Back
Yavatmal445001blurImage

यवतमाळ : पुसद मध्ये माणूसकीची भिंत फाउंडेशन ने वृद्ध, निराधार, बेघरांसोबत साजरी केली भाऊबीज

Shrikant Ramchandra Raut
Nov 03, 2024 12:41:05
Yavatmal, Maharashtra

यवतमाळच्या पुसद येथे माणुसकीची भिंतच्यावतीने बेघर, निराधार, दिव्यांग, असहाय वृद्ध व अनाथांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. वृद्धाश्रम व रुग्णालय परिसरात हा सोहळा संपन्न झाला. माणुसकीची भिंत परिसरात स्वच्छता करून गोरगरीब निराधार वृद्धांची व पुरुषांची दाढी-कटिंग करण्यात आली. त्यानंतर महिलांनी काढलेल्या रांगोळ्यांनी अंगण सजले. पाट मांडण्यात आले. त्यानंतर माणुसकीची भिंतच्या महिला सदस्यांनी टोपी, टॉवेल, नारळ पेढा देऊन वंचितांना ओवाळले. त्यांच्या कुटुंबातील महिलांना साड्या देण्यात आल्या.

1
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com