Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Palghar401301

विरार में बहुजन विकास आघाडी की गुढीपाडवा शोभायात्रा 21 साल से जारी

PTPRATHAMESH TAWADE
Mar 19, 2026 16:15:59
Virar, Maharashtra
विरार | बहुजन विकास आघाडची गुढीपाडवा निमित्त भव्य शोभायात्रा; २१ वर्षांची परंपरा कायम गुढीपाडव्याच्या निमित्ताने बहुजन विकास आघाडीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या २१ वर्षांपासून हा सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबवला जात असून नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित या शोभायात्रेत पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर, विविध सांस्कृतिक देखावे आणि सामाजिक संदेश देणाऱ्या आकर्षक झांकी यांचा समावेश असतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच नागरिक उत्साहाने या उपक्रमात सहभागी होताना दिसतात. बहुजन विकास आघाडीच्या या उपक्रमाने स्थानिक पातळीवर एक वेगळी ओळख निर्माण केली असून, सामाजिक एकात्मता आणि सांस्कृतिक जपणूक याचा संदेश दिला जातो. “गेल्या २१ वर्षांपासून आम्ही हा उपक्रम सातत्याने राबवत आहोत. समाजात एकोपा आणि संस्कृती जपण्याचा आमचा प्रयत्न आहे。”
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
KJKunal Jamdade
Mar 19, 2026 15:34:22
Shirdi, Maharashtra:ऑन संगमनेर ॲसिड हल्ला प्रकरण - झालेली घटना दुर्दैवी... पीडितेला पाठबळ देण्याचे काम विखे परिवाराने केलंय... पीडितेवर आपण मोफत उपचार आपण करतोय... ज्या भागात घटना घडली तिथे सीसीटीव्ही नाहीत, त्यामुळे आरोपीला पकडणे अवघड झालंय... या नराधमाला अटक होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे... आरोपीचे स्केच जास्तीत जास्त सरक्युलेत करा... या प्रकरणाचा फार मोठा विस्तार शिर्डी मतदारसंघात असल्याचं समोर येतंय... मला सगळ्या गोष्टी माहित आहे... खरात प्रकरणाचा तपास महिला IPS अधिकाऱ्याकडे आहे... तपासात सगळ्या गोष्टी समोर येतील... कैप्टन खरातशी माझा कधीही संबंध आलेला नाही... शिर्डी आणि महाराष्ट्रातील अनेक नामांकित लोक या प्रकरणात असू शकतील... पोलिस तपासात सर्व गोष्टी समोर येतील, मला काही गोष्टी माहित असल्या तरी त्यावर बोलणे संयुक्तिक नाही... शिर्डीतील नावे पोलिस तपासात समोर येतील... निलेश लंके श्रीरामपूर जमीन आरोप - आम्हाला असे आरोप रोजचे झाले आहेत... नामदार विखे पाटलांनी यावर खुलासा केलाय... हा विषय खूप गांभीर्याने घेयाचा नाही... जनता आमच्या मागे... अशा आरोपांवर लोकांचा विश्वास बसत नाही... येणाऱ्या काळात या गोष्टीचा खुलासा होईल... लोकशाहीत आरोप करण्याचे स्वातंत्र्य... एखादा व्ययासाय करण्यासाठी शासनानेकडे जमीन मागण्याचा अधिकार नागरिकांना... मात्र जमीन द्यायची की नाही हा शासनाचा अधिकार... झालेल्या आरोपांवर तपास करावा, आम्ही कुठे थांबलंय?... आम्हच्यावर आरोप जमिनीबाबत आरोप केले, मात्र त्यांचाच व्हिडिओ कॅप्टन खरात यांच्यासोबत दिसलाय...
1086
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 19, 2026 14:16:43
1022
comment0
Report
JMJAVED MULANI
Mar 19, 2026 14:16:26
Rui, Maharashtra:बारामती ओबीसी नेते लक्ष्मण हाके बाईट पॉईंट्स..... ऑन राज्यसरकार जीआर रद्द रस्त्यावर उतरलेल्या कार्यकर्त्यांचा विजय आहे... मिसगाईड करून नाव देण्यास लावले मात्र राज्यसरकारला कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने पुन्हा जीआर रद्द करावा लागला... ऑन बारामती पोटनिवडणूक निवडणूक बिनविरोध होणार नाही.. बारामती विधानसभा पोटनिवडणूक होणार आहे.. सुनेत्रा पवार यांना विधानपरिषदेवर बिनविरोध घ्या -लक्ष्मण हाके.. ऑन काँग्रेस निवडणूक लढविणार निवडणूक लढवीणाऱ्या पक्षाचे स्वागत करतो.. परंतु प्रत्यक्ष काँग्रेसने निवडणूक मध्ये उतरले पाहीजे.. ऑन अशोक खरात महाराष्ट्र राज्यात अंधश्रद्धा विरुद्ध कायदा आहे.. कालच्या प्रकरणात भोंदूबाबा कनेक्शन असेल आणि त्यात संविधानिक पदावर कोणी असेल तर ते उघड झाले पाहिजे.. रुपाली चाकणकर यांचा व्हिडीओ कधीचा आहे हे तपासले पाहिजे हा व्हिडीओ जुना असेल तर रुपाली चाकणकर यांच्यावर अन्याय होईल..
1049
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Mar 19, 2026 13:34:17
Dhule, Maharashtra:धुळे जिल्ह्यातील आबेक भागात अवकाळी पाऊस आणि गरपिटीने झोडपून काढले. गरपितीचा सर्वाधिक फटका साक्री तालुक्यातील कासारे, पेरेजपूर परिसरात बसला असून, काढणीला आलेले रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. धुळे तालुक्यातही अनेक भागात मेघ गरजनेसह पुसने हजेरी लावली. अचानक वादळी वाऱ्यासह गारपीट सुरु झाल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार गारपीटीचा तडाका बसला असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत. या गारपीटमुळे कांदा, गहू, हरभरा पिकाला फटका बसला आहे. जवळपास अर्धा तास चाललेल्या पावसामध्ये सुरुवातीचे दहा मिनिट गारपीट व त्यानंतर वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेल आहे.
1015
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 19, 2026 13:23:49
Akola, Maharashtra:राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने थैमान घातले असून काही ठिकाणी गारपीटही होत आहे. हवामान खात्याने अकोला जिल्ह्यासाठी 18 ते 20 मार्च दरम्यान अवकाळी पावसाचा इशारा दिला होता आणि त्यानुसार आज अकोला जिल्हा मधील अकोट – दर्यापूर रोड परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या भागात काही ठिकाणी गारपीटही झाली आहे. सध्या अकोला जिल्ह्यातील अनेक भागात शेतकऱ्यांची गहू काढणी सुरू होण्याच्या टप्प्यावर आली आहे. मात्र अचानक झालेल्या या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे गव्हाच्या पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अकोट–दर्यापूर रोड परिसरात शेतात उभे असलेले गहू पीक पावसामुळे आडवे पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तर गव्हा बरोबरच टरबूज, निंबू, संत्रा पिकांना सुद्धा धोका निर्माण झाला आहे.यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली असून शासनाने तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यातील इतर भागातही हवामान ढगाळ असून पुढील काही तासांमध्ये पावसाची शक्यता नाकारता येत नसल्याचे सांगितले जात आहे.
1095
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 19, 2026 13:07:57
1064
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 19, 2026 13:03:35
Beed, Maharashtra:बीड: जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पावसाला सुरुवात; अनेक ठिकाणी गारांचा वर्षाव, रब्बी पिकांसह फळबागांचे नुकसान..! ANC - गेल्या आठवडा भरापासून हवामानातील आद्रता वाढल्याने गर्मीने नागरिक परेशान झाले असतानाच आज दुपारीच बीड जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांचाही वर्षाव झाला. त्यामुळे उकाड्यापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. बऱ्याच ठिकाणी रब्बी पिकांसह फळबागांचेही नुकसान झाले आहे. पहिल्याच अवकाळी पावसात गारांचा वर्षाव झाल्याने बच्चे कंपनीचा आनंद गगनात मावेनासा झालाय, यावेळी बच्चे कंपनी मोठ्या आनंदात गारा गोळा करण्याचा मनमुराद आनंद लुटला. अचानक झालेल्या या पावसामुळे मात्र शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. कांदा, गहू, ज्वारी यासह आंबा पिकांचे नुकसान झाले आहे. पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. बाईट: शेतकरी
1052
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 19, 2026 12:17:21
1019
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 19, 2026 12:00:27
Beed, Maharashtra:बीड: निवडणूकीच्या काळात मला मोठमोठे नेते संपवायला निघाले होते; आमदार धनंजय मुंडे यांचं धक्कादायक विधान ज्यावेळी नगरपालिकेच्या निवडणुका होत्या त्यावेळी महाराष्ट्रभर निवडणुकीचे वातावरण होतं. मी मात्र वेगळ्याच वातावरणात होतो.. सर्वदूर जे एकट्या धनंजय मुंडे यांना बदनाम करता येईल त्याकरिता महाराष्ट्रातील मोठ मोठे नेते सर्व काही करत होते. शेवटी मला वाटलं आपल्या मध्ये काहीतरी नक्कीच आहे... हे बाबा आपल्याला पुरून उरेन.. असे त्यांनी वाटत असावे..! एवढं वातावरण सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया युट्युबचे चैनल या परिस्थितीत सुद्धा परळीच्या मायबाप जनतेने महायुतीच्या मागे भक्कम पाठिंबा दिला आणि ऐतिहासिक विजय मिळवून दिला. असे वक्तव्य परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केले. त्यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्या मनातील सल पुन्हा एकदा बाहेर पडली आहे.
1056
comment0
Report
Advertisement
Back to top