Back
नागपुर में अतिवृष्टि का कहर: किसानों को भारी नुकसान, NDRF मदद की मांग तेज
AKAMAR KANE
Sept 28, 2025 08:49:41
Nagpur, Maharashtra
नागपूर
बाईट - विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते
*अतिवृष्टी ऑन*
पाच तारखेपर्यंत पाऊस थांबणार नाही असा अंदाज हवामान खात्याने वर्तविलेला आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. दोन दिवस जरी पावसाने उसंत घेतली असली तरी..
29 संध्याकाळ पासून काही भागात रेड अलर्ट घोषित करण्याची आवश्यकता आहे.. यावर्षी पावसाने सर्वात अधिक नुकसान शेतकऱ्यांच्या केलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी 37 हजार हेक्टरचे नुकसान दाखवलेला आहे. विदर्भात काही जिल्ह्यांच्या समावेश नाही आहे. येलो मोझॅक नावाच्या रोगाचा पिकांच्या समावेश नाही आहे. मराठवाड्यातील धाराशिव पासून तर सोलापूर पर्यंत व इतर जिल्ह्यात या भागात प्रचंड नुकसान झालेला आहे. उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे या भागातील फळबागांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. महाराष्ट्रात ओला दुष्काळ घोषित करण्याची आवश्यकता आहे. उद्या जर पाऊस आला तर हलके जे धान आहेत त्यांच्या सुद्धा नुकसान होणार आहे. काल आम्ही यवतमाळ जिल्ह्यात दौऱ्यावर होतो त्या ठिकाणी सुद्धा शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. एकरामध्ये क्विंटल सुद्धा सोयाबीन होऊ शकत नाही अशी परिस्थिती सध्या शेतकऱ्यांची झाली आहे.. अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारने केंद्राकडून भरीव मदत मिळवली पाहिजे राज्य सरकारने केंद्राला माहिती देऊन मदत घेतली पाहिजे. तातडीने NDRF ची टीम पाठवून तातडीने मदत केली पाहिजे. राज्यामध्ये अशा हालचाली होताना दिसत नाही आहे. बांधावर फिरून येऊन शेतकऱ्यांना ठोस मदत मिळेल तेव्हा त्यांचे समाधान होईल सरकारचे बॅलन्स मंत्रांच्या बॅलन्स का बिघडतो.. मंत्र्यांना का राग येतो शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. शेतकरी जर तुम्हाला विचारत असेल तर त्याला रागात का उत्तर द्यायचं... आम्ही गोट्या खेळायला आलो का.. असे म्हणून शेतकऱ्यांचे अपमान करू नका. 50 हजार हेक्टरी शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे.
*ऑन काँग्रेस अतिवृष्टी कमिटी*
आमच्याकडे अहवाल आला तर वस्तुस्थिती माहिती होईल.. विशेष अधिवेशन बोलवा म्हणून मी राज्यपालांना पत्र लिहितो आहोत. यावर चर्चा झाली पाहिजे. जनजीवन विस्कळीत आहे. दोन दिवसाच्या अधिवेशन विशेष बोलून सरकारने यावर चर्चा करावी. सभागृहामध्ये चर्चा झाली तर आम्हीही बोलू आणि सरकारला जिथे मदत लागेल विरोधक म्हणून आम्ही सरकारला समर्थन करू.
*ऑन सोनम सोनम वांगचूक*
केंद्रशासित राज्य आहे. गृह मंत्रालय जो म्हणेल तोच तेथील पोलीस करतील. आमची कडे कुठली यंत्रणा नाही की त्यातील आम्ही सत्यता जाणू. जे चूक केली आहे.. चिन जो प्रदेश भारतातून बळकावलेला आहे. चीनने जो अतिक्रमण केलेला आहे भारतामध्ये.. त्या विरोधात जर आंदोलन केलं नसतं. आवाज उठवला नसता.. कदाचित सोनम वांगचूक ही पाळी सरकारवर आली नसती. अशी मोठी चर्चा होत आहे पाकिस्तानकडे याचे पुरावे असतील तर ते गंभीर आहे. सोनम वांगचूक आम्ही जे बघतो सामाजिक नवा क्रांतीच्या चेहरा बघतो.. लदाख च नाव जगामध्ये पुढे आणला आहे. वीस पुरस्कार त्यांना मिळालेले आहे. लदाक मध्ये जो संतोष निर्माण झालेला आहे जी परिस्थिती निर्माण झालेली आहे. सरकारने नेमके काय पुरावे आहे ते जाहीर केले पाहिजे.
*ऑन बीड ओबीसी*
तो सत्याधारी पक्षाच मेळावा होता. त्या मेळाव्याला गर्दी झाली नसावी. सत्ता पक्षातले विरुद्ध पक्षातील तो कोणी असू दे. जो ओबीसींवर घाव घालणारा जीआर आहे तो रद्द करा हीच आमची मागणी आहे... सत्ताधारी मिळावे असेल व जाहीर करत असतील की दोन सप्टेंबरच्या जीआर रद्द करावा तर आम्ही त्याचे स्वागत करू. भुजबळ साहेबांनी नागपुरात येऊन जे वक्तव्य केले. सत्ते मधून तुमची भूमिका स्पष्ट असावी. चर्चेमध्ये असा दिसत नाही आहे.. त्यामध्ये अनेक लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे बीडच्या मेळावा रद्द करण्याची पाळी आली असेल. त्या ठिकाणी गोपीचंद पडळकर येणार होते धनंजय मुंडे येणार होते सत्ताधारी पक्षाच्या हा मेळावा होता. सत्ताधारी पक्षानेच सभा घ्या चे आंदोलन कराचे. या जीआर मध्ये दुरुस्त करण्यासाठी हा जीआर रद्द झाला असता भाषण देऊन जीआर कसा रद्द होईल.. सरकारच्या दरवाज्यात मागणी करावी लागेल तेव्हाच हा जीआर रद्द होईल त्यांची व आमची भूमिका एक असावी असं मला वाटतं. त्या भूमिकेमध्ये बदल असेल या संदर्भात त्यांनी स्पष्टता करावी. दोघांची भूमिका एक असेल तर वाद होण्याच्या मध्ये काही कारण नाही.
*ऑन भारत पाकिस्तान मुकाबला*
सिंदूर पुसलं देशातील महिलांच्या.. तो कट होता. पूर्वी नियोजित होता तो आमच्या भारतावरील हल्ला होता. त्या विरोधात रान करून पुढे आणलं.. पाकिस्तानला तुम्ही दुश्मन म्हणता.. क्रिकेटमध्ये पैसे कमवण्यासाठी या खेळाची गरज आहे का कुणालाही वाटेल उद्धवजींना वाटते ते स्वाभाविक आहे.. ज्या पाकळ्यांनी आमच्यावर हल्ला केला अशांशी काय खेळ खेळायचा या सरकारचे दाखवायचे दात व खायचे दात वेगळे आहेत हे दिसून येत आहेत. हा डुप्लिकेट पणा आहे हे दिसत आहे.
1
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 28, 2025 10:31:570
Report
KJKunal Jamdade
FollowSept 28, 2025 10:30:340
Report
KJKunal Jamdade
FollowSept 28, 2025 10:18:533
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 28, 2025 10:05:010
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 28, 2025 09:51:400
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 28, 2025 09:49:190
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 28, 2025 09:46:180
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 28, 2025 09:38:011
Report
0
Report
MAMILIND ANDE
FollowSept 28, 2025 09:35:180
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 28, 2025 09:34:570
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 28, 2025 09:33:240
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 28, 2025 09:33:140
Report
KJKunal Jamdade
FollowSept 28, 2025 09:20:230
Report
JMJAVED MULANI
FollowSept 28, 2025 09:18:440
Report