Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nanded431604

मध्य प्रदेशातील बोगस सोयाबीन बियाणे: शेतकऱ्यांची मोठी फसवणूक!

PINEWZ
Jun 25, 2025 13:11:54
Nanded, Maharashtra
Satish Mohite Slug - Ned_Seeds Feed on - 2C -------------------------------- Anchor - मध्य प्रदेशातील काही कंपण्यांचे सोयाबीनचे बियाणे बोगस निघाल्याच्या तक्रारी नांदेड जिल्ह्यात समोर आल्यात. बियान्याच्या शेकडो बॅगा उगवल्याच नाहीत. बोगस बियाणे विकणाऱ्या कंपनीवर गुन्हे दाखल करून पेरणीसाठी बियाणे द्यावे अशी मगणी शेतकऱ्यांनी केलीये. Vo - थोड्याश्या कमी भावात मिळणारे सोयाबीनचे बियाणे लावणे शेतकऱ्यांना चांगले महागात पडले. मध्यप्रदेशातील काही कंपण्यांचे सोयाबीनचे बियाणे इतर कंपन्यांच्या तुलनेत सहाशे te आठशे रुपये स्वस्त मिळतात. परंतु हे बियाणे बोगस निघाल्याच्या तक्रारी आहेत. देगलूर तालुक्यातील थडी सावरगाव येथील जवळपास पन्नास शेतकऱ्यांनी मध्य प्रदेशातील कंपण्यांचे बियाणे लावले होते. पण बियाणे उगवलेच नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. देगलूर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी हेच बियाणे पेरले होते. आठ दिवस उलटूनही कुणाचेही बियाणे उगवले नाही. याबाबत शेतकऱ्यांनी तालूका कृषी अधिकाऱ्याकडे तक्रारी केल्यात. Byte - लक्ष्मण कोळनुरे - शेतकरी थडी सावरगाव. Byte - ज्ञानेश्वर परसे - शेतकरी Byte - चंद्रकांत तंगावार - शेतकरी, ग्राम पंचायत सदस्य Vo - तक्रार प्राप्त झाल्यानंतर कृषी विभागाने पंचनामे करून चौकशी सुरु केली आहे. चौकशीमध्ये बियाणे सदोष आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिलाय. Byte - महेश वडदकर - निवासी उपजिल्हाधिकारी. Vo - बियाणे न उगवन्यामागे गेल्या आठ दहा दिवसापासून पावसाने दडी मारल्याचे एक कारणही सांगितले जात आहे. पण ज्या शेतात हे बियाणे पेरले त्याच्या बाजूच्या शेतात पेरलेले दुसरे बियाणे मात्र उगवले. अशी असंख्य उदाहरणे आहेत. त्यामुळे कृषी विभागाने तांत्रिकदृष्टया चौकशी करून योग्य कारवाई करणे अपेक्षित आहे. तूर्तास या शेतकऱ्यांवर दुबार पेरनीची वेळ आल्याने शासनाने पेरणीसाठी मोफत बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केलीये. सतीश मोहिते झी 24 तास, नांदेड. -----------------
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement