Back
बार्शीटाकळी दगड पारवा डैम में डूबे युवक का शव 10 मिनट में निकाला
JJJAYESH JAGAD
Feb 18, 2026 05:34:37
Akola, Maharashtra
अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील दगड पारवा धरणात बुडालेल्या युवकाचा मृतदेह संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाने अवघ्या दहा मिनिटांत शोधून बाहेर काढला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बार्शीटाकळी तालुक्यातील दगड पारवा धरणाच्या भिंतीवर काही नागरिकांना मोबाईल आणि चप्पल आढळून आल्या. संशय आल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार बार्शीटाकळी पोलिसांनी मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचलित संत गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना संपर्क साधून घटनास्थळी पाचारण केले. बचाव पथक घटनास्थळी पोहोचताच धरण परिसरात तपासणी सुरू करण्यात आली. गेटच्या मध्यभागी सुमारे २० ते २५ फूट खोल पाणी असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तत्काळ सर्च ऑपरेशन हाती घेण्यात आले. अवघ्या दहा मिनिटांच्या अथक प्रयत्नांनंतर धरणातील मृतदेह शोधून बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. मृत युवकाचे नाव सुरेश घुगे (वय २९) असे असून तो स्थानिक रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. ही घटना आत्महत्या आहे की घातपात, याचा तपास बार्शीटाकळी पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VNVishal Nagesh More
FollowFeb 18, 2026 07:18:170
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 18, 2026 07:17:490
Report
JMJAVED MULANI
FollowFeb 18, 2026 07:17:190
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 18, 2026 07:03:060
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 18, 2026 06:49:220
Report
JMJAVED MULANI
FollowFeb 18, 2026 06:48:390
Report
PNPratap Naik1
FollowFeb 18, 2026 06:48:140
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 18, 2026 05:37:530
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 18, 2026 05:37:310
Report
AKAMAR KANE
FollowFeb 18, 2026 05:35:260
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 18, 2026 05:35:080
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 18, 2026 05:33:350
Report
WJWalmik Joshi
FollowFeb 18, 2026 05:31:270
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 18, 2026 05:31:140
Report