Back
साकोली शाळेतील जीर्ण इमारतीत विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात!
PTPRAVIN TANDEKAR
FollowJul 14, 2025 02:02:52
Bhandara, Maharashtra
Pravin Tandekar Bhandara
Slug - 1407_BHA_SCHOOL
FILE - 5 VIDEO
साकोली येथील जिल्हा परिषदेची शाळा जीर्ण अवस्थेत... जीर्ण इमारतीत विद्यार्थी करतात ज्ञानर्जन... विद्यार्थीचे जीव धोक्यात...
Anchor : - भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथील विद्यार्थी शाळेतील जीर्ण इमारतीखालीच ज्ञानार्जन करत असल्याचे वास्तव्य समोर आले आहे यामुळे जीर्ण इमारतीखाली विद्यार्थी अध्ययन करीत असल्याने विद्यार्थ्यांच्या जीव धोक्यात आले आहे.....
Vo : भंडारा जिल्ह्याच्या साकोली येथील जिल्हा परिषद शाळेची स्थापना 1 जुलै 1957 रोजी झाली असून सध्या इमारतीचे वय 79 वर्षापर्यंत पोहोचले आहे. दरम्यान शाळेतील दुसऱ्या मजल्यावरील छप्पर सध्या वाकलेले असून ते मोठ्या बासाच्या टोकावर अवलंबून आहे. कवेली फुटलेल्या अवस्थेत असून त्यातून पावसाचे पाणी गळत आहे. हेच वर्ग विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे केंद्र आहे. पावसाळ्यात पावसाच्या वेळी छत कोसळण्याचा मोठा धोका निर्माण झालं आहे. सद्या पावसाळा सुरू असताना परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर दुर्घटना घडू शकते सध्याची धोकादायक स्थितीची जाणीव असूनही शाळा प्रशासन अत्यंत मर्यादित संसाधनामध्ये विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू ठेवण्याच्या प्रयत्न करत आहे. मुख्याध्यापकांनी पंचायत समितीकडून सकाळी , दुपारी असा दोन पाळीत शाळा भरवण्याची तात्पुरती परवानगी घेतली आहे. मात्र विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे.
Vo : साकोली विधानसभेतील तीन पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या लाखनी,साकोली आणि लाखांदूर येथील अश्या 134 वर्ग खोल्यांना 17 कोटी 52 लक्ष रुपये मजूर झाला असला तरी शासन कधी नवीन वर्ग खोल्या बांधणार असा प्रश्न उपस्थित होत असून शासन एखादि मोठी दुर्घटना घडण्याची वाट बघते काय असा सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहे.
BYTE - बादल विश्वनाथ हेमने , विद्यार्थी
BYTE - जिज्ञाशा कापगते , विद्यार्थ्यांनी
BYTE - कोचे,मुख्याध्यापक
BYTE - रवींद्र सोनटक्के , शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद भंडारा
10
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement