Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

रूपाली चाकणकरांच्यावर आरोप: तृप्ती देसाईसह गुन्हा दाखल!

Sarfaraj Musa
Jul 04, 2025 14:38:14
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - रूपाली चाकणकरांच्यावर आरोप केल्याप्रकरणी तृप्ती देसाईसह पीडित महिलेवर गुन्हा दाखल.. अँकर - राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकण यांच्यावर आर्थिक आरोप प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या व भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्या विरोधात सांगलीमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये तृप्ती देसाईसह दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. राज्य महिला आयोगाच्या सचिव डॉक्टर पद्मश्री बनाडे यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे.सांगलीच्या कडेगाव येथील तत्कालीन पोलीस निरीक्षकाने केलेल्या एका बलात्कार प्रकरणी भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी पीडित महिलेसह सांगलीत पत्रकार परिषद घेऊन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्यावर पैसे घेतल्याचे आरोप केला होता. दरम्यान गुडा दाखल झाल्या प्रकरणी तृप्ती देसाई यांनी रूपाली चाकणकरांच्यावर टीका केली करत महिलांच्यावरील अत्याचाराबाबत आवाज उठवल्यावर पीडित महिलेला न्याय मिळायला हवा होता पण महिला आयोगाकडून पीडित महिलेसह माझ्यावरच गुन्हा दाखल केला जातोय,हे निषेधार्य असल्याचं तृप्ती देसाई यांनी स्पष्ट केले आहे. बाईट - सुधीर भालेराव - पोलीस निरीक्षक, विश्रामबाग पोलीस ठाणे -सांगली. बाईट - तृप्ती देसाई - अध्यक्ष -भूमाता ब्रिगेड.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement