Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

निळजे रेल्वे ओव्हरब्रिज पुनर्बांधणी: 5 महिन्यांचे यातायात निर्बंध, 31 मार्च 2026पर्यंत

ABATISH BHOIR
Nov 16, 2025 11:07:55
Kalyan, Maharashtra
निळजे रेल्वे ओव्हरब्रिज पुनर्बांधणीसाठी पाच महिन्यांचे वाहतूक निर्बंध. ठाणे वाहतूक विभागाची नवी अधिसूचना जाहीर Anc...निळजे रेल्वे ओव्हरब्रिजची उंची कमी असल्याने वरील डबल डेकर कंटेनर वाहतुकीस अडथळा येत होता. हा अडथळा दूर करण्यासाठी ब्रिजच्या पुनर्बांधणीची महत्त्वपूर्ण कामे टाटा कंपनीने आजपासून सुरू होत असून ती ३१ मार्च २०२६ पर्यंत चालणार आहेत. या कालावधीत परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेता ठाणे शहर वाहतूक उपविभागाने व्यापक वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी केली आहे. कल्याण ग्रामीण चे आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते नवीन ब्रिजच्या पुनर्बांधणीच्या कामाचे नारळ फोडून सुरवात केली आहे. पोलीस उप-आयुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट यांनी मोटार वाहन कायदा कलम 115 व 116 (1)(अ)(ब) अंतर्गत विविध रस्त्यांवर प्रवेशबंदी आणि पर्यायी मार्ग लागू करण्याचे आदेश दिले आहेत. 1. कल्याण → शिळफाटा निळजे कमानजवळून सर्व वाहनांना प्रवेशबंद. पर्यायी मार्ग : निळजे कमान → उजवीकडे लोढा पलावा वाहीनी → महालक्ष्मी हॉटेल → पुढे इच्छित स्थळी. 2. लोढा पलावा / कासाबेला / हेवन / एक्सपिरिया मॉल → कल्याण निळजे ब्रिज चढणीवरून कल्याणकडे जाणारा मार्ग बंद. पर्यायी मार्ग : कल्याण–शिळ रोड → शिळफाटा → देसाई खाडी ब्रिज → सरस्वती टेक्सटाईल → यू-टर्न → पलावा फ्लायओव्हर. 3. मुंब्रा / कल्याण फाटा → कल्याण (६ चाकी व जड वाहने) कल्याण फाटा येथे प्रवेशबंद. पर्यायी मार्ग : शिळफाटा → मुंब्रा बायपास → खारेगाव टोलनाका. 4. कल्याण → मुंब्रा / कल्याण फाटा (६ चाकी व जड वाहने) काटई (बदलापूर) चौक येथे प्रवेशबंद. पर्यायी मार्ग : काटई चौक → खोणी नाका → तळोजा MIDC. 5. तळोजा MIDC / नवी मुंबई → काटई चौक (६ चाकी व जड वाहने) खोणी नाका, निसर्ग हॉटेल येथे प्रवेशबंद. पर्यायी मार्ग : निसर्ग हॉटेल → उजवे वळण → बदलापूर पाईपलाइन → नेवाळी. 6. अंबरनाथ / बदलापूर → काटई चौक (६ चाकी व जड वाहने) खोणी नाका येथे प्रवेशबंद. पर्यायी मार्ग : खोणी नाका → डावे वळण → तळोजा MIDC. हलक्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग मुंबई/नवी मुंबई → कल्याण : दिवा–संदप रोड → मानपाडा → कल्याण–शिळ रोड ठाणे/मुंबई → कल्याण : मानकोली–मोटागाव–डोंबિવली मार्ग किंवा रांजनोली–कोनगाव–कल्याण मार्ग कल्याण/डोंबिवली/उल्हासनगर → मुंबई/नवी मुंबई : चक्कीनाका → श्री मळगाई पेड → नेवाळी → बदलापूर पाईपलाईन → तळोजा MIDC कल्यान/डोंबिवली → ठाणे/मुंबई : डोंबिवली → मोटागाव → मानकोली → दुर्गाडी → कोनगाव → नाशिक–मुंबई १६ नोव्हेंबर २०२५ ते ३१ मार्च २०२६ या निर्बंधांमधून पोलीस वाहने, रुग्णवाहिका, अग्निशामक दल आणि इतर अत्यावश्यक सेवा वाहनांना सूট असेल. निळजे ब्रिजवरील पुनर्बांधणीमुळे कल्याण–शिळ रोडवरील वाहतूक काही महिन्यांसाठी मोठ्या प्रमाणात विस्कळीत होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी प्रवासाची पूर्वतयारी करून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.
147
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRASHANT PARDESHI
Nov 16, 2025 12:51:10
Dhule, Maharashtra:Anchor - नंदुरबार जिल्ह्यात होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाने देखील एन्ट्री केली असून, ठाकरे गटाचे उमेदवार संगीता खंडू माळी उमेदवारी अर्ज दाखल केला, पक्षाचे पदाधिकारी, शिवसैनिक व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. संगीता खंडू माळी यांनी आज नामांकन सादर केले. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे जिल्हाप्रमुख पंडित माळी, पदाधिकारी, संपर्कप्रमुख, शिवसैनिक आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. शिवसेनाही सर्वसामान्य लोकांच्या पक्ष आहे. सर्वसामान्य मतदार हा ठाकरे गटाच्या बाजूने उभे राहून नंदुरबार नगरपालिकेवर शिवसेनेच्या झेंडा फडकवणार असल्याने शिवसेना नंदुरबार नगरपालिकेचे निवडणुकीत उतरली असून नगराध्यक्ष सह सर्वेच नगरसेवक निवडून येथील असा विश्वास जिल्हाप्रमुख पंडित माळी यांनी व्यक्त केला.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 16, 2025 12:46:29
Dhule, Maharashtra:नंदुरबार नगरपालिका साठी भाजपकडून अविनाश माळी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपाकडून उमेदवारी संदर्भात चांगलीच गुप्तता ठेवण्यात आली होती, मात्र शेवटी अविनाश माळी यांचे नाव निश्चित झाल्याने, माळी यांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवारी अर्ज दाखल केला. अविनाश माळी यांच्या अर्ज दाखल करण्यासाठी माजी खासदार डॉ. हिना गावित आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. माळी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने शिवसेना आणि भाजपाची सरळ लढत होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून यावेळेस माजी खासदार डॉ. हिना गावित आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित उपस्थित होत्या, भाजपाकडून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत शेवटपर्यंत सम्राट कायम होता. मात्र अविनाश माळी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीच्या रिंगणात आता अविनाश माळी उतरले असून, अविनाश माळी यांची लढत शिवसेनेच्या उमेदवार रत्न रघुवंशी यांच्याशी होणार आहे नंदुरबार नगरपालिकेत खऱ्या अर्थाने रंगत आता येणार आहे. यावेळी मात्र भाजपचे अनेक नेते लोकप्रतिनिधी माळी सोबत दिसून आले नाहीत. उमेदवार अर्ज दाखल करतांना पक्षाचे दिग्गज नेत्याचा एक मोठा गट अलिप्त असल्याचे दिसुन आले. त्यामुळे ही निवडणूक देखील रघुवंशी विरुद्ध गावित परिवार अशीच होईनार असल्याचे संकेत आहेत.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 16, 2025 12:37:50
Dhule, Maharashtra:भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते डॉ. शशिकांत वाणी आणि माजी नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी आज भाजप उमेदवारीसह अपक्ष म्हणूनही अर्ज दाखल केला आहे. सी वाणी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून सर्वांना आचर्याचा धक्का दिला आहे. त्यांचा वेळप्रसंगी बदखोरीचा निर्णय मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे. 44 वर्षे सातत्याने पक्षाशी निष्ठा राखत त्यांनी भाजपच्या पडत्या काळातही संघटन मजबूत करण्यासाठी महत्त्वाची कामे केल. 2017 मध्ये नगराध्यक्ष पदाची उमेदवारी न मिळाल्यानंतरही यावेळी पक्ष न्याय देईल, असा त्यांचा विश्वास आहे. पक्ष माझा सन्मान करेल असे त्यांनी सांगितले. मात्र तिकीटाबाबत अनिश्चितता असल्याने त्यांनी अपक्स पर्यायही खुला ठेवला आहे. आता भाजपश्रेष्ठी कोणती भूमिका घेणार आणि डॉ. वाणींची नाराजी कशी दूर करणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यांच्या दुहेरी उमेदवारीमुळे स्थानिक राजकारणात उत्सुकता वाढली आहे.
45
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 16, 2025 12:35:26
Dhule, Maharashtra:पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन लैंगिक शोषण करणाऱ्या मुख्याध्यापकाला पोलिसांनी बेड्या घातल्या आहेत. मुख्याध्यापकाच्या हा कारनामा एकूण पोलिसांनाही चक्रवून ठेवला होता. महिलेचा शारीरिक संबंधाचा व्हिडिओ व्हायरलची धमकी देत या मुख्याध्यापकाने 60 लाख रुपये उकळले असून, पोलिसांनी त्या नराधम मुख्याध्यापकाला अटक केली आहे. या घटनेमुळे धुळ्यात खळबळ उडली आहे. आर्थिक व्यवहारातून झालेल्या ओळखीचा फायदा घेत पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन पीडित महिलेचे शारीरिक संबंधाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 60 लाख रुपये उकळले आणि सलग दोन वर्षांहून अधिक काळ अत्याचार करणाऱ्या मुख्याध्यापक विरोधात महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पश्चिम देवपूर पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पश्चिम देवपूर पोलिसांनी सुकलाल बोरसे या मुख्याध्यापकाला अटक केली. महिलेने पश्चिम देवपूर पोलीस स्थानक गाठून नराधम मुख्याध्यापक विरोधात तक्रार दाखल केली, ज्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास पश्चिम देवपूर पोलिस करत आहेत.
45
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 16, 2025 12:35:08
Kalyan, Maharashtra:ये पब्लिक है सब जानती है, कुणीही काहीही बोलो , जनता जनार्दन ठरवणार महापौर कुणाचा बसणार -खासदार श्रीकांत शिंदे यांचा विरोधकांना फिल्मीस्टाईल टोला आगामी होऊ घातलेले महानगरपालिकेच्या निवडणुकी बाबत राजकीय चर्चांनाही या कार्यक्रमात रंग मिळाला. कल्याण पूर्वेत सत्कार समारंभ मध्ये विरोधकांच्या टीकेवर भाष्य करताना डॉ. शिंदे यांनी ये पब्लिक है, सब जानती है कुणीही काहीही बोलो, जनता जनार्दनच ठरवणार की महापौर कुणाचा बसणार, असा फिल्मी-स्टाईल टोला लगावला. त्यांच्या या वक्तव्याला उपस्थितांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला. बाइट - श्रीकांत शिंदे खासदार येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकी नंतर महापौर हा भाजपाचा बसणार असा दावा जिल्हा अध्यक्ष नंदू परब यांच्या आज पक्ष प्रवेशाच्या वेळी दावा केला आहे. बाइट.. नंदू परब कल्याण जिल्हा अध्यक्ष
40
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 16, 2025 12:16:44
Jalna, Maharashtra:जालना :एकीकडे महापौर पदासाठी नाव जाहीर करायचं आणि मग युतीसाठी पत्र द्यायचं हे चुकीचं भाजप नेते रावसाहेब दानवे यांची खोतकरांवर टीका युतीसाठी पत्र दिल्यानंतरही मित्रपक्षावर आरोप अर्जुन खोतकरांनी संयम ठेवायला पाहिजे- दानवे अँकर- जालन्यात एकीकडे महापौर पदासाठी नाव जाहीर करायचं आणि मग युतीसाठी पत्र द्यायचं हे चुकीचं असल्याचं म्हणत रावसाहेब दानवेंनी अर्जुन खोतकरांवर टीका केलीये.. काही दिवसांपूर्वी खोतकर यांनी मित्रपक्ष असलेल्या भाजपला युतीसाठी पत्र दिलं.. मात्र अद्याप यावर कोणतिही चर्चा झाली नाही. त्यामुळं जालना महापालिकेत शिवसेनेचा महापौर होईल असं म्हणत टांगा पलटी करू असा इशारा खोतकरांनी भाजपला दिला होता. मात्र खोतकरांनी संयम ठेवायला पाहिजे.. असा सल्लाही दानवेंनी खोतकरांना दिला आहे..
202
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 16, 2025 12:15:41
Jalna, Maharashtra:जालना : 76 वर्षीय आजी नगर परिषद निवडणुकीच्या रिंगणात,नगरसेविका पदासाठी केला उमेदवारी अर्ज दाखल शोभाबाई बापुराव कारके असं या आजीेचे नाव अंबड नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 9 मधून भरला अर्ज अँकर- जालन्यातल्या अंबड नगरपरिषद निवडणुकीसाठी एका 76 वर्षीय आजीने उमेदवारी अर्ज दाखल केलाय...शोभाबाई बापुराव कारके असं या आजीेचे नाव आहे.. शोभाबाई यांचं 76 वर्ष वय आहे. मात्र उरलेलं आयुष्य आता जनतेसाठी खर्च करायचं आणि विकास करायचा. या भावनेतून शोभाबाई यांनी अंबड येथील प्रभाग क्रमांक 9 मधून निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय.राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने आजींना उमेदवारी दिलीय. बाईट- शोभाबाई कारके, उमेदवार अंबड
103
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 16, 2025 11:47:33
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - गुंड आणि मोका लागलेल्या लोकांच्या हातात शहर देऊ नका,ईश्वरपूरकरांना साद घालत,जयंत पाटलांचा महायुतीवर निशाणा... अँकर - गुंड आणि मोका लागलेल्या लोकांच्या हातात शहर देऊ नका,असे विधान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी केले आहे. सांगलीच्या उरुण ईश्वरपूर नगरपरिषद निवडणुकी तील प्रचार शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते किशोर पूर नगर परिषदेसाठी महायुतीकडून गुंड,मोका लागलेल्या लोकांना उमेदवारी दिली जात असल्याचा अप्रत्यक्ष आरोप देखील जयंत पाटलांनी,यावेळी करत ईश्वरपूर शहराला, अशा लोकांचा विळखा पडू नये,याची खबरदारी ईश्वरपुरकर घेतील,असे देखील जयंत पाटलांनी स्पष्ट केले आहे.जयंत पाटील यांच्या बालेकिल्ला असणाऱ्या ईश्वरपूर मध्ये जयंत पाटलांच्या विरोधात महायुती एकवटली आहे.तर नगर परिषदेसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार आनंदराव मलगुडे यांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ पार पडला,यावेळी जयंत पाटलांनी महायुतीवर ही टीका केली आहे.
90
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 16, 2025 11:47:17
Nashik, Maharashtra:वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीमध्ये आज नाशिक शहराजवळील पेठ भागामध्ये सव्वा लाख वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्ती सोहळा साजरा करण्यात आला. रामानंदचार्य नरेंद्र महाराज यांच्या उपस्थितीत शेकडो भाविकांच्या साक्षीने आपल्या आईच्या नावाने एका वृक्षाची लागवड करण्याची मोहीम पूर्ण झाली. याचा डिजिटल डेटा आणि जीपीएस लोकेशन सह अत्याधुनिक ॲप मध्ये झाडाच्या वाढीची माहिती ठेवण्यात येणार आहे. - एक पेड माँ के नाम. - झाड लावताना आणि झाड संगोपन याचे फोटो काढणार - दरवर्षी झाड लावले त्यांचा सन्मान करू, झाड संगोपन यांची नोंद ठेवली जाणार. - वेब साईट वर माहिती देऊ, ही घोषणा नाही तर आम्ही त्याचा डाटा देणार - कुंभमध्ये आम्ही येणाऱ्या साधू महंतांना वृक्ष लागवड चे आवाहन करणार
188
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 16, 2025 11:31:17
Nashik, Maharashtra:ऑन अहिल्यानगर बिबट्या anchor अहिल्यानगर मध्ये एक नरभक्षक बिबट्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ठार मारला आहे. केंद्र सरकारच्या कायद्यानुसार बिबट्यांना गोळी घालून ठार मारणे निषेधार्थ आहे मात्र आवश्यक तिथे मारण्याची परवानगी आहे. साध्या खूप संख्या बिबट्याची वाढ झाली आहे; जसे कुत्रे फिरतात तसे बिबट्या वाढतील. उद्या लोक बिबट्यांना पळायला कमी करणार नाही इतकी मोठी संख्या होईल. आज जे हल्ले झाले ते दुःखद आहेत; उद्या पुण्यात होणारी बैठकमध्ये नाशिक, अहिल्यानगर नाशिक येथे होणाऱ्या बिबट्याची दहशत यावर सविस्तर चर्चा करणार आहेत. AI च्या माध्यमातून यंत्रणा उभी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
190
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Nov 16, 2025 11:19:46
Bhandara, Maharashtra:गोंदियाची दुर्दशा पाहून इथे चांगला प्रशासन देणाऱ्या व्यक्ती आणि पक्ष हवा. अरे राष्ट्रवादी तो पक्ष आहे: प्रफुल पटेल गोंदिया नगरपरिषद मी स्वतः सात वर्ष अध्यक्ष पदावर राहिलेलो आहो, माझे वडील पंचवीस वर्ष गोंदिया नगरपालिकेचे अध्यक्ष होते. म्हणून आम्हाला गोंदिया शहरांची काळजी वाटते. मला वाटते की गोंदियाचा विकास उत्तम रित्याने व्हायला पाहिजे. गोंदियाचे दुर्दशा पाहून इथे चांगलं प्रशासन देणारा व्यक्ती आणि पक्ष असे असायला पाहिजे. आणि तो असं वाटते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. मुंबईमध्ये काँग्रेसने स्वबळावर लढण्याच्या निर्णय केला असून मनसे आणि महाविकास आघाडी युती करणार आहे या प्रश्नावर प्रफुल पटेल यांची प्रतिक्रिया. ज्याप्रमाणे मुंबईत अशी चर्चा रंगली आहे की मनसे आणि महाविकास आघाडी एकत्र लढत असताना काँग्रेसने जी भूमिका घेतली यावर तुमचं काय मत आहे.. यावर प्रफुल पटेल म्हणाले की महाराष्ट्र मध्ये काँग्रेसची अवस्था आयसीयू मध्ये असल्यासारखी, प्रफुल पटेल यांच्या टोला काँग्रेस पक्ष आता काय अवस्था मध्ये आहे हे आपल्याला बिहारच्या निवडणुकीनंतर बिल्कुल स्पष्ट झालेला आहे महाराष्ट्र मध्ये पण एका काळात काँग्रेस पक्ष स्वबळावर महाराष्ट्रात राज करत होती , आम्ही जुनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आम्ही अनेक वर्ष सत्तेवर होतो पण आज काँग्रेसची अवस्था आयसीयू ची आहे. महाराष्ट्र मध्ये त्यांनी किती लोक निवडून आले ते तुम्ही बघितलं.16लोक निवडून आलेत. महाराष्ट्रात जे आले तेही जेमतेम निवडून आले आहेत. काँग्रेसचे सगळे नेते विस्कळीत होत आहेत. काँग्रेस आणि काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर लोकांच्या विश्वास राहिलेला नाही., आणि बिहारमध्ये ही अगदी स्पष्ट झाला आहे. बिहारमध्ये सुद्धा स्वतःच्या स्वबळावर काँग्रेसचे सत्ता केली होती, आता मात्र त्या सहा जागा जेमतेम मिळालेले आहेत. बिहार मध्ये काँग्रेसचे किती लढून किती निवडून आले हे सुद्धा विचार करण्याची गरज आहे. डॉक्टर योगेश क्षीरसागर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा प्रमुख पदाचा राजीनामा, पक्षांतर्गत गटबाजी मुळे प्रफुल पटेल यांचे प्रतिक्रया स्थानिक स्तरावर थोडी राजी नाराजी असते, तुम्हीच बघा आता नगरपालिका निवडणुकीत किती लोक इच्छुक असतात, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे आणि बीडमध्ये सुद्धा आहे, काही नाराजी असेल तर त्या भागातले नेते आमचे प्रांत अध्यक्ष नक्कीच काही योग्य मार्ग काढतील. प्रफुल पटेल ON पार्थ पवार पार्थ पवार संदर्भात मुख्यमंत्री आणि चौकशीचे आदेश दिलेले आहे, बाकीचे माहिती गोळा करण्यास सुद्धा दुसरी कमिटी तयार करण्यात आलेली आहे, त्या संदर्भातच काही दिवसांनी समोर येणारच गोंदिया भंडाराच्या सगळ्यात जागा आम्ही लढवणार, नगराध्यक्ष जागा सुद्धा आम्ही लढवणार आहे.: प्रफुल पटेल आमचा पक्ष चांगला रीतीने सर्व निवडणूक लढण्याकरता तयार आहे, गोंदिया भंडाराच्या सर्व जागा आम्ही लढवण्या सोबतच नगराध्यक्ष पदाच्या जागा सुद्धा आम्ही लढवल्याला तयार आहोत. गोंदिया भंडाराच्या लोकांना राष्ट्रवादीने प्राथमिक पटेल यांच्या बद्दल जास्त सांगण्याची गरज नाही. गोंदिया भंडाराच्या निवडणूक आम्ही स्वयंमबळावर लढवणार, मात्र युतीधर्म सुद्धा पाळणार: प्रफुल पटेल यांची ग्वाही Anchor: गोंदिया भंडारा जिल्ह्याच्या नगरपालिका नगरपंचायत च्या निवडणुका आम्ही राष्ट्रवादी म्हणून जवळपास लढाईच्या ठरवलेला आहे एखादा ठिकाणी युती ची शक्यता मात्र त्याही स्वबळावर लढणार ,महायुती चा धर्म सुद्धा आम्ही पाळतात ,नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात मध्ये काम करत असताना जे काही या निवडणुकीमध्ये निकाल जसा लागेल त्याच्यानंतरही आम्ही आमचे मित्र पक्ष आहे त्यांच्याबरोबर कसं जुळता येणार त्याच्याही आम्ही विचार करणार. अजित पवार यांनी दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेतली. आणि पार्थ पवार संदर्भात चर्चा झाली का? या संदर्भात प्रफुल पटेल यांचे प्रतिक्रिया. अजित पवार दिल्लीला ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला त्याकरता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गेले होते, त्याच दिवशी बिहारचा निकाल लागला , त्यामुळे अभिनंदन कळाला त्यावेळेस अजित पवार तिथे गेले होते. किती कोणतीही दुसरी चर्चा झाली आहे असं मला काही वाटत नाही.. गवळी कुटुंब्लातील तिसरी पिढी पालिका निवडणुकीत रिंगणात.. प्रफुल पटेल यांचे प्रतिक्रिया.. भारत एक लोक तांत्रिक देश आहे, सगळ्यांना लढण्याचा अधिकार आहे आणि नियम पण बनले आहे की कोण लढू शकतो आणि कोण नाही लढू शकत, नियमात बसत असतील तर सगळ्यांना अधिकार आहे, आणि ते जनतेला ठरवायचे आहे कोणाला निवडून आणायचा आहे. उमेदवारांबद्दल आज संध्याकाळपर्यंत होणार चित्र स्पष्ट: प्रफुल पटेल राष्ट्रवादीकडून नगराध्यक्ष पदाकरता महिला उमेदवाराला संधी देण्याची चर्चा जोरात रंगली असून, आज संध्याकाळपर्यंत गोंदिया भंडारा दोन्ही जिल्ह्यातील उमेदवारांच्या नावांच्या स्पष्ट होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
100
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 16, 2025 11:02:38
Kalyan, Maharashtra: Nilje रेल्वे ओव्हरब्रिज पुनर्बांधणीसाठी पाच महिन्यांचे वाहतूक निर्बंध. ठाणे वाहतूक विभागाची नवी अधिसूचना जाहीर Anc...निळजे रेल्वे ओव्हरब्रिजची उंची कमी असल्याने वरील डबल डेकर कंटेनर वाहतुकीस अडथळा येत होता. हा अडथळा दूर करण्यासाठी ब्रिजच्या पुनर्बांधणीची महत्त्वपूर्ण कामे टाटा कंपनीने आज पासून सुरू होत असून ती ३१ मार्च २०२६ पर्यंत चालणार आहेत. या कालावधीत परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेता ठाणे शहर वाहतूक उपविभागाने व्यापक वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी केली आहे. कल्याण ग्रामीण चे आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते नवीन ब्रिजच्या पुनर्बांधणीच्या कामाचे नारळ फोडून सुरवात केली आहे. पोलिस उप-आयुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट यांनी मोटार वाहन कायदा कलम 115 व 116 (1)(अ)(ब) अंतर्गत विविध रस्त्यांवर प्रवेशबंदी आणि पर्यायी मार्ग लागू करण्याचे आदेश दिले आहेत. 1. कल्याण → शिळफाटा निळजे कमानजवळून सर्व वाहनांना प्रवेशबंद. पर्यायी मार्ग : निळजे कमान → उजवीकडे लोधा पलावा वाहीनी → महालक्ष्मी हॉटेल → पुढे इच्छित स्थळी. 2. लोढा पलावा / कासाबेला / हेवन / एक्सपिरिया मॉल → कल्याण निळजे ब्रिज चढणीवरून कल्याणकडे जाणारा मार्ग बंद. पर्यायी मार्ग : कल्याण–शिळ रोड → शिळफाटा → देसाई खाडी ब्रिज → सरस्वती टेक्सटाईल → यू-टर्न → पलावा फ्लायओव्हर. 3. मुंब्रा / कल्याण फाटा → कल्याण (६ चाकी व जड वाहने) कल्याण फाटा येथे प्रवेशबंद. पर्यायी मार्ग : शिळफाटा → मुंब्रा बायपास → खारेगाव टोलनाका. 4. कल्याण → मुंब्रा / कल्याण फाटा (६ चाकी व जड वाहने) काटई (बदलापूर) चौक येथे प्रवेशबंद. पर्यायी मार्ग : काटई चौक → खोणी नाका → तळोजा MIDC. 5. तळोजा MIDC / नवी मुंबई → काटई चौक (६ चाकी व जड वाहने) खोणी नाका, निसर्ग हॉटेल येथे प्रवेशबंद. पर्यायी मार्ग : निसर्ग हॉटेल → उजवे वळण → बदलापूर पाईपलाईन → नेवाळी. 6. अंबरनाथ / बदलापूर → काटई चौक (६ चाकी व जड वाहने) खोणी नाका येथे प्रवेशबंद. पर्यायी मार्ग : खोणी नाका → डावे वळण → तळोजा MIDC. हलक्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग मुंबई/नवी मुंबई → कल्याण : दिवा–संदप रोड → मानपाडा → कल्याण–शिळ रोड मानकोली–मोटागाव–डोंबिवली मार्ग किंवा रांजनोली–कोनगाव–कल्याण मार्ग कल्याण/डोंबिवली/उल्हासनगर → मुंबई/नवी मुंबई : चक्कीनाका → श्री मळगाई पेड → नेवाळी → बदLLापूर पाईपलाईन → तळोजा MIDC कल्याण/डोंबिवली → ठाणे/मुंबई : डोंबिवली → मोटागाव → मानकोली → दुर्गाडी → कोनगाव → नाशिक–मुंबई १६ नोव्हेंबर २०२५ ते ३१ मार्च २०२६ या निर्बंधांमधून पोलीस वाहने, रुग्णवाहिका, अग्निशामक दल आणि इतर अत्यावश्यक सेवा वाहनांना सूट असेल. निळजे ब्रिजवरील पुनर्बांधणीमुळे कल्याण–शिळ रोडवरील वाहतूक काही महिन्यांसाठी मोठ्या प्रमाणात विस्कळीत होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी प्रवासाची पूर्वतयारी करून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.
193
comment0
Report
Advertisement
Back to top