Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळच्या आर्णीत भाजपाची पहिली यादी, आमदाराचा नामांचा गहजब!

Oct 22, 2024 13:19:11
Yavatmal, Maharashtra

यवतमाळच्या आर्णी विधानसभा मतदारसंघासाठी भाजपाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत विद्यमान आमदाराचे नाव नाही. यामुळे महायुतीतील शिवसेनेने या मतदारसंघावर दावा केला आहे. तिन्ही तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन उपजिल्हाप्रमुख विष्णू उकंडे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. पालकमंत्री संजय राठोड यांचेही या जागेसाठी आग्रह आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, जागा सुटली नाही तरी शिवसेना उमेदवार निवडणूक लढवेल.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Dec 25, 2025 02:46:43
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर शहरात थंडीचा कडाका आता अधिक तीव्र होणार असून हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी निरभ्र आकाशाचा अंदाज वर्तवला आहे. विशेषतः २६ आणि २७ डिसेंबर रोजी किमान तापमानाचा पारा ११ अंश सेल्सियसपर्यंत खाली घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे ख्रिसमस आणि सरत्या वर्षाला निरोप देताना शहरवासीयांना हुडहुडी भरवणारा गारठा अनुभवावा लागेल. बुधवारी  शहराचे कमाल तापमान २८.० अंश सेल्सियस नोंदवले गेले, जे सरासरीपेक्षा १ अंशाने कमी होते. तर किमान तापमान १२.४ अंश इतके राहिले. हवेतील आर्द्रता सायंकाळी ४० टक्क्यांपर्यंत खाली आल्याने कोरडा गारठा वाढला आहे. येत्या काही दिवसांत पावसाचे किंवा ढगाळ हवामानाचे कोणतेही संकट नसून हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे.
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Dec 25, 2025 02:46:27
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 25, 2025 02:46:08
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 25, 2025 02:31:30
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुकांची मोठी झुंबड उडाली आहे. छत्रपती संभाजी नगरात अर्ज विक्रीच्या पहिल्या दोन दिवसांत तब्बल ३,१७० उमेदवारी अर्जाची विक्री झाली आहे. मात्र, तिकीट वाटपाचा पेच अद्याप सुटलेला नसल्याने, हजारो अर्ज विकले गेले असले तरी प्रत्यक्ष मैदानात उतरण्याचे धाडस केवळ दोनच उमेदवारांनी दाखवले आहे. ३० डिसेंबर शेवटची तारीख असून दुपारी २ वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. मंगळवारी पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. बुधवारी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने आणि काँग्रेसच्या उमेदवाराने अर्ज दाखल केला. सध्या भाजप, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, वंचित, एमआयएम आणि इतर पक्षांचे इच्छुक प्रतीक्षेत आहेत, आज उद्या जागा वाटप होईल अशी सर्वानाच शक्यता वाटतेय...
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Dec 25, 2025 02:17:27
Jalna, Maharashtra:जालना : युतीसाठी भाजपचे गोरंटयाल 40,शिवसेनेचे खोतकर 35 तर राष्ट्रवादीचे चव्हाण 5 जागांवर आडून जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ६५ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तरी प्रमुख राजकीय पक्षांमधील युतीचा तिढा अधिकच गुंतागुंतीचा होत चालला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा थेट परिणाम इच्छुक उमेदवारांवर आणि कार्यकर्त्यांच्या मनोबलावर होत आहे. दरम्यान, भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमधील युतीबाबत बैठका सुरू आहेत. भाजपचे कैलास गोरंट्याल 40, शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर 35, तर राष्ट्रवादीचे अरविंद चव्हाण हेसुद्धा 5 जागांवर आडून आहेत. दुसरीकडे 20 दिवसांवर मतदान प्रक्रिया येऊन ठेपली आहे. युतीबाबत घोषणा नसल्याने मतदार संभ्रमात पडलेले दिसतायत. भाजपचे लोकप्रतिनिधी युतीचा निर्णय शिवसेनेने घ्यावा, अशी भूमिका घेत आहेत. शिवसेनेचे पदाधिकारी भाजपवर निर्णयाची जबाबदारी ढकलताना दिसत आहेत.दरम्यान युती न झाल्यास स्वबळावर निवडणुक लढवण्याची तयारी या पक्षांनी केल्याची माहिती समोर आली आहे.
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Dec 24, 2025 13:40:55
Nanded, Maharashtra:राज्यभर गाजलेल्या सक्षम ताटे खून प्रकरणात आज उसकी प्रेमिका आंचल मामीलवार और मयत सक्षम के माता ने जिल्हाधिकारी कार्यालय के सामने अंग पर पेट्रोल डालकर आत्मदहन का प्रयास किया. वहाँ उपस्थित पुलिस कर्मियों ने उन्हें रोक लिया. इस दौरान आंचल मामीलवार और सक्षम ताटे के परिवार के साथ पुलिस की धक्का‑मुक्की हुई. आंतरजातीय प्रेम प्रसंग से 27 नवंबर को नांदेड़ शहर के जुनागंज भाग में सक्षम ताटे युवक की हत्या की गई थी. आचल मामीलवार के पिता और भाई ने साथियों के साथ सक्षम की हत्या की थी. इस मामले के सभी आरोपी पहले ही गिरफ्तार हैं. लेकिन घटना के दिन इतवारा थाने के पुलिस कर्मी मोहिदासरवाड और धीरज कोमूलवाड ने आचल के अल्पवयीन भाई को सक्षम की हत्या के लिये प्रवृत्त किया ऐसा आरोप है. इन दोनों के विरुद्ध कारवाई की मांग को लेकर आंचल मामीलवार और सक्षम ताटे के परिवार ने वरिष्ठ अधिकारियों को ज्ञापन देकर मांग की थी. आत्मज्ञान का इशारा भी दिया गया था. लेकिन कार्रवाई नहीं हुई, इसलिए आज आंचल मामीलवार और सक्षम ताटे की माँ ने जिल्हाधिकारी कार्यालय के सामने आत्मदहन का प्रयास किया. अगर आज भी कारवाई नहीं हुई तो हम अपना जीवन समाप्त करेंगे, ऐसा इशारा दोनों ने दिया.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 24, 2025 13:39:04
Kolhapur, Maharashtra:नागपूर–रत्नागिरी महामार्गासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील अंकली ते चोकाक दरम्यान भूसंपादनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या महामार्गासाठी भूसंपादन होणाऱ्या जमिनीसाठी शासनाने चौपट मोबदला देण्याचा निर्णय घेतला असून, त्याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला है. या आधी दुप्पट दराने मोबदला दिला असता एकूण खर्च सुमारे 94 कोटी रुपये झाला असता. मात्र चौपट दराने मोबदला देण्याचा निर्णय घेतल्याने हा खर्च 171 कोटी रुपये इतका होणार आहे. त्यामुळे 937 शेतकऱ्यांना एकूण 76 कोटी रुपयांचा अतिरिक्त फायदा या निर्णयामुळे होणार आहे. अनेक वर्षांपासून योग्य मोबदल्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी महामार्गाचे काम थांबवले होते. त्यामुळे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांची भूमिका मांडल्यानंतर तात्काळ सकारात्मक निर्णय घेण्यात आला आणि जीआर निघाला.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Dec 24, 2025 13:38:44
Navi Mumbai, Maharashtra:अत्याधुनिक ग्रीनफिल্ড विमानतळ म्हणून नावजले गेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या धावपट्टीवर उद्या 25 डिसेंबर रोजी पहिलं प्रवासी विमान उतरणार आहे. सकाळी 8 वाजता इंडिगोचे 6 E 460 हे विमान बंगळूरू येथून दाखल होणार आहे. यानंतर सकाळी 8.40 वाजता इंडिगोचेच 6 E 882 हे विमान हैदराबादकडे रवाना होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करणारं हे पहिलं विमान असणार आहे. यासोबतच मालवाहतूक सेवा (कार्गो) ही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी आज सिडको भवन इथं आयोजित पत्रकार परिषदेत दिली. पहिल्या दिवशी 30 विमानं ची आवाक जावक होणार आहे। दिवसभरात 4 हजार प्रवासी वाहतूक राहणार आहे. तर 15 जानेवारी पर्यंत हा आकडा वाढत दररोज 48 विमान उड्डाण करणार आहेत. या विमानतळावरून दरवर्षी अंदाजे 9 कोटी प्रवासी प्रवास करतील. सध्या केवळ देशांतर्गत असलेली ही विमानसेवा मार्च महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय विमानसेवेपर्यंत विस्तारली जाणार आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात या विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानं उड्डाण करणार आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झाल्यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील हवाई वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे. हे विमानतळ कार्यान्वित झाल्याने नागरिकांनाही देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासासाठी मोठा लाभ मिळणार आहे. या प्रकल्पामुळे रोजगारनिर्मिती, पर्यटनवृद्धी आणि औद्योगिक व व्यापारी गुंतवणुकीला देखील चालना मिळणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी ही या प्रकल्पाचं वैशिष्ट्य आह. महामार्ग, द्रुतगती मार्ग, उपनगरीय रेल्वे, मेट्रो मार्गिका यामुळे विमानतळाकडे विविध दिशांनी सहज व सुरळीत पोहोचणे शक्य होणार आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल)सारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांमुळे विमानतळ सर्व मार्गांनी जोडले जाणार आहे. हा मार्ग चिरले इथं पोहोचून विमानतळाकडे जाण्यासाठी मार्ग तयार करण्यात आला आहे. गुगल मॅपमध्येही याबाबत माहिती देण्यात आली असल्याचंही सिंघल यांनी सांगितलं.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 24, 2025 13:18:10
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Dec 24, 2025 12:53:17
Parbhani, Maharashtra:अँकर परभणी वसमत महामार्गावरील पूर्णा नदीवर पात्रावर असलेल्या राहाटीच्या पुलावरून एका मातेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडलीय. आत्महत्येचा प्रयत्न ही महिला आपल्या सोबत एक तीन वर्षाची मुलगी आणि एक वर्षाचा मुलगा घेऊन परभणी वसमत महामार्गावरील राहाटीच्या पुलावर मुलांसह आत्महत्या करण्याच्या उद्यष्याने पोहोचली, पण लहान मूल बघून तिला त्यांना पाण्यात टाकू वाटलं नसल्याने सदर महिलेने पुलावरून भरलेल्या पाण्याच्या पात्रात उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केल्याचं प्रत्यक्षदर्शी कडून सांगितलं जातं आहे, पण यावेळी वसमत तालुक्यातील बळेगाव येथून मिस्त्री काम आटोपून परभणीकडे घरी जात असलेल्या तीन तरुणांनी हा प्रकार बघताच पाण्यात उतरून या महिलेचे प्राण वाचविलेत, त्यामुळे त्यांच्या सर्वत्र कौतुक होत आहे. सदर महिला ही परभणीच्या धसाडी या गावातील असल्याचे समजते, पाण्यातून बाहेर काढल्या नंतर नागरिकांनी शेकोटी करून त्यांना गरम ऊब देण्याचा प्रयत्न केलाय, सदर महिला कोणाला बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याने त्यांचं नाव मात्र अद्याप समजू शकले नाहीये, त्यामुळे सदर महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केलाय हे मात्र समजू शकले नाहीये, मोहम्मद असिफ, शेख अस्लम आणि शेख फरीद असे महिलेचे प्राण वाचविणार्या तरुणांचे नाव आहेत.
0
comment0
Report
christmas
Advertisement
Back to top