Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421503

उल्हासनगरात भरधाव कारने पाणीपुरी गाडीला धडक, 4 जण गंभीर जखमी!

CHANDRASHEKHAR BHUYAR
Jun 29, 2025 04:32:23
Ambernath, Maharashtra
उल्हासनगरात भरधाव कारने तीन ते चार जणांना उडवलं नियंत्रण सुटल्याने थेट पाणीपुरी हातगाडीला धडक कार चालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात Ulh accident Anchor : उल्हासनगरच्या कुर्ला कॅम्प रस्त्यावर भरधाव कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पाणीपुरीच्या हातगाडीला जोरदार धडक देत ३ ते ४ नागरिकांना उडवलं. या घटनेनंतर कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई केली जातेय. Vo : शनिवारी सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास कुर्ला कॅम्प रस्त्यावरील पाणीपुरी हातगाडीवर काही नागरिक पाणीपुरी खात उभे होते. यावेळी अचानक भरधाव कार हातगाडीला येऊन धडकली. यात हातगाडीवर उभ्या असलेलं ३ ते ४ नागरिक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कार चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं बोललं जातंय. या घटनेनंतर विठ्ठलवाडी पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतलं असून तो मद्यधुंद अवस्थेत होता का? याचा तपास केला जातोय. चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement