Back
LPG की कमी से कोल्हापुर उद्योगों में ऑक्सीजन सिलेंडर पर भी असर
PNPratap Naik1
Mar 11, 2026 10:22:08
Kolhapur, Maharashtra
केंद्र सरकारने उद्योगांमध्ये LPG गॅसच्या वापरावर निर्बंध घातल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक उद्योग अडचणीत आले आहेत. विशेष म्हणजे या निर्णयाचा फटका केवळ उद्योगांनाच नाही तर ऑक्सिजन सिलेंडर उद्योगालाही बसू लागला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 70 ते 80 टक्के उद्योगांमध्ये LPG गॅससोबत ऑक्सिजन सिलेंडरचा वापर केला जातो. त्यामुळे उद्योगांना LPG गॅस मिळाला नाही तर ऑक्सिजन सिलेंडरचाही उपयोग होत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
उद्योगांना LPG गॅसच्या तुटवड्यामुळे ऑक्सिजन इंडस्ट्रीही अडचणीत
कोल्हापूर जिल्ह्यातील 70 ते 80% उद्योगांमध्ये फॅब्रिकेशन, इंजिनिअरिंग आणि शेती अवजारे निर्मितीसाठी ऑक्सिजन सिलेंडर आणि LPG गॅसचा एकत्रित वापर केला जातो. मात्र केंद्र सरकारच्या निर्णयानुसार उद्योगांसाठी LPG गॅस उपलब्ध होत नसल्याचे उद्योग क्षेत्रातून सांगितले जात आहे. लोखंडी साहित्य कापण्यासाठी आणि वेल्डिंगसाठी ऑक्सिजन आणि LPG गॅस हे दोन्ही घटक एकत्र वापरावे लागतात. त्यामुळे LPG गॅस नसल्यास ऑक्सिजन सिलेंडर असला तरी उद्योगांना त्याचा फारसा उपयोग होत नाही.
हॉप्स्टिकल सोबत उद्योगांमध्ये देखील ऑक्सिजनची मोठी गरज
एकूणच LPG गॅसच्या उपलब्धतेवर उद्योगांसह ऑक्सिजन इंडस्ट्रीही मोठ्या प्रमाणात अवलंबून असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे उद्योगांसाठी LPG गॅसचा पुरवठा तातडीने सुरू करण्यात यावा, अशी मागणी आता उद्योग क्षेत्रातून होत आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowMar 11, 2026 11:36:390
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 11, 2026 11:36:110
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 11, 2026 11:17:050
Report
SNSWATI NAIK
FollowMar 11, 2026 11:16:530
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 11, 2026 10:49:200
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 11, 2026 10:48:210
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 11, 2026 10:45:190
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 11, 2026 10:21:520
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 11, 2026 10:05:260
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 11, 2026 10:01:460
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 11, 2026 09:36:130
Report
AKAMAR KANE
FollowMar 11, 2026 09:30:500
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 11, 2026 09:11:360
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 11, 2026 09:11:140
Report