Back
चंद्रपुर में बाढ़ राहत: फडणवीस की तेज रणनीति जारी
AAASHISH AMBADE
Sept 28, 2025 08:04:27
Chandrapur, Maharashtra
Feed slug:-- 2809ZT_CHP_BITE
( Single file sent on 2C)
टायटल:--मराठवाड्यासाठी पुढील दोन-तीन दिवस महत्त्वाचे, विसर्ग पाहून बचाव पुनर्वसन करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चंद्रपुरात माहिती
अँकर:--- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथील दौऱ्यात मराठवाड्याच्या पूरग्रस्त भागातील परिस्थिती विषयी माहिती दिली आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी सकाळी संपर्कात आहे. आता सध्या तिथे चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे मदत आणि पुनर्वसनाबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. ज्या लोकांना आपण वाचवून तात्पुरत्या कॅम्पमध्ये आणले आहे त्या सर्वांची योग्य सोय झाली पाहिजे. चारा खरेदी करून जनावरांसाठी उपलब्ध करण्याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. आपण दोन हजार कोटी रुपये जे रिलीज केले आहे त्याचं वाटप देखील सुरू आहे. घरात पाणी शिरलेल्या सर्वांना दहा हजार रुपये तातडीची मदत देण्यासही सुरुवात झाली आहे. रेशन किट देण्यास सुरुवात झाली असून अन्नधान्य देखील दिले जात आहे. फिल्डवरची यंत्रणा योग्य रीतीने काम करत आहे की नाही हे बघण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. आता काही ठिकाणी धरणाचे विसर्ग सुरू झाले आहेत. त्याचा अभ्यास करून पुढील पावले उचलायची आहेत. उद्याचा दिवस ,विशेषतः परवाचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. नंतर बंगालमधील कमी दाबाचा पट्टा कमी होत जाणार आहे. त्यामुळे कुठलीही हानी होणार नाही याची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लोकांना अधिकाधिक मदत करण्याची मानसिकता सरकारची आहे. निकष फार कठोर ठेवू नका ,त्यात माणुसकी दाखवा असेही निर्देश देण्यात आले आहेत. सरसकट पंचनामे करा असेही म्हटले आहे. सर्व माहिती आल्यानंतर अधिकची काय मदत करायची आहे हे ठरवणार आहोत.
बाईट १) देवेन्द्र फडणवीस, मुख्यमंत्री
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 28, 2025 09:51:400
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 28, 2025 09:49:190
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 28, 2025 09:46:180
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 28, 2025 09:38:011
Report
0
Report
MAMILIND ANDE
FollowSept 28, 2025 09:35:180
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 28, 2025 09:34:570
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 28, 2025 09:33:240
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 28, 2025 09:33:140
Report
KJKunal Jamdade
FollowSept 28, 2025 09:20:230
Report
JMJAVED MULANI
FollowSept 28, 2025 09:18:440
Report
KJKunal Jamdade
FollowSept 28, 2025 09:18:330
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 28, 2025 09:18:030
Report
KJKunal Jamdade
FollowSept 28, 2025 09:17:420
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 28, 2025 09:17:020
Report