Back
सातारा के पांडे गांव में 350 वर्ष पुरानी उभ्या नवरात्र प्रथा
TTTUSHAR TAPASE
Sept 26, 2025 06:45:51
Satara, Maharashtra
TUSHAR TAPASE
6 FILES
SLUG NAME -SAT_PANDE_STORY
सातारा - सध्या सगळीकडे देवीचा जागर सुरू असून या शारदीय नवरात्रौत्सवात अनेक भक्त उपवास करतात. या उपवास करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. काहीजण फळे खाऊन उपवास करतात तर काही जण पायात चप्पल घालत नाहीत .ज्याला जसं जमेल तशी देवीची भक्ती करत असतो.पण या नवरात्रौत्सवात साताऱ्यातील वाई तालुक्यातील पांडे गावात अनोखी प्रथा आहे.या प्रथेला उभ्याची नवरात्र म्हटलं जातं.जमिनीवर न बसता,जमिनीला आपली पाठ न टेकवता हा उपवास केला जातो आणि यामध्ये अनेक भक्त सहभागी होतात चला पाहूया कशी असते ही उभ्याची नवरात्र...
विओ 1- पांडे गावात काळभैरवाचं जागृत स्थान आहे. येथे मागितलेली मनोकामना पूर्ण होते अशी मान्यता आहे.उपासक दिवसभर काळभैरवाची पूजा करतात.पांडे हे बारा बलुतेदारांचं गाव आहे. दरवर्षी या गावातील अनेक लोक उपवास करतात. हातात काठी घेऊन गावभर आरती करतात. आपल्या मनातून इच्छा पूर्ण करण्यासाठी देवीला नवस केला जातो. आणि नवसासाठी हा कडक उपवास केला जातो. विशेष म्हणजे गावातील मुस्लीम समाजातील लोकही देवीचा हा कडक उपवास करतात. नवस बोलणारे उपासक जमिनीवर पाय ठेवूनच सगळ्या गोष्टी करतात.उपासकाने जमिनीवर बसायचे नाही आणि झोपायचे देखील नाही.जर उपासकाला विश्रांती घ्यायचीच असेल तर मंदिरात असणाऱ्या पाळण्यावर छाती टेकवून आणि एक पाय वर घेऊन उभ्या उभ्या झोपतायच असते.ही तब्बल साडेतीनशे वर्षे जुनी परंपरा असल्याचे गावकरी सांगतात..
बाईट - उपासक
विओ 2- पांडे गावातील हे उपासक नवरात्रौत्सवाचे नऊ दिवस कडक उपवास करतात. तेल, मीठ, तिखटाचा पूर्णपणे त्याग केला जातो. हे नऊ दिवस ते केवळ गोड खातात. यामध्ये साबुदाण्याची खिर खाल्ली जाते. याशिवाय ते फळं आणि दूध घेतात.
बाईट - उपासक
विओ 3- हा उपवास इतका कडक असतो की या नऊ दिवसांच्या काळात ते बसत नाहीत. ते अख्खे नऊ दिवस उभेच राहतात. आधार फक्त काठीचा. झोपेसाठी ते पाळण्याचा वापर करतात. या नऊ दिवसास ते झोपत नाहीत. पळत नाही. चप्पल घालत नाही. सकाळी दोन तास आणि सायंकाळी दोन तास आरती केली जाते.पाय रिकामे करण्यासाठी गावत फेरफटका मारला जातो.झोपाळ्यावर छाती टेकून एक पाय वर घेऊन झोपतात. या उपासनेत एक पाय जमिनीवर ठेवावाच लागतो.नाथांची सेवा जितकी कडक कराल, तितकं फळ चांगलं मिळतं अशी उपासकांची मान्यता आहे. गावकरी मानतात की अशी कठोर उपासना केल्यावर देवी आपल्या मनोकामना पूर्ण करते. विशेष म्हणजे या उपासनेत सर्व समाजातील लोक सहभागी होतात.
तुषार तपासे सातारा
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRANAV POLEKAR
FollowSept 26, 2025 08:35:550
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 26, 2025 08:33:470
Report
0
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 26, 2025 08:16:260
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 26, 2025 08:16:090
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 26, 2025 08:02:100
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 26, 2025 08:01:400
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 26, 2025 08:01:280
Report
AKAMAR KANE
FollowSept 26, 2025 07:49:412
Report
SNSWATI NAIK
FollowSept 26, 2025 07:49:140
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 26, 2025 07:49:050
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 26, 2025 07:47:530
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 26, 2025 07:46:280
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 26, 2025 07:37:473
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 26, 2025 07:35:300
Report