Back
गडचिरोली के बंगाडी में नया पुलिस सहायता केंद्र स्थापित, 24x7 सुरक्षा सुनिश्चित
AAASHISH AMBADE
Mar 19, 2026 17:45:46
Gadchiroli, Maharashtra
गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम बंगाड़ी येथे नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना , 1000 सी–60 कमांडो, 18 बीडीडीएस टीम, नवनियुक्त पोलीस जवान, 500 विशेष पोलीस अधिकारी व खाजगी कंत्राटदार यांच्या मदतीने 24 तासात उभारले नवीन पोलीस मदत केंद्र , सन-2023 पासूनच्या सुरक्षा पोकळी कमी करण्यासाठीच्या साखळीमधील 11 व्या नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना
दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी फुलनार कॅम्प गुंडुरवाही येथे नवीन पोलीस मदत केंद्र
दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी तुमरकोठी येथे नवीन पोलीस स्टेशन
2026 या वर्षात दिनांक 24/01/2026 रोजी बिनागुंडा येथे नवीन पोलिस मदत केंद्राची स्थापना करण्यात येऊन अति-दुर्गम भागातील नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करण्यात आली आहे .
तसेच गडचिरोली पोलीस दलाच्या नागरी कृती उपक्रमांद्वारे या भागातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जात आहे.
बंगाडी पोलीस मदत केंद्राची उभारणी करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यात एकुण 1050 मनुष्यबळ, 04 जेसीबी, 08 ट्रेलर, 02 पोकलेन, 20 ट्रक इत्यादीच्या सहाय्याने अवघ्या एका दिवसात पोलीस मदत केंद्राची उभारणी करण्यात आली. सदर पोलीस मदत केंद्रामध्ये पोलीस बलाच्या सुविधेसाठी वायफाय सुविधा, 15 पोर्टा कॅबिन, जनरेटर शेड, पिण्याच्या पाण्यासाठी आर ओ प्लांट, मोबाईल टॉवर, टॉयलेट सुविधा, पोस्ट सुरक्षेसाठी मॅक वॉल, बी.पी मोर्चा, 08 सँड मोर्चा इत्यादींची उभारणी करण्यात येत असून यासोबतच पोलीस मदत केंद्राच्या सुरक्षाेसाठी गडचिरोली पोलीस दलाचे 03 अधिकारी व 55 अंमलदार, एसआरपीएफ ग्रुप 03, जालना सी कंपनीचे 02 प्लाटुन तसेच सिआरपीएफ 192 बटा. सी कंपनीचे 01 असिस्टंट कमांडंट व 52 अधिकारी/अंमलदार, विशेष अभियान पथकाचे 08 पथक (200 कमांडोज) तैनात करण्यात आले आहेत. पोलीस मदत केंद्राच्या उभारणी कार्यक्रमादरम्यान जनजागरण मेळावा आयोजित करुन पोलीस मदत केंद्र, बंगाडी हद्दीतील उपस्थित नागरिकांना विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले. वाढलेल्या सुरक्षाेमुळे भविष्य काळात या अतिदुर्गम भागात राष्ट्रीय महामार्ग, पूल, मोबाईल टॉवर तसेच गुंडेनूर नाल्याच्या बांधकामास सुरक्षा मिळणार असून याभागातील विकास कामांना गती मिळणार आहे. तसेच येथील दुर्गम भागात भविष्यात एस. टी. बस सेवा सुरु करणे शक्य होऊन अति-दुर्गम भागात नवीन पोलीस मदत केंद्राच्या उभारणीमुळे तेथील नागरिकांनी संतोष व्यक्त करुन पोलीस प्रशासनाप्रती आभार व्यक्त केले.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 19, 2026 16:15:591009
Report
KJKunal Jamdade
FollowMar 19, 2026 15:34:221086
Report
KJKunal Jamdade
FollowMar 19, 2026 15:01:531074
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 19, 2026 14:16:431022
Report
JMJAVED MULANI
FollowMar 19, 2026 14:16:261049
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 19, 2026 14:03:561089
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 19, 2026 14:00:13937
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 19, 2026 13:48:101048
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 19, 2026 13:34:171015
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 19, 2026 13:23:491095
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 19, 2026 13:07:571064
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 19, 2026 13:05:481033
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 19, 2026 13:03:351052
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 19, 2026 12:17:211019
Report