Back
सावकाराच्या भयानक धमकीने कर्जदाराने घेतला आत्महत्या, कुटुंबावर काळा सावट!
Beed, Maharashtra
बीड: खासगी सावकाराकडून कर्जदाराला पत्नीची मागणी; हतबल आणि त्रस्त झालेल्या कर्जदाराने आयुष्य संपवलं..!!
Anc : बीडच्या सावकारकीने एक बाप हिरावून नेला... एक पती गमावला... आणि एका कुटुंबावर काळाचं सावट ओढवलं...‘पैसे नाहीत? मग तुझी बायको माझ्या घरी सोड’ — हे विकृत वाक्य आज एका कुटुंबाला उद्ध्वस्त करून गेलंय. सात जणांच्या सावकारी त्रासाला कंटाळून राम फटाले यांनी चौकटीला दोरी बांधली… आणि गळफास घेवून जीव दिला. पाहुयात बीडच्या सावकारकीचा समाजात दडलेला काळाकुट्ट चेहरा...!!!
Vo 1 -------
Opening byte दिलीप फटाले, वडील...
अश्रूंनी डोळे नाही, तर काळीज ओलं झालंय... धाय मोकलून रडणारे हे आहेत पीडित राम फटाले यांचे वडील दिलीप फटाले. त्यांचा हा थरथरता आवाज, आणि डोळ्यांमधून निघणारा हुंदका – कोणाचंही मन हेलावून टाकतो. कारण, त्यांचा मुलगा राम... आज या जगात नाही. फक्त एवढंच कारण तो सावकाराच्या व्याजाने गळ्यात दोरी घालून गेला... "पैसे नाही देत? मग तुझी बायको माझ्याकडे सोड!" अशी विकृत, अपमानास्पद धमकी दिली होती त्याला. आणि तीही कोणी साधासुधा नव्हे, तर भाजपचा पदाधिकारी डॉ.लक्ष्मण जाधव. हो याच सावकाराच्या विकृत बोलण्यातून एका कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. घरातील कर्ता पुरुष या कुटुंबांनी कायमचा गमावला..
सात वर्षांपूर्वी घेतलेलं कर्ज होतं फक्त 2 लाख 55 हजार... पण महिन्याला 25 हजार व्याज. सात वर्षांत साडेसात लाख रुपये फेडूनही मुद्दल तशीच... मागे फक्त अपमान, छळ आणि अपकीर्ती. एक दिवस, घरात बसलेली पत्नी ती धमकी कानावर घेताना ढासळली... आणि दुसऱ्या दिवशी, रामने घराच्या चौकटीला दोरी बांधून, अखेरचा श्वास घेतला. आज त्याच्या वडिलांच्या डोळ्यात फक्त अश्रू नाहीत... तर जीवन कसे जगायचे हा प्रश्न उरला आहे
बाईट : दिलीप फटाले, मयताचे वडील
Vo 2 :
एक नवरा होता... दोन लहान मुलं होती... आणि त्यांचं छोटंसं घर होतं..हसतं, खेळतं, स्वप्नांनी भरलेलं… पण एक सावकारकीचा जीवघेणा फास आल्यानं, ते घर आता काळ्या कपड्यांनी झाकलेलं आहे. रामा फटाले जो आपल्या कुटुंबासाठी लढत होता, तो आता या जगात उरला नाही. कारण, एका लक्ष्मण नावाच्या सावकारानं त्याला मनानं तोडलं… आत्म्यापर्यंत जखमी केलं. रोज धमक्या, अपमान, "बायकोला माझ्याकडे सोड" अशा अमानवी वाक्यांनी तो घुसमटला… आणि जेव्हा हातात काही उरलं नाही, तेव्हा गळ्यात दोरी घेतली. फक्त लक्ष्मण जाधव नव्हे, तर सहा सावकार सगळेच त्याचं रक्त चोखत होते. रामा ला इतकं छळण्यात आलं की, त्यांनी आत्महत्येच्या आधी चिठ्ठीत सगळ्यांची नावं लिहूनच गेले. आता या सगळ्या नराधमांवर गुन्हा दाखल झालाय. मात्र याचा तपास पोलिसांकडे नकोय तर सीआयडीने करावा अशी मागणी रामाच्या वृद्ध आईने केली आहे..
बाईट : विमल फटाले, मयताची आई
Vo 3....
बीडमधील खंडणी, खून आणि दरोड्याच्या घटनांनंतर आता सावकारीचा सावट पुन्हा डोकं वर काढताना दिसतंय. शेकडा दहा ते तीस रुपये व्याजदराने बीडमधील नागरिकांची कंबरडे मोडली आहेत. अडचणीत सापडलेले व्यापारी कर्ज घेतात, पण परतफेडीच्या नाहक दबावामुळे अनेकांना आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घ्यावा लागतो.
अशाच एका प्रकरणानंतर पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला. तिघांना अटक केली आहे. अटकेतील प्रमुख आरोपी म्हणजे भाजपचा पदाधिकारी डॉ. लक्ष्मण जाधव, त्याची पत्नी वर्षा जाधव आणि आणखी एक साथीदार आहे. उर्वरित आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचं पथक रवाना करण्यात आलं आहे.
बाईट : अशोक मोदीराज,पोलीस निरीक्षक बीड
------
Vo 4...
बीड जिल्ह्यातील सावकारीचा बळी हा पहिलाच नाही… याआधीही अनेकांनी खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून जीव दिलाय. बीड शहरात शेकडो अवैध सावकार बिनधास्तपणे व्यवहार करतायत. विशेषतः सर्वाधिक सावकार हे पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सक्रिय आहेत. त्यामुळे या सावकारांवर फक्त गुन्हे नाही, तर थेट मोकासारख्या कायद्यांतर्गत कठोर कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.
बाईट : तत्त्वशील कांबळे, सामाजिक कार्यकर्ते
End vo -----
घडलेल्या या सगळ्या प्रकरणानंतर आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत ते म्हणजे बीडच्या ‘दबंग’ पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्याकडे....
शब्दांनी नाही, तर कृतीतून आणि धाडसातून विश्वास निर्माण करणाऱ्या या पोलीस अधीक्षकांपुढे आज बीड जिल्ह्यात पसरलेल्या सावकारीच्या दलदलीला कायम उखडून टाकण्याचं आव्हान आहे.
8
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement