Back
छगन भुजबळ: शेतकऱ्यांच्या पैशांचा खर्च वाढणार का?
SKSudarshan Khillare
FollowJul 13, 2025 10:34:53
Yeola, Maharashtra
*छगन भुजबळ ऑन वाइन शॉप परवाना (अजित पवार)*
उत्पन्न वाढीसाठी काही पॉलिसी सर्व संमतीने घेतात.
शासनाचा खर्च वाढतो आहे शेतकऱ्यांचे पैसे अद्याप द्यायचे...
शासन हा पैसा तुमच्या टॅक्स मधूनच गोळा करतात...
खर्चाची हात मिळवणी करायची असेल कुठून तरी टॅक्स वाढवावा लागेल....
पैसे आले तरच तरच शासनाच्या लाडकी बहीण सारथी भारती शेतकरी मदत विद्यार्थ्यांना मदत यासाठी सर्व पैसे कधी येतील
खर्च वाढले आहे इन्कमही वाढला पाहिजे
अजितदादा त्या खात्याचे मंत्री आहे आणि त्या खात्याचा कारभार जो आहे टॅक्स गोळा करणे आणि लोकांना खर्चायला देणे त्यामुळे ते अध्यक्ष होणे स्वाभाविक आहे मात्र यात सर्व पक्षाचे लोक आहेत त्यांना न्याय मिळणारच आहे.
*छगन भुजबळ ऑन ठाकरे मेळावा शिंदे चलबिचल*
कोणाचा लोकसंग्रह वाढला आणि कोणाचा कमी झाला......
याचा बॅरोमीटर म्हणजे निवडणूक आहे.....
त्यामुळे निवडणुकीत कळेलच खरोखर कोण पुढे जाते आणि कोण मागे राहते....
*छगन भुजबळ ऑन जयंत पाटील नाराज भाजप वाटेवर*
भाजप सारख्या पक्षात देखील दोन वर्षानंतर अध्यक्ष बदलण्याची प्रक्रिया होत असते
तसं प्रत्येक पक्षाच्या आहे वेगवेगळ्या लोकांना संधी दिली जाते
जयंत पाटलांनी स्वतःच म्हटलं होतं मला सात वर्षे झाली आहेत इतरांनाही संधी द्यावी लागेल
म्हणून ती जागा खाली केली असेल.
*छगन भुजबळ ऑन उज्वल निकम राज्यसभा खासदारकी*
त्यांना खासदारकी मिळाली ही चांगली गोष्ट आहे त्यांचे मनापासून अभिनंदन
आपलं सर्व कौशल्य पणाला लावून कसा सारखी मोठी केस आता कोणतीही केस असेल ते पूर्णपणे लढले
ज्या ज्या वेळेस असे काही प्रकार होतात त्यामुळे पब्लिक मधून डिमांड येते की आम्हाला हेच वकील पाहिजे एवढा विश्वास त्यांनी निर्माण केला आहे
अनेक लोक खासदार होतात मात्र त्यांचे उद्योग चालूच असतात
अनेक सिनेस्टार देखील खासदार झालेले आहेत तरीदेखील ते सिनेमात काम करतातच
त्यामुळे त्यांच्या वकिलाला कोणताही बाधा येणार नाही..
*छगन भुजबळ ऑन राज्यसभा खासदारकी*
आता शिळ्या कडीला उत आणण्याचं काही कारण आहे का...
तुमची इच्छा असेल आणि येवलेकर जर म्हणाले तर जाईल जरा विचारून पाहतो सर्वांना असे मिश्किल उत्तर दिले.
*छगन भुजबळ ऑन सामना युती टीका*
हा जर तर चा प्रश्न आहे त्यावर भुजबळाने बोलणे टाळले.....
*छगन भुजबळ ऑन लाडका भाऊ योजना अनुदान*
लाडक्या बहिणाबाईंना पैसे मिळतंय,मात्र लाडक्या भावांचे अनुदान अद्याप मिळाले नाही,
मिळतील ना त्यांना पण पैसे मिळतील,
ज्या प्रमाणे एखाद्या मोठ्या घरात खर्च वाढतो त्यावेळी नेहमीचे खर्च मागेपुढे आपण करतो,सगळ्यांना पैसे मिळणार.
शेवटी लाडक्या बहिणीचे पैसे लाडक्या भावाच्या घरातच जातात ना,
लाडक्या बहिणी थोडी सगळे पैसे खर्च करत असतात.
लाडक्या बहिणीचा भार सरकारी तिजोरीवर पडला हे खरे आहे त्यात लपवण्यासारखे काय....
11
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement