Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413001

सोलापुर में भाजपा के विरोध प्रदर्शन: राहुल गांधी की प्रतिमा के सामने प्रदर्शन

AAABHISHEK ADEPPA
Mar 15, 2026 12:16:53
Solapur, Maharashtra
सोलापुर ब्रेकिंग : भाजपा कांग्रेस ने राहुल गांधी की प्रतिमा पर प्रदर्शन किया। काँग्रेस नेता राहुल गांधी ने संसदीय प्रवेशद्वार पर बैठकर चाय पीने के निषेधार्थ भाजपा का विरोध किया। राहुल गांधी को मूर्ख कहा गया और उनकी सांसदता रद्द कर गिरफ्तारी की मांग की गई। सोलापुर के महापौर विनायक कोंड्याल तथा भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर के नेतृत्व में आंदोलन किया गया। राहुल गांधी को संविधान की पायमल्ली करने का आरोप भी लगाया गया। बाइट्स - विनायक कोंड्याल (महापौर, सोलापूर महानगरपालिका) - रोहिणी तडवळकर (शहराध्यक्ष, भाजप)
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ABATISH BHOIR
Mar 15, 2026 13:46:40
Kalyan, Maharashtra:कल्याण के आंबिवली नगर पाटील नगर परिसर में रात्री के समय नागरिकों के घरों पर सुतळी बम फेंके जाते हैं। इस घटना से नागरिकों में भय फैल गया है और टिकवाला पुलिस स्टेशन को बार-बार शिकायत करने के बावजूद भी कार्रवाई न होने का आरोप locals ने लगाया है। नशाखोरों का बड़ा दबदबा है, जो नारों, मारपीट, गाली-गलौच तथा नशे की बिक्री के चलते सामान्य नागरिकों को परेशान करते हैं। पिछले कुछ दिनों से नागरिकों के घरों के पास रात के समय सुतळी बम फेंके जाने की घटनाएं बढ़ी हैं जिससे बच्चे और बुजुर्ग बेहद परेशान हैं। स्थानीय नागरिक सतिश यादव के माध्यम से टिटवाला पुलिस को शिकायत कर रहे हैं, पर पुलिस की ओर से स्पष्ट कार्रवाई नहीं दिख रही है। इस मामले में स्थानीय नागरिकों का एक ही मांग है कि उक्त क्षेत्र में नशाखोरों के विरुद्ध कड़ी कार्रवाई कर नागरिकों को राहत दी जाए।
53
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 15, 2026 13:46:29
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील पांडुरंग येथे संतप्त जमावाने अपहरणकर्त्या टोळीच्या वाहनावर हल्ला चढवून त्यांना बेदम मारहाण केली आहे. चार चाकी वाहनात हे अपहरणकर्ते एका व्यक्तीला हातपाय बांधून घेऊन जात होते. ही टोळी मुलांचे अपहरण करणारी आहे अशा संशयावरून ग्रामस्थांनी जमाव करीत वाहनाचा पाठलाग केला, आणि वाहन थांबवून अपहरण कर्त्यांना बेदम चोप दिला. बोरीअरब येथील पाच जण उधारीचे पैसे वसूल करण्यासाठी मुकुटबन येथे गेले, मात्र पैसे न मिळाल्याने त्यांनी संजय पेडकर याला हातपाय बांधून गाडीत कोंबले, त्याचे अपहरण करून नेत असताना वाटेतील ग्रामस्थांना संशय आला, मुलं पळविणारी टोळी समजून ग्रामस्थांनी वाहनाचा पाठलाग सुरू केला. पांढुर्णा जवळ गाडी अडवून 6 जणांना मारहाण केली, यात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. घाटंजी पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे.
51
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 15, 2026 13:17:57
Yavatmal, Maharashtra:Anchor : यवतमाळच्या मनपूर वर्तुळात रान तुळस असलेल्या जंगलात पेटलेला वनवा विझवीताना वनपाल विजय शिंगनजुडे यांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत. आपल्या जंगलांचे आणि नैसर्गिक संपदेचे रक्षण करताना जीवाची बाजी लावणारे ते खरे वन शहीद आहेत. राज्य त्यांच्या कर्तव्यनिष्ठ सेवेला सदैव कृतज्ञतेने स्मरणात ठेवेल. अशा संवेदना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या आहे. तर वनपाल वनरक्षकांना वनवनवा हाताळताना कुठल्याही सुविधा मिळत नाही, त्यांना प्रशिक्षण देखील दिले जात नाही, त्यामुळे वारंवार अशा घटना घडत असून आता तरी प्रशासन जागे होणार का असा संतप्त सवाल महाराष्ट्र राज्य वनरक्षक पदोन्नत वनपाल संघटने ने उपस्थित केला आहे.
165
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 15, 2026 12:48:24
Washim, Maharashtra:वाशिम: इरान,इस्रायल और अमेरिकेमधील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारावर परिणाम झाला असून वाशिम जिल्ह्यातील टरबूज उत्पादकांना फटका बसत आहे. निर्यात ठप्प झाल्याने टरबूजाचे दर घसरले असून शेतकऱ्यांना माल अवघ्या 6 रुपये किलो दराने विकावा लागत आहे. यंदा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात टरबूजाचे उत्पादन झाले; मात्र निर्यात बाजारपेठेवर परिणाम झाल्याने स्थानिक बाजारात आवक वाढून दरात घसरण झाली. काही ठिकाणी व्यापारी माल खरेदीसाठी पुढे येत नसल्याने टरबूज शेतातच पडून राहत आहे. लागवडीचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून शासनाने मदत करावी,अशी मागणी होत है.
158
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 15, 2026 12:47:52
Chandrapur, Maharashtra:चंद्रपुर महानगरपालिका स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत आता थेट सामना रंगणार आहे. सोमवारी होणाऱ्या निवडणुकीसाठी विरोधी गटाकडून काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक वसंत देशमुख यांनी तर सत्तारूढ गटाकडून भाजप आघाडीतील उद्धवसेनेच्या नगरसेविका मनस्वी गिन्हे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. दोन्ही गटांकडे प्रत्येकी ८-८ असे संख्याबळ असल्याने निकाल ईश्वर चिठ्ठीची शक्यता बळावली आहे. महापालिका स्थायी समितीत एकूण १६ सदस्य असून, सत्तारूढ गटात भाजपचे ६ आणि उद्धवसेनेचे २ सदस्य आहेत. दुसरीकडे विरोधी गटात काँग्रेसचे ७ तर मित्रपक्ष भाशेकापचा १ सदस्य आहे. असे समसमान संख्याबळ आहे. यापूर्वी उपमहापौर पदाची निवडणूकही ईश्वर चिठ्ठीतूनच झाली होती. त्यावेळी नशिबाने उद्धवसेनेचे प्रशांत दानव यांच्या बाजूने कौल दिला होता. त्यामुळे यावेळीही राजकीय समीकरणांपेक्षा नशिबाचा फेरा निर्णायक ठरणार काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
174
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 15, 2026 12:15:44
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर : कुणबी प्रमाणपत्राबाबत खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती, मंत्री राधाकृष्ण विखेंसह मनोज जरांगे पाटलांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी कुणबी प्रमाणपत्र वाटपाच्या मुद्द्यावरून आता नवा वाद उभा राहिल्याचं पाहायला मिळतंय. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे या दोघांविरोधात छत्रपती संभाजीनगर क्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार दाखल करण्यात आलीय. कुणबी प्रमाणपत्र वाटपाबाबत चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती देऊन समाजात तेढ निर्माण केल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते विदुर लाघडे पाटील यांनी केला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यात 12 लाख कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप झाल्याची माहिती माध्यमांमध्ये दिली होती, मात्र हा आकडा फसवा असून प्रत्यक्ष वाटप अत्यंत कमी झाल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. तर दुसरीकडे, मनोज जरांगे पाटील यांनी 4 कोटी 22 लाख मराठा समाज कुणबी आरक्षणात गेल्याचे अनधिकृत आणि खोटे वक्तव्य केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. अशा प्रकारच्या चुकीच्या विधानांमुळे मराठा आणि ओबीसी समाजामध्ये अनावश्यक संशय आणि जातीय तणाव वाढत असून, हे वक्तव्य जाणीवपूर्वक केल्याचा आरोप विदुर लाघडे पाटील यांनी केला आहे. दरम्यान, या सर्व प्रकारामुळे राज्याची शांतता धोक्यात येत असून मंत्री विखे पाटील आणि मनोज जरांगे पाटील याच्याकांवर तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आता पोलीस महानिरीक्षकांकडे करण्यात आली आहे. या तक्रारीमुळे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यताय.
190
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 15, 2026 12:15:29
:पुणे.. वाघोलीत विद्यार्थ्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे हल्ल्यावेळी आरोपीने मारलेला कोयता विद्यार्थ्याच्या डोक्यातच अडकून राहिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही संपूर्ण थरारक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. वाघोलीमधील रायसोनी कॉलेजसमोर ही भीषण घटना घडली. नागेश जगताप हा विद्यार्थी आपल्या मित्रासोबत हॉटेलसमोर चहा पिण्यासाठी थांबला होता. त्याच वेळी जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपी मंगेश सांगळे आपल्या दोन साथीदारांसह तेथे आला. “तू मला शिवी का दिली?” असा जाब विचारت आरोपींनी अचानक नागेशवर कोयत्याने सपासप वार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात नागेशच्या डोक्यावर, पाठीवर आणि शरीरावर गंभीर वार करण्यात आले. हल्ला इतका भयानकर होता की आरोपीने मारलेला कोयता नागेशच्या डोक्यातच अडकून राहिला. नागेशला वाचवण्यासाठी धावून गेलेला त्याचा मित्र सिद्धेश यालाही या हल्ल्यात दुखापत झाली आहे. ही संपूर्ण थरारक घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून घटनेमुळे वाघोली परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, जखमी विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक केली आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे वाघोली परिसरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
234
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 15, 2026 11:32:52
Bhandara, Maharashtra:पवनीत सिलेंडरवर चालणाऱ्या ओमनी वॅनला अचानक आग लगली; नागरिकांच्या प्रयत्नांनी अनर्थ टळला. भंडारा जिल्ह्यातील पवनी शहरातील गांधी चौकात रविवारी दुपारी सिलेंडरवर चालणाऱ्या एका ओमनी वॅनला अचानक भीषण आग लागल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. आग वेगाने पसरत असताना नागरिकांनी तत्परता दाखवत पाणी व अन्य साधनांच्या मदतीने अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अवैधरित्या गॅस सिलेंडरवर चालवली जाणारी वाहने किती धोकादायक ठरू शकतात, हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
113
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 15, 2026 11:19:57
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा उमेदवार जवळपास निश्चित सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा उमेदवार जवळपास निश्चित सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी दिपक वैद्य यांचे नाव जवळपास निश्चित झालेय दिपक वैद्य हे बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे येथून निवडून आले आहेत. दिपक वैद्य हे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे कट्टर समर्थक मानले जातात अतिशय सर्वसामान्य शेतकरी कुटुुंबातील व्यक्तिमत्व म्हणून दिपक वैद्य यांची ओळख आहे माजी आमदार राजेंद्र यांच्या नेतृत्वाखाली बार्शी तालुक्यातील सर्वच्या सर्व 8 झेडपी गट आणि 16 पंचायत समिती गणात भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत तर सोलापूर जिल्हा परिषदेत 68 पैकी 38 जागा जिंकत भाजपने एकहाती सत्ता मिळवलीय त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाबाबत मोठी चूरस पाहायला मिळाली होती. मात्र अखेर बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी बाजी मारत झेडपी अध्यक्षपद बार्शी तालुक्याकडे खेचून आणले आहे
166
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 15, 2026 11:16:24
Beed, Maharashtra:सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाठ यांच्या हस्ते आज परळीतील श्री साई मंदिराचे लोकार्पण करण्यात आले यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. संजय सिरसाठ बाईट पॉइंटर्स श्री साई मंदिराचे लोकार्पण केल्यानंतर आज श्रद्धा सबुरीचा संदेशाचा प्रत्यय आला. ऑन बीड मधील महिला अत्याचार बीड मधल्या महिला अत्याचाराच्या घटना संताप जनक आणि चिंताजनक आहेत. अशा नराधमाला चौकामध्ये फाशी दिली पाहिजे. अशा प्रकारच्या अत्याचार करणाऱ्याला कुठल्याही प्रकारची दयामाया दाखवू नये. महिलेला बांधल्याचा प्रकार ऐकूनच अंगावर शहारे येतात. अशा लोकांना सोडता कामा नये त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. अशा घटना पुन्हा घडून येण्यासाठी ही सरकार काम करेल. ऑन पुण्यातील घटना पुण्यातील प्रकार मानसिक संतुलन बिघडलेल्या व्यक्तीकडून झालेला आहे. यावर पोलीस कारवाई करत आहे. अशा घटना आपल्यावर सुद्धा कलंक आहे. ऑन ॲट्रॉसिटी कायदा ॲट्रॉसिटी बद्दल तुमच्या काही लोकांचे काही गैरसमज झाले आहेत. मी उद्या विधानसभेत त्याच्यावर निवेदन करणार आहे. ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये कुठेही बदल झालेला नाही. मला कायद्यात बदल करायचे अधिकार नाहीत. चुकीचे गैरसमज पसरवले जात आहेत. मी यावर समिती नाहीतर आयोग नियमाचे म्हणालो आहे. केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे आम्ही आयोग स्थापन करणार आहोत. त्या आयोगामध्ये अध्यक्ष आयपीएस अधिकारी अशी ती कमिटी असणार आहे जे दलित बांधावावर अत्याचार होतात आणि जे प्रकरण पेंडिंग आहेत त्याबाबत काम करेल. आयोगाची निर्मिती समाजाच्या हितासाठी असेल. ऑन राज्यातील गुन्हेगारी पोलिसांना कुठलाही दोष देता येणार नाही पोलिसांनी जलद गतीने काम करायला सुरुवात केली आहे. कुठलाही गुन्हा झाला तर 24 तासाच्या आत सर्व घटनेचा तपास केला जात आहे. आरोपीला तात्काळ अटक सुद्धा केली जाते. ऑन नितेश राणे यांचे वक्तव्य कुंभमेळ्यात कोणी स्टॉल लावायचे हे तिथल्या प्रशासनाचा प्रश्न आहे. स्टॉल लावायला एखाद्याला बंदी घालणं योग्य होणार नाही. ऑन अबू आझमींच्या इफ्तार पार्टीला संजय राऊत यांची उपस्थिती संजय राऊत कुठेही जातील उद्या ओबीसी ने इफ्तार पार्टी दिली तरी जातील त्याचं काय. त्यांना पक्ष राहिला ना धर्म राहिला ना नीतिमत्ता राहिली. अशा पद्धतीचे त्यांनी कितीही चांगुलपणा केला तरी मुस्लिम मत त्यांना मिळणार नाहीत. बाईट - संजय सिरसाठ, सामाजिक न्याय मंत्री
215
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Mar 15, 2026 10:49:43
Dhule, Maharashtra:नंदुरबार जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये अद्यापही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले नासल्येची धक्कादायक बाब समोर आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावणं अनिवार्य करण्याचा निर्णय शासनाने घेतला असला, तरी प्रत्यक्षात जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये त्याची अंमलबजावणी झालेली नाही. जिल्हा परिषदेसह काही खासगी शाळांमध्येही कॅमेऱ्यांची व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्यात वाढत असलेल्या विद्यार्थ्यांवरील अत्याचार आणि शाळांमधील घटनांच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज अधिक अधोरेखित होत आहे. जिल्ह्यात सुमारे हजारो सरकारी व खासगी शाळा असतानाही अनेक ठिकाणी कॅमेरे नसल्याने शाळांमधील घडामोडींवर नियंत्रण ठेवणे कठीण होत आहे. शासनाने जिल्हा नियोजनाच्या निधीतून सीसीटीव्ही बसविण्याचे निर्देश दिले असले, तरी काही ठिकाणी प्रशासनाचे दुर्लक्ष आणि नियोजनाच्या अभावामुळे हा प्रश्न अद्यापही कायम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी पालकांकडून होत आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाशी संपर्क केला असता त्यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला त्यामुळे शासनाच्या आदेशांचे पाय मल्ली केली जात आहे का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
165
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Mar 15, 2026 10:49:29
109
comment0
Report
MAMILIND ANDE
Mar 15, 2026 10:39:24
153
comment0
Report
Advertisement
Back to top