Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445304

यवतमाळच्या शेतकऱ्यांचा जोरदार आवाज: सोयाबीन आणि कापसाच्या भावाची मागणी!

Oct 15, 2024 17:14:15
Wani, Maharashtra

यवतमाळच्या वणी येथे कांग्रेसचे संजय खाडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव देण्याची मागणी केली कारण सध्या सोयाबीन कवडीमोल भावात विकली जात आहे. त्यांना सोयाबीनसाठी नऊ हजार आणि कापसासाठी दहा हजार रुपये मिळावेत, तसेच वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे मोबदले ताबडतोब देण्यात यावे, वीज पुरवठा अखंडीत करावा, कर्जमाफी व पिक विमा लाभ द्यावा अशी मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
Dec 28, 2025 10:35:06
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज स्किप्ट ::- लातूर महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी नाही झाल्यास स्वबळावर लढण्याची आमची तयारी .... शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री विनायकराव पाटील यांची माहिती... AC::- लातूर महापालिका निवडणुकीला महाविकास आघाडीच्या माध्यमातून सामोरे जाण्याची आमची भूमिका आहे... मात्र, जर महाविकास आघाडी नाही झाली तर, स्वबळावर या निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी असल्याची माहिती शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी लातुरात दिली... दरम्यान, महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी आघाडी करण्याबाबत आमचे प्रयत्न सुरू असून, याशिवाय मनसे आणि वंचित बहुजन आघाडीशीही युतीबाबत चर्चा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली...
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 28, 2025 10:17:00
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - महायुती बाबत अस्पष्टता,राष्ट्रवादी अजित पवार आणि शिवसेना शिंदे गट आघाडीकरून लढण्याच्या हालचाली. अँकर - सांगली महापालिका निवडणुकीमध्ये महायुती होणार की नाही,याबाबत अद्यापही स्पष्टता नाही.अंतर्गत गटबाजीमुळे उमेदवारांच्या यादीवरून भाजपात संघर्ष सुरू आहे.त्यामुळे भाजपाने महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे पक्षाबरोबर युतीच्या बाबतीत सकारात्मक भूमिका घेतली नाही,मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाने पक्षातल्या इन्कमिंगमुळे स्वबळाचा नारा दिलाय,तर शिवसेना शिंदे पक्षाची काय करायचे,अशी स्थिती झाली आहे.त्यामुळे शिवसेना शिंदे गटाने माहितीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाबरोबर आघाडी करण्याच्या हालचाली सुरू केल्याात.शिवसेना शिंदे पक्षाच्या नेत्यांकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांची भेटी घेण्यात आल्या असून आघाडी बाबत प्राथमिक बैठक देखील पार पडली आहे.त्यामुळे महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाची आघाडी होण्याची शक्यता नाकारता
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 28, 2025 10:15:54
Gadchiroli, Maharashtra:टायटल: बदलत्या गडचिरोलीचे बदलते स्वरूप, नक्षल दहशत संपुष्टात येताना गडचिरोली महोत्सवाचा जल्लोष, चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर जिल्हाधिकारी अविष्यांत पांडा यांचे श्रवणीय गझल गायन अँकर: गडचिरोलीत सध्या जिल्हा महोत्सव सुरू आहे. याच महोत्सवात चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे खुमासदार गझल सादर करून जिल्हाधिकारी अविष्यांत पांडा यांनी उपस्थितांची मने जिंकली. महोत्सवात अनेक मराठी सेलेब्रिटीनी आपापली कला सादर केली. मात्र आयएएस अधिकाऱ्यांत लपलेला एक गायक मात्र सर्वांना भारावून गेला. नक्षल दहशत संपुष्टात येताना गडचिरोली महोत्सवाचा जल्लोष सुखावणारा होता मात्र त्याहून अधिक म्हणजे बदलत्या गडचिरोलीचे मोहक स्वरूप दर्शविणारा होता. -----अविष्यांत पांडा यांनी गायलेली गझल--- आशीष अम्बाडे झी मीडिया गडचिरोली
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 28, 2025 10:04:26
Dhule, Maharashtra:धुले महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. शहरातील शाहू नाट्य मंदिरात सुमारे 1710 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण संपन्न झाले. ईव्हीएम मशीन हाताळताना मॉक ड्रिल कसे करावे, मतदान यंत्र कसे हाताळावे याचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणासाठी सुमारे 1710 कर्मचारी 507 मतदान केंद्राध्यक्ष 507 शिपाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाचशे सात मतदान केंद्राध्यक्ष यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील १९ प्रभागातील 74 जागांसाठी 107 मतदान केंद्र असणार आहेत. तब्बल 7 वर्षानंतर पालिका निवडणूक पार पडत आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 28, 2025 09:46:53
Akola, Maharashtra:अकोला महापालिका निवडणुकीसाठी जागा वाटपाच्या मुद्द्यावर महायुतीत अजूनही रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र आहे. काल तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक पार पडली असली तरी जागा वाटपाचा तिढा सुटू शकलेला नाही. आज भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्या पदाधिकाऱ्यांची भाजप कार्यालयात बैठक झाली. मात्र अद्याप दोन जागांवरून मतभेद कायम असल्याने महायुतीतील तणाव पूर्णपणे दूर झालेला नाही. या संदर्भात शिवसेना (एकनाथ शिंदे) गटाचे नेते गोपीकिशन बाजोरिया यांनी माहिती देताना सांगितले की, दुपारी 4 वाजेपर्यंत या तिढ्यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. दरम्यान, महायुतीतील चर्चा सकारात्मक सुरू असून अंतिम निर्णय लवकरच जाहीर होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. जागा वाटपाचा प्रश्न सुटतो का, याकडे आता अकोल्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 28, 2025 09:33:59
Kalyan, Maharashtra:भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या निवासास्थानी कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक.. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये युती चा फॉर्मुला ठरला असला तरी भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नाराजगी पाहायला मिळत आहे भाजपाला 54 जागा दिले आहेत तर शिवसेनेला 67 जागा यांनी देण्यात आल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नाराजगी आहे काल रात्री आमदार सुभा गायकवाड यांच्या कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी करत घोषणा बाजी केली कल्याण पश्चिम मध्ये देखील घोषणाबाजी करण्यात आली अखेर सर्व कार्यकर्ते पदाधिकारीयांनी प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी बैठक सुरु आहे या बैठकीत भाजप प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना युतीत काम करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत या बैठकीचा आढावा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या डोंबिवलीतील निवासस्थान बाहेरून घेतला आहे आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 28, 2025 09:01:53
Chandrapur, Maharashtra:टायटल: काँग्रेसला मित्र पक्ष नकोत, शिवसेना उबाठा चा चंद्रपुरात वंचित शी घरोबा, 66 पैकी समसमान जागा लढविणार, काँग्रेसने कुठलीही चर्चा न केल्याचा शिवसेना उबाठाचा आरोप तर वंचित ला काँग्रेसने सन्मानजनक जागा न दिल्याने नवी आघाडी केल्याचा वंचित नेत्यांचा दावा अँकर: चंद्रपूर महानगरपालिका निवडणुक शिवसेना उबाठा आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्र लढविण्याची घोषणा केली. चंद्रपुरात आयोजित पत्रपरिषदेत एकमेकांना स्वताच्या पक्षाचे दुपट्टे घालून एकत्र आल्याची घोषणा दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी केली. दोन्ही पक्ष महानगरपालिकेत समसमान म्हणजे 33-33 उमेदवार उभे करणार आहेत. काँग्रेस कडून सन्मानजनक वाटा न दिल्याने आम्ही युती करत असल्याचं म्हणत दोन्ही पक्षांनी काँग्रेसवर टीका केली आहे. मात्र दोन्ही पक्ष भाजप विरोध या मुद्यावर एकत्र आले असल्याचा खुलासा करण्यात आलाय.
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Dec 28, 2025 08:54:08
Ratnagiri, Maharashtra:गुहागर तालुक्यातील झोंबडी गावच्या माळरानाला भीषण आग गुहागर guhu g? (Note: Original content preserved as provided) "गुहागर तालुक्यातील झोंबडी गावच्या माळरानात आज भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. दुपारच्या सत्रात ही आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. वडव्यामधील मोठ्या प्रमाणावर गवत जळून खाक झाले असून आगीचा वेग वाढल्याने झाडे जळून नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले आहे. आग विझवण्यासाठी ग्रामस्थांनी तत्काळ शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र कडक उन्हामुळे आणि वाऱ्याच्या झोतामुळे आग आटोक्यात आणण्यात अडचणी येत आहेत. आगीमुळे परिसरातील माळरान पूर्णपणे काळवंडले असून पुढील नुकसान टाळण्यासाठी नागरिकांकडून प्रयत्न सुरू आहेत.
0
comment0
Report
Advertisement
Back to top