यवतमाळ विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी उमेदवारी आपल्यालाच मिळणार असून तुतारी चिन्हावरच आपण लढु असा दावा केला आहे. महाविकास आघाडीत तिकीट वाटपाआधीच त्यांनी जाहीरनामा प्रकाशित करून प्रचार देखील सुरू केला आहे. भाजप आमदार मदन येरावार यांनी मतदारसंघ बकाल करून ठेवला, रस्त्यांची दैना झाली, प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार केला त्यामुळे गुन्हेगारीचा बिमोड करून भयमुक्त वातावरण देऊ असे वचन आपण जनतेला देत असल्याचे संदीप बाजोरिया यांनी सांगितले.
माझी उमेदवारी मदन येरावारांना पाडण्यासाठीच, माजी आमदार संदीप बाजोरीयांचा दावा.
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
यवतमाळ विधानसभेमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार संदीप बाजोरीया यांचे मन वळविण्यात पक्ष नेतृत्वाला यश आले आहे. बाजोरिया यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला, तत्पूर्वी त्यांचे गुरुबंधू अ.भा. चतु:संप्रदाय चे अध्यक्ष महामंडलेश्वर डॉ. संगीतकृष्ण सावरिया बाबा यांनी देखील बाजोरीया यांची समजूत काढली व उमेदवारी अर्ज परत घेण्यास सांगितले. पक्षाने आपल्याला एबी फॉर्म दिला होता, परंतु मविआत मिठाचा खडा पडू नये म्हणून मी माघार घेत आहे.
यवतमाळच्या पुसद येथे माणुसकीची भिंतच्यावतीने बेघर, निराधार, दिव्यांग, असहाय वृद्ध व अनाथांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. वृद्धाश्रम व रुग्णालय परिसरात हा सोहळा संपन्न झाला. माणुसकीची भिंत परिसरात स्वच्छता करून गोरगरीब निराधार वृद्धांची व पुरुषांची दाढी-कटिंग करण्यात आली. त्यानंतर महिलांनी काढलेल्या रांगोळ्यांनी अंगण सजले. पाट मांडण्यात आले. त्यानंतर माणुसकीची भिंतच्या महिला सदस्यांनी टोपी, टॉवेल, नारळ पेढा देऊन वंचितांना ओवाळले. त्यांच्या कुटुंबातील महिलांना साड्या देण्यात आल्या.
यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेने पवन जयस्वाल यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी संजय राठोड यांनी केलेल्या गद्दारीचा बदला घेऊ असा निर्धार व्यक्त केला आहे. संजय राठोडांना उद्भवजीनी उमेदवारी दिली, पद दिले त्यापासून त्यांनी मोठी माया जमविली. त्यातून त्यांचे चारित्र्य खराब झाल्याने मतदारसंघाची बदनामी झाली, या मायेतूनच आर्थिक आमिषे दाखवून राठोडांनी जनतेला मूर्ख बनविले आणि मतदारसंघ भकास केला. अशी घणाघाती टीकाही पवन जयस्वाल यांनी केली.
यवतमाळच्या आर्णी विधानसभा मतदारसंघासाठी भाजपाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत विद्यमान आमदाराचे नाव नाही. यामुळे महायुतीतील शिवसेनेने या मतदारसंघावर दावा केला आहे. तिन्ही तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन उपजिल्हाप्रमुख विष्णू उकंडे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. पालकमंत्री संजय राठोड यांचेही या जागेसाठी आग्रह आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, जागा सुटली नाही तरी शिवसेना उमेदवार निवडणूक लढवेल.
यवतमाळच्या झरीजामनी तालुक्यातील रुईकोट येथे श्री संत सद्गुरू जगन्नाथ महाराज देवस्थानाची जमीन परस्पर विक्री करून कोळसा खान सुरू केल्याचा आरोप भक्तांनी केला आहे. धर्मदाय आयुक्तांची परवानगी न घेता ही जमीन BS ईस्पात कंपनीला देण्यात आली, ज्यामध्ये सचिव संजय देरकर यांची भूमिका संशयास्पद असल्याचे म्हटले आहे. जमीन विक्रीपूर्वीच कोळसा उत्खनन सुरू झाल्याने मनी लॉंड्रींग प्रतिबंध अधिनियमांतर्गत कारवाई सुरू आहे. भक्तांनी झेंडा रोवून भजन, पूजा करून आंदोलन केले आणि कारवाईसह मंदिर बांधण्याची मागणी केली.
यवतमाळच्या वणी येथे कांग्रेसचे संजय खाडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव देण्याची मागणी केली कारण सध्या सोयाबीन कवडीमोल भावात विकली जात आहे. त्यांना सोयाबीनसाठी नऊ हजार आणि कापसासाठी दहा हजार रुपये मिळावेत, तसेच वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे मोबदले ताबडतोब देण्यात यावे, वीज पुरवठा अखंडीत करावा, कर्जमाफी व पिक विमा लाभ द्यावा अशी मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले.
यवतमाळच्या बसस्थानकाचे उद्घाटन 5 वर्षानंतर होत आहे. 11 महिन्यात पूर्ण होणार्या या कामात कंत्राटदाराच्या संथगतीने व न्यायालयीन अडथळ्यांमुळे विलंब झाला. लोकप्रतिनिधींनीही यावर योग्य पाठपुरावा केला नाही. त्यामुळे प्रवाश्यांना तात्पुरत्या बसस्थानकातून बस सुटत असल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. निवडणुकीच्या तोंडावर, मुख्यमंत्र्यांकडून आभासी पद्धतीने उद्घाटन होणार आहे. प्रवाश्यांना नवीन बसस्थानकातून सर्व सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे.