Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Wardha442001

वर्धा के श्री निवास कॉलनी में फर्जी आयकर अधिकारी की दबिश

MAMILIND ANDE
Mar 04, 2026 15:16:35
Wardha, Maharashtra
वर्ध्याच्या 'श्री निवास कॉलनीत' बनावट आयकर अधिकाऱ्यांची फिल्मी स्टाईल धाड - बनावट धाडी टाकणाऱ्या जवळ महागडे मोबाईल असल्याची पोलिसांची माहिती अँकर - वर्धा शहरातील रामनगर परिसरातील श्री निवास कॉलनी येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सुहास चिंतामण कोंगरे यांच्या घरी चारचाकी गाडीतून आलेल्या तिघांनी स्वतःला आयकर विभाग मुंबई येथील अधिकारी असल्याचे सांगत घराची झडती घेतल्याची घटना समोर आली आहे.सदर व्यक्तींनी कोंगरे यांना त्यांच्या नावाचा “सर्च वॉरंट” असल्याचे सांगितले. तसेच बनावट ओळखपत्र दाखवून घराची तपासणी केली व घरातला विडिओ काढला. कोंगरे यांनी विचारणा करताच संबंधितांनी दमदाटी करत घरात प्रवेश केला. त्यांच्यासोबत एक ड्रायव्हर आणि आणखी दोन जण होते.घरातील हॉलसह इतर भागांची सुमारे ३० मिनिटे तपासणी करण्यात आली. संपूर्ण कारवाई चित्रपटातील धाडीप्रमाणे करण्यात आल्याने कुटुंबीय घाबरून गेले. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून हे खरे आयकर अधिकारी होते की तोतये, याबाबत तपास सुरू आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Mar 16, 2026 03:20:08
Nagpur, Maharashtra:विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते - राहुरी आणि बारामती येथील पोटनिवडणुका बिनविरोध होऊ द्याव्यात का याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतरच यावर अंतिम निर्णय घेतला जाईल, सत्ताधारी किंवा इतर पक्षांकडून अद्याप या संदर्भात कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नसल्याचेही त्यांनी सांगितले. - मुख्यमंत्र्यांनी या निवडणुकांना बिनविरोध व्हाव्यात असे आवाहन केले होते. आम्ही निवडणूक लढण्यासाठी तयार आहोत. बिनविरोध झाल्यास ते योग्यच ठरेल, पण याबद्दल आधी चर्चा होणे गरजेचे आहे. यापूर्वी अनेक ठिकाणी आम्ही बिनविरोधचा विचार केला होता, मात्र सत्ताधाऱ्यांनी उमेदवार उभे केले होते, त्यामुळे त्यांची भूमिका तपासून पाहू, - ‘नमो शेतकरी स्वाभिमानी योजना’साठी राज्य सरकार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या कल्याणकारी योजनांचा निधी वापरणार केला. सरकारकडून समाजकल्याण आणि आदिवासी विभागासाठी मोठे बजेट दाखवले जाते, मात्र प्रत्यक्षात मागील वर्षी समाजकल्याण विभागाचा केवळ सुमारे ४५ टक्के निधी खर्च झाला, तर आदिवासी विभागात केवळ सुमारे ३८ टक्के निधी खर्च करण्यात आला. - सरकार बजेट फुगवून दाखवत असून नंतर तो निधी इतर योजनांकडे वळवला जातो, यामुळे ज्या घटकांसाठी निधी मंजूर केला जातो त्यांनाच त्याचा लाभ मिळत नाही - धर्मांतरासंदर्भातील कायद्याबाबतचा विषय सभागृहात चर्चेला आल्यावर आम्ही आमची भूमिका मांडू, दोन समाजांमध्ये तणाव निर्माण करून मतांची राजकारण करण्यासाठी असे कायदे आणले जात आहे. यासाठी काही विषारी मंत्री पोसले जात आहे. ( नितेश राणे यांच्यावर टीका ) त्यांनी घेतली झाली शपथ याचा अर्थ तरी त्यांना कळतो का?
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Mar 16, 2026 03:18:04
Nashik, Maharashtra:नाशिकमध्ये महावादनाचा जल्लोष २५ ढोल पथकांच्या दमदार सादरीकरणाने वातावरण दुमदुमले नाशिक महानगरपालिका व नववर्ष स्वागत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नववे गुरु तेगबहादुरसिंग जी यांच्या ३५० व्या स्मृती वर्ष निमित्त त्यांना हा कार्यक्रम समर्पित करण्यात आलेल्या भव्य महावादन कार्यक्रमाने शहरातील वातावरण ढोल-ताशांच्या गजराने दणाणून गेले. शहरातील विविध भागांतील २५ ढोल पथकांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत दमदार वादन सादर केले. पारंपरिक ढोल-ताशांच्या तालावर उपस्थित नागरिकांनीही उत्साहाने प्रतिसाद देत कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला.
74
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 16, 2026 03:17:01
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई मध्ये आज आणि उद्या बाल मराठी संमेलनाचे आयोजन केलेले आहे. हे संमेलन नवी मुंबईतील सिडको प्रदर्शन केंद्र (साने गुरुजी बालनगरी) येथे आयोजित करण्यात आले आहे. मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीची गोडी लहानपणापासून मुलांमध्ये निर्माण व्हावी, त्यांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळावे आणि मराठी भाषेचे संस्कार पुढील पिढीत रुजावेत, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या भव्य संमेलनासाठी ‘स्व. दि. बा. पाटील मुख्यमंच’ आणि ‘डॉ. जयंत नारळीकर उपमंच’ असे दोन स्वतंत्र मंच उभारण्यात आले असून, दोन्ही मंचांवर मुलांसाठी विविध सांस्कृतिक, साहित्यिक आणि प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
28
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 16, 2026 03:16:26
Yeola, Maharashtra:एकीकडे गोण्याअभावी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा शासकीय हमीभावाने मका खरेदी केली जात नसतांना दुसरीकडे नाशिकच्या चांदवड तालुक्यातील हिवरखेड येथील शासकीय हमीभाव केंद्रावर चक्क निफाड तालुक्यातील मक्का खरेदी केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे विक्रीसाठी आलेल्या मकाच्या ट्रॅक्टरमध्ये महाराष्ट्र शासनाच्या शासकीय गोण्यांही आढळून आल्याने शेतकरी आता मक्का बरोबरच शासकीय गाण्यांचे उत्पादन करायला लागला की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नाशिकच्या चांदवड तालुक्यातील हिवरखेडयेथील शासकीय हमीभाव मक्का खरेदी केंद्रावर निफाड तालुक्यातील टाकळी विंचूर येथील ट्रॅक्टरमधून आलेला मक्का खाली होत असल्याची माहिती काही शेतकऱ्यांनी दिली असता. प्रहार शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष गणेश निंबाळकर यांनी घटनास्थळी धाव घेतली व तहसीलदार व महसूल यंत्रणेला माहिती दिली. दरम्यान शासकीय यंत्रणेने हिवरखेडे येथील शासकीय खरेदी केंद्रावर छापा मारला असता याठिकाणी खरेदी केंद्रावरील अधिकारी तसेच खरेदीदार गैरहजर असल्याचे निदर्शनात आले विशेष म्हणजे मका विक्रीसाठी आलेल्या ट्रॅक्टरमध्ये मकाच्या खाली चक्क शासनाच्या हमी भाव खरेदीसाठी असलेल्या गोण्या आढळून आल्या. एकूण सहा ट्रॅक्टर मका विक्रीसाठी आले होते. मात्र शासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत विक्रीसाठी आलेल्या सहापैकी पाच ट्रॅक्टर मक्यासह ताब्यात घेतले असून ,शासकीय धान्य गोडाऊन जप्त केले आहे.याबाबत अधिक तपास केला जात आहे.विशेष म्हणजे ज्या ट्रॅक्टरमधून हा मका विक्रीसाठी आणला होता त्या ट्रॅक्टर चालकांना कुठलीही माहिती नसल्याचे ट्रॅक्टर चालकांनी सांगितले आहे.
103
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 16, 2026 03:15:48
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर मध्ये  १० दिवसांपासून उद्योगांचा गॅस पुरवठा बंद आहे. आखाती देशांतून पेट्रोलियम पदार्थाची होणारी आयात युद्धामुळे बंद आहे. परिणामी, औद्योगिक वसाहतींमधील ४०० हून अधिक उद्योग संकटात आहेत. त्या उद्योगांना गॅसपुरवठा करण्याचे धोरण अद्याप ठरलेले नाही. ५ मार्चपासून उद्योग व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद आहे. उद्योगांकडे जेवढा साठा आहे, त्यावर त्यांचे उत्पादन सध्या सुरू आहे. साठा संपल्यानंतर उद्योगांना बंद करण्याशिवाय पर्याय नसेल. ऑटोमोबाइल्स, ब्रीव्हरेज, बॉटलिंग, फार्मा या उद्योगांवर गॅस तुटवड्याचा मोठा फटका बसला आहे. शासनाने १३ मार्च रोजी पाठविलेल्या परिपत्रकानुसारच सध्या गॅसचा पुरवठा सुरू आहे असे प्रशासनाचे म्हणणे आहे...
41
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 16, 2026 03:01:57
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने अनुदानित, विनाअनुदानित आणि जिल्हा परिषद शाळांच्या वार्षिक परीक्षांचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार, नववीची परीक्षा २३ मार्चपासून तर इयत्ता पाचवी ते आठवीची परीक्षा २४ मार्चपासून सुरू होणार आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी  आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी या वेळापत्रकात कोणताही बदल केला जाणार नाही असे सांगितले आहे, तर  द्वितीय सत्राच्या परीक्षा ४ एप्रिलला संपत असताना पायाभूत चाचणी थेट २२ एप्रिलपर्यंत गेल्याने शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एप्रिल महिन्यात उन्हाची तीव्रता अधिक असते आणि त्यामुळं ग्रामीण भागात पाण्याची समस्या जाणवत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे त्यामुळं शिक्षक संघटनांचा विरोध आहे,  शिक्षण विभागाने या विरोधावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शाळांच्या शैक्षणिक वर्षासाठी ठरलेल्या तासिका पूर्ण होणे आवश्यक आहे. तसेच परीक्षेनंतर निकाल वेळेत लावण्याच्या सूचना एससीईआरटीने दिल्या आहेत. त्यामुळे वेळापत्रकात कोणताही बदल करणे शक्य नसल्याचे शिक्षण विभागाने ठामपणे सांगितले. गेल्या वर्षीही अशीच मागणी करण्यात आली होती, मात्र नियमांचे कारण पुढे करत ती फेटाळण्यात आली होती. त्यामुळं आता संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे...
94
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 16, 2026 02:49:59
197
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 16, 2026 02:49:41
174
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 16, 2026 02:45:16
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर ते मुंबई विमानाचे तिकीट प्रथमच पोहोचले तब्बल 43 हजारांवर, दर वाढूनही सर्व तिकिटे फुल्ल - सोलापूर ते मुंबई विमान सेवेला प्रवाशांचा अभूतपूर्व प्रतिसाद - सोलापूर ते मुंबईसाठी नेहमी तिकिटाचे दर 3500 रुपयांच्या आसपास असताना रविवारी हेच दर पोहोचले तब्बल 43 हजार रुपयांवर - वाढत्या मागणीमुळे विमान तिकिटाच्या दरांनी गाठला उच्चांक - शनिवार रविवारच्या सलग सुट्ट्या, देवदर्शन, लग्नाचे मुहूर्त अशा अनेक कारणांनी विमानसेवेला तुफान प्रतिसाद - तर दुसरीकडे सोलापूर गोवा विमान सेवेला देखील प्रवाशांचा चांगला प्रतिसाद - सोलापूर ते गोवा विमान प्रवासाचा दरात 8 पटींनी वाढ होऊन दर पोहचले 18 हजार रुपयांवर - सोलापुरच्या विमानसेवेला कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळेल अशी शंका विमान कंपन्यांमध्ये असताना प्रत्यक्षात मात्र अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद
74
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Mar 16, 2026 02:32:51
146
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Mar 16, 2026 02:30:30
Varasoli, Maharashtra:स्लग - आखाती युद्धाचा रायगडच्या कलिंगड उत्पादकांना फटका ........ निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी अडचणीत ........ स्थानिक बाजारात कलिंगडाला कवडीमोल भाव ....... लागवडीवरील खर्च निघणंही दुरापास्त ....... अँकर - रायगड जिल्ह्यातील चविष्ट आणि रसदार कलिंगडांना केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर परदेशातही मोठी मागणी असते. दरवर्षी गोरेगाव, माणगाव आणि कोलाड या भागातून मोठ्या प्रमाणावर कलिंगडांची निर्यात दुबई, Mस्कत, कुवेत आणि सौदी अरेबिया या आखाती देशांमध्ये केली जाते. मात्र यंदा आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे शेतमालाची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे तयार झालेली कलिंगडे परदेशात पाठवता आली नाहीत आणि त्याचा मोठा आर्थिक फटका येथील कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. शेतात तयार झालेली कलिंगडे सुकून आणि कुजून जात आहेत, तर काढलेली फळे स्थानिक बाजारात केवळ पाच ते सात रुपये किलो या दराने विकावी लागत आहेत. त्यामुळे लागवडीसाठी केलेला लाखो रुपये खर्च वाया गेला असून कामगारांच्या मजुरीचाही खर्च निघणे कठीण झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नेमकी परिस्थिती काय आहे हे जाणून घेतलय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी.
118
comment0
Report
Advertisement
Back to top