Back
नांदेड में लव जिहाद के आरोप: 14 वर्षीया छात्राओं के अपहरण-धर्मांतरण का दावा
SMSATISH MOHITE
Mar 29, 2026 03:34:16
Nanded, Maharashtra
नांदेड शहरात खाजगी शिकवणीसाठी आलेल्या जवळपास दिडशे मुलींना लव्ह जिहाद मध्ये अडकवून अपहरण करून त्यांचे धर्मांतरण करण्यात आल्याचा स्फ़ोटक दावा शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनी केलाय. धर्मांतरण कायद्याबाबत बोलताना अधिवेशनात आमदार हेमंत पाटील यांनी हे वक्तव्य केले होते. झी 24 तासशी बोलताना आमदार हेमंत पाटील यांनी पुन्हा हा दावा केला. नांदेड शहरात खाजगी शिकवणीसाठी राज्यभरातून विद्यार्थी येतात. मुस्लिम समाजाचे काही टोळके या अल्पवयीन मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात ओढतात. मागच्या दोन वर्षात जवळपास दिडशे मुलींचे अपहरण करून आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात त्यांचे अपहरण करण्यात आल्याचा दावा पाटील यांनी केला. काही मौलवी यासाठी मदत करत असल्याचे पाटील म्हणाले. उद्योगपती असलेल्या आपल्या मित्राच्या अवघ्या 14 वर्षांच्या मुलीला पश्चिम बंगाल मध्ये युवकाने पळवून नेले होते. त्या मुलीला सोडवताना पोलीस स्टेशनमध्ये जमावाने हल्ला केल्याचा किस्सा पाटील यांनी सांगितला. लोकसंख्या वाढीसाठी मुस्लिम समाजाला कारणीभूत ठरवत एक कुटुंब एक मुल अनिवार्य करणे गरजेचे असल्याचे पाटील म्हणाले. मुस्लिम समाजातील कुटुंबात आठ आठ मुले असतात, ते कुटुंब नियोजन ऑपरेशन करत नाहीत. यातून राजकीय सत्ता हातात घेण्याचा डाव असल्याचे पाटील म्हणाले. भारतात बहुतांश मुस्लिम हे धर्मांतरण झालेले मुस्लिम असल्याचा दावा पाटील यांनी केला. दिवंगत माजी मुख्यमंत्री ए आर अंतूले हे पूर्वी कदम असल्याचा दावाही हेमंत पाटील यांनी केला. हे सर्व दावे हेमंत पाटील यांनी अधिवेशनातही केले.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowMar 29, 2026 05:00:570
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 29, 2026 04:32:12914
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 29, 2026 04:17:351041
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 29, 2026 04:01:101011
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 29, 2026 04:00:521045
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 29, 2026 03:49:341009
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 29, 2026 03:49:011079
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 29, 2026 03:48:101064
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 29, 2026 03:47:531063
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 29, 2026 03:35:241077
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 29, 2026 03:34:321094
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 29, 2026 03:18:541007
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 29, 2026 03:17:061066
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 29, 2026 03:03:011080
Report