Back
जालना के किसान बायोमेट्रिक समस्या से सोयाबीन बिक्री में बाधा
NMNITESH MAHAJAN
Dec 15, 2025 10:06:27
Jalna, Maharashtra
जालना : नाफेडच्या हमी भाव केंद्रावर शेतकऱ्यांचे हेलपाटे, सोयाबीन विक्रीसाठी बायोमेट्रिक वर हाताचे ठसे मिळत नसल्यानं अडचण (पॅकेज)
अँकर : राज्य सरकारने कापूस आणि सोयाबीनची हमीभावाने खरेदी सुरु केलीय.मात्र अनेक वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या हाताचे ठसे आधारशी मॅच होत नसल्यानं या शेतकरीांची सोयाबीन विक्रीसाठीची नोंदणी अडचणीत आलीय.जालना जिल्ह्यात देखील अशा समस्यांना शेतकरी सामोरा जातोय बघूया हा स्पेशल रिपोर्ट
व्हिओ :१:69 वर्षाचे तुकाराम काकडे हे जालन्यातील भारज येथील नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर सोयाबीनच्या विक्रीसाठी नोंदणी करण्यासाठी आलेत.पण त्यांचं सोयाबीन त्यांच्या नावावर त्यांना विक्री करता येत नाही.कारण त्यांच्या हाताला वृद्धापकाळामुळे सुरकुत्या पडल्यायत. त्यामुळे त्यांच्या हाताचे ठसे बायोमेट्रिकवर आधारशी मॅच होत नाहीय.त्यामुळे काकडे हैराण झालेत.आता हमीभावाने सोयाबीन विकायची तर आहे पण नाफेडकडे नोंदणी करायची तरी कशी आणि सोयाबीन जास्त असेल तर सगळी सोयाबीन विकायचं कसं असा सवाल काकडे यांना पडलाय.
बाईट : तुकाराम काकडे,शेतकरी
व्हिओ :२:काकडे यांच्या सारखीच अवस्था जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांची झालीय.हातावर सुरकुत्या पडून हात शेतीकाम करून खराब झाल्यानं सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी करताना बायोमेट्रिक मशीनवर अडचणी येतायत.अशा परिस्थितीत हमीभाव केंद्रावर शेतकऱ्यांच्या घरातील ईतर सदस्यांच्या नावावर सोयाबीन विक्रीचा पर्याय नाफेड खरेदी केंद्र चालकांकडून दिला गेलाय.तसेच हाताचे तसे येत नसतील मोबाईल फेस आयडी केला जातो.मात्र वृद्धापकाळामुळे चेहऱ्यावर देखील सुरकुत्या आल्यानं त्यातही अडचण पाहायला मिळते.त्यामुळे अशा शेतकऱ्यांना आधार अपडेट सेंटरवर जाऊन हाताचे ठसे अपडेट करण्याचा पर्याय दिला जातोय.
बाईट : अमोल पडघन,नाफेड हमीभाव खरेदी केंद्र चालक,
व्हिओ :३:सध्या सोयाबीन हमीभाव केंद्रावर 5 हजार 328 रुपये दराने हमीभाव शेतकऱ्यांना दिला जातोय.राज्य सरकारने सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांना एकरी 6.48 क्विंटल तर हेक्टरी 16.50 क्विंटलची मर्यादा घालून दिलिय.त्यातच आता हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांना बायोमेट्रिकच्या अडचणी येत असल्यानं शेतकऱ्यांचे हे हेलपाटे थांबणार कधी असा सवाल उपस्थित होतोय.
नितेश महाजन,झी-२४ तास,जालना
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSACHIN KASABE
FollowJan 21, 2026 15:16:190
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowJan 21, 2026 14:47:170
Report
PNPratap Naik1
FollowJan 21, 2026 14:05:350
Report
JJJAYESH JAGAD
FollowJan 21, 2026 13:23:450
Report
DPdnyaneshwar patange
FollowJan 21, 2026 13:22:200
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowJan 21, 2026 13:21:160
Report
PNPratap Naik1
FollowJan 21, 2026 12:50:550
Report
ABATISH BHOIR
FollowJan 21, 2026 12:49:230
Report
DPdnyaneshwar patange
FollowJan 21, 2026 12:36:340
Report
SKSACHIN KASABE
FollowJan 21, 2026 12:00:580
Report
SMSarfaraj Musa
FollowJan 21, 2026 11:39:270
Report
SNSWATI NAIK
FollowJan 21, 2026 11:21:180
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 21, 2026 11:21:010
Report
JMJAVED MULANI
FollowJan 21, 2026 11:01:310
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJan 21, 2026 10:51:480
Report