Back
नाशिक में दहावी के छात्र पर हमला: परीक्षा केंद्र के बाहर 10-15 युवकों ने किया हमला
SGSagar Gaikwad
Mar 11, 2026 10:48:21
Nasik, Maharashtra
नाशिक
- *नाशिक मध्ये एका दहावीच्या विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ला*
- दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने केला हल्ला
- नाशिकच्या भद्रकाली परिसरात घडली घटना
- न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट समोर घडली घटना
- दहावीचा पेपर देऊन बाहेर आल्यावर केला हल्ला
- हल्ल्याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट भद्रकाली पोलीस करत आहेत अधिक तपास
दहावीच्या परीक्षा देऊन बाहेर पडताच 10-15 जणांनी केला हल्ला नाशिक शहरात धक्कादायक घटना समोर आली आहे. न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट, स्व. सौ. रत्नप्रभाकर वैशंपायन कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे दहावीचा पेपर देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव तौकीर नईमुद्दीन अन्सारी आहे, तो दूध बाजार परिसरातील रहिनूमा स्कूलमध्ये शिकणारा दहावीचा विद्यार्थी. तौकीर हा कोर्टासमोरील परीक्षा केंद्रावर दहावीचा पेपर देण्यासाठी आला होता. पेपर संपल्यानंतर तो गेटसमोर बाहेर येताच 10 ते 15 जणांच्या टोळक्याने त्याच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या डोक्यावर गंभीर मार लागला असून तो गंभीर जखमी झाला आहे. घटनेनंतर त्याला तात्काळ नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे नाशिकमध्ये शाळकरी मुलांचेही जीवन सुरक्षित आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या परीक्षा केंद्राबाहेर अशी घटना घडल्यामुळे पालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowMar 11, 2026 12:18:430
Report
SNSWATI NAIK
FollowMar 11, 2026 11:36:390
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 11, 2026 11:36:110
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 11, 2026 11:17:050
Report
SNSWATI NAIK
FollowMar 11, 2026 11:16:530
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 11, 2026 10:49:200
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 11, 2026 10:45:190
Report
PNPratap Naik1
FollowMar 11, 2026 10:22:080
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 11, 2026 10:21:520
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 11, 2026 10:05:260
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 11, 2026 10:01:460
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 11, 2026 09:36:130
Report
AKAMAR KANE
FollowMar 11, 2026 09:30:500
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 11, 2026 09:11:360
Report