Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444001

हिवारखेड नगरपालिका चुनाव: शिंदे-प्रहार का साथ, भाजपा की कड़ी चुनौती

JJJAYESH JAGAD
Nov 21, 2025 07:18:43
Akola, Maharashtra
एकेकाळी एकत्र येत राजकारण करणारे दोन्ही पक्षांमध्ये आता कडवट भूमिका दिसत असतानाच, हिवरखेडमध्ये मात्र एकत्र येऊन निवडणुक लढवण्याचा केलेला निर्णय मतदारांमध्ये मोठा चर्चेचा विषय बनला आहे.या अनपेक्षित राजकीय समीकरणामुळे हिवरखेडची निवडणुूक अधिकच उत्सुकता वाढवणारी ठरली आहे.एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांचे विचार जुळत असल्याने बच्चू कडू यांनी पाठिंबा दिला असल्याचं येथील उमेदवार म्हणत आहे।नगरपरिषद अस्तित्वात आल्यानंतर सर्वच पक्षांनी येथे मोर्चेबांधणीला वेग दिला असून, प्रचार मोहिमा जोरात सुरू आहेत। भाजपनेही या निवडणुकीत दमदार तयारी करत जिल्हा परिषद सदस्या आणि अनुभवी राजकारणी सुलभा दुतोंडे यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या प्रचाराचा नारळही फोडण्यात आला असून, प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्याचे आश्वासन भाजपकडून दिले जात आहे.हिवरखेड नगरपरिषद क्षेत्रात तब्बल २०,१७३ मतदार असून अध्यक्षपदासाठी ७ उमेदवार रिंगणात आहेत. सर्वच पक्ष बूथ पातळीवर शक्तीझोत लावत असताना, शिवसेना (शिंदे गट) आणि प्रहार जनशक्ती पक्षाची झाली असलेली स्थानिक युती हे संपूर्ण निवडणुकीचे समीकरणच बदलणारे ठरू शकते. त्यामुळे अंतिम क्षणी कोणाचे पारडे जड ठरणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे।दशकांपासून नगरपरिषद दर्जासाठी लढा देत अखेर हा दर्जा मिळालेल्या हिवरखेडमध्ये होत असलेली पहिलीच निवडणुūk राजकीय दृष्ट्या अत्यंत रंगतदार बनली आहे. शिवसेना–प्रहार युतीचा प्रभाव की भाजपची संघटनशक्ती ,अंतिम निकाल कोणाच्या बाजूने झुकतो, हे पाहण्यासाठी नागरिक उत्सुक आहेत。
130
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSACHIN KASABE
Nov 21, 2025 08:09:30
Pandharpur, Maharashtra:शहाजी बापू पाटील आदर्शवत आहेत. मैत्रीपूर्ण लढत व्हावी हा त्यांचाच प्रस्ताव होता. सांगोल्यातील नगरपालिका निवडणूकित सुरू असलेल्या घडामोडी वरून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले स्पष्ट शब्दात उत्तर मी सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री असूनही शहाजी बापू पाटील यांनी युती मध्ये लढण्याचा प्रस्ताव दिला नाही. एकदा भेटले तेव्हा त्यांनी मैत्रीपूर्ण लढू अशी भूमिका त्यांनी घेतली. शहाजी बापू जवळचे मित्र आहेत सहकारी आहेत. गावातली परिस्थिती बघून व्यथित झाले आहेत. निवडणुकीत आणि त्यानंतरही आमचे संबंध चांगले राहतील. ते काल ही आमचे मित्र होते उद्याही राहतील. अशी भूमिका घेऊन शहाजी बापू पाटील यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला
10
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 21, 2025 08:04:00
Satara, Maharashtra:सातारा - तपोवन मधील झाडे तोडून कुंभमेळ्यासाठी झाडे तोडणे दुर्दैवाची गोष्ट आहे. याला खूप विरोधच करावा लागणार आहे. तुम्ही एक झाड तोडून दहा झाडे लावणार असे फालतू विधान करत असाल तर आम्ही एक झाड तोडू नये यासाठी 100 माणसे मारू पण एक झाड तोडून देणार नाही.. सरकार आपला असून सुद्धा ते बेजबाबदार वागत आहे माझ्या तोंडात शिव्या येत आहेत अशा शब्दात आपला राग व्यक्त अभिनेते सयाजी शिंदे यांनी केला आहे . नागपूरला 45 हजार झाडे तोडणार आहेत,कर्जत मध्ये झाडे तोडणार आहेत. आपल्या डोळ्यासमोर जी झाडे तोडणार आहेत ती आपल्याला वाचवायचे आहेत. नाहीतर माणसं पेटून उठतील मी फक्त निमित्त पात्र आहे. राज्य सरकारने डोळे उघडले पाहिजे, झाडे लावलेल्या हिशोब द्या तर देणार.. तुम्ही काय आवाज उठवला तर त्याचा आवाज दाबला जातो पाहिजे त्याला बोलता आले पाहिजे .. ढोंगी सर्व पक्षातील लोक बोलायला लागले आहेत.. अभिनेते सयाजी शिंदे यांनी आपले खंत मांडली.. बाईट - सयाजी शिंदे
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Nov 21, 2025 07:55:18
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Nov 21, 2025 07:50:29
Amravati, Maharashtra:काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नजरकैद केल्याने यशोमती ठाकूर आक्रमक; कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांच्या विरोधात होणार होते आंदोलन काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी नजर कैदेत ठेवल्याने काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर पोलिसांवर संतापल्या असून पोलिसांच्या नजर कैदेत असलेल्या कार्यकर्त्यांना यशोमती ठाकूर यांनी स्वतःच्या गाडीत बसवत परत आणलं आहे. अमरावतीच्या चांदूर बाजार–शिराळा मार्गावर काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करणार होहो. पोलिसांनी वर्दीचा गैरफायदा फायदा घेऊ नये पोलिसांना आम्ही घाबरत नाही अमरावतीमध्ये आमदार संजय खोडके यांची दादागिरी चालली आहे अशी टीका यशोमती ठाकूर यांनी आमदार संजय खोडके यांच्यावर केली आहे. खोडके यांना महापालिकेतील खुली जागा हरपायची आहे त्यामुळे हे सगळं ते करत आहे. तसंच आम्ही पोलिसांना घाबरत नाही अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे घाबरले त्यामुळे ते सत्तेत गेले मात्र आम्ही शेतकऱ्यांसोबत राहू असे यशोमती ठाकूर म्हणाल्या आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 21, 2025 07:32:12
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर. मंत्री संजय शिरसाठ यांची पत्रकार परिषद. शिंदे नाराजी, उद्धव ठाकरे आरोप. गेल्या आठवड्यात काही मंत्री न गे्ल्याने महाराष्ट्रात जो वादळ निर्माण झाला होता त्यावर आता पडदा पडला आहे. काय केलं पाहिजे, काय नाही याची आचार सहिता ठरवावी असे होते. यात वाद आहे असे काही नाही. शिंदे यांनी पत्रकार परिषद मध्ये सर्व स्पष्ट केले आहे. शिंदे यांची भेट ही पूर्वनियोजित होती. मात्र काहीजण कविता करू लागले, काही ध्न्यांनी त्यावर बोलू लागले. उद्धव ठाकरे यांच्या अवस्था सध्या धृतराष्ट्र सारखी आहे. टोमणे मारण्याचा प्रयत्न करतात. कविता करण्याचा प्रयत्न करतात. शिंदे यांना भूमिका मांडायची असेल तर ते मिडिया समोर मांडतात. युतीत मिठाचा खडा पडेल असे बिलकुल नाही. ऑन नाराजी...नेत्यांची देहबोली. प्रत्येकजण आपापल्या वेळेनुसार जात असतात. फ्लाईट मध्ये ते नेहमी वेगवेगळे जातात.. चुकून कोणी पाहिले नाही तर त्याच बाऊ करू नये. उद्धव ठाकरे यांनी आता वयोमानानुसार मोठे प्रगल्भ व्हावं... दुसऱ्याचा वास घेणे एवढ्या मोठ्या नेत्याला शोभत नाही. टोमणे मारणे बंद करा.. पक्ष संपतो ते बघण्यापेक्षा टोमणे मारणे योग्य वाटत असेल तर लखलाभ. शिंदे यांचे मोदी आणि शाह सोबत चांगले सबंध आहे. दानवे वक्तव्य. त्याचा संबंध महाराष्ट्रातील भाजप नेत्यांशी जोडणे योग्य नाही. सर्वांशी संबंध चांगले आहे. भांड्याला भांडे लागते, घर म्हंटल्यावर भांडे लागते. घटस्फोट सारखी परिस्थिती नाही. ऑन पार्थ पवार एफ आय आर. मुख्यमंत्री यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे, कुणालाही वाचवले जाणार नाही. भविष्यात जे काही कायदेशीर आहे. जे अडकतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. ऑन शीतल तेजवानी vip चौकशी. vip ट्रीटमेंट का दिली याबाबत कल्पना नाही. तेथील अधिकारी याचा उत्तर देऊ शकतील. ऑन बांगर हिंगोली. तिन्ही नेत्यांमध्ये बैठक होऊन आचार संहिता ठरली आहे. सर्वांना याची आचार साहित्याचे पालन करावे अशी सूचना सर्वांना दिली आहे. ऑन एकमेकांना चर्चा. इतका छोटा विषय ५० मिनिटांच्या भेटीत चालत नसतो... एवढ्या छोटा विषयावर चर्चा झाली की नाही. देशाच्या मीडियाचा माध्यमातून शहा पर्यंत ही बाब गेली असावी. ऑन बिनविरोध निवडणूक. छोट्या मोठ्या निवडणुकीत अनेक प्रतिनिधी बिनविरोध निवडून येत असतात. जे आरोप करताय त्यांच्याबाबत झालं नाही का, पवार साहेबांनी केले आहे, सगळ्यांनी केले आहे.... ऑन नगरसेवक पद लिलाव. मला कल्पना नाही, बोली लावून नगरसेवक असे पहिल्यांदा ऐकले. असे असेल तर राजकारणाला चांगले दिवस नाहीत ऑन आमदार अधिकारी उभे राहणे. लोकशाही मध्ये जो प्रक्रिया आहे त्यातील हा एक भाग आहे. हा प्रोटोकॉल आधीपासून आहे. काही अधिकारी स्वतःला मोठे समजता खुर्चीवरून उठत नाही. आचार सहित वगळता इतर वेळी लोकप्रतिनिधींचा सन्मान झालाच पाहिजे. ऑन लाडकी बहीण. असे प्रकार समोर आल्यानंतर सरकारने सांगितले होते, आपले नाव सरेंडर करून बाहेर पडा, अनेकजण बाहेरदेखील पडले होते. आता कारवाई करायची नाही... मात्र यावर गंभीर पाऊले उचलावी. ऑन मुंबई ट्रेन वाद तरुण मृत्यू. अत्यंत वाईट आणि दुर्दैवी घटना आहे. भाषेचा वाद इथपर्यंत जाऊ नये. डॉक्टरांच्या स्वप्न पाहणाऱ्या तरुणाचा मृत्यू होणे म्हणजे हा महाराष्ट्रावर लागलेला कलंक म्हणावं लागेल... ऑन विरोधक एकत्र निवडणूक मुंबई. शरद पवार यांनी आतापर्यंत सायलेन्स भूमिका घेतली आहे. मनसे ठाकरे एकत्र आल्यावर बोलले फक्त... कुणाचीही युती करा असे संकेत त्यांनी दिले आहे. काँग्रेसकडे त्यांचा कल आहे. असे झाले तर मनसे आणि उद्धव ठाकरेंची सेना बाहेर पडावे लागेल. ऑन ससून रुग्णालयात प्रकार. ससून होटेलच्या बाहेर बसविण्यात आले मी तातडीने दाखल घेतली जो कुणी जबाबदार असेल त्यावर कारवाई करावी अशा सूचना केल्या आहे. सहानुभूमीतने विचार करून माझ्या खात्याकडून काय करता येईल पाहू.. ऑन भाजप मुंबई सर्वे - चांगले आहे. निवडणूक जाहीर होऊ द्या, लोकांचे जन मत तयार होत नाही तो पर्यंत अशी सर्व्हे प्राथमिक असते. खरे सर्व्हे निवडणुंक जवळ असल्यावर असतात... ऑन सुनील तटकरे संपर्कात. ते कोकणातील असल्याने त्यांना राजकारण माहिती असेल मला काहीही माहिती नाही.. ऑन ओळखपत्र - टँकमध्ये ओळखपत्र कशाला टाकले, तेथून रॅकेट चालत असावे असे दिसत आहे. अत्यंत गांभीर्यपूर्वक याची चौकशी झाली पाहिजे. हे कुणी जमा केले कुणी काढले याची चौकशी झाली पाहिजे. ऑन उद्धव ठाकरे, काँग्रेस. हे दिल्लीला कुणाला भेटायला जात आहे. वेळ आल्यावर राहुलगंधीला सामानाच्या फ्रंट पेजवर छाप्याची खाज असते. राहुल गांधी सोनिया गांधी यांना विचारत नाही. आणि यांची कसली ताकत म्हणून यांना सर्व साथ घेऊन लढायचे आहे... झालेली चूक झाकण्यासाठी हे करतात. काँग्रेस आधीही कुणाची न्हवती, आजही नाही, उद्याही राहणार नाही... कसली ताकद आली, नाटकातील राजासारखा बोलतात, मेकअप केलेला चेहरा कधीतरी पुसा.... ताकद होती तर एवढे कमी आमदार कसे, नगरसेवक का नाही.. ऑन मनसे ठाकरे काँग्रेस - असेच एकमेकावर वर बोलतील याची आघाडी टिकणार नाही. पडळकर कार्यकर्ते भाजप प्रवेश... यातिनी नेते घेतील, याचा काय कार्यकर्ते ठरवतील...
32
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 21, 2025 07:17:50
Nagpur, Maharashtra:नागपूर चंद्रशेखर बावनकुळे (महसूल मंत्री) मैं आज यवतमाळ, पुसद, और वर्धा, देवळी इन स्थानों पर प्रचार कर रहा हूँ.. महाराष्ट्र की भाजपा के सभी विधायक, खासदार और नेताओं ने प्रचार की जिम्मेदारी संभाली है.. और महायुति 51% मत लेकर जीत जाएगी इसका मुझे विश्वास है.. Mumbai सर्वे हम भाजपा महायुती मिलकर इस बार मुंबई का महापौर बनवेंगे। मुंबई की जनता विकास के पक्ष में है.. और भाजपा के पक्ष में है.. ठाणे कानशिलात इस घटना की जिम्मेदारी लेकर उचित कार्रवाई की जाएगी.. भाजप धमकी -- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष के जिलाध्यक्ष ने आरोप लगाया कोई धमकी नहीं दी गई.. यह हमारे संस्कार और संस्कृति नहीं.. शितल तेजवानी स्पेशल ट्रीटमेंट.. क्या और कैसी ट्रीटमेंट दी गई यह पुलिस देखेगी.. परंतु इस घोटाले में जो भी आरोपी होंगे उन्हें हम सख्ती से सजा देंगे.. मालेगाव प्रकरण फासी की मांग.. जिन लोगों ने इतना बड़ा अत्याचार किया उन्हें फांसी होनी चाहिए।
77
comment0
Report
SNSWATI NAIK
Nov 21, 2025 07:10:01
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई सायबर पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेने संयुक्त कारवाईत तुर्भेतील मिलेनियम पार्क, बिल्डिंग क्रमांक 03, तिसरा मजला येथे सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटरवर छापा टाकून एक मोठा सायबर फसवणूक रॅकेट उधळून लावले. शेअर्स मार्केट ट्रेडिंगमध्ये नफा मिळण्याचे आमिष व अमेरिकन नागरिकांच्या संगणकांमध्ये व्हायरस हल्ला करून मदतीच्या नावाखाली आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीतील अक्षय शिर्के, गगन थापर सह १७ जणांना अटक करण्यात आली. तर शिव शर्मा हा मुख्य सूत्रधार फरार आहे. छाप्यादरम्यान The Wealth Growth, The Capital Services, Sigma, Trade Knowledge Services आणि Stock Vision या नावांनी चालणाऱ्या बनावट कंपन्यांमध्ये 97 युवक व युवती संगणकावरून व्हॉट्सअॅप ग्रुप्स व कॉलच्या माध्यमातून शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचे आश्वासन देत असल्याचे आढळले. संगणक तपासणीअंती फसवणुकीसाठी वापरलेले चॅट मेसेजेस, विविध बँक खात्यांची माहिती, व्यवहारांचे तपशील तसेच नागरिकांनी फसवणूक झाल्याची तक्रारीचे पुरावे जप्त करण्यात आले. तपासादरम्यान उघड झालेल्या 71 बँक खात्यांपैकी 61 खात्यांतून तब्बल 12.29 कोटींचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले. National Cyber Crime Reporting Portal (NCCRP) वर या प्रकरणाशी संबंधित संपूर्ण देशभरातून 31 तक्रारी नोंद झालेल्या आहेत. याशिवाय World Solution या कंपनीमार्फत अमेरिकन नागरिकांच्या संगणकांमध्ये Malware/Ransomware Attack करून स्क्रीनवर Microsoft Error Code दाखवत बनावट Microsoft Customer Support च्या नावाने फसवणूक करण्यात येत असल्याचेही उघड झाले. संपूर्ण कारवाईत 21 सीपीयू, 5 लॅपटॉप, 5 SSD, 38 मोबाईल फोन आणि GSM सर्व्हर असा मुद्देमाल जप्त केला. सायबर पोलीस ठाणे, गु.र.नं. 55/2025 कलम 318(4), 319(2), 61(2) भा.दं.वि. व माहिती तंत्रज्ञान अधिनियम 66(C), 66(D) अन्वये गुन्हा नोंदण्यात आला असून 20 आरोपींना 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील फसवणुकीचा व्याप मोठा असून आणखी आरोपींना अटक होण्याची शक्यता असून पुढील तपास पोलिस करत आहेत.
129
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Nov 21, 2025 06:35:49
Buldhana, Maharashtra:बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मोहना बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण पेशाला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली.. शाळेचे मुख्याध्यापक धम्मसागर कांबळे हे दारूच्या नशेत शाळेच्या आवारातच धिंगाणी घालत असल्याचे पालकांच्या लक्षात आलेय .. ज्यावेळी मुख्याध्यापक कांबळे दारूच्या नशेत शाळेत दारू पिऊन आले आणि धिंगाणा घालायला लागले तेव्हा शाळेत सर्व विद्यार्थी आणि शिक्षक हजर होते, आणि प्रार्थना सुद्धा सुरू होती.. या संदर्भातील काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे.. तर ग्रामस्थानी या प्रकाराचा निषेध केला असून शिक्षण विभागाकडून तातडीने कारवाईची मागणी ग्रामस्थानी केलीय ..
133
comment0
Report
Advertisement
Back to top