Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahilyanagar414001

Ahilyanagar सीना नदी में बाढ़: घरों तक घुसा पानी, बचाव टीम जुटी

LBLAILESH BARGAJE
Sept 28, 2025 07:32:24
Pune, Maharashtra
रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- सीना नदी नागरिक बचाव wkt फीड 2C Anc:- अहिल्यानगर शहरातून जाणाऱ्या सीना नदीला पूर आला आहे. या पुराचे पाणी नदीपात्रापासून सुमारे एक किलोमीटर पर्यंत बाहेर आला आहे त्यामुळे नदीकाठी असलेल्या घरांमध्ये पाच ते सहा फुटापर्यंत पाणी साचलं आहे नदीकाठच्या घरामध्ये अडकलेल्या नागरिकांना का बाहेर काढण्यासाठी महानगरपालिकेच बचाव पथक काम करत असून या नागरिकांना बचावाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी wkt:- लैलेश
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
KJKunal Jamdade
Sept 28, 2025 09:20:23
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Sept 28, 2025 09:18:44
Baramati, Maharashtra:JAVED MUALNI SLUG 2809ZT_INDAPURROAD FILE 2 इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी गावात रस्त्यांची झालेली दुरावस्था… संतप्त युवकांनी गावातील भर चौकात फलकबाजी करून शासनाचे लक्ष वेधलं… ANCHOR :— सध्या चालू असलेल्या पावसामुळे ग्रामीण भागात रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी गावातही अशीच परिस्थिती आहे. महादेव शिव रस्ता – जाधववस्तीचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्त न झाल्याने संतप्त युवकांनी रस्त्याचे फोटो काढून गावात भर चौकात फलकबाजी केली. शाळकरी विद्यार्थी शेतकरी व महिला कामगारांना चिखल पाणी माती तुडवत प्रवास करावा लागत असून वारंवार मागणी करूनही फक्त आश्वासनं मिळाल्याचा आरोप युवकांनी केला.... बाईट- ग्रामस्थ
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 28, 2025 09:18:03
Washim, Maharashtra:वाशिम: File:2809ZT_WSM_SOYA_CROP_DAMAGE रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर:वाशिम जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे.या पावसाचा सर्वाधिक फटका मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. तालुक्यातील तळप येथील नंदकिशोर गोदमले शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या असलेल्या सोयाबीन पिकावरील शेंगांना कोम फुटल्याने पिकाचं मोठं नुकसान झालं आहे.शेतकऱ्यांचा हंगामभराचा खर्च वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली असून उत्पादनात मोठी घट होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.दरम्यान, तळपसह परिसरातील शेतकऱ्यांनी शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. बाईट: नंदकिशोर गोदमले,शेतकरी
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Sept 28, 2025 08:50:01
Nanded, Maharashtra:Satish Mohite Slug - Ned_VillageFlood Feed on - 2C --------------------------- Anchor - गोदावरी नदीच्या पुरामुळे नुकसान झालेल्या ग्रामस्थांनी गोदावरी नदीपात्रात उतरून जलसमाधी आंदोलन केले. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील रोशनगाव इथल्या नागरिकांनी नुकसानभरपाई तात्काळ मिळावी यासाठी जलसमाधी आंदोलन केले. गोदावरी नदीचे बॅक वॉटर मुळे या भागातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे घरांचेही नुकसान झाले आहे. शासनाने जाहीर केलेला मावेजा तोकडा आहे त्यामुळे मावेजा वाढवून द्यावा आणि तात्काळ मदत करावी ही या गावकऱ्यांची मागणी आहे. पुर परिस्थिती असताना प्रशासनाने दखल घेतली नसल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. Sound Byte - महिला -------------------------------
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 28, 2025 08:49:41
Nagpur, Maharashtra:नागपूर बाईट - विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते *अतिवृष्टी ऑन* पाच तारखेपर्यंत पाऊस थांबणार नाही असा अंदाज हवामान खात्याने वर्तविलेला आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. दोन दिवस जरी पावसाने उसंत घेतली असली तरी.. 29 संध्याकाळ पासून काही भागात रेड अलर्ट घोषित करण्याची आवश्यकता आहे.. यावर्षी पावसाने सर्वात अधिक नुकसान शेतकऱ्यांच्या केलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी 37 हजार हेक्टरचे नुकसान दाखवलेला आहे. विदर्भात काही जिल्ह्यांच्या समावेश नाही आहे. येलो मोझॅक नावाच्या रोगाचा पिकांच्या समावेश नाही आहे. मराठवाड्यातील धाराशिव पासून तर सोलापूर पर्यंत व इतर जिल्ह्यात या भागात प्रचंड नुकसान झालेला आहे. उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे या भागातील फळबागांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. महाराष्ट्रात ओला दुष्काळ घोषित करण्याची आवश्यकता आहे. उद्या जर पाऊस आला तर हलके जे धान आहेत त्यांच्या सुद्धा नुकसान होणार आहे. काल आम्ही यवतमाळ जिल्ह्यात दौऱ्यावर होतो त्या ठिकाणी सुद्धा शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. एकरामध्ये क्विंटल सुद्धा सोयाबीन होऊ शकत नाही अशी परिस्थिती सध्या शेतकऱ्यांची झाली आहे.. अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारने केंद्राकडून भरीव मदत मिळवली पाहिजे राज्य सरकारने केंद्राला माहिती देऊन मदत घेतली पाहिजे. तातडीने NDRF ची टीम पाठवून तातडीने मदत केली पाहिजे. राज्यामध्ये अशा हालचाली होताना दिसत नाही आहे. बांधावर फिरून येऊन शेतकऱ्यांना ठोस मदत मिळेल तेव्हा त्यांचे समाधान होईल सरकारचे बॅलन्स मंत्रांच्या बॅलन्स का बिघडतो.. मंत्र्यांना का राग येतो शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. शेतकरी जर तुम्हाला विचारत असेल तर त्याला रागात का उत्तर द्यायचं... आम्ही गोट्या खेळायला आलो का.. असे म्हणून शेतकऱ्यांचे अपमान करू नका. 50 हजार हेक्टरी शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. *ऑन काँग्रेस अतिवृष्टी कमिटी* आमच्याकडे अहवाल आला तर वस्तुस्थिती माहिती होईल.. विशेष अधिवेशन बोलवा म्हणून मी राज्यपालांना पत्र लिहितो आहोत. यावर चर्चा झाली पाहिजे. जनजीवन विस्कळीत आहे. दोन दिवसाच्या अधिवेशन विशेष बोलून सरकारने यावर चर्चा करावी. सभागृहामध्ये चर्चा झाली तर आम्हीही बोलू आणि सरकारला जिथे मदत लागेल विरोधक म्हणून आम्ही सरकारला समर्थन करू. *ऑन सोनम सोनम वांगचूक* केंद्रशासित राज्य आहे. गृह मंत्रालय जो म्हणेल तोच तेथील पोलीस करतील. आमची कडे कुठली यंत्रणा नाही की त्यातील आम्ही सत्यता जाणू. जे चूक केली आहे.. चिन जो प्रदेश भारतातून बळकावलेला आहे. चीनने जो अतिक्रमण केलेला आहे भारतामध्ये.. त्या विरोधात जर आंदोलन केलं नसतं. आवाज उठवला नसता.. कदाचित सोनम वांगचूक ही पाळी सरकारवर आली नसती. अशी मोठी चर्चा होत आहे पाकिस्तानकडे याचे पुरावे असतील तर ते गंभीर आहे. सोनम वांगचूक आम्ही जे बघतो सामाजिक नवा क्रांतीच्या चेहरा बघतो.. लदाख च नाव जगामध्ये पुढे आणला आहे. वीस पुरस्कार त्यांना मिळालेले आहे. लदाक मध्ये जो संतोष निर्माण झालेला आहे जी परिस्थिती निर्माण झालेली आहे. सरकारने नेमके काय पुरावे आहे ते जाहीर केले पाहिजे. *ऑन बीड ओबीसी* तो सत्याधारी पक्षाच मेळावा होता. त्या मेळाव्याला गर्दी झाली नसावी. सत्ता पक्षातले विरुद्ध पक्षातील तो कोणी असू दे. जो ओबीसींवर घाव घालणारा जीआर आहे तो रद्द करा हीच आमची मागणी आहे... सत्ताधारी मिळावे असेल व जाहीर करत असतील की दोन सप्टेंबरच्या जीआर रद्द करावा तर आम्ही त्याचे स्वागत करू. भुजबळ साहेबांनी नागपुरात येऊन जे वक्तव्य केले. सत्ते मधून तुमची भूमिका स्पष्ट असावी. चर्चेमध्ये असा दिसत नाही आहे.. त्यामध्ये अनेक लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे बीडच्या मेळावा रद्द करण्याची पाळी आली असेल. त्या ठिकाणी गोपीचंद पडळकर येणार होते धनंजय मुंडे येणार होते सत्ताधारी पक्षाच्या हा मेळावा होता. सत्ताधारी पक्षानेच सभा घ्या चे आंदोलन कराचे. या जीआर मध्ये दुरुस्त करण्यासाठी हा जीआर रद्द झाला असता भाषण देऊन जीआर कसा रद्द होईल.. सरकारच्या दरवाज्यात मागणी करावी लागेल तेव्हाच हा जीआर रद्द होईल त्यांची व आमची भूमिका एक असावी असं मला वाटतं. त्या भूमिकेमध्ये बदल असेल या संदर्भात त्यांनी स्पष्टता करावी. दोघांची भूमिका एक असेल तर वाद होण्याच्या मध्ये काही कारण नाही. *ऑन भारत पाकिस्तान मुकाबला* सिंदूर पुसलं देशातील महिलांच्या.. तो कट होता. पूर्वी नियोजित होता तो आमच्या भारतावरील हल्ला होता. त्या विरोधात रान करून पुढे आणलं.. पाकिस्तानला तुम्ही दुश्मन म्हणता.. क्रिकेटमध्ये पैसे कमवण्यासाठी या खेळाची गरज आहे का कुणालाही वाटेल उद्धवजींना वाटते ते स्वाभाविक आहे.. ज्या पाकळ्यांनी आमच्यावर हल्ला केला अशांशी काय खेळ खेळायचा या सरकारचे दाखवायचे दात व खायचे दात वेगळे आहेत हे दिसून येत आहेत. हा डुप्लिकेट पणा आहे हे दिसत आहे.
1
comment0
Report
UJUmesh Jadhav
Sept 28, 2025 08:47:19
Thane, Maharashtra:ब्रेकिंग... शहापुरात रात्रभर मुसळधार कोसळणारा पाऊस.. मुसळधार पावसाचा शहापूराता हाहाःकार... सापगावात पूर सदृश्य परिस्थिती गावाला पूराचा विळखा... भातसा नदीला पूर अनेक गावात पूरसदृश्य परिस्थिती... लोकांच्या घरात शिरले पूराचे पाणी... सापगाव नदीवरील पूल गेला पाण्याखाली... जागोजागी सखळ भागात पावसाचे पाणी... शापुरात आणि गाव मध्ये पूर सदृश्य परिस्थिती... नदी लागत असलेल्या गावात पुराचे पाणी शिरले... अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी.. गावातील मंदिरा देखील पाण्याखाली... अवकाळी आणि परतीच्या पावसाने हाकार माजवला असून शहापूर मध्ये पुरुषा दिवशी परिस्थिती.... या पावसामुळे भात पिकाचं अतोनात नुकसान झाले आहे. जनजीवन विस्कळीत...
0
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 28, 2025 08:33:52
Kolhapur, Maharashtra:*आमदार सतेज पाटील, नेते काँग्रेस बाईट मुद्दे* मराठवाड्यासाठी सरकारकडून कोणत्याही सहकार्याची भूमिका दिसत नाही गेल्या दहा ते बारा दिवसांमध्ये कोणतेही मंत्री किंवा लोकप्रतिनिधी त्या भागामध्ये मुक्कामाला नाहीत दिवसभर थांबून रात्री दुसऱ्या ठिकाणी मुक्कामाला येत आहेत यातूनच त्यांची संवेदनशीलता किती आहे दिसून येते सरकारची जबाबदारी आहे सरकार म्हणून त्या ठिकाणी राबलं पाहिजे जिल्हाधिकारी यांच्यावर कंट्रोल नाही, अधिकारी कसे पंचनामे करतात याची माहिती नाही आम्ही हेक्टरी 50000 च्या वर नुकसान भरपाई मागत आहे संपूर्ण शेतकरी उध्वस्त झालेला आहे याकडे सरकार पाहणार आहे की नाही? मराठवाड्यातील महापुराकडे संवेदनशीलतेने गरजेचे होते मात्र हे सरकार संवेदनशीलतेने पाहत नाही
0
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 28, 2025 08:33:43
Kolhapur, Maharashtra:Kop KSSDC Program Feed:- Live U Anc :- कोल्हापूर, सांगली आणि सातारा डेव्हलपमेंट कॉरिडॉर अंतर्गत महत्त्वाची बैठक कोल्हापुरात बैठक पार पडली. या बैठकीत तिन्ही जिल्ह्यातील विकासाचे मुद्दे चर्चेत होते. या जिल्ह्यांना आगामी काळात विकसित बनण्यासाठी कोणकोणत्या विषयांवर लक्ष देणे गरजेचे याविषयी उद्योजकांनी आपली मते मांडली. शेती, औद्योगिक, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात येणाऱ्या अडचणीच्या मुद्द्यांवर या बैठकीत लक्ष केंद्रित करण्यात आलं. तिन्ही जिल्ह्याची कनेक्टिव्हिटी वाढवणे या डेव्हलपमेंट कॉरिडॉरचा हेतू आहे. येणाऱ्या काळात या जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणं गरजेच असल्याचे मत देखील नोंदवण्यात आले. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून आजची बैठक आयोजित करण्यात आली होती. Byte:- आमदार सतेज पाटील, काँग्रेस नेते
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 28, 2025 08:16:17
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरातील महापुरामुळे अनेक ठिकाणी सापडतायत साप, घाबरून जाण्याचे प्राणी मित्रांचे आवाहन ( 1 to 1 ) - सोलापुरात सीना नदीला आलेल्या महापुरामुळे विविध भागात सापडतायत साप - दोनच दिवसांपूर्वी उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरी येथील शेतकऱ्याचा साप चावल्याने झाला होता मृत्यू - साप किंवा इतर प्राणी चावल्याचे समजताच योग्य ती काळजी घेण्याचे प्राणी मित्र भरत छेडा यांचे आवाहन - अनेक प्राणी हे विषारी नसल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये साप चावल्यानंतर कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयी प्राणीमित्र भरत छेडा यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी.... ( WKT )
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 28, 2025 08:04:27
Chandrapur, Maharashtra:Feed slug:-- 2809ZT_CHP_BITE ( Single file sent on 2C) टायटल:--मराठवाड्यासाठी पुढील दोन-तीन दिवस महत्त्वाचे, विसर्ग पाहून बचाव पुनर्वसन करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चंद्रपुरात माहिती अँकर:--- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथील दौऱ्यात मराठवाड्याच्या पूरग्रस्त भागातील परिस्थिती विषयी माहिती दिली आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी सकाळी संपर्कात आहे. आता सध्या तिथे चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे मदत आणि पुनर्वसनाबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. ज्या लोकांना आपण वाचवून तात्पुरत्या कॅम्पमध्ये आणले आहे त्या सर्वांची योग्य सोय झाली पाहिजे. चारा खरेदी करून जनावरांसाठी उपलब्ध करण्याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. आपण दोन हजार कोटी रुपये जे रिलीज केले आहे त्याचं वाटप देखील सुरू आहे. घरात पाणी शिरलेल्या सर्वांना दहा हजार रुपये तातडीची मदत देण्यासही सुरुवात झाली आहे. रेशन किट देण्यास सुरुवात झाली असून अन्नधान्य देखील दिले जात आहे. फिल्डवरची यंत्रणा योग्य रीतीने काम करत आहे की नाही हे बघण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. आता काही ठिकाणी धरणाचे विसर्ग सुरू झाले आहेत. त्याचा अभ्यास करून पुढील पावले उचलायची आहेत. उद्याचा दिवस ,विशेषतः परवाचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. नंतर बंगालमधील कमी दाबाचा पट्टा कमी होत जाणार आहे. त्यामुळे कुठलीही हानी होणार नाही याची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लोकांना अधिकाधिक मदत करण्याची मानसिकता सरकारची आहे. निकष फार कठोर ठेवू नका ,त्यात माणुसकी दाखवा असेही निर्देश देण्यात आले आहेत. सरसकट पंचनामे करा असेही म्हटले आहे. सर्व माहिती आल्यानंतर अधिकची काय मदत करायची आहे हे ठरवणार आहोत. बाईट १) देवेन्द्र फडणवीस, मुख्यमंत्री आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Sept 28, 2025 08:04:06
0
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top