Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane401105

गायमुख घाट में कंटेनर पलटने पर क्रेन गिरा, यातायात भारी बाधित

PTPRATHAMESH TAWADE
Nov 27, 2025 12:48:19
Mira Bhayandar, Maharashtra
गायमुख घाट परिसरातील घटना अँकर ठाणे हद्दीत येणाऱ्या गायमुख घाट परिसरात दुपारी कंटेनर पलटी झाल्याची घटना घडली आहे. डबल एक्स क्रेनच्या मदतीने कंटेनर उचलण्याचे काम सुरू असताना तो अचानक रोडच्या डाव्या बाजूला क्रेन सोबत पलटी झाला. अपघातानंतर परिसरातील वाहतूक मोठ्या प्रमाणात मंदावली असून एका बाजूचीच वाहतूक सुरू आहे. सध्या रस्ता एकेरी करण्यात आला असून वाहनचालकांना खबरदारीने प्रवास करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पोलिस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी तैनात असून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAABHISHEK ADEPPA
Nov 27, 2025 13:34:29
Solapur, Maharashtra:इतक्या मोठ्या बलाढ्य शक्तीसोबत आमचा गेल्या अडीच वर्षांपासून संघर्ष सुरू आहे - विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान तसेच उपोषणादरम्यान आमच्या व्यथा आम्ही सांगितल्या - दरोडाच्या प्रकरणी प्रत्येक पोलिसांना हाताशी धरल आहे, मुलाच्या शिक्षणाच्या बाबतीत एज्युकेशन डिपार्टमेंटला हाताशी धरला आहे - मतदार यादीतून नाव गायब करताना तहसील प्रशासनाला हाताशी धरला आहे - ऊस बिलाच्या बाबतीत सर्व सहकार खात्यातील मंडळींना हाताशी धरला आहे - कुठेही न्यायाची भूमिका नाही त्यामुळे जनतेसमोर प्रश्न मांडले होते - खूप वेळा धमकी येतात, मुलाच्या कामा वेळेस पाठलाग केला जातो - माझ्या मुलाचा पुण्यमध्ये अपहरण करण्याचा प्रयत्न केला - एकदा गावामध्ये गेल्यानंतर पाच पाचशे लोकांचा जमाव अंगावरती आला - निवडणुकीच्या दरम्यान महाराष्ट्र 15 दिवस झालं पाहतोय यांनी अडचणी कशा निर्माण کےल्या त्यानंतर त्यांनी कोर्टासमोर आम्ही हे केलं नाही म्हणून सबमिशन सादर केलं - प्रशासकीय अधिकारी कागदपत्रांमध्ये घोळ केला, अर्ज बाद केला न्यायालयाने फेटाळला - एका महिलेसाठी त्यांना एवढं करावं लागलं जर पत्ताच कट करण हे त्यांचा हाताच मळ आहे, आधी खून प्रकरण पचवलेले आहेत - पंडित देशमुख यांचा प्रकरण गेले वीस वर्षे झाले गाजत आहे - संतोष देशमुख यांच्यासारखे होईल... वैभवी देशमुख जशी फिरतेय... तिच्या मागे चुलता तरी आहे माझ्या मुलाच्या मागे चुलता नाही - जर काही घातपात झाला तर इतिहास तरी सर्वांनी पाहिला आहे - मी सुरुवात तरी केली आहे जनतेच प्रेम माझ्या पाठीशी आहे - सर्व पुरावे मिटवले गेले आहेत... - या सगळ्यातून वाचले तर 2029 ची कुठलीही लढाई असू दे राजकीय, कायदेशीर, किंवा रणांगणात शेतकरीन आहे मी - कमरेला कोयता बांधला आहे पोराच्या हातात नांगर दिलाय.. कोणत्याही लढाईमध्ये लढणारच आहोत - 2029 अनगर नगरपंचायतीबाबत ताकतीने उभी राहून 17 च्या 17 पॅनल लढवणार... देवाने पाच वर्षांचा अवधी दिला आहे.. भरपूर काही करू शकते...
32
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Nov 27, 2025 13:22:48
Nala Sopara, Maharashtra:नालासोपारा - वसई रेल्वे स्थानक दरम्यान घटना नालासोपारा - वसई दरम्यान लोकलमध्ये लटकून प्रवास करण्याच्या धोक्याची पुन्हा एकदा प्रचिती देणारी गंभीर घटना घडली आहे. आज सकाळी ९:१० वाजता नालासोपाराहून चर्चगेटकडे जाणाऱ्या अप लोकलमध्ये दोन प्रवासी खाली पडल्याची दुर्घटना घडली. या अपघातात प्रतीश बाळाराम भोले, वय ३५, रा. म्हसळा जिल्हा रायगड यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर नानासाहेब बंधने, वय ३२, हे गंभीर जखमी असून त्यांना तात्काळ नालासोपाऱ्यातील रिद्धी-विनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचून त्यांनी दोघांना ट्रेन मध्ये टाकून रेल्वे स्थानकात आणले, दररोजची वाढती गर्दी, आणि त्यातून वाढणारे धोकादायक लटकून प्रवासाचे प्रकार—या समस्येकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले जात आहे. प्रवासी संघटनांनी सुरक्षित प्रवासासाठी तत्काळ उपाययोजना आणि गाड्यांची संख्या वाढवण्याची मागणी केली आहे.
28
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 27, 2025 13:21:16
Shirur, Maharashtra:सचिन आहेर- शिवसेना नेते शिरूर नगरपरिषदेच्या महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांसह प्रचार रॅलीची सुरुवात आमदार सचिन आहेर यांच्या हस्ते झाली. नगरपरिषदेच्या निवडणुका या स्थानिक प्रश्नांवर आधारित असायला हव्यात, असे आहेर यांचे मत. 'ही निवडणूक जिल्हा परिषदेपेक्षाही स्थानिक जनजीवनाशी निगडित आहे,' असे त्यांनी सांगितले. 'राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री स्वतः नगरपालिकेच्या निवडणुकीत उतरतात, याचा अर्थ स्थानिक नेतृत्वावर त्यांचा विश्वास उरलेला नाही,' असा सवाल उपस्थित. 'गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही म्हणत होतो ५० खोके एकदम ओके — आज BJP च्या आमदारांनीच त्यावर शिक्कामोर्तब केले.' 'मुख्यमंत्र्यांकडे नैतिकता उरली असेल तर आपल्या पक्षाच्या आमदारांच्या आरोपांची चौकशी व्हायला हवी,' अशी मागणी. 'एका बाजूला क्लिप, तर दुसऱ्या बाजूला फाशी — हे महायुतीतील विसंवादाचं लक्षण आहे.' 'महायुतीमध्ये काही आलबेल नाही; नेत्यांना महिन्यातून दोनदा दिल्ली स्वारी करावी लागते,' असा टोला. 'नगरपालिका निवडणुका संपल्यानंतर जिल्हा परिषद आणि महानगरपालिका पातळीवर राजकीय भूकंप होणारच,' असा दावा. '५० खोके प्रकरणी चौकशी करावी, कारण आता आरोप विरोधकांनी नव्हे तर स्वतः BJP आमदारांनी केले आहेत,' अशी मागणी. 'महाविकास आघाडी उत्साहाने मैदानात उतरली असून नागरिकांच्या प्रश्नांवर उपाय देण्यास वचनबद्ध आहे,' असे सचिन आहेर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
65
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Nov 27, 2025 13:15:45
Virar, Maharashtra:राजकीय नेते , सीने कलाकारांची उपस्थिती तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम अँकर - विरार पूर्वेतील शिरगाव येथे आज भक्तीभावाने न्हाऊन निघालेला सोहळा… श्री द्वारकाधीश मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवातील वचनामृत कार्यक्रम मोठ्या श्रद्धाभावाने संपन्न झाला. परमपूज्य जगदगुरू शंकराचार्य स्वामिश्री: अविमुक्तेश्वरानंद: सरस्वती ‘१००८’ यांनी सकाळी ९ ते १०.३० या वेळेत भाविकांना अध्यात्म, भक्ती आणि धर्मपरंपरेवर आधारित प्रेरणादायी मार्गदर्शन केले. या आधी, त्यांच्या शुभहस्ते मंदिराच्या द्वार उद्घाटनाचा सोहळा पार पडला होता. कार्यक्रमस्थळी सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली होती. स्वामिश्रींच्या उपस्थितीने संपूर्ण परिसरात भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले. समस्त ठाकुर परिवार यांच्या वतीने आयोजन करण्यात आलेल्या या महोत्सवात विविध धार्मिक विधी, कीर्तन आणि सत्संगाला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिरगाव, विवा आर्किटेक्चरल महाविद्यालयाजवळ उभारण्यात आलेल्या मंदिर परिसरात आज दिवसभर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
98
comment0
Report
KPKAILAS PURI
Nov 27, 2025 12:50:55
Pimpri-Chinchwad, Maharashtra:Anchor : हिंजवडीत वीस मुलांना अंगणवाडीत कोंडून ठेवल्याचा प्रकार घडला. हा प्रकार धक्कादायक व्हिडीओ समोर आणला. त्यानंतर हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य शिवनाथ जांभुळकर यांनी बैठकीला बोलावलं असा खुलासा अंगणवाडी सेविका सविता शिंदे यांनी केला. त्यामुळं जांभुळकर यांनी कोणत्या अधिकारात सेविका आणि मदतनीस यांना ग्रामपंचायतीत बैठकीला बोलावलं. याचा तपास ही पोलिसांकडून केला जातोय. वीस मुलांना अंगणवाडीत कोंडून ठेवणं ही बाब धक्कादायक असल्यानं कठोर कारवाई अपेक्षित आहे. सविता शिंदे - अंगणवाडी सेविका, हिंजवडी हृषीकेश घाडगे - पोलीस निरीक्षक, हिंजवडी दरम्यान , अंगणवाडीत मुलांना कोंडून ठेवा अन दोघींनी बैठकीला या. असं मी म्हणालो नाहीच. असा खुलासा हिंजवडी ग्रामपंचायतीत बैठकीला बोलावलं म्हणून ज्यांचं नाव सेविकेने घेतलं, त्या माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य शिवनाथ जांभुळकर यांनी केलाय. कारण बैठक हिंजवडीतील सहा अंगणवाडीच्या सुपरवायझर यांनी बोलावली होती. मी ग्रामपंचायच्‍याच्या शिक्षण विभागाचा सदस्य असल्यानं त्या बैठकीत उपस्थित राहणार होतो. ग्रामपंचाय ≤ने अंगणवाडीला दिलेल्या वस्तू गहाळ झाल्यात, त्याची मला माहिती घ्यायची होती. मी बैठक बोलावण्याचा विषय येत नाही. असा खुलासा शिवनाथ जांभुळकर यांनी केलाय. बाईट - शिवनाथ जांबुळकर, शिक्षण विभाग सदस्य
61
comment0
Report
SKSACHIN KASABE
Nov 27, 2025 12:50:03
Pandharpur, Maharashtra:तुमच्या शहराचा विकास करायचा असेल तर त्यासाठी पैसा लागतो सगळं काही करता येत पण त्याच सोंग करता येत नाही. त्यामुळे मतदारांनी सत्तेत असलेल्या पक्षाच्या सोबत राहावं असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुर्डूवाडी येथील प्रचार सभेत दिला आहे. सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा झाली. यावेळी माजी आमदार संजय मामा शिंदे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित होते. अजित पवार यांनी कुर्डूवाडी नगरपालिका चे बजेट पाच सहा कोटीच्या आसपास असेल आणि यामध्ये कोणीही कितीही कर्तुत्वान असला त्याची विकास करण्याची इच्छा असली तरी एवढ्या रकमेमध्ये शहराचा विकास करू शकत नाही त्यासाठी पैसा लागतो. त्यामुळे सरकारमधील कोणीतरी सोबत लागतो. त्यामुळे मतदारांनी एनसिपी सोबत राहण्याचे आवाहन केले आहे
86
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Nov 27, 2025 12:20:46
Pune, Maharashtra:अहिल्यानगर सोलापूर रोडवर आष्टी येथील सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी राम खाडे यांच्यावर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला आहे या हल्ल्यात राम खाडे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर आणि नंतर पुण्यामध्ये उपचार सुरू आहेत दरम्यान या प्रकरणात राम खाडे यांच्यासोबत असलेल्या सहकार्यांनी भाजप आमदार सुरेश धस यांनी हल्ला घडवून आणला असल्याचा आरोप केला आहे यावर आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली असून हे आरोप हास्यास्पद असल्याचं सांगत लोकप्रतिनिधींवर उठ सुट कुठलेही आरोप करायचे असाच प्रकार असल्याचे म्हटले आहे कोणी कोणाचेही घोटाळे बाहेर काढतो आणि त्यातून झाल्य wfादातून हा हल्ला झाला असावा मात्र यात कारण नसताना माझं नाव गोवल जात आहे या प्रकरणाची कुठलीही चौकशी लावा आपण तयार असल्याचं देखील धस धस यांनी म्हटलं आहे
139
comment0
Report
UPUmesh Parab
Nov 27, 2025 12:20:27
Oros, Maharashtra:विजय केनवडेकर प्रेस काल माझ्या घरात येऊन केलेला प्रकार हा निंदनीय होता.. माझ्या घरात मी नसताना माझे वयोवृद्ध आई होती असे असताना माझ्या घरात निलेश राणे बाहेरून शुटिंग करत आले. माझे घरात ते अनधिकृत पने आले. माझ्या घरात सापडलेले पैसे हे के के बिल्डिंरस चे होते याच निलेश राणेंसाठी अम्ही निवडणुकीसाठी काम केले आहे. सात मजली माझा इमारत उभी होत आहे.आम्ही कष्टकरी म्हणून काम करतो.रवींद्र चव्हाण यांनी मला वडिलांसारखा हात दिला. नारायण राणे यांनी माझ्यावर मुलांसारख प्रेम केलं रवींद्र चव्हाण यांच्याबरोबर संबंध आहात म्हणून मला त्रास दिला जातो. माझ्या घरात अनधिकृत पाने घरात घुसले.नितेश राणे यांनी मला धीर दिला आहे. राजकारण दोन तारखेला संपेल..आम्हाला उगाच दहशतीखाली ठेवलं आहे. पोलिसांना अजूनही मी आव्हान करतो माझ्या घरत अजूनही झडती करू शकता. माझ्या बिल्डरच्या व्यवसायातील हे पैसे आहेत.त्या पैशाचा व भाजपाचा काही संबंध नाही माझ्यावर कितीही दबाव आणला तरी मी घाबरणार नाही मी अधिक जोमाने भाजपच काम करणार. मी कुणाला पैसे दिलं हे पुराव्यासहित सिद्ध करून दाखवा *माझ्या घरात अनधिकृत पने घुसल्याचा मी तक्रार करणारा आहे* कोणी कितीही दबाव आणला तरीमी भारतीय जनता पार्टी मरे पर्यंत सोडणार नाही माझ्याजवळ अनेकांच्या कुंडल्या आहेत निलेश राणे यांचे कान फुंकणारे बरेच जण आहेत निलेश राणे यांच्यासोबत मी दहा वर्षे काम केलं
112
comment0
Report
SKSACHIN KASABE
Nov 27, 2025 12:20:14
Pandharpur, Maharashtra:राज्यात एकीकडे भाजप आणि शिवसेनेकडून हिंदुत्ववादी मतांना साद घातली जात आहे. दुसरीकडं नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने अजित पवार यांनी दलित आणि मागासवर्गीय मतं आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शिव शाहू फुले आंबेडकरांचा विचार हा देशाचा आत्मा आहे. हाच विचार महाराष्ट्राची विचारधारा आहे. भविष्यात देखील हीच विचारधारा राहील. आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आत्मा आहे. याच्या शिवाय कोणी जिवंत राहू शकत नाही. मागासवर्गीय समाजातील पानपट्टी चालवणाऱ्या अण्णा बनसोडेला आपण विधानसभेचा उपाध्यक्ष केले. हसन मुश्रीफ यांना मंत्री केले. सना मलिकला आमदार केले. इद्रिस नायकवाडीला विधान परिषदेत आमदार केले. केवळ एक अल्पसंख्यांक आमदार तिथे आहे. अशी उदाहरणे देऊन अजित पवार यांनी दलित मुस्लिम समाजाची भाजप पासून दूर जाणारी मते आपल्याकडे वळवण्याचा जोरदार प्रयत्न सुरू केला आहे
137
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Nov 27, 2025 11:35:16
Parbhani, Maharashtra:अँकर- हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी पन्नास कोटी रुपये घेतले असा आरोप भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी केलाय, मला मुंबईत एकदा आमदार बांगर यांनीच 50 कोटी घेतल्याचे सांगितलं होतं असा गंभीर आरोप आमदार तानाजी मुटकुळे यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ माजली असून एकनाथ शिंदे यांच्या पक्षफुटीची चर्चा रंगलीय... बिंदू- बहुमत चाचणीला उद्धव ठाकरे कडे असलेले संतोष बांगर मुख्यमंत्री यांना पाठिंबा देण्यासाठी 24 तासात तिकडे दिसले, साडे तीन वर्षांच्या नंतर आमदार बांगर त्यांच्या स्वभावामुळे वारंवार चर्चेत आले,पण आता नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने हिंगोली नगर पालिकेत आमदार बांगर यांनी त्यांच्या भावजईला निवडणुकीच्या रिंगणात उतरवीत, हिंगोली नगर परिषदेची निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे, आमदार बांगर यांनी भाजपच्या अधिकृत उमेदवारांना निवडणुकीतून माघार घ्यायला लावल्याने भाजपचे हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे आक्रमक झाले असून मागील काही दिवसांपासून आमदार बंगर आणि मुटकुळे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहेत,पण आज आमदार मुटकुळे यांनी पक्षफुटीवेळी आमदार बांगर यांनी 50 करोडो रुपये घेऊन एकनाथ शिंदे यांना साथ दिल्याचा गंभीर आरोप केल्याने संतोष बांगरसह शिंदे सेनाच चर्चेत आली आहे. गोषवारा- तानाजी मुटकुळे- आमदार भाजप,हिंगोली तथ्य- आमदार तानाजी मुटकुळे यांनी केलेल्या आरोपाबद्दल आमदार संतोष बांगर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी माध्यमाला बोलण्यास नकार दिला. पण हिंगोलीचे पूर्वाश्रमीचे खासदार तथा विधान परिषद सदस्य हेमंत पाटील यांनी मात्र आमदार संतोष बांगर यांनी कुठलेही पैसे घेतले नाहीत तर ते एकनाथ शिंदे यांच्या वर विश्वास ठेवून शिंदे गटात गेले असल्याचं स्पष्टीकरण दिलं. बिंदू- हेमंत पाटील- विधान परिषद सदस्य-शिंदे गट आमदार तानाजी मुटकुळे यांनी आमदार बांगर यांच्यावर केलेला हा गंभीर आरोप शिवसेना शिंदे गटात गेलेल्या 40 आमदारांना दुखावणारा असाच असून महायुतीमध्ये असलेल्या एकनाथ शिंदे यांनाही अडचणीचा वाटणारा असाच आहे, अगोदरच नाराज असलेले एकनाथ शिंदे भाजप कडून वारंवार दुखावले जात आहेत, अश्या होऊ लागलेल्या आरोपानंतर आमदार बांगर आणि एकनाथ शिंदे नेमकी कोणती भूमिका घेतात किंवा काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गजानन देशमुख झी मीडिया हिंगोली
147
comment0
Report
Advertisement
Back to top