Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

प्रवीण गायकवाडवर हल्ला: शिवधर्म प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचा काळ वंगण कसा?

AAABHISHEK ADEPPA
Jul 13, 2025 14:34:35
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - शिवधर्म प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर काळ वंगण टाकलं, माझ्यावर हल्ला केला मला मारण्याचा प्रयत्न केला - प्रवीण गायकवाड - शिवधर्म प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर काळ वंगण टाकलं, माझ्यावर हल्ला केला मला मारण्याचा प्रयत्न केला.. - या विचारधारेतून डॉक्टर पानसरे, डॉक्टर कलबुर्गी, डॉक्टर दाभोळकर, गौरी लंकेश यांचा खून झाला.. - या सत्ता काळात पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते असुरक्षित आहेत.. - या सत्ता काळात पक्ष फोडल्यानंतर कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न होत आहे.. - सत्य विचारसरणीने आम्ही काम करतो.. - या देशात मानवता स्थापित झाली पाहिजे यासाठी संभाजी ब्रिगेडचे काम चालू आहे.. आणि ते चालू राहणार - काहीतरी गैरसमज संघटनेच्या माध्यमातून पसरवले जातात यातून हिंदू विचारसरणी कडून माझ्यावर हल्ला केला जातो - मी अक्कलकोट येथील घटनेचा निषेध करणार नाही. - ज्यांनी ही घडून आणले त्यांच्या शेवटची ही सुरुवात आहे.. - संभाजी ब्रिगेडचा इतिहास सर्वांना माहीत आहे संभाजी ब्रिगेडची उत्तर देण्याची पद्धत ही सर्वांना माहिती आहे - मुख्यमंत्री फडणवीस हे सध्या गृहमंत्री आहेत आम्ही ज्या कार्यक्रमाच्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी कोणतीही पोलीस यंत्रणा नव्हती.. - अक्कलकोट येथील कार्यक्रमात जाणीवपूर्वक पोलीस यंत्रणा नव्हती का.. हे ठरवून षडयंत्र केले आहे का... - माझ्या सर्व कार्यकर्ते आणि बहुजनांच्या प्रेमामुळे आज मी जिवंत आहे - मला आनंद वाटतो कारण पुढील काळात मला चांगलं काम करण्याची संधी असणार आहे.. - *अक्कलकोट येथे माझ्या हत्येचाच कट केला गेला होता..* - तशाच प्रकारचा माझ्यावर हल्ला झाला आहे. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांमुळे मी आज जिवंत आहे.. - *माझ्या जीवितावर हल्ला झाला होता या सर्वला सरकार जबाबदार आहे* - देशात सर्व जाती धर्म समान आहेत आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची विचारधारा आहे.. -माझ्यावर झालेला हल्ला आहे तो सोपा नाही सरकारने ते उघडं करावं - या सर्व घटनेची जबाबदारी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी येथे असं माझं म्हणणं आहे.. - हल्ला करणारे हे भाजपचे आहेत आणि ते शिवधर्म प्रतिष्ठानच्या नावाने काम करतात.. - संभाजी ब्रिगेड संघटनेचे ऑलरेडी मुंबईत छत्रपती संभाजी ब्रिगेड असं नाव केलेलं आहे.. - धर्मदाय आयुक्त कायदेशीर मार्गाने संभाजी ब्रिगेडला मान्यता दिली आहे.. - शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांसोबत बोलणं चालू होतं मात्र त्यांचा आक्रमकपणा छत्रपती संभाजी महाराज नाव करण्याने किंवा संभाजी ब्रिगेड नाव घेतल्यामुळे महाराजांचा अपमान होतो ही गोष्ट खरी नाही.. - संभाजी महाराज यांच्यावर मालिका निघाली त्यावेळेसही छत्रपती संभाजी महाराज असं नाव द्या त्यावेळेस सांगितलं होतं.. - डॉक्टर अमोल कोल्हे आणि आम्ही संभाजी महाराजांचा खरा इतिहास दाखवला, त्यावेळेसही आम्हाला धमक्या आल्या होत्या.. - माझ्यावर जो हल्ला झाला. ती विचारसरणीची लढाई आहे.. - मी सध्या उद्योजक घडवण्यासाठी काम करत आहे.. - ज्यांनी माझ्यावर हल्ला केला त्यांना आज ना उद्या पश्चाताप होईल.. - ज्यांनी माझ्यावर हल्ला केला त्यांच्यावर माझा राग नाही आणि त्यांचा निषेधही नाही.. - मी गेल्या 30 वर्षापासून मराठा समाजाचे काम करतो माझ्यावर झालेला हल्ला हा मराठा समाजावर झालेला हल्ला आहे.. - माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मारून काय संपवायचा आहे तर विचार संपवायचा आहे.. - अक्कलकोट येथील देवस्थान असेल किंवा भोसले राजे असतील यांच्याशी माझी चर्चा झाल्यानंतरच सन्मान करण्यासाठी बोलावलं होतं.. Byte : प्रवीण गायकवाड, संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top