाळा सुरू असून रस्ता निसरडा झालाय, पावसाळ्यात गाडी चालवताना काळजीपूर्वक गाडी चालवावी डाव्या बाजूने ओव्हरटेक करताना गाडी घसरली आणि थेट मागून येणाऱ्या कंटेनर खाली गेली, यात मोटरसायकल चालविणारा थोडक्यात बचावला तर मागे बसलेला थेट कंटेनर च्या चाकाखाली आल्याने जागीच ठार झाला.. गजानन बोळकेकर असे अपघातात मयत झालेल्याचे नाव आहे. हे दोघे एका खासगी कंपनीत कामाला निघाला होते..तर अपघातात ठार झालेल्या कामगाराचे नुकतेच तीन महिन्यांपूर्वी लग्न झाले होते.
0
Share
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 14, 2025 11:02:10Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - करगणीतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरपीआय आठवले गटाचे निदर्शने..
अँकर - सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील करगणी मध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार आणि आत्महत्या प्रकरणाचा आरपीआय आठवले गटाच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला आहे. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पीडित मुलीच्या कुटुंबासह निदर्शने करत आरोपींना कठोर शिक्षा व्हावी,अशी मागणी करण्यात आली आहे.तसेच आटपाडी पोलिसांकडून गुन्हेगारांच्या वर कारवाई करण्यामध्ये दिरांगाई करण्यात आल्याचा आरोप करत आटपाडी पोलिसांचा निषेध देखील नोंदवला आहे.त्याचबरोबर करगणी गावात आणि शालेय विद्यार्थिनी दहशतीखाली आहे, त्यामुळे करगणी गावात पोलीस अधीक्षकांसह जिल्हाधिकाऱ्यांनी येऊन ग्रामस्थांची बैठक घ्यावी,अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे.
बाईट - राजेंद्र खरात - जिल्हाध्यक्ष, आरपी आय, आठवले गट
0
Share
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 14, 2025 10:37:43Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ल्याप्रकरणी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी कारवाई विषयची दिली माहिती
संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरणी आरोपींवरती प्रतिबंधक कारवाई केली जाणार
प्रवीण गायकवाड यांच्यावर काल शिवधर्म फाउंडेशन कार्यकर्त्यांनी केली होती शाई फेक
आरोपी विरोधात दाखल गुन्हा जामीन पात्र असल्याने कोणालाही अटक नाही
मात्र आरोपीने पुन्हा एकदा असे कृत्य करू नये म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल
बाईट -
विलास यामवार
अक्कलकोट उपविभागीय पोलीस अधिकारी, सोलापूर ग्रामीण
2
Share
Report
SGSagar Gaikwad
FollowJul 14, 2025 10:37:35Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_dcp_byte
*नाशिकरोड करन्सी नोट प्रेस घोटाळा; उत्तरप्रदेशमधील तरुणावर गुन्हा दाखल ...*
*बनावट प्रमाणपत्र सादर करुन मिळवली नोकरी, परप्रांतीय टोळी सक्रिय असल्याचा पोलिसांना संशय...*
अँकर : करन्सी नोट प्रेस नाशिकरोडमध्ये डमी परीक्षार्थी बसवून आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळविल्याचा प्रकार उघडकीस आला असतानाच आता २०२३ मधील पर्यवेक्षक भरतीप्रक्रियेत एका उमेदवाराने बनावट प्रमाणपत्राव्दारे फसवणूक करून नोकरी मिळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार २१ मार्च २०२३ ते ३ जुलै २०२५ या कालावधीत घडला.
याप्रकरणी करन्सी नोट प्रेस, नाशिकरोडचे उप प्रबंधक विक्रमसिंग सूर्यकांत चौधरी यांनी उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखाल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित विवेक पनवार पाल सिंग याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बाईट: किशोर काळे, उपायुक्त परिमंडळ - 2.
करन्सी नोट प्रेस नाशिकरोडच्या पर्यवेक्षक पदासाठी २०२३ मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात आली. या भरती प्रक्रियेमध्ये संशयित विवेक सिंग याने बनावट वीर बहादूर सिंह पूर्वांचल विश्वविद्यालय, जौनपूर यांच्याकडील प्रमाणपत्र क्रमांक ०१३७३ असे डिप्लोमा इन इंजिनिअरींग (प्रिटींग)चे प्रमाणपत्र बनावटीकरण केले. गैरमार्गाने नोकरी मिळवून पात्र उमेदवारांना वंचित ठेवले व जनता व करन्सी नोट प्रेसची फसवणूक केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दाभाडे करीत आहेत.
0
Share
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 14, 2025 10:37:02Washim, Maharashtra:
वाशिम:
File:1407ZT_WSM_FARMER_ANDOLAN
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर : सावकारांमुळे प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांनी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज ठिय्या आंदोलन सुरू केले.पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र सावकारअधिनियम २०१४ मध्ये सुधारणा करून तो तात्काळ लागू करावा. अवैध सावकारांनी बळकावलेली शेतजमीन मूळ शेतकऱ्यांना विनामूल्य बंदोबस्तात परत द्यावी.या मागणीसाठी शेतकऱ्यांनी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या देत आंदोलन केलं.
बाईट: रवी ठाकरे,शेतकरी
0
Share
Report
SGSagar Gaikwad
FollowJul 14, 2025 10:36:38Nashik, Maharashtra:
feed send by 2c
reporter-sagar gaikwad
slug-nsk_andolan_byte
नाशिक ब्रेकिंग...
- *नाशिकमध्ये आदिवासी विकास भवनाच्या समोर गेल्या सहा दिवसांपासून रोजंदारी कर्मचाऱ्यांचे बिऱ्हाड धरणे आंदोलन सुरू...*
- आदिवासी विकास भवनाच्या परिसरात नाशिक पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात...
- बाह्यस्रोत पदभरती प्रक्रिया रद्द करावी ह्या प्रमुख मागण्यासाठी आंदोलन सुरू...
- तब्बल एक हजार नाशिक पोलिस अधिकारी कर्मचारी, दंगल विरोध पथक, राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात...
- आदिवासी विकास भवनाच्या समोर सातशे ते आठशे आंदोलक रस्त्यावर बसून
-
बाईट: गौरव अहिरे. आंदोलक.
0
Share
Report
NMNITESH MAHAJAN
FollowJul 14, 2025 10:33:15Jalna, Maharashtra:
FEED NAME | 1407ZT_JALNA_HARIN(2 FILES)
जालना : सोयाबीन पिकात हरणांचा उच्छाद,वन विभागाने बंदोबस्त करण्याची मागणी
अँकर : जालन्यातील बोरगाव,बोरगाववाडी, चिंचखेडावाडी, बारवालवाडी शिवारात हरणांनी सोयाबीन पिकांमध्ये उच्छाद मांडला आहे.25 ते 30 हरणांचा कळप सोयाबीन पीकाचे शेंडे खाऊन फस्त करत असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढलीय.या हरणांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय.
0
Share
Report
MNMAYUR NIKAM
FollowJul 14, 2025 10:33:01Buldhana, Maharashtra:
प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ बुलढाण्यात विविध संघटनांचे तीव्र आंदोलन
Anchor : संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात आज विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांनी तीव्र निदर्शने केली. संभाजी ब्रिगेडसह, मुस्लिम संघटना, बुद्धिस्ट संघटना आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. यावेळी आंदोलकांनी हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत राज्यपालांना निवेदन दिले. प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ला हा लोकशाही मूल्यांवर हल्ला असून, अशा घटना महाराष्ट्राच्या शांतता आणि सलोख्याला बाधा पोहोचवत असल्याचे आंदोलकांनी सांगितले. हल्लेखोरांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोरातील कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
0
Share
Report
SRSHRIKANT RAUT
FollowJul 14, 2025 10:11:13Yavatmal, Maharashtra:
Anchor : बच्चू कडू यांची सातबारा कोरा यात्रेचा यवतमाळच्या महागाव तालुक्यातील अंबोडा समारोप होत असून हजारोच्या संख्येने शेतकरी शेतमजुरांनी या ठिकाणी गर्दी केली आहे. सभेसाठी नागपूर तुळजापूर राष्ट्रीय मार्गावर मंच उभा करण्यात आल्याने आणि शेकडो ट्रॅक्टर शेतकऱ्यांनी आणल्यानं यां राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प पडली आहे.
1
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 14, 2025 10:10:04Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1407ZT_CHP_BAR_MORCHA
( 2 file sent on 2C)
टायटल:-- राज्य सरकारने वाढविलेल्या भरमसाठ वॅट विरोधात रेस्टॉरंट आणि बार असोसिएशनचा चंद्रपुरात निषेध मोर्चा, 700 हुन अधिक बार-रेस्टॉरंट ठेवले बंद
अँकर:--- राज्य सरकारने वाढविलेल्या भरमसाठ वॅट विरोधात रेस्टॉरंट आणि बार असोसिएशनच्या वतीने आज चंद्रपुरात निषेध मोर्चा काढण्यात आलाय. चंद्रपूर शहरातील गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. राज्य सरकारने दारू वरील व्हॅट करात भरमसाठ वाढ केली आहे. यामुळे हॉटेल व बार उद्योगावरील आर्थिक भार वाढला आहे. परवाना शुल्कातही 65% आणि उत्पादन शुल्कात 60 % वाढ करण्यात आली असल्याने रेस्टॉरंट आणि बार व्यवसाय डबघाईस येण्याची शक्यता आहे. हा करांचा भार कमी करण्यात यावा यासाठी आज राज्यातील सर्व हॉटेल -परमिट रूम -बार बंद ठेवण्यात आले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील व्यापारी या राज्यव्यापी आंदोलनात सहभागी झाले असून सुमारे 700 हून अधिक बार -परमिट रूम आज बंद ठेवण्यात आले आहे.
बाईट १) अनिल धानोरकर, संघटना सदस्य
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
NMNITESH MAHAJAN
FollowJul 14, 2025 10:00:15Jalna, Maharashtra:
FEED NAME | 1407ZT_JALNA_WAGHMARE(3 FILES)
जालना | ब्रेकिंग | मुंबईतील आंदोलनावरून जरांगे विरुद्ध वाघमारे
जरांगे मुंबईत ज्या मैदानात आंदोलन करतील त्याच मैदानात आम्हीही आंदोलन करु
ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचा राज्य सरकारसह जरांगेंना जाहीर ईशारा
जरांगेंशी आम्ही दोन हात करायला तयार आहोत
ओबीसींवर अन्याय कराल तर सरकारला त्यांची जागा दाखवून देऊ
एकनाथ शिंदेंनी जरांगेंना सपोर्ट केला तर आम्ही निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ
महाराष्ट्रातला ओबीसी समाज एका पायावर मुंबईत जायला तयार-वाघमारे
अँकर |जरांगे मुंबईत ज्या मैदानात आंदोलन करतील त्याच मैदानात आम्हीही आंदोलन करु पण जरांगे यांच्यात दम असेल तर त्यांनी मुंबईत जाऊनच दाखवावं असं आव्हान ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी जरांगेंना दिलंय.जरांगेंशी आम्ही दोन हात करायला तयार आहोत.मात्र ओबीसींवर अन्याय कराल तर सरकारला त्यांची जागा दाखवून देऊ असा ईशाराही वाघमारे यांनी सरकारला दिला.एकनाथ शिंदेंनी जरांगेंना सपोर्ट केला तर आम्ही निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असं सांगत महाराष्ट्रातला ओबीसी समाज एका पायावर मुंबईत जायला तयार आहे असं वाघमारे यांनी म्हटलंय.
बाईट | नवनाथ वाघमारे, ओबीसी नेते
0
Share
Report
ABATISH BHOIR
FollowJul 14, 2025 09:37:57Kalyan, Maharashtra:
विद्यार्थ्यांची सुरक्षा रामभरोसे..
विद्यार्थी करताय मालवाहतूक टेम्पोतून शाळेचा प्रवास.
उप प्रादेशिक विभाग आणि ट्राफिक पोलिसांची डोळेझाक..
कल्याणमध्ये चिमुकल्यांची शाळा 'मालवाहतूक' टेम्पोमधूनच सुरू! ...ना दरवाजे, ना अटेंडंट, ना सुरक्षा विद्यार्थी लोखंडी पट्ट्यांना धरून करतात प्रवास. .
आरटीओची कारवाई केवळ नोटिसांपुरती.. प्रत्यक्षात कार्यालयाच्या ५ किमी अंतरावरच नियम धाब्यावर
तक्रार करा, मग पाहू" आरटीओ अधिकाऱ्याचे उत्तर!.. प्रशासनाची ही झोप आणखी किती निष्पाप बळी घेणार?
Anc...अंबरनाथच्या अपघाताने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले होते. एका खासगी इंग्रजी शाळेच्या भरधाव व्हॅनमधून दोन चिमुकली नर्सरीची मुले रस्त्यावर पडली, त्यातील एक गंभीर जखमी झाले. ही हृदयद्रावक घटना घडून आठवडाही उलटलेला नाही, तोच कल्याणमध्ये अशाच प्रकारचा, किंबहुना त्याहून अधिक धोकादायक प्रकार उघडकीस आला आहे.
कल्याण पूर्व येथील पत्रीपूल परिसरात होली फेथ इंग्लिश हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना चक्क एका मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोमधून शाळेत ने-आण केली जात आहे. या टेम्पोमध्ये विद्यार्थ्यांसाठी कोणतीही योग्य आसनव्यवस्था नाही. त्याचे दरवाजेही पूर्णपणे बंद होत नाहीत आणि धक्कादायक म्हणजे, मुलांच्या सुरक्षिततेसाठी एकही अटेंडंट (सहाय्यक) सोबत नाही. चिमुकले विद्यार्थी केवळ टेम्पोच्या लोखंडी पट्ट्या धरून उभे आहेत. जर हा टेम्पो भरधाव वेगात असताना थोडासाही असंतुलित झाला, तर ही निष्पाप मुले थेट रस्त्यावर फेकली जाऊन भीषण अपघात होण्याची शक्यता आहे.अंबरनाथच्या घटनेनंतर कल्याण आरटीओने तिथे केवळ काही शाळांना नोटिसा बजावून आपली जबाबदारी झटकली. प्रत्यक्ष कारवाई, अनधिकृत बसेसची तपासणी, दोषींवर परवाने रद्द करण्याची कारवाई — यापैकी काहीच झाले नाही! आज त्याच आरटीओ कार्यालयाच्या अवघ्या ५ किलोमीटर परिसरातून विद्यार्थी एका टेम्पोमधून अशा जीवघेण्या पद्धतीने नेले जात आहेत आणि तरीही आरटीओच्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यात अंजन पडलेले नाही.या यंत्रणेला पुन्हा एकदा आपली जबाबदारी झटकण्याचा सोपा मार्ग सापडला आहे – "तक्रार करा, मग आम्ही पाहू."
पालक संतप्त होऊन विचारत आहेत – अपघात झाल्यावरच तुम्हाला जाग येणार का? मुलांच्या सुरक्षिततेची आणि अपघातांना प्रतिबंध करण्याची जबाबदारी नेमकी कुणाची आहे? ही निष्क्रियता आणखी किती बळी घेणार आहे? असे प्रश्न आता सर्व सामान्य कडून उपस्थित केले जात आहे
Byte आशुतोष बारकुल ( RTO अधिकारी)
शाळेने आणि आरटीओ आणि ट्राफिक पोलिसांनी याकडे लक्ष द्यावे कारण की रिक्षांमध्ये बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना कोंबले जाते त्यामुळे याकडे लक्ष द्यावे कोणती घटना घडली तर याला जबाबदार कोण असे पालकांचं म्हणणं आहे.
Byte... विद्यार्थी पालक
शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही बस ठेवलेले आहे बस मध्ये केअर टेकर आहे तसेच दीक्षा देखील आहेत या टॅब मध्ये विद्यार्थ्यांनी प्रवास केलेला आहे त्या पालकाला आम्ही ॲक्शन घेतलेली आहे तसेच आम्ही पालकांकडून लिहून देखील घेतलेला आहे
Byte.. विशू जईकर
शाळेचे प्रिन्सिपल
2
Share
Report
NMNITESH MAHAJAN
FollowJul 14, 2025 09:34:40Jalna, Maharashtra:
FEED NAME | 1407ZT_JALNA_FRAUD_CRIME(25 FILES)
सर्व तक्रारीच्या प्रती आणि बोगस प्रमाणपत्रे सुद्धा फिडमध्ये जोडलेले आहेत
जालना | पतीने पत्नीला तर मुलानं वडिलांना मृत दाखवून लाटलं 7 लाखांचं अनुदान (पॅकेज)
बांधकाम कामगार योजनेत भ्रष्टाचार
मंठा पोलिसांत गुन्हा दाखल,तपास सुरु
बांधकाम कामगार योजनेला दलालांचा विळखा
अँकर : पतीने पत्नीला तर मुलानं वडिलांना बोगस कागदपत्रांच्या आधारे मृत दाखवून बांधकाम कामगार योजनेतून 7 लाखांचं अनुदान लाटलंय.या प्रकरणी जालन्यातील मंठा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.जालन्यातील बांधकाम कामगार कार्यालयात कसा घोटाळा सुरुय यावरचा हा स्पेशल रिपोर्ट
व्हिओ :१:पतीने पत्नीला तर मुलानं वडिलांना बोगस कागदपत्रांच्या आधारे मृत दाखवून बांधकाम कामगार योजनेतून 7 लाखांचं अनुदान लाटलंय.जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील आकणी गावात हा प्रकार घडलाय.बांधकाम कामगार योजनेत जिवंत व्यक्तींना मृत दाखवून बोगस कागदपत्रांच्या आधारे अनुदान लाटले जात असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते नारायण पवार यांनी जिल्हाधिकारी आणि कामगार मंत्र्यांकडे केली होती.त्यांनंतर हे गौडबंगाल उघडकीस आलंय.
बाईट : नारायण पवार,तक्रारदार (बुमवर असलेले बाईट)
ग्राफिक्स व्हिओ :२:दलालांमार्फत बोगस मृत्यू प्रमाणपत्र तयार करून लाभ घेणाऱ्या आरोपींमध्ये शिवाजी उबाळे,तेजस जाधव आणि एका महिलेचा समावेश आहे.या प्रकरणात
आरोपी शिवाजी लक्ष्मण उबाळे यांनी त्यांच्या पत्नी स्वाती शिवाजी उबाळे यांना मयत दाखवलं तर तेजस दुर्योधन जाधव याने त्याचे वडील दुर्योधन जाधव यांना मृत दाखवून 7 लाखांचं अनुदान हडपलं.त्यामुळे पोलिसांनी या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करत चौकशी सुरू केलीय.विशेष म्हणजे दलालांमार्फत बोगस मृत्यू प्रमाणपत्र तयार करून हे अनुदान लाटण्यात आल्याचं पोलीस चौकशीत समोर आलंय.
ज्या कामगारांची कामगार कल्याण कार्यालयाकडे नोंदणी आहे.त्या कामगाराचा नैसर्गिक अथवा कामाच्या ठिकाणी मृत्यू झाल्यास कुटुंबियांना 2 लाखांचं अर्थसहाय्य मिळतं.कामगार पुरुष असेल तर त्याच्या पत्नीला 24 हजारांची मदत मिळते.याच मिळणाऱ्या अर्थसहाय्याचा आरोपींनी बोगस कागदपात्रांच्या आधाराचा फायदा घेतला.
बाईट : संतोष माळगे,पोलीस उपनिरीक्षक,मंठा पोलीस ठाणे
व्हिओ:३: जालन्यातील बांधकाम कामगार कार्यालयाला दलालांनी विळखा घातला असून बांधकाम आयुक्तांनी दलालामार्फत घोटाळा केल्याचा आरोप ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केलाय.जालन्यात बांधकाम कामगार कार्यालयात 100 कोटींचा घोटाळा झाला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची मागणी वाघमारे यांनी केलीय
बाईट : नवनाथ वाघमारे,ओबीसी नेते (हिरवा शर्ट असलेले)
व्हिओ:४: जालन्यातील बांधकाम काम गार कल्याण मंडळात हजारो बोगस कामगाराची दलालांनी नोंदणी केल्याचा आरोप आहे.त्यामुळे दलालांनी केलेल्या या कृत्याचा कामगार मंत्रालयाकडून पर्दाफाश होणार का असा सवाल आता उपस्थित केला जातोय
नीतेश महाजन झी-२४ तास,जालना
0
Share
Report
KJKunal Jamdade
FollowJul 14, 2025 09:31:51Shirdi, Maharashtra:
Anc - सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष तथा बहुजन चळवळीचे जेष्ठ विचारवंत प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे राज्यभरात पडसाद उलटले आहेत.. राहाता येथे सभाजी ब्रिगेड आणि पुरोगामी विचारांच्या संघटनांनी एकत्र येत या हल्ल्याचा निषेध केलाय..
V/O - संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा राज्यभरात निषेध केला जातोय.. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता येथे संभाजी ब्रिगेडसह पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना निवेदन देत या हल्ल्याचा निषेध केलाय.. प्रविण गायकवाड यांच्यावरील हल्ला म्हणजे शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर विचारधारेवर हल्ला आहे.. आम्ही कायद्याला आणि संविधानाला मानतो याचा अर्थ आम्ही निमुटपणे अन्याय सहन करणार नाही.. यापुढे पुरोगामी विचारांवर हल्ला केला तर जशास तसे उत्तर देऊ.. हल्लेखोर हे सरकार पुरस्कृत आहेत का? असा संशय सामान्य पुरोगामी चळवळीच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे.. सरकारने हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी अन्यथा संभाजी ब्रिगेडसह सर्व पुरोगामी संघटांनतर्फे मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय..
Byte - दशरथ गव्हाणे, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड
Byte - कार्यकर्ता, संभाजी ब्रिगेड
3
Share
Report