Back
नीलजे रेलवे ओवरब्रिज पुनर्निर्माण से 5 माह तक ट्रैफिक भारी जाम, देखें वैकल्पिक मार्ग
ABATISH BHOIR
Nov 16, 2025 11:02:38
Kalyan, Maharashtra
Nilje रेल्वे ओव्हरब्रिज पुनर्बांधणीसाठी पाच महिन्यांचे वाहतूक निर्बंध. ठाणे वाहतूक विभागाची नवी अधिसूचना जाहीर Anc...निळजे रेल्वे ओव्हरब्रिजची उंची कमी असल्याने वरील डबल डेकर कंटेनर वाहतुकीस अडथळा येत होता. हा अडथळा दूर करण्यासाठी ब्रिजच्या पुनर्बांधणीची महत्त्वपूर्ण कामे टाटा कंपनीने आज पासून सुरू होत असून ती ३१ मार्च २०२६ पर्यंत चालणार आहेत. या कालावधीत परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेता ठाणे शहर वाहतूक उपविभागाने व्यापक वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी केली आहे. कल्याण ग्रामीण चे आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते नवीन ब्रिजच्या पुनर्बांधणीच्या कामाचे नारळ फोडून सुरवात केली आहे. पोलिस उप-आयुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट यांनी मोटार वाहन कायदा कलम 115 व 116 (1)(अ)(ब) अंतर्गत विविध रस्त्यांवर प्रवेशबंदी आणि पर्यायी मार्ग लागू करण्याचे आदेश दिले आहेत. 1. कल्याण → शिळफाटा निळजे कमानजवळून सर्व वाहनांना प्रवेशबंद. पर्यायी मार्ग : निळजे कमान → उजवीकडे लोधा पलावा वाहीनी → महालक्ष्मी हॉटेल → पुढे इच्छित स्थळी. 2. लोढा पलावा / कासाबेला / हेवन / एक्सपिरिया मॉल → कल्याण निळजे ब्रिज चढणीवरून कल्याणकडे जाणारा मार्ग बंद. पर्यायी मार्ग : कल्याण–शिळ रोड → शिळफाटा → देसाई खाडी ब्रिज → सरस्वती टेक्सटाईल → यू-टर्न → पलावा फ्लायओव्हर. 3. मुंब्रा / कल्याण फाटा → कल्याण (६ चाकी व जड वाहने) कल्याण फाटा येथे प्रवेशबंद. पर्यायी मार्ग : शिळफाटा → मुंब्रा बायपास → खारेगाव टोलनाका. 4. कल्याण → मुंब्रा / कल्याण फाटा (६ चाकी व जड वाहने) काटई (बदलापूर) चौक येथे प्रवेशबंद. पर्यायी मार्ग : काटई चौक → खोणी नाका → तळोजा MIDC. 5. तळोजा MIDC / नवी मुंबई → काटई चौक (६ चाकी व जड वाहने) खोणी नाका, निसर्ग हॉटेल येथे प्रवेशबंद. पर्यायी मार्ग : निसर्ग हॉटेल → उजवे वळण → बदलापूर पाईपलाईन → नेवाळी. 6. अंबरनाथ / बदलापूर → काटई चौक (६ चाकी व जड वाहने) खोणी नाका येथे प्रवेशबंद. पर्यायी मार्ग : खोणी नाका → डावे वळण → तळोजा MIDC. हलक्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग मुंबई/नवी मुंबई → कल्याण : दिवा–संदप रोड → मानपाडा → कल्याण–शिळ रोड मानकोली–मोटागाव–डोंबिवली मार्ग किंवा रांजनोली–कोनगाव–कल्याण मार्ग कल्याण/डोंबिवली/उल्हासनगर → मुंबई/नवी मुंबई : चक्कीनाका → श्री मळगाई पेड → नेवाळी → बदLLापूर पाईपलाईन → तळोजा MIDC कल्याण/डोंबिवली → ठाणे/मुंबई : डोंबिवली → मोटागाव → मानकोली → दुर्गाडी → कोनगाव → नाशिक–मुंबई १६ नोव्हेंबर २०२५ ते ३१ मार्च २०२६ या निर्बंधांमधून पोलीस वाहने, रुग्णवाहिका, अग्निशामक दल आणि इतर अत्यावश्यक सेवा वाहनांना सूट असेल. निळजे ब्रिजवरील पुनर्बांधणीमुळे कल्याण–शिळ रोडवरील वाहतूक काही महिन्यांसाठी मोठ्या प्रमाणात विस्कळीत होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी प्रवासाची पूर्वतयारी करून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.
167
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 16, 2025 12:37:5045
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 16, 2025 12:35:2645
Report
ABATISH BHOIR
FollowNov 16, 2025 12:35:0840
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 16, 2025 12:16:44116
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 16, 2025 12:15:41103
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 16, 2025 11:47:3346
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 16, 2025 11:47:17187
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 16, 2025 11:31:17190
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 16, 2025 11:19:46100
Report
ABATISH BHOIR
FollowNov 16, 2025 11:07:5589
Report
HPHARSHAD PATIL
FollowNov 16, 2025 11:03:01144
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 16, 2025 11:00:36146
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 16, 2025 10:36:1558
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 16, 2025 10:32:49128
Report