Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane410210

नवी मुंबई में शिंदे नाम हटाने पर हंगामा; मंत्री का नाम निमंत्रण पत्रिका से गायब

SNSWATI NAIK
Mar 11, 2026 11:16:53
Navi Mumbai, Maharashtra
नवी मुंबई में महापालिका के निमंत्रण पत्रिके से पालकमंत्री एकनाथ शिंदे का नाम गायब होने को लेकर हंगामा मचा हुआ है। संपर्क नेते के रूप में गणेश नाईक का नाम निमंत्रण पत्रिका में दिखाया गया है। गणेश नाईक पालकमंत्री होते तो निमंत्रण पत्रिका में उनका नाम होता—सत्ताधाऱ्यांचा अַלिखित अजब फतवा। गलत निमंत्रण पत्रिका छपवाने पर आयुक्त ने कहा कि उनका नाम न टाकना पड़ा, इसकी चर्चा भी खूब हो रही है। महापालिका के पहले विश्व महिला दिन के कार्यक्रम के निमंत्रण पत्रिका पर भी विवाद छाया हुआ है। गणेश नाईक के मनमानी के विरोध में शिंदे की शिवसेना नगरविकास खाते के पास तक्रार करेगी; इसके साथ ही कहा गया है कि अगर अब भी पालकमंत्री का नाम न डाला गया तो पालिका का एक भी कार्यक्रम नहीं होगा। शिवसेना की ओर से यह इशारा स्पष्ट है। बाइट — मनोज हळदणकर — शिवसेना गटनेता। बाइट — विजय चौगुले, विरोधी पक्षनेता, नवी मुंबई मनपा। प्रशासन ने इस पर चुप्पी साध रखी है; सभागृह नेते सतर्क रहते हुए इसकी जानकारी ली है और निमंत्रण पत्रिके की नियमावली तय की जाएगी, इसके अधिकार लेने के लिए कई नए निर्णय upcoming महासभा में दिखेंगे। बाइट — सागर नाईक — सभागृह नेते। यह भी कहा गया है कि प्रशासन मनमानी कर रहा है और सत्ता पक्ष कानून का प्रयोग कर नवी मुंबई भाजपा-शिवसेना को दबाने की एक भी चांस नहीं छोड़ रहा.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
NMNITESH MAHAJAN
Mar 11, 2026 12:48:09
Jalna, Maharashtra:जालना :जरांगे पाटील बाईट कुणबी प्रमाणपत्र वाटप का करत नाहीत, आमदारांनी अधिकार्यांना जाब विचारावा नसता मराठे आमदारांना जाब विचारतील मनोज जरांगे यांचा आमदारांसह सरकारला इशारा माझ्या विरोधात कुणीही उठतं आणि बदनामी करतं कुणाच्या सुखासाठी, खोटं बोलून पैसे कमवू नये मराठा समाज भरपूर आरक्षणात गेला, राहिलेलाही जाणार मात्र समाजात काम करणारी यंत्रणा नसल्याने जरांगेंची नाराजी युद्धामुळं सर्वसामान्याला झळ बसू नये याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारची- जरांगे अँकर- कुणबी प्रमाणपत्र वाटप का करत नाहीत याचा सर्व आमदारांनी अधिकार्यांना जाब विचारायला हवा नसता मराठा आमदारांना जाब विचारतील असा थेट इशाराच मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिलाय. मुंबई आंदोलनानंतर राज्य सरकारने हैदराबाद गॅजेटिअर लागू केलं. मात्र त्याची अमंलबजावणी होताना दिसून येत नाहीये. त्यामुळं जरांगे यांनी संताप व्यक्त केलाय.. मराठा आरक्षणासाठी मी मागच्या अडच वर्षांपासून लढा देत आहे. त्यामुळं भरपूर मराठा समाज आरक्षणात गेलाय. राहिलेलाही आरक्षणात जाणार असं जरांगे यांनी म्हंटलंय. मात्र राज्याच्या कानाकोपर्यात मदतीसाठी समाजात यंत्रणाच नाहीये. त्यामुळं जरांगेंनी नाराजी व्यक्त केलीये.. दरम्यान अमेरिका इराण युद्धामुळं राज्यासह देशभरात गॅसचा तुटवडा निर्माण झालाय. मात्र सर्व सामान्यांना याचा त्रास होऊ नये याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारची आहे असं जरांगे यांनी म्हंटलंय.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 11, 2026 12:46:15
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर विमानतळाच्या नाईट लँडिंग संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधासभेत महत्वाची घोषणा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सोलापूर विमानतळाच्या नाईट लँडिंग संदर्भात मोठी गुड न्यूज - सोलापूर विमानतळाच्या नाईट लँडिंग संदर्भात केंद्र सरकारसोबतची बोलणी अंतिम टप्प्यात असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती - राज्य सरकारने सगळ्या विमानतळावर या व्यवस्था करण्याकरिता 500 कोटी रुपये ठेवलेले आहेत - त्यामुळे सोलापूर विमानतळाची नाईट लँडिंगची व्यवस्था करण्याचे आश्वासन - अर्थसंकल्पीय घोषणेमध्ये सोलापूरचा उल्लेख न केल्यावरून आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडली होती व्यथा - यासोबतच शहरातील उड्डाणपुल आणि आयटी पार्क संदर्भात केली महत्त्वाची घोषणा - तसेच जी अर्थसंकल्पीत तरतूद सोलापूरच्या आयटी पार्कसाठी लागेल ती याच वर्षी उपलब्ध करून देण्यात येईल - उड्डाण पुलाकरिता निधी उपलब्ध करून देत आहोत - साऊंड बाईट - देवेंद्र फडणवीस ( मुख्यमंत्री )
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 11, 2026 12:18:43
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 11, 2026 11:36:11
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ नगर पालिकेच्या नियोजन विभागाचे प्रमुख हरिश जाधव यांना सत्ताधारी शिवसेना नगरसेवक पिंटू बांगर यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप करीत पालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले. बांगर यांनी प्रभागातील विविध विकास कामे वेळेत का होत नाही अशी विचारणा करीत अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुरक्षित व सन्मानपूर्वक कार्य करण्याचे वातावरण असावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी, व कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली. दरम्यान यापुढे असे अनुचित प्रकार घडल्यास कायदेशीर कारवाई करू असे मुख्याधिकारी शुभम क्यातमवार यांनी सांगितले.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Mar 11, 2026 10:48:21
Nasik, Maharashtra:नाशिक - *नाशिक मध्ये एका दहावीच्या विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ला* - दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने केला हल्ला - नाशिकच्या भद्रकाली परिसरात घडली घटना - न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट समोर घडली घटना - दहावीचा पेपर देऊन बाहेर आल्यावर केला हल्ला - हल्ल्याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट भद्रकाली पोलीस करत आहेत अधिक तपास दहावीच्या परीक्षा देऊन बाहेर पडताच 10-15 जणांनी केला हल्ला नाशिक शहरात धक्कादायक घटना समोर आली आहे. न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट, स्व. सौ. रत्नप्रभाकर वैशंपायन कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे दहावीचा पेपर देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव तौकीर नईमुद्दीन अन्सारी आहे, तो दूध बाजार परिसरातील रहिनूमा स्कूलमध्ये शिकणारा दहावीचा विद्यार्थी. तौकीर हा कोर्टासमोरील परीक्षा केंद्रावर दहावीचा पेपर देण्यासाठी आला होता. पेपर संपल्यानंतर तो गेटसमोर बाहेर येताच 10 ते 15 जणांच्या टोळक्याने त्याच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या डोक्यावर गंभीर मार लागला असून तो गंभीर जखमी झाला आहे. घटनेनंतर त्याला तात्काळ नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे नाशिकमध्ये शाळकरी मुलांचेही जीवन सुरक्षित आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या परीक्षा केंद्राबाहेर अशी घटना घडल्यामुळे पालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Mar 11, 2026 10:45:19
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 11, 2026 10:22:08
Kolhapur, Maharashtra:केंद्र सरकारने उद्योगांमध्ये LPG गॅसच्या वापरावर निर्बंध घातल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक उद्योग अडचणीत आले आहेत. विशेष म्हणजे या निर्णयाचा फटका केवळ उद्योगांनाच नाही तर ऑक्सिजन सिलेंडर उद्योगालाही बसू लागला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 70 ते 80 टक्के उद्योगांमध्ये LPG गॅससोबत ऑक्सिजन सिलेंडरचा वापर केला जातो. त्यामुळे उद्योगांना LPG गॅस मिळाला नाही तर ऑक्सिजन सिलेंडरचाही उपयोग होत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. उद्योगांना LPG गॅसच्या तुटवड्यामुळे ऑक्सिजन इंडस्ट्रीही अडचणीत कोल्हापूर जिल्ह्यातील 70 ते 80% उद्योगांमध्ये फॅब्रिकेशन, इंजिनिअरिंग आणि शेती अवजारे निर्मितीसाठी ऑक्सिजन सिलेंडर आणि LPG गॅसचा एकत्रित वापर केला जातो. मात्र केंद्र सरकारच्या निर्णयानुसार उद्योगांसाठी LPG गॅस उपलब्ध होत नसल्याचे उद्योग क्षेत्रातून सांगितले जात आहे. लोखंडी साहित्य कापण्यासाठी आणि वेल्डिंगसाठी ऑक्सिजन आणि LPG गॅस हे दोन्ही घटक एकत्र वापरावे लागतात. त्यामुळे LPG गॅस नसल्यास ऑक्सिजन सिलेंडर असला तरी उद्योगांना त्याचा फारसा उपयोग होत नाही. हॉप्स्टिकल सोबत उद्योगांमध्ये देखील ऑक्सिजनची मोठी गरज एकूणच LPG गॅसच्या उपलब्धतेवर उद्योगांसह ऑक्सिजन इंडस्ट्रीही मोठ्या प्रमाणात अवलंबून असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे उद्योगांसाठी LPG गॅसचा पुरवठा तातडीने सुरू करण्यात यावा, अशी मागणी आता उद्योग क्षेत्रातून होत आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 11, 2026 10:21:52
Akola, Maharashtra:अकोला शहरात समाजकंटकांकडून व्यापाऱ्यांना विनाकारण त्रास देण्याच्या घटना वाढताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी कुलर चोरी करत असताना दुकानदाराने एका मुलाला हटकल्याने संतप्त नातेवाईकांनी दुकानदाराला शिवीगाळ करत मारहाण केली होती. त्यानंतर आता शहरातील सराफा गल्लीमध्ये आणखी एक धक्कादायक घटना समोर आली असून याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही घटना ५ मार्च रोजी अकोला शहरातील नामवंत सराफा गल्ली परिसरात घडली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या या घटनेत एक व्यक्ती रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी वाहनांची तोडफोड करताना दिसत आहे. कोणतेही कारण नसताना दुचाकी गाड्यांचे नुकसान केल्यानंतर संबंधित व्यक्ती जवळील एका दुकानात घुसली आणि सराफा व्यापाऱ्याला शिवीगाळ करत मारहाण केली. या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. विशेष म्हणजे भीतीच्या वातावरणामुळे अनेक व्यापाऱ्यां पोलिसांत तक्रार देण्यासही पुढे येत नसल्याचे समोर येत आहे. दरम्यान, हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता या व्हिडिओच्या आधारे पोलिसांकडून संबंधित व्यक्तीवर काय कारवाई केली जाणार, याकडे व्यापाऱ्यांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 11, 2026 10:05:26
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Mar 11, 2026 09:36:13
0
comment0
Report
Advertisement
Back to top