Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळच्या बोधगव्हाण आणि गोधणीमध्ये पट्टेदार वाघाचा वावर, नागरिकांमध्ये भीती

Sept 24, 2024 04:45:23
Yavatmal, Maharashtra

यवतमाळ शहरालगत बोधगव्हाण, गोधणी व जांब शिवारात पट्टेदार वाघाचा वावर दिसून आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या वाघाने एका गाईवर हल्ला केला असून वाघाचे पगमार्क आढळून आले आहेत. गोधणी आणि जांब रोडवर वाघाने नाल्यातील पाण्यात विश्रांती घेतल्याचे नागरिकांनी चित्रित केले. वनविभागाची यंत्रणा सतर्क झाली असून परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. रेस्क्यू टीम वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SRSHRIKANT RAUT
Dec 13, 2025 09:47:51
Yavatmal, Maharashtra:झी 24 तास ने उघडकीस आणलेल्या ऑपरेशन सैतान चे वृत्त अतिशय गंभीर आहे, आदिवासी मुलींचीच नव्हे तर आर्थिक दृष्ट्या दुर्बल समाजातील मुलींची विक्री करणारे दलाल मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे पोलिसांनी असे रॅकेट ठेचून काढायला पाहिजे, अनेक शहरांमधून महिन्याला मोठ्य प्रमाणात मुली बेपत्ता होत आहेत अशी प्रतिक्रिया सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी झी 24 तास शी बोलताना व्यक्त केली आहे. आदिवासी विकास विभाग व सामाजिक न्याय विभागाचा निधी त्या दृष्टीने खर्च होत असून दुर्बल कुटुंबांना सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असेही शिरसाठ यांनी सांगितले.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 13, 2025 09:38:49
Kalyan, Maharashtra:डोंबिवलीत पुन्हा प्रदूषणचा मुद्दा आला पुढे.. पुन्हा एकदा रस्ता झाला गुलाबी... एमआयडीसी फेज 2 मधील प्रकार... एमआयडीसी अधिकारी आणि एमपीसीबी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष... Anc रासायनिक कंपन्यांच्या प्रदुषणामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या डोंबिवलीत चक्क गुलाबी रस्ता पाहायला मिळाला. डोंबिवली एमआयडीसीत अनेक रासायनिक कंपन्या असून यामुळे डोंबिवलीकरांना नेहमीच प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो. यापूर्वी काही वर्षांपूर्वी डोंबिवलीत हिरवा पाऊस, ऑरेंज ऑईल मिश्रित पाऊस पडला होता.तर आता केमिकलमुळे एमआयडीसी मधील रस्ता गुलाबी रंगाचा झाला आहे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोठ्या प्रमाणात गटारात केमिकल असल्याचे ही दिसून आले आहे.या केमिकल मुळे उग्र वास सुटला आहें, असे स्थानिकांनी सांगितले. 2020 साली हाचं गुलाबी रस्ता विषय लावून धरला होता, त्यामुळे तात्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेतली होती. आता 5 वर्षानी पुन्हा हा विषय पुढे आला असून अधिकारी वर्ग लक्ष देणार कां असा सवाल उपस्थित होतं आहे याचा आढावा घेतला आहे आतिश भोईर यांनी.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Dec 13, 2025 09:37:33
Pune, Maharashtra:अहिल्यानगर शहरात असलेली पुरातन माळीवाडा वेळेस पाडण्यासाठी महापालिकेने जाहीर प्रकटनाद्वारे नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागवल्या आहेत मात्र पालिकेच्या निर्णयाविरोधात माळीवाडा येथील नागरिक एकवटले आहेत. माळीवाडा वेस ही अत्यंत पुरातन असून यावेसीचा एक दगडही हलवू देणार नसल्याची भूमिका नागरिकांनी घेतली आहे. शहरातील नागरिक वेशीसमोर एकत्र येत महापालिकेविरुद्ध हरकती घेण्यासाठी अभियान राबवलं जात आहे जास्तीत जास्त संख्येने नागरिकांकडून हरकती नोंदवून त्या महानगरपालिका आयुक्तांकडे सादर करून सोमवारी महापालिकेत आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. यामुळे नगर शहरातील ऐतिहासिक माळीवाडा वेस रक्षणासाठी नागरिक एकवटत असल्याचे पहायला मिळत आहे.
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Dec 13, 2025 09:36:41
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 13, 2025 09:04:00
Junnar, Pune, Maharashtra:पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्याच्या मातीतून पिकलेला आंबा आता राष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे. जुन्नरमधील प्रयोगशील शेतकरी भरत जाधव यांनी विकसित केलेल्या ‘जुन्नर गोल्ड’ आंबा वाणाला केंद्र शासनाकडून जीआय टॅग/शेतकरी वाण म्हणून अधिकृत मान्यता मिळाली आहे. जुन्नर तालुक्यातील डोंगरदऱ्यांमध्ये पिकलेला आंबा देशपातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. या आंब्याचे वैशिष्ट्य म्हणजे हापूसचा स्वाद, केशरचा रंग आणि राजापुरीचा आकार — तिन्ही गुणांचा अनोखा संगम. जवळपास ९०० ग्रँम ते १ किलो वजनाचे फळ, आकर्षक रंग आणि चव यामुळे बाजारात याला मोठी मागणी आहे. या यशामुळे भरत जाधव यांचे सर्वत्र कौतुक होत असून, जुन्नर तालुक्याच्या कृषी परंपरेला नवी ओळख मिळाली आहे. विशेष म्हणजे हा वाण विकसित करण्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. एका शेतकऱ्याच्या जिद्दीतून जन्माला आलेला ‘जुन्नर गोल्ड’ आता जुન્નरच्या नावाला सुवर्णमुद्रा ठरतोय.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 13, 2025 08:32:02
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:संभाजी नगरचा लखन सध्या राज्यात गाजतोय. या पठ्ठ्याने सांगलीच्या हिंद केसरी बैलगाडा शर्यतीत मालकाला फॉर्च्यूनर जिंकूवुन दिली. 5 वर्षाच्या या लखन ने गेल्या चार ते पाच वर्षात मालकाला दीड कोटींची कमाई सुद्धा करून दिलीय. दिवसाला 10 लिटर दूध पिणारा हा पैलवान स्पर्धेत उतरला की भल्या भल्याना घाम फोडतो. कोण आहे लखन आणि काय करतो पाहुयात. घोड्याला लाजवणारी गती, वाऱ्याला चिरण्याची हिम्मत, आणि हत्तीची ताकद घेऊन शर्यतीत उतरणारा हा छत्रपती संभाजी नगरचा लखन आहे. नोव्हेंबर महिन्यात सांगली मध्ये झालेली श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यतीत या पठ्ठ्याने बाजी मारली आणि मालकासाठी 35 लाखांची फॉरचुणर गाडी जिंकली. संभाजी नगर जिल्ह्यातील करोडी गावतील चव्हाण कुटुं biographiesचा हा लखन सर्वांचाच लाडका आहे. चव्हाण कुटुंबांनी लखनला दोन वर्षांचा असताना जालन्याच्या गावातून साडेबाराएक लाखात विकत घेतले आणि त्यानंतर सुरू झाला त्याचा बैलगाडा शर्यतीचा प्रवास. तासगाव इथं हिंद केसरी चंद्रहार पाटील यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेत देशभरातील 2400 बैल आले होते; त्यात लखन ने बाजी मारली. ही ही काही त्याची पहिली स्पर्धा नव्हती; त्याने या आधी 150 वर स्पर्धा जिंकल्या, एक फॉरचुणर आणि 16 दुचाकी जिंकल्या आहेत; त्यात तीन बुलेटसुद्धा आहेत. स्वतःची वाहतूक करण्यासाठीसुद्धा एक गाडी जिंकली आहे. लखन ने हिंद केसरी स्पर्धा तब्बल 4 वेळा जिंकली आहे. 2024 सातारा जिल्ह्यातील पेडगाव येथे पहिल्यांदा, 2024 मध्ये फलटण दुसऱ्यांदा, 2025 मध्ये सोलापूर जिल्ह्यातील माळशेर तिसऱ्यांदा, डिसेंबर 2025 महिन्यात पुणे हवेली तालुक्यातील वडकी येथे झालेल्या स्पर्धेत चौथ्याांदा हिंद केसरी जिंकून सर्वांची मने जिंकली. मालिक मनोहर चव्हाण, लखन चे मालक. लखनचा आहारही तितकाच तगडा आहे; सकाळ-Sanskrit संध्याकाळ त्याला पाच पाच लिटर दूध पाजले जाते, पंधरा प्रकाराचा सुका मेवा वापरून लाडू तयार करून गावरान तुपामध्ये भिजवून खाद्य दिले जाते. दर दोन दिवसाला पळण्याचा सराव देण्यात येतो, काही वेळा पाण्यात पोहण्याचा सराव देऊन शरीर तंदुरुस्त ठेवतात. लखन चा रुबाब इतका असतो की तो खाली बसताना देखील त्याला गादी लागते. लखन ची देखभाल करणाऱ्या साठी 24 तास एक माणूस त्याचा सेवेत असतो; प्रत्येकाचा एक शुभ अंक असतो, तसा लखनचा 1197 हा शुभ अंक आहे. ज्यावेळी या क्रमांकावर तो शर्यतीत उतरला तो अव्वल आला, तेव्हा हा क्रमांक त्याचा शुभ अंक म्हणून ओळखला. प्रत्येक स्पर्धेत हा नंबर घेऊन तो सहभागी झाला आणि जिंकू देखील लागला. लखन ला अनेकांनी दीड कोटी रुपयात मागितले आहे, मात्र चव्हाण कुटुंबाचा हा रांगडा मुलगा त्यांना प्रिय आहे. लखन आता इन्स्टाग्राम वर पण स्टार आहे; अल्पावधीत त्याचे 27 हजार फॉल्लोअर झाले आहेत.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Dec 13, 2025 08:16:12
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Dec 13, 2025 07:24:04
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Dec 13, 2025 07:04:26
Nanded, Maharashtra:नांदेडमध्ये एका पक्ष कार्यालयाच्या उदघाटन दिवशी टेंट टाकला होता; दीड महिन्यापासून रस्त्यावर तसाच राहिला आहे. महापालिका या अतिक्रमणावर कारवाई करण्यास धजावत नाही. भाजपच्या केंद्रीय कार्यालयाचे गेल्या 22 ऑक्टोबर रोजी माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते उदघाटन झाले होते. नांदेड शहरातील नाना नानी पार्कसमोरील मुख्य रस्त्यावर उदघाटन प्रसंगी रस्त्यावर टेंट टाकण्यात आला होता. जवळपास 60 फुटाच्या या रस्त्यावर हा टेंट काही भागात बसवण्यात आला आहे. उदघाटन कार्यक्रमानंतर हा टेंट काढला जाईल असं वाटत होते. मात्र दीड महिने उलटूनही हा टेंट रस्त्यात तसाच कायम आहे. महापालिका सध्या शहरात रस्त्यावर अतिक्रमणावर कारवाई करत आहे; पण या अतिक्रमणाकडे महापालिकेचे लक्ष गेले नाही. रस्त्यावर ठीकठिकाणी गाडे लावणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी या रस्त्यातील पक्ष कार्यालयाच्या टेंटवर कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे सेनेने केलीये.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Dec 13, 2025 07:03:44
Pune, Maharashtra:स्लग:- चार बिबटे जेरबंद फीड 2C Anc:- अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यात तीन दिवसात चार बिबटे जर बंद झाले आहेत तर एका बिबट्याने पिंजऱ्या जवळ येऊन पळ काढला आहे दोन दिवसांपूर्वी कीन्ही या गावांमध्ये एका दिवसात दोन बिबटे वन विभागाच्या पिंजऱ्यात अडकले 3क दिवसानंतर याच परिसरात तिसरा बिबट्या देखील जेरबंद झाला तर काही अंतरावर असलेल्या पिंपरी गवळी गावात चौथा बिबट्या वन विभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झालाय...आतापर्यंत पारनेर तालुक्यात चार बिबटे जेरबंद झालेत...तर याचं तालुक्यात एका बिबट्याने पिंजऱ्याला चकवा दिल्याचेही समोर आले आहे...पिंजऱ्याला चकवा देतानाचा व्हिडीओ वनविभागाच्या ट्रॅप कॅमेरा कैद झालाय...दोन डिसेंबरला पारनेर तालुक्यातील किन्ही गावातील वयोवृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाला होता...तर पारनेर तालुक्यातील बिबट्तांना जेरबंद करण्यासाठी गावकऱ्यांनी नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं होतं...दरम्यान चार बिबटे जेरबंद झाल्याने पारनेर तालुक्यातील नागरिकांमध्ये दहशतीचा वातावरण निर्माण झाले आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top