Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

किसानों ने राजू शेट्टी को नागरिक सम्मान दिया, 3500 FRP से किसान लाभ

SMSarfaraj Musa
Nov 21, 2025 06:02:53
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
ऊसाला दर मिळवून दिल्याबद्दल माजी खासदार राजू शेट्टी यांचा सांगलीतल्या वसगडे येथे सत्कार पार पडलाय. ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून राजू शेट्टी यांचा जाहीर सत्कार करण्यात आला आहे. यंदाच्या हंगामामध्ये राजू शेट्टींच्या भूमिकेमुळे कारखानदारांकडून 3500 FRP जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा आर्थिक फायदा झाल्याने पलूस तालुक्यातल्या शेतकऱ्यांकडून राजू शेट्टींचा नागरी सत्कार करत शेतकऱ्यांनी राजू शेट्टींचा जाहीर आभार मानेल आहेत.
91
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
MNMAYUR NIKAM
Nov 21, 2025 06:35:49
Buldhana, Maharashtra:बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मोहना बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण पेशाला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली.. शाळेचे मुख्याध्यापक धम्मसागर कांबळे हे दारूच्या नशेत शाळेच्या आवारातच धिंगाणी घालत असल्याचे पालकांच्या लक्षात आलेय .. ज्यावेळी मुख्याध्यापक कांबळे दारूच्या नशेत शाळेत दारू पिऊन आले आणि धिंगाणा घालायला लागले तेव्हा शाळेत सर्व विद्यार्थी आणि शिक्षक हजर होते, आणि प्रार्थना सुद्धा सुरू होती.. या संदर्भातील काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे.. तर ग्रामस्थानी या प्रकाराचा निषेध केला असून शिक्षण विभागाकडून तातडीने कारवाईची मागणी ग्रामस्थानी केलीय ..
29
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 21, 2025 06:19:09
Nagpur, Maharashtra:नागपूर - - ग्रामपंचायतींतील संगणक परिचालकांचे कामबंद आंदोलन, चार महिन्यांपासून मानधनही नाही - नागपूर जिल्ह्यातील सावनेर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ७५ ग्रामपंचायती मध्ये कार्यरत संगणक परिचालकांनी बेमुदत कामबंद आंदोलन सूर केले आहे - संगणक परिचालकांना चार महिन्यांपासून मानधन देण्यात आले नाही, वारंवार पाठपुरावा करूनही मानधन वेळेवर मिळत नाही त्यामुळे काम बंद केल्याचे संगणक परिचालकांनी सांगितले - गेल्या चार महिन्यांपासून मानधन नसल्याने संगणक परिचालक आर्थिक संकटात सापडला आहे - त्यामुळे आता मानधन मिळाल्यावर काम करू, अशी भूमिका ग्रामपंचायती मध्ये कार्यरत संगणक परिचालकांनी घेतली आहे - शासनाने आपले सरकार सेवा प्रकल्प कार्यान्वित करण्याकरता आई टी आई लिमिटेड व रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या दोन कंपन्यांसोबत करार केला होता - या कंपन्यांची सदर प्रकल्पासाठी सेवा पुरवठादार म्हणून मुदत १८ सप्टेंबर २०२५ रोजी संपुष्टात आली आहे या मुळे ग्रामपंचायत संगणक परिचालक यांच्या मानधनाची जबाबदारी कुणाकडे राहील याचे स्पष्ट निर्देश शासनाकडून देण्यात आले नाही ज्यामुळे मानधनाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे
155
comment0
Report
SGSagar Gaikwad
Nov 21, 2025 06:00:36
Nashik, Maharashtra:नाशिकमधील कॉबॅक्ट एव्हिएशन स्कुल गांधीनगर येथे आज सैन्य दलाच्या महत्वाच्या संयुक्त पासिंग आऊट परेड संपन्न झाला.. CAC-44, AHIC-43, बेसिक RPAS IP आणि OB Series 01 या चारही कोर्सेसचा संयुक्त दीक्षांत सोहळा पार पडला.. या परेडदरम्यान विविध कोर्सेस पूर्ण केलेल्या अधिकारी प्रशिक्षणार्थींना प्रतिष्ठेच्या हेलिकॉप्टर आणि RPAS विंग्ज, बॅजेस आणि ट्रॉफीज प्रदान करण्यात आले. हा सोहळा दक्षिणी कमांडचे GOC-in-C लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. दीक्षांत सोहळ्याच्यानंतर युद्ध भूमीवरील थरार अनुभवायला मिळाला. शिस्तबद्ध पडणाऱ्या पाऊल, अभिमानाने भरलेल्या ऊर, देशसेवेसाठी सज्ज झालेले तरुण अशा वातावरणात गांधीनगर येथील कॉम्बॅक्ट एव्हिएशन स्कूलमध्ये दीक्षांत सोहळा संपन्न झाला
128
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 21, 2025 05:49:03
Akola, Maharashtra:राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अकोला जिल्ह्यातील हिवरखेड नगरपरिषद विशेष ठरत आहे. दशकांपासून नगरपरिषद दर्जासाठी सातत्याने लढा देणाऱ्या ग्रामस्थांच्या संघर्षाला यंदा यश मिळाले असून, ग्रामपंचायतीपासून नगरपरिषदेपर्यंतचा प्रवास करणारी सध्याच्या राज्यातील निवडणुकीतील ही एक मात्र नगरपरिषद आहे आणि पहिल्याच निवडणुकीत अध्यक्षपदाची धुरा महिलेकडे सोपवण्यात आली आहे. नगरपरिषद अस्तित्वात आल्यानंतर सर्वच प्रमुख पक्षांनी येथे मोर्चेबांधणी गतीने सुरू केली आहे. भाजपने अनुभवी राजकारणी आणि जिल्हा परिषद सदस्या सुलभा दुतोंडे यांच्या नावावर विश्वास ठेवत अध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर केली असून, त्यांच्या प्रचाराचा नारळही फोडण्यात आला आहे. शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली विकासकामे मार्गी लावू, असे आश्वासन भाजपने मतदारांना दिले आहे. हिवरखेड नगरपरिषद क्षेत्रात सुमारे २०,१७३ मतदार असून अध्यक्षपदासाठी तब्बल ७ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे अंतिम क्षणी अल्प मतांच्या फरकाने कोणाचे पारडे जड ठरणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सर्वच पक्षांनी बूथ पातळीवर शक्तीझोत लावण्यास सुरुवात केली आहे. या नगरपरिषद निवडणुकीत आणखी एक राजकीय घडामोड चर्चेत आहे. सत्ताधारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला, कट्टर विरोधक मानल्या जाणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी स्थानिक पातळीवर दिलेला पाठिंबा ही अभूतपूर्व युती मतदारांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. राज्यात दोन्ही पक्षांमध्ये कडवट भूमिका दिसत असतानाच, हिवरखेडमध्ये मात्र एकत्र येऊन निवडणूक लढवण्याच्या निर्णयामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पहिल्यांदा नगरपरिषदेचा दर्जा मिळालेल्या हिवरखेडमध्ये होत असलेली ही निवडणूक त्यामुळे राजकीय दृष्ट्या अधिक रंगतदार बनली असून, अंतिम निकाल कोणाच्या बाजूने झुकतो हे पाहण्यासाठी नागरिक उत्सुक आहेत.
125
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 21, 2025 05:33:31
Chandrapur, Maharashtra:चंद्रपुरात सरदार पटेल जयंती निमित्ताने युनिटी मार्च चे आयोजन, शहरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी झाले सहभागी, युवकांना एकात्मतेची दिली गेली शपथ चंद्रपुरात मेरा युवा भारत अभियानाच्या निमित्ताने सरदार पटेल जयंती निमित्ताने युनिटी मार्च चे आयोजन करण्यात आले. स्थानिक सरदार पटेल महाविद्यालयात शहरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी एकत्र येत यात सहभागी झाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी युवकांना एकात्मतेची शपथ दिली गेली. देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरणानंतर शहराच्या प्रमुख मार्गांवरून युनिटी मार्च काढण्यात आला. स्वातंत्र्य लढ्यातील सरदार पटेल यांचे योगदान नव्या पिढीला ज्ञात व्हावे यासाठी युनिटी मार्च चे आयोजन करण्यात आले.
171
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 21, 2025 05:17:47
Nagpur, Maharashtra:नागपूर दत्ता भरणे (राज्य कृषी मंत्री) पर सलील देशमुख. ही माहिती मला आपल्या माध्यमातून मिळाली, मात्र कोणताही मोठा नेता येत असला तर त्याचं स्वागत केलं जातं. देशमुख घराणे या भागातील मोठे घराण असल्याने याबद्दल जो निर्णय घ्यायचा ते आमचे पक्षाचे अध्यक्ष अजित पवार घेतील. MSP भाव: एमएसपी पेक्षा कोणी कमी भाव देत असतील तर त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाणार. स्वतः पणनमंत्र्यांचं यावर बारीक लक्ष असल्याने पणन विभाग आणि कृषी विभाग ही योग्य तो निर्णय घेईल. निसर्गाच्या संकटामुळे त्रासलेल्या शेतकऱ्यांच्या मागे राज्य सरकार उभे राहणार हे आमचं कर्तव्य आहे. पेरणी पासून ते कापणी पर्यंत शेतकऱ्यांना काय सहकार्य करता येईल हे राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. नाफेड खरेदी: याबाबत निर्णय झाला असून लवकरात लवकर खरेदीला सुरुवात होईल. महेंद्र दळवी तटकरे टीका: महेंद्र दळवी काय टीका करतात यावर लक्ष देण्याची गरज नाही. तटकरे हे राज्याचे मोठे नेते असल्याने त्यांच्यावर कोण काय बोलने यावर बोलणे योग्य नाही. सलील देशमुख: प्रत्येकाला राजकारण करत असताना आपापलं स्वातंत्र्य असतं. सलील देशमुख यांना काही अडचणी आले असतील त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला असावा. त्यामुळे यावर अजितदादा योग्य ते निर्णय घेतील. मालेगाव आरोपी फाशी: ही घटना अत्यंत दुखद आणि वेदनादायक आहे त्यामुळे अशा लोकांना शंभर टक्के फाशीच दिली गेली पाहिजे. शासकीय कर्मचारी आमदार सोबत वागणूक नियम: कोणताही लोकप्रतिनिधी असला तरी एक शासकीय प्रोटोकॉल असतो. आमदार देखील लोकप्रतिनिधी असल्याने प्रोटोकॉलमुळे या गोष्टी झाल्या असतील. हसन मुश्रीफ क्लीन चीट: आरोप करणे दोषारोप करणे ठीक आहे, मात्र त्यामध्ये दोषारोप सिद्ध झाला नाही. हसन मुश्रीफ आमचे नेते आहेत, कदाचित त्यांनी झालेले आरोप चुकीचे होते, त्यामुळे ते आता निर्दोष सुटले आहे. नागपूर दत्ता भरणे, कृषिमंत्री (on सलील देशमुख.. राष्ट्रवादी AJ पक्षात जाणार) याबाबतीत आमचे नेते अजित पवार निर्णय घेतील. प्रत्येकाला राजकारण करताना काही अडचणी असतात, त्यामुळे देशमुख साहेबांना काही अडचणी आले असतील. पुढच्या काही गोष्टी महत्त्वाच्या असतील. काही अडचणी आल्यामुळे त्यांनी तो राजीनामा दिलेला असावा. या बाबतीत अजितदादा योग्य तो निर्णय घेतील.
163
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 21, 2025 05:16:37
Washim, Maharashtra:जिल्ह्यातील चार नगरपरिषद आणि एक नगर पंचायत निवडणुकीची धामधूम चांगलीच रंगली असून थंडीच्या दिवसात राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. जिल्ह्यातील पाच नगरअध्यक्ष पदासाठी तब्बल 63 उमेदवार तर 69 प्रभागांतील 124 नगरसेवकांसाठी 827 उमेदवार मैदानात आहेत. आज नामांकन अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असल्यामुळे सर्वच शहरांमध्ये उमेदवारांची मोठी लगबग पाहायला मिळत आहे. कोणत्या प्रभागातून किती उमेदवार माघार घेतात आणि अखेरीस प्रत्यक्ष लढत कोणकोणात होणार,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यंदाच्या निवडणुकीत अनेक प्रभागांत एकाच पक्षाचे अनेक उमेदवार रिंगणात उतरल्याने स्पर्धा अधिक चुरशीची झाली आहे. तिकीट न मिळाल्यामुळे काही जणांनी बंडखोरीचा मार्ग स्वीकारला आहे. त्यामुळे मनधरणी,बैठका, चर्चा आणि मोठ्या नेत्यांची मध्यस्थी अशी घडामोडी जिल्ह्यात सुरू आहेत. आज संध्याकाळी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतरच अध्यक्षपद आणि प्रभागनिहाय अंतिम स्पर्धेचे चित्र स्पष्ट होणार आहे.
172
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Nov 21, 2025 05:01:07
Beed, Maharashtra:बीड: आष्टी तालुक्यातील विविध भागात बिबट्याचा मुक्त संचार स्थानिकांकडून मोबाईल कॅमेऱ्यात कैद; वनविभागाने बंदोबस्त करावा स्थानिकांमधून मागणी बीडच्या आष्टी तालुक्यातील विविध भागात बिबट्या आढळून आल्यानं स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण, घाटा पिंपरी, माळींबा यासह पाटोदा परिसरात बिबट्याचा मुक्त संचार दिसून आला. अनेकांनी बिबट्याचा हा मुक्त संचार आपल्या मोबाईल कॅमेरात कैद केला. मागील महिनाभरापूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पुन्हा बिबट्याचा मुक्त संचार आढळून आल्याने वनविभागाने याचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिकांमधून केली जाते आहे.
230
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 21, 2025 05:00:45
Satara, Maharashtra:सातारा - आज नगरपालिका निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटचा दिवस आहे. सातारा जिल्ह्यातील महत्त्वाची समजली जाणारी सातारा नगरपालिका निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरले आहे. हे अपक्ष बंडखोराचे बंड मोडीत काढण्यासाठी दोन्ही राजेंनी प्रयत्न सुरू केले आहेत. जे अर्ज मागे घेणार नाहीत त्यांना काल झालेल्या दोन्ही राजेंनी संयुक्त घेतलेल्या पत्रकार परिषदेतून इशारा वजा दम दिला आहे. मात्र आज दुपारी एक वाजेपर्यंत अपक्ष उमेदवारी अर्ज मुदत असल्याने हे दोन्ही राजे आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंड कसे थंड करतात हे पहावं लागणार आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी
194
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 21, 2025 04:49:05
Dhule, Maharashtra:थंडीच्या लाटेचा परिणाम आता फळभाज्यांच्या दरांवर ही दिसू लागला आहे. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टमाटेचे दर विक्रमी वाढलेले आहेत. वाढत्या थंडीमुळे टमाट्याचे उत्पन्न कमी झालेला आहे. त्यामुळे टमाटे दर दुपटीने वाढलेला आहे. आठवड्यापूर्वी 20 किलो टमाट्याचे कॅरेट 400 ते 500 रुपयांपर्यंत मिळत होता. मात्र तेच आता वीस किलोचे कॅरेट 1000 रुपयांपर्यंत विकला जात आहे. त्यामुळे या दरवाढीचा फटका ग्राहकांना बसणार आहे. मात्र याचा फायदा शेतकऱ्यांना होणार नाही कारण की, वाढत्या थंडीमुळे टमाट्याचे उत्पन्न कमी झालेला आहे. त्यामुळेयां दर वाढीचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही अशी परिस्थिती आहे. येणारे काही दिवस थंडीचा परिणाम असाच कायम राहिलास दर अजून वाढण्याची शक्यता आहे.
115
comment0
Report
Advertisement
Back to top