Back
अकोला: सराफा गल्ली में व्यापारी भयभीत करने वाला वीडियो वायरल, पुलिस से कार्रवाई की मांग
JJJAYESH JAGAD
Mar 11, 2026 10:21:52
Akola, Maharashtra
अकोला शहरात समाजकंटकांकडून व्यापाऱ्यांना विनाकारण त्रास देण्याच्या घटना वाढताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी कुलर चोरी करत असताना दुकानदाराने एका मुलाला हटकल्याने संतप्त नातेवाईकांनी दुकानदाराला शिवीगाळ करत मारहाण केली होती. त्यानंतर आता शहरातील सराफा गल्लीमध्ये आणखी एक धक्कादायक घटना समोर आली असून याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही घटना ५ मार्च रोजी अकोला शहरातील नामवंत सराफा गल्ली परिसरात घडली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या या घटनेत एक व्यक्ती रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी वाहनांची तोडफोड करताना दिसत आहे. कोणतेही कारण नसताना दुचाकी गाड्यांचे नुकसान केल्यानंतर संबंधित व्यक्ती जवळील एका दुकानात घुसली आणि सराफा व्यापाऱ्याला शिवीगाळ करत मारहाण केली. या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. विशेष म्हणजे भीतीच्या वातावरणामुळे अनेक व्यापाऱ्यां पोलिसांत तक्रार देण्यासही पुढे येत नसल्याचे समोर येत आहे. दरम्यान, हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता या व्हिडिओच्या आधारे पोलिसांकडून संबंधित व्यक्तीवर काय कारवाई केली जाणार, याकडे व्यापाऱ्यांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowMar 11, 2026 11:36:390
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 11, 2026 11:36:110
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 11, 2026 11:17:050
Report
SNSWATI NAIK
FollowMar 11, 2026 11:16:530
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 11, 2026 10:49:200
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 11, 2026 10:48:210
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 11, 2026 10:45:190
Report
PNPratap Naik1
FollowMar 11, 2026 10:22:080
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 11, 2026 10:05:260
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 11, 2026 10:01:460
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 11, 2026 09:36:130
Report
AKAMAR KANE
FollowMar 11, 2026 09:30:500
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 11, 2026 09:11:360
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 11, 2026 09:11:140
Report