प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तीपिठ महामार्गाच्या भुसंपादन प्रकीयेस एकीकडे विरोध होत असला तरी यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी या शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे भाजपा आमदार अशोक उईके यांनी देखील हा महामार्ग होईलच यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याची भूमिका घेतली आहे. मात्र या महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांची पूर्ण सहमती आहे. या महामार्गामुळे शेतकरी आत्महत्या ग्रस्त यवतमाळ जिल्हातील सर्व शेतक-यांना आणि युवकांना भविष्यात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.
शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा, भाजप आमदार समर्थन
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
यवतमाळ शहरातील रस्त्यांवर खड्डयांचे साम्राज्य वाढल्यामुळे आणि नवरात्री उत्सवात खड्डे न बुजविल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाने आंदोलन केले. माजी आमदार संदीप बाजोरिया यांच्या नेतृत्वात हे लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. खड्डेमय रस्त्यातून दुर्गादेवीचे आगमन झाल्याने खड्ड्यांना श्रद्धांजली देत भजन म्हणत पालिका प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आला. अमृत योजना आणि भूमिगत गटार योजनेमुळे रस्त्यांची स्थिती गंभीर झाली आहे. बाजोरिया यांनी आ. मदन येरावार यांना ह्या दुर्दशेसाठी जबाबदार धरले आहे.
आर्णी दिग्रस मार्गावर रात्री दोन वाजताच्या सुमारास मंत्री संजय राठोड यांच्या वाहनाने मालवाहू ऍपे ला धडक दिली, ज्यामुळे ऍपे पलटी होऊन चालक जखमी झाला. राठोड यांनी स्पष्ट केले की, अपघातात ते आपल्या गाडीत नव्हते, तर ताफ्यातील दुसऱ्या वाहनात होते. वाहतूक नियमांचे उल्लंघन झाले आहे का याबाबत पोलीस चौकशी करतील. त्यांनी सांगितले की, रस्त्यावर खड्डे व अपूर्ण कामामुळे वाहनधारकांना त्रास होत आहे, आणि अपघातग्रस्त वाहनाची दुरुस्ती पोलिसांना सूचित न करता करण्यात आल्याबाबत त्यांना माहिती नाही.
यवतमाळ विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी उमेदवारी आपल्यालाच मिळणार असून तुतारी चिन्हावरच आपण लढु असा दावा केला आहे. महाविकास आघाडीत तिकीट वाटपाआधीच त्यांनी जाहीरनामा प्रकाशित करून प्रचार देखील सुरू केला आहे. भाजप आमदार मदन येरावार यांनी मतदारसंघ बकाल करून ठेवला, रस्त्यांची दैना झाली, प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार केला त्यामुळे गुन्हेगारीचा बिमोड करून भयमुक्त वातावरण देऊ असे वचन आपण जनतेला देत असल्याचे संदीप बाजोरिया यांनी सांगितले.
यवतमाळमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांच्या संचमान्यतेसाठी तसेच कंत्राटी शिक्षक भरतीच्या शासन निर्णयाला रद्द करण्याच्या मागणीसह शिक्षक संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश महामोर्चा केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळा आणि शिक्षणाबद्दल शासनाकडून सतत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला. शिक्षण हक्क कायदा २००९ च्या तरतुदींचा उल्लंघन करणारा हा निर्णय असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांचे अस्तित्व धोक्यात येणार आहे, असे शिक्षकांनी म्हटले आहे.
पुणे महापालिकेतून फुरसुंगी उरळी नगरपरिषद निर्माण झाल्यानंतर नागरिकांनी आंदोलन पुकारले आहे. त्यांनी बॅनरबाजी करून महापालिकेत समाविष्ट 33 गावांचे विक्रीच्या विरोधात आवाज उठवला आहे. नागरिकांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. महापालिकेच्या जास्त करामुळे गाव विकण्याची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
यवतमाळ शहरालगत बोधगव्हाण, गोधणी व जांब शिवारात पट्टेदार वाघाचा वावर दिसून आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या वाघाने एका गाईवर हल्ला केला असून वाघाचे पगमार्क आढळून आले आहेत. गोधणी आणि जांब रोडवर वाघाने नाल्यातील पाण्यात विश्रांती घेतल्याचे नागरिकांनी चित्रित केले. वनविभागाची यंत्रणा सतर्क झाली असून परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. रेस्क्यू टीम वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
यवतमाळ जिल्ह्यात खुनाच्या घटना थांबत नसून आता आर्णी शहरात क्षुल्लक कारणावरून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. मयत तरुण संभाजीनगर येथील गणेश मंडळात आयोजित महाप्रसादाला गेला होता, जेवण सुरू असताना एका तरुणाने वाद घातला, परिणामी त्याच्या डोक्यात जीवघेणा हल्ला झाला. जिथे तो गंभीर जखमी झाला. जखमी तरुणाला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ग्रामीण रुग्णालयात नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी २ आरोपींना अटक केली आहे.
यवतमाळच्या बाबाजी दाते महिला बॅंकेत २४२ कोटींच्या अपहार प्रकरणात महिनाभराने अटकसत्र सुरू झाले आहे. पोलिसांनी शिवसेना नेते रमेश अगरवाल, व्यावसायिक प्रकाश पिसाळ आणि ठेकेदार प्रशांत पामपट्टीवार यांना अटक केली आहे. याआधी बँकेच्या CEO सुजाता महाजन, तिचा पती विलास महाजन, ॲड. वसंत मोहरेकर आणि नवलकिशोर मालाणी यांना अटक झाली होती. आता अटक केलेल्या आरोपींची संख्या सात झाली आहे. २०६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत, ज्यामुळे संचालक व लेखा परीक्षक चिंतेत आहेत.