Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाल के तासलोट जंगल में प्रेमी ने महिला की हत्या, 13 दिन राज खुला

SRSHRIKANT RAUT
Mar 29, 2026 02:31:47
Yavatmal, Maharashtra
यवतमाळ च्या जोडमोहा शिवारातील तासलोट जंगलात अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या 'त्या' तरुणीची ओळख पटली असून, तेरा दिवसांनी खुनाचे रहस्य उलगडले आहे. पतीपासून विभक्त राहणाऱ्या या महिलेचा तिच्या प्रियकराने संशयातून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपी प्रियकर व खुनासाठी साथ देणाऱ्या एका विधी संघर्ष बालकाला पोलिसांनी अटक केली आहे. मृतदेहाचा ओळखपटवणे कठीण होते. ४० हजार मोबाइल क्रमांकांची पडताळणी केली गेली. जिल्ह्यातील बेपत्ता महिलांचा शोध घेतला गेला. घटनास्थळाच्या परिसराची तपासणी करण्यात आली. १९६ सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले. एकाच फुटेजमध्ये स्त्री व पुरुष जंगलाकडे जाताना दिसले, परंतु काही वेळाने परतताना फक्त पुरुषच दुचाकीवर दिसला. या धाग्यावरून तपास पुढे नेण्यात आला. लग्नाचा तगादा व संशय यांतून हा हत्याकांड घडला. आरोपीने शांत डोक्याने खुनाचा कट केला, परंतु पोलिसांनी चौफेर तपास केल्याने आरोपी पकडला गेला.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ADANIRUDHA DAWALE
Mar 29, 2026 04:17:35
Amravati, Maharashtra:शेतकऱ्यांच्या घराला लागली अचानक आग; घरातील 30 क्विंटल कापूस जळून खाक, शेतकरीचे लाखोच नुकसान. अमरावती जिल्ह्यातील शेंदूरजना घाट येथील शेतकऱ्यांच्या घराला काल रात्री अचानक लागली आग लागल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या आगीत शेतकऱ्याच्या घरात असलेला 30 क्विंटल कापूस जळून खाक झाला आहे. त्यामुळे शेतकरी सुभाष सोलव यांचे लाखोचे नुकसान झाले आहे. आग विझवण्यासाठी गावातील नागरिकांनी आटोकाट प्रयत्न केल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले मात्र घरी कोणीही नसल्याने आग कशी लागली असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान कारण अस्पष्ट असून घरात असलेले गॅस सिलेंडर बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळल्याचे पाहायला मिळाले आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 29, 2026 04:01:10
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:कोट्यवधी च्या जमिनीच्या हिबनामा प्रकरणात प्रसिद्धी च्या झोतात आलेल्या खासदार संदीपण भुमरे यांचा चालक जावेद शेख वर अखेर गुन्हा दाखल झालाय... दाऊद पुरा भागातील 9 एक्कर जमिनीच्या हिबानामा प्रकरणात हा गुन्हा दाखल झालाय... जमिनीचे मूळ मालक मीर मेहमूद अली आणि जावेद रसूल शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय, आर्थिक फसवणूक, विश्वासघात , धमकी देणं या कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झालाय... या बाबत मुजाहिद्द इकबाल खानांनी तक्रार केली होती, मूळ मालक मीर मेहमूद अली यांनी मुजाहिद इकबाल खान यांना यातील काही जमिनीचा हिबानामा करून दिला होता. असं असताना पुन्हा जावेद रसूल शेख यांना दुसरा हिवानामा करून आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार करण्यात आली, त्यानंतर छत्रपती संभाजी नगर आर्थिक गुन्हे शाखेने हा गुन्हा दाखल केलाय...
817
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 29, 2026 04:00:52
909
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 29, 2026 03:49:34
933
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 29, 2026 03:49:01
Khed, Maharashtra:पुणे जिले के खेड तालुका में जमिनी के विवाद के कारण टीका लेने आए महिलाओं के समूह और स्थानीय युवाओं के बीच फ्री-स्टाइल मारपीट की घटना सामने आई है। खेड तालुक्यातील वाफगाव में जमिनीका ताबा लेने के लिए बाहर से महिलाओं की बड़ी टोली लाई गई थी, लेकिन स्थानीय लोगों के विरोध पर विवाद ने जोर पकड़ा और कुछ ही क्षणों में मारपीट में तब्दील हो गया। महिलाओं सहित युवाओं के बीच जोरदार धक्का मुक्की, मारामारी और गंदगी/गोंधळ से परिसर में तनावपूर्ण स्थिति बन गई। कुल घटना के वीडियो सामने आए हैं, जिसमें खुलकर चल रही मारपीट स्पष्ट दिखाई दे रही है। स्थानीय लोगों ने आरोप लगाया है कि पुलिस मौके पर पहुंचकर स्थिति नियंत्रित करने के लिए कड़ी कार्रवाई तुरंत नहीं कर पाई। जमिनी के ताबे के लिए ऐसी परिस्थितियों में महिलाओं का उपयोग करके हास्यास्पद तरह से तनाव बढ़ रहा है, जिससे कानून-व्यवस्था का प्रश्न गंभीर बन गया है और सामान्य नागरिकों में डर का माहौल फैल गया है।
1069
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 29, 2026 03:48:10
1044
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 29, 2026 03:47:53
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरच्या एन-६ सिडको परिसरातील साईनगर येथे शनिवारी रात्री उशिरा गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. ३१ वर्षीय समीर नाईक या तरुणाच्या राहत्या घरातच ही घटना घडली असून, त्याच्या कानाजवळून डोक्याच्या आरपार गोळी गेल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. प्राथमिक तपासानुसार, समीरने स्वतःवरच गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त केला जातो. घटनेनंतर त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. समीर हा आपल्या आई आणि लहान भावासोबत साईनगरमध्ये भाड्याच्या घरात राहत होता. त्याची आई बजरंग चौकात बांगड्यांचे दुकान चालवते, तर समीर पौरोहित्याचे काम करून कुटुंबाला हातभार लावत होता. घटनेच्या दिवशी सायंकाळी आई दुकानात गेल्यानंतर समीर घरी एकटाच होता. काही वेळाने लहान भाऊ घरी परतला असता, समीर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याच्या शेजारी पिस्तूलही आढळून आले. हा प्रकार पाहून परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच सिडको पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
1055
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 29, 2026 03:35:24
1077
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 29, 2026 03:34:32
1094
comment0
Report
SMSATISH MOHITE
Mar 29, 2026 03:34:16
Nanded, Maharashtra:नांदेड शहरात खाजगी शिकवणीसाठी आलेल्या जवळपास दिडशे मुलींना लव्ह जिहाद मध्ये अडकवून अपहरण करून त्यांचे धर्मांतरण करण्यात आल्याचा स्फ़ोटक दावा शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनी केलाय. धर्मांतरण कायद्याबाबत बोलताना अधिवेशनात आमदार हेमंत पाटील यांनी हे वक्तव्य केले होते. झी 24 तासशी बोलताना आमदार हेमंत पाटील यांनी पुन्हा हा दावा केला. नांदेड शहरात खाजगी शिकवणीसाठी राज्यभरातून विद्यार्थी येतात. मुस्लिम समाजाचे काही टोळके या अल्पवयीन मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात ओढतात. मागच्या दोन वर्षात जवळपास दिडशे मुलींचे अपहरण करून आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात त्यांचे अपहरण करण्यात आल्याचा दावा पाटील यांनी केला. काही मौलवी यासाठी मदत करत असल्याचे पाटील म्हणाले. उद्योगपती असलेल्या आपल्या मित्राच्या अवघ्या 14 वर्षांच्या मुलीला पश्चिम बंगाल मध्ये युवकाने पळवून नेले होते. त्या मुलीला सोडवताना पोलीस स्टेशनमध्ये जमावाने हल्ला केल्याचा किस्सा पाटील यांनी सांगितला. लोकसंख्या वाढीसाठी मुस्लिम समाजाला कारणीभूत ठरवत एक कुटुंब एक मुल अनिवार्य करणे गरजेचे असल्याचे पाटील म्हणाले. मुस्लिम समाजातील कुटुंबात आठ आठ मुले असतात, ते कुटुंब नियोजन ऑपरेशन करत नाहीत. यातून राजकीय सत्ता हातात घेण्याचा डाव असल्याचे पाटील म्हणाले. भारतात बहुतांश मुस्लिम हे धर्मांतरण झालेले मुस्लिम असल्याचा दावा पाटील यांनी केला. दिवंगत माजी मुख्यमंत्री ए आर अंतूले हे पूर्वी कदम असल्याचा दावाही हेमंत पाटील यांनी केला. हे सर्व दावे हेमंत पाटील यांनी अधिवेशनातही केले.
966
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 29, 2026 03:18:54
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर मध्ये जुना बाजार परिसरात राजकीय वर्चस्ववादातून माजी नगरसेवकावर लोखंडी रॉड आणि लाकडी दांड्याने हल्ला झाला होता, त्याप्रकरणी एमआयएमचे नगरसेवक मेहराज खान यांच्यासह त्यांच्या भाऊ आणि इतर एकूण ११ जणांविरुद्ध शहर चौक पोलिस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ला झालेले रफत यार खान हे यापूर्वी एमआयएमकडून नगरसेवक होते. मात्र, पक्षाने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. त्यात पराभव झाल्यानंतर त्यांनी मालेगाव येथील इस्लाम पार्टीमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत कलीम कुरेशी यांनीही याच पक्षात प्रवेश केल्याने शहरातील एमआयएम विरुद्ध इस्लाम पार्टी असा हा राजकीय संघर्ष होत आहे. त्यातून मारहाणीचा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगीतले आहे.
966
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 29, 2026 03:17:06
1066
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 29, 2026 03:02:39
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुरातील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेल्या रंकाळा तलाव परिसरातील खेळण्याचे साहित्य लहान मुलांसाठी अक्षरशः धोकादायक ठरत असल्याचे समोर आले होते. खेळण्यांच्या साधनांकडे झालेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अनेक मुलांना दुखापत झाल्याच्या घटना घडल्या. हा गंभीर मुद्दा झी २४ तासने आपल्या बातमीतून ठळकपणे मांडल्यानंतर कोल्हापूर महानगरपालिका आणि संबंधित ठेकेदार यांना अखेर जाग आली. त्यानंतर ठेकेदारामार्फत जावळाचा गणेश मंदिर परिसरातील रंकाळा तलावाजवळील तुटलेले आणि धोकादायक खेळण्याचे साहित्य तातडीने बदलण्यात आले. घसरगुंडीखाली आवश्यक असलेली वाळू टाकण्यात आली तसेच अनेक ठिकाणी गायब झालेले झोपाळे पुन्हा बसवण्यात आले. रंकाळा तलाव परिसराला दररोज हजारो पर्यटक भेट देतात. त्यामुळे अशा ठिकाणी मुलांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष देणे अत्यावश्यक आहे. मात्र, महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे हा प्रश्न निर्माण झाला होता. झी २४ तासने यावर आवाज उठवल्यानंतर प्रशासनाने कारवाई केली, ही बाब सकारात्मक असली तरी भविष्यात अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी नियमित देखभाल गरजेची आहे.
1037
comment0
Report
Advertisement
Back to top