Back
लातूरमध्ये रस्त्याच्या उद्घाटनावर भाजप-काँग्रेसमध्ये चांगला राडा!
VBVAIBHAV BALKUNDE
FollowJul 13, 2025 15:30:22
Latur, Maharashtra
लातूर ब्रेकिंग
AC ::- रस्त्याच्या कामाच्या शुभारंभ वरून भाजप आणि काँग्रेसमध्ये लातूरमध्ये राडा.... आ.अमित देशमुख रस्त्याच्या कामाच्या उद्घाटनासाठी आले असता कार्यकर्त्यांमध्ये झाला राडा..भाजपचे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने .... काँग्रेस आणि भाजपच्या दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी.... निषेधाचे फलक घेऊन भाजप कार्यकर्ते उद्घाटनाच्या स्थळी पोहोचले.... पोलिसांनी केली मध्यस्थी....
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRAFULLA PAWAR
FollowJul 13, 2025 16:00:30Raigad, Maharashtra:
स्लग - फणसाड धरणात बुडून मुंबईतील पर्यटकाचा मृत्यू .....
अँकर - वर्षा सहलीसाठी मुंबईतून आलेल्या एका पर्यटकाचा मुरूड तालुक्यातील फणसाड येथील धरणात बुडून मृत्यू झाला. साहिल रणदिवे असे मृत तरुणाचे नाव आहे. मुंबईतील अंधेरी येथील 11 तरुणांचा चमू बोर्ली गावाजवळ असलेल्या फणसाड धरण परिसरात आज वर्षा पर्यटनासाठी आला होता. त्यातील काहीजण पाण्यात पोहायला उतरले. पोहत असताना अचानक साहिल बेपत्ता झाला. बचाव पथकाच्या शोध कार्यानंतर संध्याकाळी साहिलचा मृतदेह हाती लागला.
0
Share
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowJul 13, 2025 16:00:09Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज
AC ::- लातूर शहरातील मजगे नगर येथे रस्त्याच्या कामाच्या उद्घाटनावरून काँग्रेसचे आणि भाजपाचे कार्यकर्ते मध्ये राडा झाला आहे. काँग्रेसचे आमदार अमित देशमुख उद्घाटनासाठी पोहोचले आणि त्यांनी त्या रस्त्याचे उद्घाटन केलं त्यावेळी भाजपाचे कार्यकर्ते उद्घाटन स्थळी घुसले आणि कार्यक्रमात घोषणाबाजी केली. यावेळी काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आम्ही सामने आले. आणि दोघांमध्ये राडा झाला. भाजप कार्यकर्ते निषेधाचे फलक घेऊन उद्घाटनस्थळी दाखल झाले होते. हे काम भाजप सरकारच्या निधीतून मंजूर झालं आहे आणि काँग्रेस फक्त श्रेय घेते असा आरोप भाजपकडून करण्यात आला. या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनीही घोषणाबाजी करत प्रत्युत्तर दिलं. काही काळ दोन्ही गट आमने-सामने आले होते. परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप केला. दोन्ही गट वेगळे करून परिस्थिती आटोक्यात आणण्यात आली. याप्रकरणी पोलिसांकडून अद्याप कोणताही गुन्हा अद्याप नोंदवण्यात आलेला नाही.
बाईट ::- आमदार अमित देशमुख
बाईट ::- अजित पाटील कव्हेकर भाजपा शहर जिल्हाध्यक्ष
0
Share
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowJul 13, 2025 15:33:27Hingoli, Maharashtra:
अँकर- स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर आज करण्यात आलेल्या हल्ल्याचा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी निषेध व्यक्त केलाय. सरकारने हल्लेखोरांना तात्काळ अटक करावी अशी मागणी आखरे यांनी केलीय. संभाजी ब्रिगेड आपल्या स्टाईलने हल्लेखोरांना धडा शिकवेलच, महाराष्ट्रातल्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी त्यांना जशास तसा धडा शिकवावा अस आवाहनही संभाजी ब्रिगेडचे राज्य अध्यक्ष मनोज आखरे यांनी केलय...
बाईट- मनोज आखरे- संभाजी बिग्रेड राज्याध्यक्ष
0
Share
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 13, 2025 15:06:30Yeola, Maharashtra:
अँकर:- लाडक्या बहिणीप्रमाणे लाडक्या भावांसाठी देखील सरकारने सुरू केलेल्या योजनेनंतर भावांना अनुदानाचे पैसे मिळत नसल्याबाबत मंत्री छगन भुजबळ यांना येवल्यात प्रश्न विचारण्यात आल्यानंतर भुजबळांनी यावर मिश्किल भाष्य करत
' लाडक्या बहिणीचे पैसे हे लाडक्या भावांच्या घरात जातात आमच्या बिचाऱ्या बहिणी ते पैसे घेऊन कुठे उडवत नाही घर खर्चासाठीच खर्च करतात ना '
असे भुजबळाने सांगताच उपस्थितांमध्ये हाशा पिकला तसेच लाडक्या बहीण योजनेचा भार हा तिजोरीवर पडला असून यात लपवायचे काय सरकारला एक दोन हजार कोटींनी फरक पडत नाही मात्र दरवर्षी 45 हजार कोटी या योजनेसाठी बाजूला काढायचे असतील तर इतर योजनेवर त्याचा ताण येणारच आहे त्यामुळे इतर खर्च हे मागेपुढे करावेच लागतात अशी माहिती देखील मंत्री भुजबळ यांनी येवल्यातील पत्रकार परिषदेमध्ये दिली.
0
Share
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 13, 2025 14:36:25Washim, Maharashtra:
वाशिम :
File: 1307ZT_WSM_RATHOD_POEM
रिपोर्टर:गणेश मोहळे
अँकर: मी चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो,तर गिर्हाईक फिरता फिरेना..आणि मी जेव्हा सोन पांघरून चिंध्या विकायला बसलो तेव्हा गिऱ्हाईक मावता मावेना.सध्या जे प्रकार राजकारणात सुरू आहे,कोणीही येतो उठसूट बोलतो. माझ्या पाठीमागे समाज उभा राहिल्यामुळे मजबुतीन तुमच्या समोर संजय राठोड काम करताना उभा दिसतोय.अशी माध्यमा सोबत बोलतांना कवितेतून खंत मंत्री संजय राठोड यांनी वाशीम इथ व्यक्त केली.
बाईट : संजय राठोड,मंत्री मृद व जलसंधारण, मंत्री महाराष्ट्र.
0
Share
Report
YKYOGESH KHARE
FollowJul 13, 2025 14:36:05Nashik, Maharashtra:
nsk_tribalissue
feed by 2C
नाशिक -
- नाशिकच्या आदिवासी आयुक्तालय बाहेर गेल्या पाच दिवसांपासून आंदोलन सुरू
- राज्य रोजंदारी वर्ग तीन व चारच्या कर्मचाऱ्यांचे बेमुदत बिराड धरणे आंदोलन सुरू
- बाह्यस्त्रोत द्वारे पदे भरण्याचा शासन निर्णय तात्काळ रद्द करा या मागणी सह विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू
- राज्यभरातील रोजंदारी वर्ग तीन व चारच्या कर्मचाऱ्यांचे आदिवासी आयुक्तालय बाहेर सुरू
- आदिवासी आयुक्तालयाला बॅरिकेटिंग छावणीचे स्वरूप.
- सरकारने मागण्या मान्य केले नाही तर आंदोलनकर्त्यांनी दिला आत्मदहनचा इशारा.
0
Share
Report
JJJAYESH JAGAD
FollowJul 13, 2025 14:34:46Akola, Maharashtra:
1 फाईल आहे..AVB
Anchor : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेल्या हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी निषेध व्यक्त केला आहेय.. गुंड प्रवृत्तीचे हे लोक असून यांना पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावरही कारवाई करण्याची मागणी, अमोल मिटकरी यांनी केली आहेय..तर या हल्ल्याचा पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ता म्हणुनही त्यांनी निषेध व्यक्त केलाय..प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांच्या वेळी हे हल्लेखोर कुठे होते , असा प्रश्नही मिटकरींनी उपस्थित केला आहेय..
Byte : अमोल मिटकरी , राष्ट्रवादी काँग्रेस , आमदार ..
0
Share
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 13, 2025 14:34:35Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - शिवधर्म प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर काळ वंगण टाकलं, माझ्यावर हल्ला केला मला मारण्याचा प्रयत्न केला - प्रवीण गायकवाड
- शिवधर्म प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर काळ वंगण टाकलं, माझ्यावर हल्ला केला मला मारण्याचा प्रयत्न केला..
- या विचारधारेतून डॉक्टर पानसरे, डॉक्टर कलबुर्गी, डॉक्टर दाभोळकर, गौरी लंकेश यांचा खून झाला..
- या सत्ता काळात पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते असुरक्षित आहेत..
- या सत्ता काळात पक्ष फोडल्यानंतर कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न होत आहे..
- सत्य विचारसरणीने आम्ही काम करतो..
- या देशात मानवता स्थापित झाली पाहिजे यासाठी संभाजी ब्रिगेडचे काम चालू आहे.. आणि ते चालू राहणार
- काहीतरी गैरसमज संघटनेच्या माध्यमातून पसरवले जातात यातून हिंदू विचारसरणी कडून माझ्यावर हल्ला केला जातो
- मी अक्कलकोट येथील घटनेचा निषेध करणार नाही.
- ज्यांनी ही घडून आणले त्यांच्या शेवटची ही सुरुवात आहे..
- संभाजी ब्रिगेडचा इतिहास सर्वांना माहीत आहे संभाजी ब्रिगेडची उत्तर देण्याची पद्धत ही सर्वांना माहिती आहे
- मुख्यमंत्री फडणवीस हे सध्या गृहमंत्री आहेत आम्ही ज्या कार्यक्रमाच्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी कोणतीही पोलीस यंत्रणा नव्हती..
- अक्कलकोट येथील कार्यक्रमात जाणीवपूर्वक पोलीस यंत्रणा नव्हती का.. हे ठरवून षडयंत्र केले आहे का...
- माझ्या सर्व कार्यकर्ते आणि बहुजनांच्या प्रेमामुळे आज मी जिवंत आहे
- मला आनंद वाटतो कारण पुढील काळात मला चांगलं काम करण्याची संधी असणार आहे..
- *अक्कलकोट येथे माझ्या हत्येचाच कट केला गेला होता..*
- तशाच प्रकारचा माझ्यावर हल्ला झाला आहे. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांमुळे मी आज जिवंत आहे..
- *माझ्या जीवितावर हल्ला झाला होता या सर्वला सरकार जबाबदार आहे*
- देशात सर्व जाती धर्म समान आहेत आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची विचारधारा आहे..
-माझ्यावर झालेला हल्ला आहे तो सोपा नाही सरकारने ते उघडं करावं
- या सर्व घटनेची जबाबदारी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी येथे असं माझं म्हणणं आहे..
- हल्ला करणारे हे भाजपचे आहेत आणि ते शिवधर्म प्रतिष्ठानच्या नावाने काम करतात..
- संभाजी ब्रिगेड संघटनेचे ऑलरेडी मुंबईत छत्रपती संभाजी ब्रिगेड असं नाव केलेलं आहे..
- धर्मदाय आयुक्त कायदेशीर मार्गाने संभाजी ब्रिगेडला मान्यता दिली आहे..
- शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांसोबत बोलणं चालू होतं मात्र त्यांचा आक्रमकपणा छत्रपती संभाजी महाराज नाव करण्याने किंवा संभाजी ब्रिगेड नाव घेतल्यामुळे महाराजांचा अपमान होतो ही गोष्ट खरी नाही..
- संभाजी महाराज यांच्यावर मालिका निघाली त्यावेळेसही छत्रपती संभाजी महाराज असं नाव द्या त्यावेळेस सांगितलं होतं..
- डॉक्टर अमोल कोल्हे आणि आम्ही संभाजी महाराजांचा खरा इतिहास दाखवला, त्यावेळेसही आम्हाला धमक्या आल्या होत्या..
- माझ्यावर जो हल्ला झाला. ती विचारसरणीची लढाई आहे..
- मी सध्या उद्योजक घडवण्यासाठी काम करत आहे..
- ज्यांनी माझ्यावर हल्ला केला त्यांना आज ना उद्या पश्चाताप होईल..
- ज्यांनी माझ्यावर हल्ला केला त्यांच्यावर माझा राग नाही आणि त्यांचा निषेधही नाही..
- मी गेल्या 30 वर्षापासून मराठा समाजाचे काम करतो माझ्यावर झालेला हल्ला हा मराठा समाजावर झालेला हल्ला आहे..
- माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मारून काय संपवायचा आहे तर विचार संपवायचा आहे..
- अक्कलकोट येथील देवस्थान असेल किंवा भोसले राजे असतील यांच्याशी माझी चर्चा झाल्यानंतरच सन्मान करण्यासाठी बोलावलं होतं..
Byte : प्रवीण गायकवाड, संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष
0
Share
Report
JMJAVED MULANI
FollowJul 13, 2025 14:31:42Baramati, Maharashtra:
JAVED MULANI
SLUG 1307ZT_INDAPURJANKAR
BYTE 1
नागवेलीच्या विड्याच्या पानाचे दर घसरले..
माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांनी केला कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना फोन..
पानमळेधारकांना मदत करण्याची केली मागणी
Anchor:- नागवेलीच्या विड्याच्या पानासाठी प्रसिद्ध असलेल्या पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी गावात राज्याचे माजी पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री विधान परिषदेचे आमदार महादेव जानकर यांनी पान बाजाराला भेट देऊन पानमळे धारक, व्यापारी शेतकऱ्यांशी संवाद साधत सध्या पानाचे दर पडले असून सहा हजार पानांना केवळ अडीचशे रुपये येत असल्याने पान उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून यावर मार्ग काढावा अशी विनंती राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना दूरध्वनी वरून संवाद साधला यावेळी कोकाटेने देखील लवकरच आपण यावर मार्ग काढू असे आश्वासित केले...
3
Share
Report
YKYOGESH KHARE
FollowJul 13, 2025 14:06:07Nashik, Maharashtra:
nsk_celebretion
feed by 2C
video 5
नाशिक -
- नाशिकच्या साल्हेर किल्ल्यासह बारा किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याने नाशिक मध्ये जल्लोष
- नाशिकच्या सीबीएस येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ आनंद उत्सव
- बारा किल्ल्यांचे छायाचित्र लावत , ढोल ताशाच्या गजरात फेटे बांधत आनंदोत्सव
13
Share
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 13, 2025 14:03:35Washim, Maharashtra:
वाशिम :
File:1307ZT_WSM_SANJAY_RATHOD_BT
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशीम
अँकर:वाशिम जिल्ह्यातील बंजारा धर्माची काशी असलेल्या पोहरादेवी येथील श्री संत सेवालाल महाराज मंदिर आणि जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी मृद व जल मंत्री संजय राठोड यांचा वाशिम शहरात भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.या सोहळ्याला बंजारा समाजबांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मंत्री संजय राठोड यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले. पोहरादेवीच्या धार्मिक आणि सामाजिक कार्याला चालना देणाऱ्या विकास योजनांमुळे बंजारा समाजात समाधान व्यक्त होत आहे.
*मंत्री संजय राठोड साऊंड बाईट*
मागे जे प्रकरण झालं त्यामध्ये माझ्या वर जे आरोप झाले हेच आरोप दुसऱ्यावर झाले असते तर एखाद्याने आत्महत्या केली असती किंवा जंगलात जाऊन संन्यास घेतला असता पण माझा बंजारी समाज माझ्या पाठीशी एक जुटीने होता. मंत्री संजय राठोड यांनी वाशिम मध्ये झालेल्या नागरी सत्कार सोहळ्यात बोलत होते.
2
Share
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 13, 2025 14:01:37Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेकणारा दीपक काटे गुन्हेगार?
- संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेकणारा शिवधर्म फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष दीपक काटे गुन्हेगार ?
- दीपक काटे याला सहा महिन्यांपूर्वी पिस्टल आणि 28 जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी पुणे विमानतळावर झाली होती अटक
- दीपक काटे हा भाजपा पक्षाचा आणि पक्षातील बड्या नेत्याच्या जवळचा कार्यकर्ता असल्याची चर्चा
- चार वर्षांपूर्वी संभाजी बिडीचे नाव बदलण्यासाठी याच कार्यकर्त्याने पुरंदर किल्ल्यावर केले होते आमरण उपोषण
- याच गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तीने प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेकल्याने संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आक्रमक
2
Share
Report
TTTUSHAR TAPASE
FollowJul 13, 2025 14:01:30Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
2 FILES
SLUG NAME -SAT_HIGHWAY
सातारा- साताऱ्यात ऐकावं ते नवलच...एका पठ्ठ्यानं स्कॉर्पिओ गाडी खरेदी केली आणि त्याचं फोटोशूट चक्क महामार्ग अडवून करण्यात आलं.. सोशल मीडियावर याची रिल्स व्हायरल झाल्यानंतर सातारा पोलीस विभाग अलर्ट झाल असून या स्कॉर्पिओ मालकाचा तपास घेत आहेत..
या गाडीचे ड्रोन कॅमेराद्वारे महामार्गावर चित्रीकरण करण्यात आल आहे हे विशेष.. महामार्गावर पाठीमागे गाड्यांची भलीमोठी रांग लागल्याचे दिसत आहेत.. त्यामुळे त्यांना देखील या बिन बुलाये मेहमान सारखं ताटकळत उभं राहावं लागल्याने संताप व्यक्त करण्यापलीकडे काहीच करता येत नसणार..
सातारा पोलीस स्कॉर्पिओ मालकाचा शोध कधी घेतात हे पाहावे लागणार आहे.. मात्र सोशल मीडियावर रिल्स टाकण्याच्या नादात सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरणे कितपत योग्य आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे..
0
Share
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 13, 2025 13:37:18Washim, Maharashtra:
वाशिम:
File3:1307ZT_WSM_RATHOD_CIVILHONORS
WSM_RATHOD_BT
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशीम
अँकर:वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथील श्री संत सेवालाल महाराज मंदिर आणि जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचा वाशिम शहरात भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्याला बंजारा समाजबांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मंत्री संजय राठोड यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले.पोहरादेवीच्या धार्मिक आणि सामाजिक कार्याला चालना देणाऱ्या विकास योजनांमुळे बंजारा समाजात समाधान व्यक्त होत आहे.
व्हिवो:नगरी सत्कार कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना राज्याचे मंत्री संजय राठोड अचानक भावूक झाले.भाषणाच्या दरम्यान त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले आणि काही क्षणांसाठी ते थांबले.भावूक होत मंत्री राठोड म्हणाले,माझ्यावर समाजाचा जेवढा विश्वास आहे,आणि ज्या अपेक्षा आहेत, त्या मी पूर्ण करू शकेन की नाही ही भावना मनात आल्याने मी भारावून गेलो.आज कार्यक्रमात मला जे प्रेम आणि जिव्हाळा मिळाला तो मी कधीच विसरू शकणार नाही.कोणतेही संकट असो माझा बंजारी समाज एक जुटीने माझ्या पाठीशी खंबीर पणे उभा असतो.मंत्री संजय राठोड भाषणा दरम्यान भावनिक झाले होते.निवडणुका वेळी अनेक जण विरोध करतात मात्र माझा बंजारा बांधव माझ्या पाठीशी असतो.मंत्री संजय राठोड यांनी वाशिम मध्ये झालेल्या नागरी सत्कार सोहळ्यात बोलत होते.
बाईट:संजय राठोड,मृद व जलसंधारण मंत्री
0
Share
Report