Back
NMIA पर तृतीय रनवे के लिए SIDCO ने व्यवहार्यता अध्ययन शुरू किया
SNSWATI NAIK
Dec 15, 2025 02:31:36
Navi Mumbai, Maharashtra
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (NMIA) तिसऱ्या समांतर धावपट्टीच्या विकासासाठी सविस्तर तांत्रिक-व्यावसायिक व्यवहार्यता अभ्यास करण्याकरिता सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सिडकोने सुरू केली आहे. या अभ्यासासाठी नामांकित व पात्र स्वतंत्र संस्था तसेच संयुक्त उपक्रम/संघटनांकडून निविदा मागविण्यासाठी प्रस्ताव मागणी (Request for Proposal – RFP) तयार करण्यात आली आहे. सध्या मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्राला (MMR) प्रमुखत्वे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) सेवा देत असून, त्याची प्रवासी हाताळणी क्षमता सुमारे ५० ते ५५ दशलक्ष प्रवासी प्रतिवर्ष (MPPA) इतकी मर्यादित आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर, मुंबई व नवी मुंबई येथील विमानतळांद्वारे सुमारे १५० MPPA क्षमतेची नियोजित बहुविमानतळ व्यवस्था कार्यान्वित होणार आहे. यात CSMIA ची क्षमता ५०–५५ MPPA तर NMIA ची क्षमता ९०–९५ MPPA इतकी असेल. NMIA चे आगामी विस्तार टप्पे आणि CSMIA येथील क्षमतेत वाढ यांद्वारे मध्यम कालावधीतील वाढती मागणी पूर्ण करण्यात येणार असली, तरी २०३७ नंतरच्या दीर्घकालीन हवाई वाहतूक मागणीसाठी NMIA वरील तिसऱ्या धावपट्टीसारख्या अतिरिक्त पायाभूत सुविधांचा विचार करण्यात येत आहे. सुमारे १,१६० हेक्टर क्षेत्रावर विकसित होत असलेला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरवर्षी ९० दशलक्ष प्रवासी आणि ३.२ दशलक्ष टन मालवाहतूक हाताळण्याच्या क्षमतेसह नियोजित आहे. या विमानतळावर एकाच वेळी स्वतंत्रपणे कार्य करू शकणाऱ्या दोन समांतर धावपट्ट्या तसेच परस्पर जोडलेल्या चार प्रवासी टर्मिनल्सची उभारणी करण्यात आली आहे. यात टर्मिनल-१ ची क्षमता २० MPPA, टर्मिनल-२ ची ३० MPPA, तर टर्मिनल-३ आणि टर्मिनल-४ प्रत्येकी २० MPPA इतकी आहे. त्यामुळे एकूण टर्मिनल क्षमता ९० MPPA इतकी आहे. हे विमानतळ पाच टप्प्यांत विकसित करण्यात येत असून, पहिला व दुसरा टप्पा (२० MPPA capacity) २५ डिसेंबरपासून देशांतर्गत उड्डाणांच्या प्रारंभासाठी सज्ज आहे. पुढील टप्प्यांमध्ये २०२९ पर्यंत क्षमता ५० MPPA, २०३२ पर्यंत ७० MPPA आणि २०३७ पर्यंत ९० MPPA इतकी वाढविण्यात येणार आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VNVishal Nagesh More
FollowDec 15, 2025 16:01:590
Report
ABATISH BHOIR
FollowDec 15, 2025 15:51:170
Report
ABATISH BHOIR
FollowDec 15, 2025 15:16:010
Report
LBLAILESH BARGAJE
FollowDec 15, 2025 14:08:010
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowDec 15, 2025 12:45:260
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 15, 2025 12:34:420
Report
LBLAILESH BARGAJE
FollowDec 15, 2025 11:52:170
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 15, 2025 11:18:200
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 15, 2025 11:00:320
Report
DPdnyaneshwar patange
FollowDec 15, 2025 10:21:530
Report
NMNITESH MAHAJAN
FollowDec 15, 2025 10:06:270
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 15, 2025 10:05:580
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 15, 2025 09:48:330
Report
UPUmesh Parab
FollowDec 15, 2025 08:50:130
Report
KJKunal Jamdade
FollowDec 15, 2025 08:49:460
Report