Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune413133

इंदापुर में ट्रैफिक जाम में फँसे कृषि मंत्री भरणे, प्रतिक्रिया चौंकाने वाली

JMJAVED MULANI
Sept 13, 2025 11:01:24
Baramati, Maharashtra
JAVED MULANI SLUG 1309ZT_INDAPURBHRNRE BYTE 1 *इंदापुरात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे अडकले ट्राफिक मध्ये..... एवढं तेवढं होत असतं म्हणत मंत्री भरणेंची सावध प्रतिक्रिया....* सर्वांनी शिस्त पाळली पाहिजे माझ्यापासून सुरुवात करतो : मंत्री भरणे Anchor राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज इंदापूरच्या दौऱ्यावर होते या दरम्यान दत्तात्रय भरणे यांना इंदापूर शहरात ट्रॅफिकच्या समस्येचा सामना करावा लागलाय. दत्तात्रय भरणे इंदापूर न्यायालय परिसरात आले असता भरणे यांचा ताफा बराच काळ त्या ठिकाणी वाहनांच्या गर्दीमुळे अडकून पडला होता. शेवटी पोलिसांना गाडीच्या खाली उतरून मंत्री भरणे यांना वाट काढून द्यावी लागली आहे. मात्र एवढं तेवढं चालत असतं कधीतरी असं होत असतं सर्वांनीच शिस्त पाळली पाहिजे. मी मंत्री असलो तरी माझ्यापासून शिस्तीची सुरुवात झाली पाहिजे अशी सावध प्रतिक्रिया मंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी दिली आहे..... *बाईट —कृषी मंत्री दत्तात्रय भरणे*
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAABHISHEK ADEPPA
Sept 13, 2025 13:04:40
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरातील खराब हवामानामुळे गोव्याहुन सोलापूर आणि सोलापूरहुन गोवा जाणारे विमान रद्द सोलापुरातील खराब हवामानामुळे गोव्याहुन सोलापूर आणि सोलापूरहुन गोवा जाणारे विमान रद्द सोलापूर गोवा विमानसेवा देणारे fly-91 कंपनीचे विमानसेवा आज रद्द सोलापुरात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने विमान रद्द झाल्याची विमानसेवा प्राधिकरणाची माहिती आज संध्याकाळी 4 वाजता गोव्याहुन सोलापूरला येणारे विमान खराब हवामानामुळे उड्डाण घेऊ शकलेलं नाही त्यामुळे गोवा-सोलापूर आणि सोलापूर-गोवा दोन्ही बाजूचे विमानसेवा आज रद्द उद्या पुन्हा दुपारी 12.30 वाजता आजची विमान रेषेड्युल करण्यात आल्याची माहिती
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Sept 13, 2025 13:02:30
Baramati, Maharashtra:JAVEDMULANI SLUG 1309ZT_INDAPURWATRE FILE 4 पाण्याचा टाकीच्या विरोधात घोलपवाडी ग्रामस्थांचं उपोषण.....अंदाजपत्रकानुसार काम होत नसल्याचा उपोषण कर्त्यांचा आरोप.... बेकायदेशीर होणाऱ्या कामाकडे लक्ष वेधण्यासाठी उपोषण सुरू...... उपोषणाचा आजचा चौथा दिवस Anchor_पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील पवारवाडी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील उद्धट प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या जलजीवन मिशन योजनेचे काम अंदाजपत्रकानुसार होत नसल्याने याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते यशवंत खरात यांनी बुधवार १० सप्टेंबर पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. खरात यांच्या या आंदोलनाला गावातील ग्रामपंचायत सदस्यांनी देखील पाठिंबा दर्शवलाय. या ठिकाणी दुसऱ्या गावासाठी मंजूर असलेली पाण्याची टाकी पवारवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत बांधण्यात येत आहे. विशेष म्हणजे या टाकीचे काम गायरानामध्ये बेकायदेशीरपणे करण्यात आले असून टाकी ज्या गावासाठी मंजूर आहे. त्याच गावात ती बांधावी. सुरू असलेल्या टाकीचे काम त्वरित बंद करावे अशी मागणी खरात यांनी केली आहे.
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Sept 13, 2025 13:02:19
Thane, Maharashtra:भिवंडी... आमदार रईस शेख आणि आयुक्त अनमोल सागर यांनी बागे फिरदौस रस्ता आणि वाहतूक समस्येला दिली भेट... ॲंकर... भिवंडी शहरातील बागे फिरदौस परिसरातील रस्ता आणि वाहतूक समस्येचे निराकरण करण्यासाठी भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी शनिवारी भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त अनमोल सागर आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह घटनास्थळाला भेट दिली. भेटीदरम्यान रस्ता रुंदीकरण, वाहतूक नियंत्रण आणि अतिक्रमण हटवणे यासारख्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. बागे फिरदौस परिसरातील कोंडीची समस्या दूर करण्यासाठी प्रशासनाला तातडीने पावले उचलावी लागतील असे आमदार रईस शेख यांनी स्पष्ट केले. आयुक्त अनमोल सागर यांनी आश्वासन दिले की महानगरपालिका प्रशासन लवकरच कृती आराखडा तयार करेल आणि समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी काम सुरू करेल.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Sept 13, 2025 12:48:05
Nashik, Maharashtra:feed send by 2c reporter-sagar gaikwad slug-nsk_shinde_pc *नाशिक @ शशिकांत शिंदे - प्रदेशाध्यक्ष, शरद पवारांची राष्ट्रवादी* - शेतकऱ्यांचा आवाजाचा आम्ही एल्गार करतोय - राजकारणातील बदल आणि संघटनात्मक बांधणी - १४ तारखेला शिबीर होणार - राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विषयावर चर्चा - अनेक मान्यवर विचार मांडणार - महाराष्ट्रात शेतकऱ्यांवर संकट उभे राहिले आहे - १२ तास काम करणारे धोरण - मालेगावच्या लूमचा प्रश्न - नाशिकला अध्यक्ष म्हणून आलो तेव्हा शेतकरी उपस्थित होते - अनेक प्रश्न त्यांनी सांगितले - त्यानुसार पवार साहेबांशी चर्चा केली - जबरदस्त मोर्चा काढायचे ठरले - त्यामुळे नाशिकला मोर्चा काढतोय - आगामी निवडणुकीच्या बाबत धोरण ठरलं आहे - स्थानिक पातळीवर चर्चा सुरू करावी - निवडणूक आरक्षण जाहीर झाले त्यानंतर आम्ही चर्चा करू - असीम सरोदे, अशोक वानखेडे यांना बोलावले आहे - पक्षाचे नेते बोलतील - आणि पवार साहेब समारोप करतील - सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अनिल देशमुख असे सगळेच पदाधिकारी असतील - प्रमुख पदाधिकारी बोलावले आहे - आता सिस्टमची लढाई सुरू झाली आहे - सत्ताधाऱ्यांना भीती राहिली नाही - मतदार याद्यांची छाननी करावी - सरकारने लोकउपयोगी कामे झाले नाही - विकास हा कंत्राटदाराच्या अडचणींचा आहे - शेतकरी आमचा केंद्रबिंदू आहे - वाढती बेरोजगारी आहे - ८ तासाच्या ऐवजी १२ तास काम करावे लागणार आहे - पोलीस भरतीचा विषय आहे - जाती धर्माचा तेढ निर्माण करून सत्ताधारी लढतात - आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढू - आमच्या मतांच्या विभाजनाचा फायदा सत्ताधारी यांना होणार नाही याची काळजी घेऊ - मनसे आणि शिवसेना युतीवर शिक्कामोर्तब नाही त्यानंतर बोलणं योग्य नाही - त्यानंतर आम्ही सविस्तर खुलासा करू - खडसे साहेब आमचे जेष्ठ नेते आहेत - तब्येत घेऊन काळजी घेतोय *ऑन आरक्षण* - सरकार मध्ये एक वाक्यता नाही - आमच्या पेक्षा सरकार मध्ये श्रेयवाद सुरू - भाजपने अजेंडा राबविला - मित्र पक्षाला बाजूला ठेवले - सत्ता मिळविण्यासाठी जातीचा वाद फार काळ चालत नाही - सरकार मधील मंत्री विरोध करत आहे - त्यांनी जीआर काढला आहे तो हैद्राबाद गॅझेट नुसार आहे - जरांगे खुश असतील तर खुलासा करावा - सत्य परिस्थिती समोर आल्यावर माहिती घेऊन बोलतो *ऑन भुजबळ* - सत्तेतील लोकांनी भूमिका स्पष्ट करावी - कोर्टाने सुद्धा हेच विचारलं आहे - मागणी आणि सरकारची भूमिका काय - नक्की कोणते आरक्षण कुठलं फायद्याचे ते समोर आल्यावर आम्ही बोलू *ऑन धाराशिव आत्महत्या* - कुणीही आत्महत्या करू नये - सत्तेच्या समीकरणात गरीब भरडला जातो - आदिवासींत बंजारा समाज, धनगर समाजाला समावेश करण्याची मागणी - आमश्या पाडवी यांनी विरोध दर्शविला आहे - सरकार मधून बाहेर पडणार म्हणाले *ऑन आशिया चषक भारत पाक* - भारत पाक तणाव होता - ऑपरेशन सिंदूर ताजे आहे - सरकार म्हणतंय बदला घेतला आहे - तेच सरकार का खेळ का करत आहे - सत्तेत नव्हते तेव्हा सामना होऊ देणार नाही म्हणते - जनता सगळे ओळखून आहे - आमचा विरोध आहे *ऑन मोदी मणिपूर* - फार लवकर दौरा करत आहे - घटना झाली तेव्हाच जायला पाहिजे होते - माझ्या शुभेच्छा *ऑन नगरविकास खात्यात हस्तक्षेप* - मागच्या काही वर्षात 10 लाख कोटींच्या वर कर्ज - मुख्यमंत्री सगळ्याच खात्यात हस्तक्षेप करतात - प्रत्येक मंत्र्याला काम करण्याची मुभा नाही - अनेक मंत्री नाराज आहे *ऑन ai बिहार / वोट चोरी* - कुणी शंका घेतली तर निवडणूक आयोगाचे काम - मतदारांची फेरतपासणी करण्याची मागणी - आम्ही कोर्टात गेलो आहे - आता vvpt बंद करण्याचा निर्णय सरकार करत आहे - एकदा दूध का दूध पाणी का पाणी होण्याची गरज आहे
2
comment0
Report
JMJAVED MULANI
Sept 13, 2025 12:46:02
Baramati, Maharashtra:JAVEDMULANI SUG 1309ZT_INDAPURMINISTR FILE 1 इंदापूरमध्ये कट्टर राजकीय प्रतिस्पर्ध्यांची अनपेक्षित भेट — हर्षवर्धन पाटील यांनी कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंना केला नमस्कार... ANCHOR — इंदापूरच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जाणारे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची आज इंदापुरात अनपेक्षित अशी समोरासमोर भेट झाली. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी हात जोडून भरणे यांना नमस्कार केला. त्यावर मंत्री भरणे यांनीही तितक्याच आदराने प्रतिसाद दिला. सलग तीन वेळा हर्षवर्धन पाटील यांचा पराभव करूनही भरणे यांच्याशी त्यांनी दाखवलेले हे वर्तन राजकारणा पलीकडील नातेसंबंध जपण्यानाचे पाहायला मिळाले...
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 13, 2025 11:48:25
Jalna, Maharashtra: FEED NAME | 1309ZT_JALNA_JARANGE_BYTE(1 FILE) जालना :जरांगे पाटील बाईट पॉईंटर ऑन सारथी संस्थेची शिष्यवृत्ती बंद: भुजबळांचं ऐकून मराठ्यांच्या पोरांवर अन्याय करू नका-जरांगे याबाबत आम्ही सरकारला कळवलं आहे पोरांचे पैसे द्या अन्यथा सरकारला परीणाम भोगावे लागतील ऑन वडेट्टीवार-माणूस त्या लायकीचा पाहिजे.तुम्ही त्याची बाजू घ्यायला त्याला कोणती तुमची माया येते एवढी.? तो प्रत्येकवेळी तुमच्या तंगड्यात तंगड्या घालतो.तुम्ही त्याची बाजू घेता याचं आम्हाला आश्चर्य वाटत तुमचं ऐकून तुमच्यात काही बदल होतो का बघा आमचं ऐकून अन्यथा तो तुम्हाला पायाखाली घालेल एक दिवस ऑन जिल्हा परिषद अध्यक्षपद ओबीसीसाठी राखीव-अजून मिळालं तरी कुठे आम्हाला आरक्षण.? छगन भुजबळांना फक्त तेवढाच नांद आहे राजकारण एके राजकारण.याला वारंवार हगणदारीत पळण्याची सवय,भुजबळ यांच्यावर जरांगे यांची टिका हायकोर्टात आरक्षण सुनावणी-आमचं 10 टक्के आरक्षण 50 टक्क्यांच्या आतील ओबीसी आरक्षणात घ्या अशी आमची मागणी आहे.50 टक्क्यांवरील आरक्षण टिकत नाही.आमच्या हक्काचं आरक्षण आम्हांला पाहिजे-जरांगे यांची मागणी
1
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 13, 2025 11:46:09
Washim, Maharashtra:वाशिम: File:1309ZT_WSM_ZP_FANDS रिपोर्टर: गणेश मोहळे, वाशिम अँकर: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून वाशीम जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील वस्त्यांच्या विकासासाठी तब्बल २९६५लाख रुपयांचा निधी वाशिम जिल्हा परिषदेवर उपलब्ध करून देण्यात आला आहे.मात्र प्रशासकीय मान्यता मिळूनही प्रत्यक्षात कामांना सुरुवात झाली नसल्याने ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त होत आहे.फेब्रुवारी महिन्यात काढण्यात आलेल्या आदेशान्वये जिल्ह्यातील ३८० गावांमध्ये विविध विकासकामांसाठी २६९८.६० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.तर २५ मार्च रोजी जिल्ह्यातील २९ गावांसाठी सिमेंट रस्त्यांच्या बांधकामासाठी २६७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली.प्रशासनाने या कामांना मान्यता दिली असली तरी प्रत्यक्षात कुठल्याच कामाला सुरुवात झालेली नाही. मागास वस्त्यांमध्ये अजूनही मुलभूत सुविधांचा अभाव असल्याने शासनाकडून मंजूर झालेल्या निधीतील कामे सुरू होण्याची ग्रामस्थ वाट पाहत आहेत.
1
comment0
Report
ABATISH BHOIR
Sept 13, 2025 11:37:06
Kalyan, Maharashtra:कल्याण महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात MRI मशीन धुळ खात ! मे महिन्यात आणलेली लाखोंची अत्याधुनिक मशीन अजूनही बंद Anc...कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई शासकीय रुग्णालयात रुग्णसेवेच्या दृष्टीने अत्याधुनिक MRI मशीन मे महिन्यात दाखल करण्यात आलं. लाखो रुपये खर्च करून हे मशीन आणलं असलं, तरी अजूनही ते इंस्टॉल करण्यात आलं नाही. परिणामी, गेल्या ३ ते ४ महिन्यांपासून हे MRI मशीन रुग्णालयाच्या खोलीत धूळ खात पडलेलं आहे. दररोज १ हजार ते १२०० बाह्यरुग्ण (ओपीडी) या रुग्णालयात तपासणीसाठी दाखल होतात. तसेच खाटांच्या संख्येपेक्षा अधिक रुग्ण येथे भरती असतात. अपघात किंवा इतर आपातकालीन वैद्यकीय परिस्थितीत MRI तपासणी तितकीच महत्त्वाची असते. पण रुग्णालयात सुविधा बंद असल्याने गंभीर रुग्णांना खासगी रुग्णालयांकडे धाव घ्यावी लागत आहे. MRI तपासणीसाठी ५ ते १० हजार रुपये खर्च करावे लागतात आणि त्यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.मनसे व ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन लवकरात लवकर MRI मशीन सुरू करण्याची मागणी केली आहे. अन्यथा मोठं आंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला. Byte:- पुरुषोत्तम टिके ( कल्याण रुक्मिणीबाई हॉस्पिटल आरोग्य अधिकारी)
2
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 13, 2025 11:36:07
4
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 13, 2025 11:07:24
Nashik, Maharashtra: अँकर नाशिक जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात प्रति क्विंटलमागे २०० ते २५० रुपयांची घसरण झालीये. शेतकऱ्यांनी कांद्याचे भरलेले १०० ते १५० ट्रॅक्टर मानूर प्रशासकीय इमारतीच्या आवारात उभे करून प्रशासनाचा निषेध केला. याच ठिकाणी व्यापाऱ्यांना बोलवून कांद्याचे लिलाव करत प्रशासनाला कांदे भेट देत शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. Vo 1 नाशिक जिल्ह्यातील ही कळवण बाजार समिती...यामध्ये लिलावात कांद्याला प्रतिक्विंटल ८०० ते १००० रुपये असा नीचांकी दर मिळत आहे. असे असताना सरकार नाफेडद्वारे माध्यमातून किरकोळ बाजारपेठेमध्ये कांदा विक्रीसाठी आणत असल्याचे कळाल्याने शेतकरी आक्रमक झाले,विविध बाजारसमैत्यांमध्ये आंदोलन करून वैतागलेला कांदा उत्पादक शेतकरी आंदोलन करताना दिसतोय Byte *बाईट: सागर अंबाडे शेतकरी GFX ४ दिवसांत घसरलेले दर (क्विं.) सोमवार ११०० ते १२५० मंगळवार १००० ते १२०० गुरुवार ९५० ते ११०० शुक्रवार ९०० ते १००० Vo 2एकीकडे अमेरिकेने भारतावर 50 टक्के टेरिफ लावलेला असताना दुसरीकडे श्रीलंकेने देखील कांद्यावरील आयात शुल्क 10 टक्क्यावरून थेट 50 टक्के केले तिकडे बांगलादेशासह इतर देशात कांदा निर्यात मंदावलीचा आहे याचा परिणाम कांद्याच्या भावावर झाला आहेकांद्याचे भाव 1500 वरुन 1200 रुपये प्रती क्विंटलवर आले. या अगोदर जो भाव मिळत होता त्यातून पिकांवर केलेला खर्च निघत नव्हता आता क्विंटल मागे 300 रुपयाची घसरण झाल्यामुळे वाहतुकीवरचा खर्च देखील निघत नाही त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. कांद्याला किमान 2500 ते 3000 पर्यंत भाव द्यावा किंवा आम्हाला क्विंटल मागे 1000 रुपये अनुदान द्यावे अशी मागणी आता शेतकरी करू लागले आहेत. * *बाईट: संदीप थेटे, शेतकरी* VO 2: दरम्यान कांद्याच्या भावात सातत्याने होणाऱ्या घसरणीकडे सरकारने वेळीच लक्ष देऊन काहीतरी मार्ग काढावा अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जिल्ह्यात निर्माण होऊ शकतो
0
comment0
Report
Advertisement
Back to top