Back
छत्रपती संभाजीनगर के सिडको में घर पर गोलीबारी, 31 वर्षीय समीर घायल
VKVISHAL KAROLE
Mar 29, 2026 03:47:53
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजीनगरच्या एन-६ सिडको परिसरातील साईनगर येथे शनिवारी रात्री उशिरा गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. ३१ वर्षीय समीर नाईक या तरुणाच्या राहत्या घरातच ही घटना घडली असून, त्याच्या कानाजवळून डोक्याच्या आरपार गोळी गेल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. प्राथमिक तपासानुसार, समीरने स्वतःवरच गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त केला जातो. घटनेनंतर त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. समीर हा आपल्या आई आणि लहान भावासोबत साईनगरमध्ये भाड्याच्या घरात राहत होता. त्याची आई बजरंग चौकात बांगड्यांचे दुकान चालवते, तर समीर पौरोहित्याचे काम करून कुटुंबाला हातभार लावत होता. घटनेच्या दिवशी सायंकाळी आई दुकानात गेल्यानंतर समीर घरी एकटाच होता. काही वेळाने लहान भाऊ घरी परतला असता, समीर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याच्या शेजारी पिस्तूलही आढळून आले. हा प्रकार पाहून परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच सिडको पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
TTTUSHAR TAPASE
FollowMar 29, 2026 05:17:52877
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 29, 2026 05:00:571065
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 29, 2026 04:32:12946
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 29, 2026 04:17:351042
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 29, 2026 04:01:101049
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 29, 2026 04:00:521087
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 29, 2026 03:49:341009
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 29, 2026 03:49:011079
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 29, 2026 03:48:101064
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 29, 2026 03:35:241077
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 29, 2026 03:34:321094
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 29, 2026 03:34:161050
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 29, 2026 03:18:541007
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 29, 2026 03:17:061066
Report