Back
नवी मुंबई के bogus कॉल सेंटर पर बड़े बदमाश पुलिस छापेमारी: 17 गिरफ्तारी
SNSWATI NAIK
Nov 21, 2025 07:10:01
Navi Mumbai, Maharashtra
नवी मुंबई सायबर पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेने संयुक्त कारवाईत तुर्भेतील मिलेनियम पार्क, बिल्डिंग क्रमांक 03, तिसरा मजला येथे सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटरवर छापा टाकून एक मोठा सायबर फसवणूक रॅकेट उधळून लावले. शेअर्स मार्केट ट्रेडिंगमध्ये नफा मिळण्याचे आमिष व अमेरिकन नागरिकांच्या संगणकांमध्ये व्हायरस हल्ला करून मदतीच्या नावाखाली आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीतील अक्षय शिर्के, गगन थापर सह १७ जणांना अटक करण्यात आली. तर शिव शर्मा हा मुख्य सूत्रधार फरार आहे. छाप्यादरम्यान The Wealth Growth, The Capital Services, Sigma, Trade Knowledge Services आणि Stock Vision या नावांनी चालणाऱ्या बनावट कंपन्यांमध्ये 97 युवक व युवती संगणकावरून व्हॉट्सअॅप ग्रुप्स व कॉलच्या माध्यमातून शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचे आश्वासन देत असल्याचे आढळले. संगणक तपासणीअंती फसवणुकीसाठी वापरलेले चॅट मेसेजेस, विविध बँक खात्यांची माहिती, व्यवहारांचे तपशील तसेच नागरिकांनी फसवणूक झाल्याची तक्रारीचे पुरावे जप्त करण्यात आले. तपासादरम्यान उघड झालेल्या 71 बँक खात्यांपैकी 61 खात्यांतून तब्बल 12.29 कोटींचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले. National Cyber Crime Reporting Portal (NCCRP) वर या प्रकरणाशी संबंधित संपूर्ण देशभरातून 31 तक्रारी नोंद झालेल्या आहेत. याशिवाय World Solution या कंपनीमार्फत अमेरिकन नागरिकांच्या संगणकांमध्ये Malware/Ransomware Attack करून स्क्रीनवर Microsoft Error Code दाखवत बनावट Microsoft Customer Support च्या नावाने फसवणूक करण्यात येत असल्याचेही उघड झाले. संपूर्ण कारवाईत 21 सीपीयू, 5 लॅपटॉप, 5 SSD, 38 मोबाईल फोन आणि GSM सर्व्हर असा मुद्देमाल जप्त केला. सायबर पोलीस ठाणे, गु.र.नं. 55/2025 कलम 318(4), 319(2), 61(2) भा.दं.वि. व माहिती तंत्रज्ञान अधिनियम 66(C), 66(D) अन्वये गुन्हा नोंदण्यात आला असून 20 आरोपींना 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील फसवणुकीचा व्याप मोठा असून आणखी आरोपींना अटक होण्याची शक्यता असून पुढील तपास पोलिस करत आहेत.
111
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 21, 2025 07:50:290
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 21, 2025 07:32:1232
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 21, 2025 07:19:30106
Report
KJKunal Jamdade
FollowNov 21, 2025 07:19:1059
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 21, 2025 07:19:0149
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 21, 2025 07:18:43130
Report
AKAMAR KANE
FollowNov 21, 2025 07:17:5077
Report
SNSWATI NAIK
FollowNov 21, 2025 07:00:25Navi Mumbai, Maharashtra:बेलापूर उरण मार्गांवर वाहतूक कोंडी. दोन ते तीन किलोमीटरपर्यत वाहनाच्या रांगा. डांबर टँकर पलटी झाल्याने वाहतूक कोंडी. सध्या टँकर बाजूला करुन वाहतूक कोंडी पूर्वरत करण्याचं काम वाहतूक पोलीस करीत आहेत
87
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 21, 2025 06:46:13177
Report
MNMAYUR NIKAM
FollowNov 21, 2025 06:35:49108
Report
AKAMAR KANE
FollowNov 21, 2025 06:19:09155
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 21, 2025 06:15:51191
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 21, 2025 06:02:5391
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 21, 2025 06:00:36167
Report