Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ - पुसद मध्ये जन्माष्टमीनिमित्त टाळमृदुंगाच्या गजरात शोभायात्रा.

Aug 26, 2024 16:56:16
Yavatmal, Maharashtra

जन्माष्टमीनिमित्त यवतमाळच्या पुसद शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. डीजेला फाटा देत पारंपारिक पद्धतीने सलग 11 वर्षांपासून या आदर्शवत मिरवणुकीचे आयोजन करण्यात येत आहे. या मिरवणुकीत टाळ व मृदुंगाच्या तालावर गोपाल कृष्ण भगवान की जय असा एकच जयघोष करण्यात आला. या मिरवणुकीत बाल गोपाल वयोवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीकृष्ण जन्मोत्सव समिती पुसद तर्फे मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.

1
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Oct 20, 2025 02:48:55
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Oct 20, 2025 02:47:53
Nashik, Maharashtra:रिक्षाचालकाची युवतीला मारहाण नाशिकच्या रविवार कारंजा येथे रिक्षाने कट मारल्याने रस्त्यावर पडलेल्या एका युवतीने जाब विचारला असता, रिक्षाचालकाने तिला अश्लील शिवीगाळ करत मारहाण केलीये. त्याचबरोबर तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना काल दुपारच्या सुमारास घडलीये... याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात विनयभंगासह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय...काल दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. रमेश बाबुराव बोडके असे संशयित रिक्षाचालकाचे नाव आहे. पीडित २६ वर्षीय युवती तिच्या मोपेडने जात असताना रविवार कारंजा चौकात संशयित रिक्षाचालकाने तिच्या मोपेडला कट मारला. त्यामुळे मोपेडसह पीडिता रस्त्यावर पडली.रिक्षाचालक मुजोरी करत बोलत असल्याने पीडितेने त्याला जाब विचारला. याचा राग आल्याने संशयित रिक्षाचालक बोडके याने तिला अश्लील शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली आणि विनयभंग करण्याचाही प्रयत्न केला. पीडितेने तातडीने सरकारवाडा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. यानुसार, रमेश बोडकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला...
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Oct 20, 2025 02:47:39
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 20, 2025 02:47:30
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:संभाजी नगरच्या कन्नड तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानीबाबत शासनाकडून ठोस मदत मिळावी, तसेच तत्काळ सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, या मागणीसाठी कन्नड तहसील कार्यालयासमोर १० ऑक्टोबरपासून एका व्यक्तीने सुरू केलेले बेमुदत उपोषण अखेर नवव्या दिवशी शनिवारी छत्रपती संभाजीनगर येथे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरी जाऊन मागे घेतल्याची घटना घडली, त्यामुळं राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू आहेत... कन्नड येथील संदीप विजयकुमार सेठी या व्यक्तीने, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पंजाब सरकारप्रमाणे सरसकट नुकसानभरपाई द्यावी, पूरग्रस्त मृतांच्या कुटुंबीयांना तातडीची मदत करावी, सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, सरसकट कर्जमाफी जाहीर करून नवीन कर्ज मंजूर करावे, बँक वसुली वर्षभरासाठी स्थगित करावी आदी मागण्यांसाठी १० ऑक्टोबरपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले. तहसीलदारांनीसेठी यांना उपोषण मागे घेण्यासाठी विनंती केली; परंतु त्यांनी पालकमंत्री संजय शिरसाट जोपर्यंत उपोषणस्थळी येऊन आश्वासन देणार नाही तो पर्यंत माघार घेणार नाही अशी भूमिका घेतली, मात्र पालकमंत्र्यांचे बिझी शेड्यूल असल्यामुळे कन्नडला येणे शक्य नाही, असे सांगण्यात आले. उपोषणकर्त्यांनाच इकडे छत्रपती संभाजीनगरला पालकमंत्र्यांच्या घरी आणा. इथेच उपोषण सोडवू, असा संदेश दिला. त्यानंतर उपोषणकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगरला जाण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर एका रुग्णवाहिकेमध्ये उपोषणकर्ते संदीप सेठी हे डॉक्टर आणि काही कार्यकर्त्यांसह छत्रपती संभाजीनगरला रवाना झाले आणि पालकमंत्र्यांच्या घरी उपोषणाची सांगता झाली. मात्र एखाद्या मंत्र्याच्या घराला जाऊन उपोषण सोडण्याची ही पहिलीच वेळ असावी मंत्र्यांना उपोषणकर्त्याकडे जाण्यास वेळ नाही का अशा चर्चा सुरू झाल्या.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Oct 20, 2025 01:45:49
Dhule, Maharashtra:दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील सुप्रसिद्ध बीएपीएस स्वामीनारायण मंदिरामध्ये तब्बल तीन हजार दिव्यांनी दीपोत्सव साजरा झाला. यावेळी स्वामीनारायण मंदिराचे संत आनंदजीवन स्वामी यांच्या संकल्पनेतून मंदिर परिसरामध्ये भाविकांनी तीनहून अधिक दिवे लावून दीपोत्सव साजरा केला. दरवर्षी दिवाळी सणाच्या निमित्ताने धुळ्यातील स्वामीनारायण मंदिरात विविध उत्सव साजरे करण्यात येतात. या दीपोत्सवात तसाच अन्नकुट उत्सवाचं भाविकांमध्ये मोठं आकर्षण असतं. दिवाळीच्या निमित्ताने स्वामीनारायण मंदिरात लावण्यात आलेल्या तब्बल तीन हजार दिव्यांमुळे संपूर्ण परिसर दिव्यांनी प्रकाशमान झाला होता. दिव्यांनी प्रकाशमान झालेले दैदीप्यमान दृश्य डोळ्यांचं पाळण्याचं फेडणार होतं.
1
comment0
Report
Diwali 2025
Advertisement
Back to top