Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज

Oct 25, 2024 07:21:47
Yavatmal, Maharashtra
यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSATISH MOHITE
Dec 09, 2025 03:47:32
Nanded, Maharashtra:नांदेड शहरातील एक तेल व्यापाऱ्याची 30 लाख रुपये असलेली बॅग चोरट्यानी कार मधून पळवली. जुना मोंढा येथील तेल व्यापारी विनायक पारसेवार काल रात्री आपले दुकान बंद करून जात होते. आपल्या कारमध्ये ते बसले पण पंक्चर असल्याचे त्यांना समजले. पारसेवार कारमधून उतरतच तिथे अगोदरच संधी पाहत उभ्या असलेल्या चोरट्याने कारमधून पैश्यांची बॅग काढली. त्याचा साथीदार दुचाकी घेऊन तयारच होता. काही कळण्यापूर्वी बॅग घेऊन दोघे पसार झाले. पारसेवार यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला पण चोरटे धूम स्टाईल पसार झाले. या घटनेने व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. चोरट्यांचा शोध लावणे पोलीसांसमोर आव्हान आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 09, 2025 03:47:14
Akola, Maharashtra:अकोला शहरातील वाशीम बायपास परिसरात सोमवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. नाशिकहून अकोल्याकडे येणारी एसटी महामंडळाची बस सिग्नलवर थांबलेली असताना एका अज्ञात युवकाने अचानक बसच्या काचेला दगड मारत काच फोडली. दगडफेक झाल्यानंतर आरोपी युवकाने चालकासोबत वाद घातला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वाहक मध्यस्थी करण्यासाठी पुढे आला मात्र त्याच क्षणी आरोपीने वाहकाजवळील रोख रक्कम हिसकावून घेत पलायन केले. या प्रकरणी एसटी वाहकाच्या तक्रारीवरून जुनी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला आहे. घटनेमुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 09, 2025 03:45:15
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Dec 09, 2025 03:34:49
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीवर राऊत गटाने घवघवीत यश मिळवल्यानंतर आता सभापती पदाकडे सर्वांचे लक्ष. बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सोपल गटाची धोबीपछाड झाली. नगरपालिका निवडणुकांचा निकाल पुढे ढकल्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीत काय होणार याची उत्सुकता बार्शी तालुक्यासह जिल्ह्याला लागली होती. १८ जागांपैकी १८ जागांवर विजय मिळवत बाजार समितीवर आपले वर्चस्व राखल्याने वैरागमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला. १८ जागांपैकी व्यापारी मतदारसंघातील २ जागा अगोदरच बिनविरोध झाल्याने उर्वरित १६ जागांसाठी काल चुरशीने मतदान झाले होते. आमदार दिलीप सोपल पुरस्कृत बार्शी बाजार समिती परिवर्तन आघाडी माजी आमदार राजेंद्र राऊत पुरस्कृत बळीराजा विकास आघाडी या दोन पॅनलमध्ये ही लढाई होती. बाजार समिती सभापतीपदवी वैराग की बार्शी असे कोणाची वर्णी लागणार? Barshiला सभापती पद दिले तर वैरागला उपसभापती पद मिळणार का? याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
88
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 09, 2025 03:33:58
Dhule, Maharashtra:धुळे जिल्ह्यात तापमानाचा पारा 5.3° C पर्यंत खाली आला आहे. जिल्ह्यात यंदाच्या हंगामातील हे सर्वाधिक कमी तापमान नोंदवले गेलेले आहे. प्रचंड कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कडाक्याच्या थंडीतही शाळकरी मुलांची शाळेची वेळ बदलली न गेल्यामुळे शिक्षण विभागाबद्दल पालकांनी रोष व्यक्त केलेला आहे. बोचरी थंडी पडत असताना शिक्षण विभागाने शाळांची वेळ बदलावी अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे. या बोचऱ्या थंडीमुळे रस्त्यांवर शाळकरी मुलांव्यतिरिक्त रस्त्यानावर सामान्यांनाचा वावर दिसून येत नाहीये. येणारे काही दिवस थंडी अशीच वाढत राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. काळजी घेण्याचा अहवाल करण्यात आले आहे.
89
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 09, 2025 03:32:36
Akola, Maharashtra:अकोल्यातील आरोग्य विभागातील 2024 च्या सरळसेवा भरती घोटाळ्याला आता नवीन वळण मिळत असून याप्रकरणी आणखी गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे राज्य प्रवक्ता फैजान मिर्झा यांनी केले आहेत. जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी यांना कोणताही अधिकार नसताना एनएचएमच्या पाच अधिकाऱ्यांच्या बेकायदेशीर बदली केल्याचा गंभीर आरोप मिर्झा यांनी केला आहे. शासनाने बदलीवर बंदी लागू असताना देखील आरोग्य अधिकारी बळीराम गाढवे यांनी या बदल्या केल्याचा आरोप त्यांनी केला. संबंधित अधिकाऱ्यांवर तक्रारी असल्याचे कारण पुढे करत खोटा अहवाल तयार करण्यात आला आणि त्याअधारे बदल्या करण्यात आल्या, असा दावा मिरझा यांनी केला आहे. सादर केलेल्या अहवालात एकाच व्यक्तीने जवळपास 20 जणांच्या वतीने स्वाक्षऱ्या केल्याचा धक्कादायक आरोपही त्यांनी केला आहे. या सर्व स्वाक्षऱ्यांची फॉरेन्सिक चाचणी करून त्या संबंधित व्यक्तींनीच केल्या आहेत का, याची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. नागपूर येथे अधिवेशन सुरू असताना या गंभीर प्रकरणाकडे तातडीने लक्ष देऊन कारवाई करण्याची विनंतीही मिर्झा यांनी मुख्यमंत्री यांना केली आहे.
45
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Dec 09, 2025 03:16:23
Ratnagiri, Maharashtra:शिवसेना नेते रामदास कदम यांना मातृशोक खेड तालुक्यातील जामगे गावात शिवसेना नेते रामदास कदम यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या मातोश्रींचे नाव लिलाबाई गंगाधर कदम असे होते. त्या गृहराज्यमंत्री योगेश कदम व पर्यावरण महामंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या आजी होत. तसेच हॅथवे Internet चे सदानंद कदम आणि जिल्हा परिषद रत्नागिरी बांधकाम सभापती अरुण उर्फ चंद्रकांत कदम यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात मोठा परिवार असून, स्थानिकांसह अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी, अशी प्रार्थना व्यक्त केली आहे.
100
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 09, 2025 03:16:12
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेने रस्ते दुरुस्ती आणि नूतनीकरण करताना त्याचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचला सादर करावा असा आदेश न्यायमूर्तीनी दिला आहे. इतकच नाही तर जनहित याचिका दाखल केलेल्या याचिकाकर्त्याना देखील त्याची माहिती द्यावी असं देखील कोर्टाने म्हटले आहे. कोल्हापुरातील रस्त्यांसंदर्भात कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये उदय नारकर यांच्यासह इतरांनी जनहित याचिका दाखल केली आहे, या संदर्भात डिव्हिजन बेंच समोर झालेल्या सुनावणी मध्ये कोर्टाने अनेक मुद्द्यांवर बोट ठेवत कोल्हापुर महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेला आदेश दिला आहे.
132
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Dec 09, 2025 03:02:13
87
comment0
Report
YKYOGESH KHARE
Dec 09, 2025 02:49:52
Nashik, Maharashtra:जिल्हा परिषदेमधील ६१४ दिव्यांग अधिकारी-कर्मचाऱ्यांची दिव्यांगता पुन्हा एकदा तपासली जाणार. तपासणी मुंबईतील केईएम रुग्णालयात करण्यात येणार. शासनाच्या सवलती घेताना सादर केलेल्या प्रमाणपत्रांच्या वैधतेबाबत तक्रारी वाढल्याने निर्णय. दिव्यांग कल्याण विभागाच्या आदेशानुसार सर्व प्रमाणपत्रांची जिल्हास्तरावरून पुन्हा चौकशी. जि.प. सीईओ ओमकार पवार यांचा निर्णय—गैरवापर रोखण्यासाठी कडक तपासणी आवश्यक. यूडीआयडी कार्ड वेळेत न सादर केल्याने ३ कर्मचाऱ्यांचे नुकतेच निलंबन. सर्व विभाग प्रमुखांना—७ दिवसांत युडीआयडी कार्डांची पडताळणी करून अहवाल द्यावा, असे स्पष्ट निर्देश. सवलती व हक्कांचा गैरवापर केल्यास कठोरात कठोर कारवाई होणार.
152
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 09, 2025 02:46:02
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेची अर्ज प्रक्रिया सध्या सुरू आहे. दिलेल्या मुदतीत म्हणजेच २ जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांनी अर्ज भरावेत, अन्यथा अतिविलंब केल्यास प्रतिदिन ५० रुपये, विशेष विलंबास १०० रुपये आणि अतिविशेष विलंब केल्यास २०० रुपये प्रतिदिनाप्रमाणे अखेरच्या क्षणी म्हणजे १८ जानेवारीपर्यंत अर्ज केल्यास चक्क ४००० रुपये पर्यंत शुल्क भरावे लागेल. त्यामुळे मुदतीत अर्ज जमा करण्याचे आवाहन बोर्डाने केले आहे. माध्यामिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेस जानेवारीत सुरुवात होणार आहे, तर लेखी परीक्षा फेब्रुवारीत होणार आहे.
114
comment0
Report
Advertisement
Back to top