Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423401

युद्ध से ईंधन सप्लाई प्रभावित: नाशिक के येवला में होटल उद्योग पर खतरा

SKSudarshan Khillare
Mar 11, 2026 12:18:43
Yeola, Maharashtra
अमेरिका इजराइल आणि इराण या देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे इंधनपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला असून कमर्शियल गॅस पुरवठ्या अभावी भारतात हॉटेल व्यवसाय धोक्यात आला आहे नाशिकच्या येवल्यातील हॉटेल व्यवसायिकांकडे एक दोन दिवस पुरेल एवढा गॅस साठा शिल्लक असून तो संपल्यानंतर हॉटेल बंद करण्याची वेळ येणार आहे हॉटेल दर बंद झाल्या तर आमच्याकडे काम करणाऱ्या वेटर व कारागिरांवर उपासमारीची वेळ येईल अशी माहिती येवल्यातील हॉटेल व्यवसायिकांनी दिली आहे या हॉटेल व्यवसाय का सोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSudarshan Khillare
Mar 11, 2026 13:30:15
0
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Mar 11, 2026 13:23:50
Mumbai, Maharashtra:गॅस सिलेंडर नोंदविण्यासाठी सध्या ठीक ठिकाणी गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांच्या मोठमोठ्या रांगा लागलेल्या आहेत अशात भांडुप मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर रिकामी सिलेंडरच चोरीला गेल्याचे प्रकार समोर आले आहेत गॅसची नोंदणी केल्यानंतर सिलेंडर घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांचे रिकामी सिलेंडर पळवल्याच्या घटना समोर येत आहेत अकरा ते बारा सिलेंडर चोरीला गेल्याची घटना समोर आल्यामुळे आता काळ्या बाजारात सिलेंडर विकण्यासाठी चोरट्यांनी ग्राहकांचेच सिलेंडर चोरण्याचे प्रकार सुरू केले असल्याचं समोर येताय मनसेच्या कार्यकर्त्यांनी या एजन्सीच्या संचालकांची भेट घेऊन सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्या चोरट्याचा चाप बसवावा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलनाचा इशाराच दिला आहे
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 11, 2026 13:18:24
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर: पॅकेज दोन दिवसांत २८०० उद्योग, ९२० हॉटेल्स बंद पडणार. व्यावसायिक गैस पुरवठा आजपासून बंद. केंद्र सरकारकडून कमर्शियल गैस पुरवठा बंद करण्याच्या निर्णयाचा परिणाम. युद्धामुळे आखाती देशातून होणारा गैस आणि क्रूड ऑइल पुरवठा बंद झाला. यामुळे केंद्र सरकारने कमर्शियल गॅस पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दोन दिवसांत छत्रपती संभाजीनगर मधील सुमारे २८०० उद्योग आणि सुमारे ९२० हॉटेल्स बंद पडण्याची सूचना समोर आली आहे. त्यामुळे अनेक कामगार सुद्धा बेरोजगार होण्याची भीती व्यक्त केली जातीय. आजपासून व्यावसायिक गॅस पुरवठा बंद झाल्यानं उद्योगांबरोबरच हॉटेल व्यवसायालाही याची मोठी झळ बसण्याची शक्यता आहे. शहरातील ९२० हॉटेलचा गॅस साठा दोन दिवसांतच संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे या हॉटेलला टाळे ठोकण्याची वेळ हॉटेल व्यावसायिकांवर येणार आहे. गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने याचा थेट फटका लहान सहान हॉटेल व्यवसायाला बसला आहे. आता हॉटेल व्यावसायिक चक्क लाकूड-फाटा गोळा करून चूल पेटवू लागले आहेत. शहरातील बाबा पेट्रोल पंप परिसरातील चित्र तर धक्कादायक आहे. येथील प्रसिद्ध शिव गणेश नाश्ता सेंटरवर आज चक्क लाकडाच्या चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. गॅस सिलिंडरसाठी वारंवार चकरा मारूनही रिकामी हाताने परत फिरावं लागल्याने, व्यवसायाचे चाक फिरते ठेवण्यासाठी मालकाला हा टोकाचा निर्णय घ्यावा लागला आहे. गॅस टंचाई अभावी शहरातील उद्योजक, व्यावसायिक हतबल झालेत.या सगळ्यांचं लक्ष आता राज्य आणि केंद्र सरकारच्या गॅस बाबत होणाऱ्या निर्णयाकडे लागलं आहे.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 11, 2026 13:00:51
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर |वेरूळ लेणीतील सूर्यकिरणांनी उजळून निघालेली बुद्ध मूर्ती पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी छत्रपती संभाजीनगरच्या जगप्रसिद्ध वेरूळ लेणीच्या दहा नंबरच्या लेणीतील बुध्द मूर्तीवर वर्षातून केवळ दोनच दिवस अलौकिक असा किरणोत्सव होतो. सूर्यकिरणांनी उजळून निघालेली बुद्ध मूर्ती आणि प्रकाशमान झालेली संपूर्ण लेणी हे डोळ्यात साठविण्यासाठी पर्यटकांनी येथ गर्दी केली आहे. १० व ११ मार्च रोजीच सूर्यकिरणे येथील बुद्ध मूर्तीच्या चेहऱ्यावर येतात. सूर्याची मावळतीची किरणे खोल गाभाऱ्यात असलेल्या देवतांच्या मूर्तीवरील चेहऱ्यांना कशी उजळवतात हे दृष्य पहाणे खरोखरच रंजक आणि रोमांचित करणारा अनुभव आहे。
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 11, 2026 12:48:09
Jalna, Maharashtra:जालना :जरांगे पाटील बाईट कुणबी प्रमाणपत्र वाटप का करत नाहीत, आमदारांनी अधिकार्यांना जाब विचारावा नसता मराठे आमदारांना जाब विचारतील मनोज जरांगे यांचा आमदारांसह सरकारला इशारा माझ्या विरोधात कुणीही उठतं आणि बदनामी करतं कुणाच्या सुखासाठी, खोटं बोलून पैसे कमवू नये मराठा समाज भरपूर आरक्षणात गेला, राहिलेलाही जाणार मात्र समाजात काम करणारी यंत्रणा नसल्याने जरांगेंची नाराजी युद्धामुळं सर्वसामान्याला झळ बसू नये याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारची- जरांगे अँकर- कुणबी प्रमाणपत्र वाटप का करत नाहीत याचा सर्व आमदारांनी अधिकार्यांना जाब विचारायला हवा नसता मराठा आमदारांना जाब विचारतील असा थेट इशाराच मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिलाय. मुंबई आंदोलनानंतर राज्य सरकारने हैदराबाद गॅजेटिअर लागू केलं. मात्र त्याची अमंलबजावणी होताना दिसून येत नाहीये. त्यामुळं जरांगे यांनी संताप व्यक्त केलाय.. मराठा आरक्षणासाठी मी मागच्या अडच वर्षांपासून लढा देत आहे. त्यामुळं भरपूर मराठा समाज आरक्षणात गेलाय. राहिलेलाही आरक्षणात जाणार असं जरांगे यांनी म्हंटलंय. मात्र राज्याच्या कानाकोपर्यात मदतीसाठी समाजात यंत्रणाच नाहीये. त्यामुळं जरांगेंनी नाराजी व्यक्त केलीये.. दरम्यान अमेरिका इराण युद्धामुळं राज्यासह देशभरात गॅसचा तुटवडा निर्माण झालाय. मात्र सर्व सामान्यांना याचा त्रास होऊ नये याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारची आहे असं जरांगे यांनी म्हंटलंय.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 11, 2026 12:46:15
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर विमानतळाच्या नाईट लँडिंग संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधासभेत महत्वाची घोषणा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सोलापूर विमानतळाच्या नाईट लँडिंग संदर्भात मोठी गुड न्यूज - सोलापूर विमानतळाच्या नाईट लँडिंग संदर्भात केंद्र सरकारसोबतची बोलणी अंतिम टप्प्यात असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती - राज्य सरकारने सगळ्या विमानतळावर या व्यवस्था करण्याकरिता 500 कोटी रुपये ठेवलेले आहेत - त्यामुळे सोलापूर विमानतळाची नाईट लँडिंगची व्यवस्था करण्याचे आश्वासन - अर्थसंकल्पीय घोषणेमध्ये सोलापूरचा उल्लेख न केल्यावरून आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडली होती व्यथा - यासोबतच शहरातील उड्डाणपुल आणि आयटी पार्क संदर्भात केली महत्त्वाची घोषणा - तसेच जी अर्थसंकल्पीत तरतूद सोलापूरच्या आयटी पार्कसाठी लागेल ती याच वर्षी उपलब्ध करून देण्यात येईल - उड्डाण पुलाकरिता निधी उपलब्ध करून देत आहोत - साऊंड बाईट - देवेंद्र फडणवीस ( मुख्यमंत्री )
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 11, 2026 11:36:11
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ नगर पालिकेच्या नियोजन विभागाचे प्रमुख हरिश जाधव यांना सत्ताधारी शिवसेना नगरसेवक पिंटू बांगर यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप करीत पालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले. बांगर यांनी प्रभागातील विविध विकास कामे वेळेत का होत नाही अशी विचारणा करीत अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुरक्षित व सन्मानपूर्वक कार्य करण्याचे वातावरण असावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी, व कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली. दरम्यान यापुढे असे अनुचित प्रकार घडल्यास कायदेशीर कारवाई करू असे मुख्याधिकारी शुभम क्यातमवार यांनी सांगितले.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 11, 2026 11:16:53
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई में महापालिका के निमंत्रण पत्रिके से पालकमंत्री एकनाथ शिंदे का नाम गायब होने को लेकर हंगामा मचा हुआ है। संपर्क नेते के रूप में गणेश नाईक का नाम निमंत्रण पत्रिका में दिखाया गया है। गणेश नाईक पालकमंत्री होते तो निमंत्रण पत्रिका में उनका नाम होता—सत्ताधाऱ्यांचा अַלिखित अजब फतवा। गलत निमंत्रण पत्रिका छपवाने पर आयुक्त ने कहा कि उनका नाम न टाकना पड़ा, इसकी चर्चा भी खूब हो रही है। महापालिका के पहले विश्व महिला दिन के कार्यक्रम के निमंत्रण पत्रिका पर भी विवाद छाया हुआ है। गणेश नाईक के मनमानी के विरोध में शिंदे की शिवसेना नगरविकास खाते के पास तक्रार करेगी; इसके साथ ही कहा गया है कि अगर अब भी पालकमंत्री का नाम न डाला गया तो पालिका का एक भी कार्यक्रम नहीं होगा। शिवसेना की ओर से यह इशारा स्पष्ट है। बाइट — मनोज हळदणकर — शिवसेना गटनेता। बाइट — विजय चौगुले, विरोधी पक्षनेता, नवी मुंबई मनपा। प्रशासन ने इस पर चुप्पी साध रखी है; सभागृह नेते सतर्क रहते हुए इसकी जानकारी ली है और निमंत्रण पत्रिके की नियमावली तय की जाएगी, इसके अधिकार लेने के लिए कई नए निर्णय upcoming महासभा में दिखेंगे। बाइट — सागर नाईक — सभागृह नेते। यह भी कहा गया है कि प्रशासन मनमानी कर रहा है और सत्ता पक्ष कानून का प्रयोग कर नवी मुंबई भाजपा-शिवसेना को दबाने की एक भी चांस नहीं छोड़ रहा.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Mar 11, 2026 10:48:21
Nasik, Maharashtra:नाशिक - *नाशिक मध्ये एका दहावीच्या विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ला* - दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने केला हल्ला - नाशिकच्या भद्रकाली परिसरात घडली घटना - न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट समोर घडली घटना - दहावीचा पेपर देऊन बाहेर आल्यावर केला हल्ला - हल्ल्याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट भद्रकाली पोलीस करत आहेत अधिक तपास दहावीच्या परीक्षा देऊन बाहेर पडताच 10-15 जणांनी केला हल्ला नाशिक शहरात धक्कादायक घटना समोर आली आहे. न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट, स्व. सौ. रत्नप्रभाकर वैशंपायन कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे दहावीचा पेपर देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव तौकीर नईमुद्दीन अन्सारी आहे, तो दूध बाजार परिसरातील रहिनूमा स्कूलमध्ये शिकणारा दहावीचा विद्यार्थी. तौकीर हा कोर्टासमोरील परीक्षा केंद्रावर दहावीचा पेपर देण्यासाठी आला होता. पेपर संपल्यानंतर तो गेटसमोर बाहेर येताच 10 ते 15 जणांच्या टोळक्याने त्याच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या डोक्यावर गंभीर मार लागला असून तो गंभीर जखमी झाला आहे. घटनेनंतर त्याला तात्काळ नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे नाशिकमध्ये शाळकरी मुलांचेही जीवन सुरक्षित आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या परीक्षा केंद्राबाहेर अशी घटना घडल्यामुळे पालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Mar 11, 2026 10:45:19
0
comment0
Report
Advertisement
Back to top